Ahilyabai Holkar Information In Hindiनमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या या प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे .मित्रांनो शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे बलिदान दिले त्यांच्या मावळ्यांनी जी शिकस्त केली ती अलौकिक आहे. पूर्वीच्या काळात फक्त पुरुषच नव्हे तर स्त्रिया ही पराक्रमी लढवय्या अशाच होत्या .

अहिल्याबाई होळकर यांची संपूर्ण माहिती Ahilyabai Holkar Information In Hindi
तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण अशाच एका महान शासक पराक्रमी योद्धा अशा एका महान स्त्रीची माहिती पाहणार आहोत .अर्थातच या महान शासक पराक्रमी योद्धा धनुर्धार म्हणजेच महाराणी अहिल्याबाई होळकर होय .अहिल्याबाई होळकर यांची ख्याती ही सर्व दूर पसरलेली होती. अहिल्याबाई होळकर या अशा स्त्री होत्या ज्यांनी आपल्या राज्याच्या रक्षणार्थ अन्यायाविरुद्ध खूप मोठा लढा दिला होता .
मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून अहिल्याबाई होळकरांची ओळख होती .त्यांच्या साहसाला व प्रतिभेला पाहून मोठमोठे राजे व अनेक प्रभावशाली शासक आश्चर्यचकित होत असे .महिलांनी लढवय्या झालं पाहिजे व त्यांची परिस्थिती ही बदलली गेली पाहिजे या विचारांच्या अहिल्याबाई होळकर होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्याकरिता त्यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे .
अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळात विधवा महिलांना त्यांचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी लढा दिला. विधवा स्त्रीला आपल्या पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळवून दिला व अशा स्त्रीला मुलं दत्तक घेण्याचा देखील अधिकार प्राप्त करून दिला. अहिल्याबाई होळकर या खूप प्रेमळ निष्ठावान दयाळू अशा स्वभावाच्या होत्या. त्यामुळे उत्तम समाजसेविका दया व करुणेची देवी या शब्दांमध्ये त्यांची महती सांगितली जाते .तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण त्यांच्याविषयी संक्षिप्त माहिती पाहणार आहोत.
नाव | अहिल्याबाई साहिबा होळकर |
जन्म | 31 मे 1725 |
जन्मस्थान | चौंडी, जामखेड, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | 13 ऑगस्ट 1795 |
पती | खंडेराव होळकर |
सुशीलाबाई शिंदे | |
वडील | मानकोजी शिंदे |
अपत्य | मालेराव (मुलगा), मुक्ताबाई (मुलगी) |
अहिल्याबाई होळकर यांचे प्रारंभिक जीवन –
त्यांचे पूर्ण नाव अहिल्याबाई साहिबा होळकर असे होते. त्यांचा जन्म सन 1725 रोजी 31 मे या दिवशी चौंडी गावात जामखेड जवळ अहमदनगर जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या पतीचे नाव हे खंडेराव होळकर तर वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते. मालेराव व मुक्ताबाई ही अहिल्याबाई होळकर यांची दोन आपत्य होय.
चौंडी या गावचे पाटील म्हणून ओळखले जाणारे माणकोजी शिंदे व सुशीलाबाई यांच्या कन्या म्हणजेच अहिल्याबाई होळकर .माणकोजी शिंदे हे पुढारलेल्या विचारांचे होते व स्त्री ही सक्षम झाली पाहिजे स्त्रीने शिक्षण घेतले पाहिजे, धनुर्विद्या शिकली पाहिजे, तलवारबाजी शिकली पाहिजे ,अशा विचारांचे ते होते.
तो काळ असा होता की त्यावेळी महिलांना घराबाहेर पाऊल ठेवणे देखील खूप कठीण होते. त्यावेळी मानकोजी शिंदे यांनी आपल्या लेकीला म्हणजेच अहिल्याबाईंना शिक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली. त्यांचे बरेचसे शिक्षण वडिलांच्या देखरेखितच पूर्ण झाले. लहानपणापासूनच अहिल्याबाई या खूप प्रगल्भ बुद्धीच्या होत्या. कुठलाही विषय त्या लगेच आत्मसात करत .पुढे जाऊन आयुष्यात त्यांनी आपल्या सहासाने व प्रतिभेने सर्व जगाला आश्चर्याचा धक्काच दिला.
अहिल्याबाईंचा विवाह-
लहानपणापासूनच अहिल्याबाई यांच्या मनात दया प्रेम करुणा हे भाव उपजतच होते. एके दिवशी पुण्याला जात असताना मावळ प्रांताचे प्रशासक मल्हारराव होळकर हे चौंडी येथे विश्राम करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांनी अहिल्याबाईंना पाहिले .
