अक्षय तृतीयाची संपूर्ण माहिती Akshaya Tritiya Information In Marathi

Akshaya Tritiya Information In Marathi सनातन हिंदू धर्मामध्ये कुठलीही गोष्ट करताना मुहूर्त पाहणी हे पहिल्यापासूनच केले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजले जाणाऱ्या अक्षय तृतीया या सणाला विविध महत्त्वाची कामे अथवा खरेदी केली जाते. तसेच विविध लोक गुंतवणूक देखील करताना या मुहूर्ताची निवड करतात.

Akshaya Tritiya Information In Marathi

अक्षय तृतीयाची संपूर्ण माहिती Akshaya Tritiya Information In Marathi

खरे तर हिंदू धर्मामध्ये वैशाख या महिन्यालाच फार महत्त्व आहे. आणि या महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. या दिवशी नदीमध्ये स्नान करणे आणि गरजू लोकांना विविध प्रकारचे दान करणे चांगले समजले जाते.

तसेच सोन्याच्या खरेदीसाठी सर्वात उत्तम मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया समजला जातो. अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असे म्हणजे अक्षय. अशा या तृतीयेच्या दिवशी येणाऱ्या मुहूर्ताला अक्षय तृतीया म्हणून ओळखले जाते.

आजच्या भागामध्ये आपण अक्षय तृतीया या मुहूर्तमय सणाबद्दल माहिती घेणार आहोत…

आज काल प्रत्येकाला कर्मापेक्षा फळाची चिंता जास्त असते, त्यामुळे प्रत्येक जण चांगली फळे देणारेच कर्म करण्याकडे वळतात. अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी केलेले दान धर्म आणि खरेदी ही भावी आयुष्यासाठी खूप चांगली समजली जाते.

विशेषतः हिंदू धर्मीयांसाठी अक्षय तृतीया हा खूप शुभ दिवस समजला जातो. प्रत्येक हिंदू व्यक्ती मोठ्या उत्साहाने आणि भक्ती भावाने हा सण साजरा करत असतो. तसेच जैन धर्मीय देखील या दिवशी उत्साहात आढळून येतात.

अक्षय तृतीया सण आणि धार्मिक मान्यता:

हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया या सणाचा संबंध भगवान विष्णू यांच्या जन्माशी जोडला जातो, मात्र काही जण कृष्णाशी सुद्धा या सणाचा संबंध जोडतात. धर्मिक मान्यतेनुसार श्री परशुराम जे श्री विष्णू यांचे पार्थिव स्वरूप होते त्यांचा हा जन्मदिवस आहे. श्री विष्णू यांनी परशुरामाच्या रूपाने सहावा अवतार घेतला होता.

भगवान विष्णू हे त्रेतायूग आणि द्वापार युग इथपर्यंत विविध अवतारांच्या रूपात पृथ्वीवर जिवंत होते. त्यांनी आपला सहावा अवतार जमदग्नी ऋषी यांच्या पोटी परशुराम म्हणून घेतला. हा दिवस होता अक्षय तृतीयेचा. त्यामुळेच त्यादिवशी परशुराम जयंती आणि अक्षय तृतीया या दोन्हीही गोष्टी मोठ्या भक्ती भावाने साजऱ्या केल्या जातात.

हिंदू धर्माबरोबरच जैन धर्म देखील अक्षय तृतीयेला खूप महत्त्व देतो. या दिवशी जैन धर्माचे तीर्थंकर ऋषभदेव यांना प्रसिद्धी मिळाली. या वृषभदेव यांनी आहाराचार्य लोकप्रिय केले होते. त्यामुळे जैन लोक देखील या दिवसाला खूप महत्त्व देतात.

अशी आख्यायिका सांगितली जाते की, तीर्थंकर ऋषभदेव यांनी सहा महिन्यांसाठी निर्जल उपवास केला. हा उपवास संपल्यानंतर ते बाहेर ध्यानस्थ बसले, आणि आहारासाठी वाट बघू लागले. त्यांच्या प्रजाजनांनी विविध आभूषणे, रत्ने, घोडे, दाग दागिने देऊ केले, मात्र त्यांना केवळ अन्नाची भूक होती.

अन्न मिळवण्यासाठी त्यांनी तब्बल एक वर्ष तपश्चर्या केली आणि राजा श्रेयांश यांना प्रसन्न केले. ज्यांनी तीर्थंकर ऋषभदेव यांना उसाचा रस पाजून त्यांचा उपवास सोडविला, आणि तो दिवस अक्षय तृतीयेचा असल्यामुळे जैन धर्मीय देखील या दिवशी सण साजरा करतात.

अक्षय तृतीयेची पूजा कशी करावी:

या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना खूप महत्त्व दिले जाते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू ची पूजा करून विष्णू देवाला तांदूळ अर्पण केले जातात. तसेच नैवेद्य दाखवून आणि तुळशीची पाने अर्पण करून आरती केली जाते. तसंच काही ठिकाणी कैरी, चिंच आणि गुळ पाण्यामध्ये एकत्र करून देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.

यानंतर अक्षय तृतीयेची सर्वात महत्त्वाची गोष्ट समजली जाणारा दान धर्माचा विधी पार पाडला जातो. यामध्ये साखर, तूप, धान्य, भाजीपाला, फळे, वस्त्र, सोने-चांदी इत्यादी गोष्टींचे दान दिले जाते. प्रत्येकाने आपल्या ऐपती प्रमाणे दान द्यावे, मात्र या दिवशी दिलेले दान हे अतिशय चांगले समजले जाते. आणि हे दान पुढील आयुष्यामध्ये आपल्याकडे फळाच्या रूपात परत येत असते. या दिवशी जेवढे दान देऊ तेवढे आपल्याला पुन्हा मिळत असते. त्यामुळे बहुतेक लोक या दिवशी दानधर्म करतात.

अक्षय तृतीयेचे महत्त्व:

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे आपले असे वेगळे महत्त्व आहे. या दिवशी कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी चांगला दिवस समजला जातो. हा दिवस विवाह कार्यासाठी सुद्धा खूप चांगला असल्याचे सांगण्यात येते. या दिवशी होणारा विवाह पुढील भावी आयुष्यासाठी पती-पत्नीमध्ये प्रेम घेऊन येतो, आणि हे प्रेम केव्हाच संपत नाही.

तसेच त्या दिवशी दिलेले दान हे उदारपणाचे लक्षण समजले जाते. त्यामुळे या दिवशी दिलेले दान हे कित्येक पटीने आपल्याकडे पुन्हा येत असते. सोबतच उपनयन संस्कार करणे, नवीन घराची उद्घाटने, नवीन व्यवसाय सुरू करणे, किंवा कुठलेही प्रकल्प सुरू करणे, विविध जमिनी खरेदी करणे खूपच फायदेशीर असते.

निष्कर्ष:

हिंदू धर्माच्या प्रत्येक सणांना आणि मुहूर्तांना अशाप्रकारे नियोजित केलेले आहे, की निसर्गाच्या बदलानुसार वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळे सण येतात. जे त्या त्या हंगामानुसार अनुकूल देखील असतात. असाच एक वसंत ऋतूमध्ये येणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया होय. या मुहूर्ताला नवीन खरेदी जसे की सोने, वाहन, जमीन, इ. करणे भाग्याचे लक्षण समजले जाते. त्यामुळे या दिवशी सोने खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडते.

मात्र मित्रांनो, आज-काल पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे आपल्या संस्कृतीच्या सणावारांना साजरे करणे तितकेसे महत्त्वाचे वाटत नाही. त्यामुळे आपले सण मागे पडत जाऊन विविध पाश्चात्य सणांचे साम्राज्य वाढत चालले आहे. मात्र प्रत्येकाने आपली संस्कृती जपण्यासाठी अगदी पारंपारिक पद्धतीने आपले सण उत्सव साजरे केले पाहिजे. त्यामुळे भारतीय संस्कृती टिकून राहण्यासाठी मदत मिळेल.

आपली संस्कृती ही जगाला दिशा दाखवणारी आहे. अनेक देशांनी आपल्या संस्कृतीचे अनुकरण करत प्रगती साधलेली आहे. मात्र आधुनिकतेच्या नावाखाली आपण विविध पाश्चात्य गोष्टींचे अनुकरण करून आपली संस्कृती धोक्यात घालत आहोत. त्यामुळे मित्रांनो भारतीय संस्कृती टिकवणे हे तुम्हा आम्हा सर्वांचेच कर्तव्य असून, आपण सर्वांनी ते पार पाडले पाहिजे.

FAQ

अक्षय तृतीया यामधील अक्षय या शब्दाचा अर्थ काय आहे?

अक्षय तृतीया मधील अक्षय या शब्दाचा अर्थ म्हणजे कधीही क्षय म्हणजेच नाश न होणारे असा आहे.

अक्षय तृतीया या दिवशी कोणत्या देवाला पुजले जाते?

अक्षय तृतीया या दिवशी भगवान विष्णू या देवाला पुजले जाते.

हिंदू धर्मा बरोबरच आणखी कोणता धर्म समुदाय अक्षय तृतीया या सणाला महत्त्व देतो?

हिंदू धर्माबरोबरच जैन धर्म सुद्धा अक्षय तृतीया सणाला महत्त्व देतो.

अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी कोणता रंग परिधान करणे चांगले समजले जाते?

अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी घरामध्ये सुख समृद्धी, वैभव यावे याकरिता गुलाबी वस्त्र धारण करण्याचे सांगितले जाते.

अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी कोणती गोष्ट करणे फायद्याचे समजले जाते?

अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी सोने अथवा चांदी इत्यादी मौल्यवान धातूंची खरेदी करणे चांगले समजले जाते. यामुळे नेहमी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो अशी मान्यता आहे.

आजच्या भागामध्ये आपण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या मुहूर्तमय सणाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला नक्कीच नवी असेल, त्यामुळे याबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. तसेच ही नवीन माहिती इतरांनाही वाचायला मिळावी यासाठी शेअर नक्की करा.

धन्यवाद…

Leave a Comment