एका भुकेल्या व्यक्तीला अहिल्याबाई या अन्न भरवत होत्या. एका मोठ्या शासकाची मुलगी इतक्या दयेने, प्रेमाने, एका गरीब व्यक्तीला प्रेमाने खाऊ घालते हे पाहून मल्हारराव होळकर हे खूप प्रभावित झाले. मल्हारराव होळकरांनी लगेच माणकोजी शिंदे यांची भेट घेऊन आपले पुत्र खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्याबाईंचा हात मागितला .
सर्व गोष्टी जुळवून आल्यानंतर सन 1773 रोजी अहिल्याबाईंचे वय आठ वर्ष इतके असताना मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत अहिल्याबाईंचा विवाह संपन्न झाला .होळकर हे कुटुंब मराठा साम्राज्यातील महत्त्वाचे शासक कुटुंब म्हणून ओळखले जात होते. अहिल्याबाई या होळकर कुटुंबातील सुनबाई झाल्या .लग्नानंतर म्हणजेच सन 1745 रोजी अहिल्याबाईंना मालेराव नावाचे पुत्ररत्न प्राप्त झाले .
सन 1748 रोजी मुक्ताबाई नावाचे आपत्य अहिल्याबाईंच्या पोटी जन्माला आले. आपले पती खंडेराव होळकर यांना अहिल्याबाई यांनी नेहमी राजकारभाराच्या कामात मदत करत असे .अहिल्याबाई या लहानपणी तलवारबाजी नेमबाजी शिकलेल्या होत्या त्यामुळे सैन्या बद्दलच्या बाबतीतही त्या विशेष लक्ष घालत असे. अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर हे देखील युद्ध कलेमध्ये अत्यंत निपुण होते .
त्यांनी आपले वडील मल्हारराव होळकर यांच्या देखरेखित युद्ध कौशल्य अवगत केले होते .अहिल्याबाईंची आज जी प्रतिमा समाजात आहे त्यामध्ये त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा आहे असे म्हणावयास काहीच हरकत नाही .मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला नेहमीच राजकारभारात सैन्याच्या कारभारामध्ये लक्ष घालण्यास प्रोत्साहन दिले .अहिल्याबाई यांची कुशाग्र बुद्धी पाहून मल्हारराव होळकर त्यांच्यावर नेहमीच खुश असायचे .
संघर्षमय प्रवास –
अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर हे देखील युद्ध कलेमध्ये निपुण होते. मराठा साम्राज्यांमध्ये त्यावेळी स्वराज्य वाचवण्यासाठी युद्ध चालू होते .अहिल्याबाईंचे सुखाचे संसाराचे दिवस चालू असतानाच अचानक त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो व अहिल्याबाई या 21 वर्षाच्या असतानाच म्हणजेच सन 1754 रोजी त्यांचे पती खंडेराव होळकर यांना कुंभेर या ठिकाणी युद्धामध्ये वीरगती प्राप्त होते .आणि इतिहासकारांच्या मते अहिल्याबाईंचे आपल्या पतीवर अतोनात प्रेम होते आपल्या पतीच्या निधनानंतर मानसिक दृष्ट्या त्या कोलमडून पडल्या होत्या.
आपल्या पतीच्या निधनानंतर सती जाण्याचा निर्णय अहिल्याबाईंनी घेतला होता परंतु मल्हारराव होळकरांनी असे घडवून न देता त्यांच्यातील स्त्री शक्तीला जागे करून प्रशासनाचे व राज्यकारभाराचे काम पाहण्यात त्यांचे मन रमवण्यास सुरुवात केली. पण अहिल्याबाईंचा संघर्षमय प्रवास चालू असतानाच सन 1766 रोजी मल्हारराव होळकरांचे देखील निधन झाले .पण अहिल्याबाई या न खचता न डगमगता स्वराज्य रक्षणासाठी उभ्या राहिल्या.
अवघ्या मावळ प्रांताची जबाबदारी अहिल्याबाईंच्या खांद्यावर होती .राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी त्यांनी आपले चिरंजीव मालेराव होळकर यांची देखील मदत घेतली. अहिल्याबाईंनी राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतल्यानंतर थोड्याच दिवसात म्हणजे 1767 रोजी मालेरावांचा देखील युद्धामध्ये मृत्यू झाला.
आता अहिल्याबाई या पूर्णपणे खचून गेलेल्या होत्या त्यांना असे वाटत होते की त्यांचे सर्व आधारस्तंभ देवाने अचानक काढून घेतली की काय! आधी त्यांचे पती नंतर वडिलांप्रमाणे असणारे त्यांचे सासरे त्यानंतर त्यांचे आपत्य असे सलग तीन मृत्यू त्यांनी अगदीच जवळून पाहिले होते.
पण एवढ्या सगळ्या परिस्थितीतही त्यांनी मावळ प्रांतात जे प्रशासन केले ते वाखाण्याजोगे होते. त्यांनी कधीच आपल्या वैयक्तिक आयुष्याची झळ सामान्य प्रजेला बसू दिली नाही .मावळ प्रांताचा डोंगर ढासळत असताना त्यांनी स्वतः उत्तर अधिकारी होण्याचा निर्णय घेतला व त्यांनी पेशव्यांकडे तशी विनंती पत्र देखील पाठवली.
11 डिसेंबर 1967 रोजी अहिल्याबाईंनी मावळ प्रांताचे सर्व सूत्र आपल्या हाती घेत, मावळ प्रांताचे प्रशासन सुरू केले. पण समाजातील बऱ्याच लोकांना त्यांचा हा निर्णय पटला नाही .अहिल्याबाईंनी प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी मल्हारराव होळकरांचे दत्तक पुत्र तुकोजीराव होळकर यांना आपल्या सैन्याचे प्रधान सेनापती म्हणून नियुक्ती दिली.
अहिल्याबाईंनी अनेक युद्ध अचूक रणनीती आखून जिंकले देखील होते .युद्धामध्ये एखाद्या पराक्रमी योद्धा सारखे वेळप्रसंगी हत्तीवर स्वार होऊन अहिल्याबाईंनी शत्रूवर बाणांचा वर्षाव केलेला आहे. ज्यावेळी त्यांनी प्रशासनाची सूत्रे हाती घेतली तो काळ थोडा अशांततेचाच होता त्यावेळी मावळ प्रांतामध्ये चोरी मारी, लूट, हत्या या घटना वाढू लागल्या होत्या .
पण अहिल्याबाईंनी वेळीच अपराध्याच्या मुस्क्या आवळून सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. मावळ प्रांतांमध्ये सुरक्षितता व शांतता प्रस्थापित करण्यात त्या यशस्वी झाल्या. जस जस वर्ष उलटू लागली तसतसं अहिल्याबाईंनी मावळ प्रांताचा विकास करण्यास सुरुवात केली.
कला, व्यवसाय ,शिक्षण या क्षेत्रात विकासाची दारे त्यांनी सर्वांसाठीच खुली केली. हळूहळू अहिल्याबाईंची कीर्ती ही सर्व दूर पसरू लागली .आपल्या दूरदृष्टीकोनातून अहिल्याबाई या शत्रूच्या मनात चाललेल्या हालचाली अचूक हेरून घेत असत. अहिल्याबाईंनी आपल्या दूरदृष्टी कोनातून इंग्रजांचे डावपेच वेळीच लक्षात घेऊन पेशव्यांना देखील सावध करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता.
अहिल्याबाई यांची विकासकामे-
अहिल्याबाईंनी आपल्या कार्यकाळामध्ये इंदोर या शहराचे नंदनवन केले होते. त्यांनी इंदोरच नव्हे तर संपूर्ण मावळ प्रांतामध्ये तसेच आजूबाजूच्या प्रांतांमध्ये देखील विकास कामे हिरहिरीने ने पूर्ण केली होती. त्यांनी विशेष करून गरिबांसाठी विधवा अबला स्त्रियांसाठी अनाथ बालकांसाठी मोफत विश्रामगृहे, मोफत अन्न, मोफत निवारा, अशा अनेक सुखसोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.
अहिल्याबाई यांची महादेवावर अपार श्रद्धा होती .सन 1777 रोजी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार देखील केला होता. अहिल्याबाईंचे अद्वितीय कार्य पाहून महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नावे पुरस्कार देखील देण्यास सुरुवात केली.
सतत प्रजेसाठी कार्य करत असताना अहिल्याबाईंना 13 ऑगस्ट 1795 रोजी प्रकृतीच्या कारणांमुळे देवाज्ञा प्राप्त झाली, परंतु समाजापुढे त्यांनी जो आदर्श ठेवला होता तो कायम प्रज्वलितच राहिला.
धन्यवाद!!!!
FAQ
1. अहिल्याबाई होळकर ह्या कोण होत्या?
अहिल्याबाई होळकर चरित्र – अहिल्याबाई होळकर (१७२५-१७९५) या माळव्याच्या राज्याच्या राणी होत्या. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चोंडी गावात झाला आणि नंतर त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. माणकोजी शिंदे या धनगर समाजाच्या त्या कन्या होत्या ज्यांनी गावचे पाटील म्हणून काम केले.
2. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म कधी झाला?
31 मे 1725
3. अहिल्याबाई होळकर यांनी कोणत्या शहरात कापड उद्योगाची स्थापना केली?
अहिल्याबाईंनी महेश्वरमध्ये कापड उद्योगही स्थापन केला, जो आज माहेश्वरी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी तिने दररोज सार्वजनिक श्रोते धरले.
4. अहिल्याबाई होळकर यांची जयंती कधी असते?
३१ मे २०२२ रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे.