Architecture Information In Marathi आपल्या स्वतःचे एक घर असावे, आणि ते अगदी राजवाड्याप्रमाणे दिसावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र घर वारंवार बांधली जात नसल्यामुळे प्रत्येकालाच त्यातला अनुभव असेल असे नसते. त्यामुळे घर बांधल्यानंतर असे करायला पाहिजे होते, किंवा हे करायचे राहिले असे संवाद तुम्हाला नेहमी ऐकायला मिळत असतील. मात्र जर तुम्ही एक चांगला आर्किटेक्चर निवडला, तर मग मात्र तुम्हाला हा पस्तावा करण्याची वेळ येणार नाही.

आर्किटेक्चरची संपूर्ण माहिती Architecture Information In Marathi
मित्रांनो, एखादी चांगली अप्रतिम इमारत बघितली की आपल्या तोंडातून आपोआप उद्गार निघतात की, “अरे वा, आर्किटेक्चरने किती भारी इमारत बनवली आहे.” मित्रांनो मूळ इमारती गवंडी बनवत असले, तरीदेखील ती कशी असावी, कशी दिसावी, डिझाइन कसे असावे या सगळ्या गोष्टीचा पूर्व आराखडा तयार करण्याचे काम आर्किटेक्चर करत असतात.
सर्वत्र आर्किटेक्चर चा वापर केला जात नसला, तरी देखील या आर्किटेक्चर कडून काम करून घेण्याचे प्रमाण हल्ली वाढलेले आहे. जे अतिशय महत्त्वपूर्ण आणि उत्कृष्टरित्या वास्तू आणि इतर सर्व गोष्टींचा विचार करून, एक उत्तम घर बनवत असतात.
आजच्या भागामध्ये आपण या आर्किटेक्चर बद्दल माहिती घेणार आहोत…
आर्किटेक्ट म्हणजे काय:
मित्रांनो, आर्किटेक्ट म्हणजे वास्तुकार होय. जो विविध इमारतींमध्ये कोणतीही गोष्ट कशा प्रकारे बनवावी, याचे नियोजन आणि डिझाईन करत असतो. तसेच संपूर्ण इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तो निरीक्षण करण्याचे देखील कार्य करत असतो. ज्या लोकांना आपले घर अतिशय सुरेख असावे असे वाटते, ते या आर्किटेक्ट ला विचारून घर बांधत असतात.
सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे डिझाईन क्षेत्रातील आवड असणारा असा व्यक्ती, जो इमारती कशा असाव्यात आणि त्याचे बांधकाम कसे केले जावे याच्या योजना आखण्याबरोबरच त्याचे डिझाईन देखील बनवतो, तो म्हणजे आर्किटेक्ट होय.
आर्किटेक्चर ही एक कला असून, त्यामध्ये विज्ञानाचा देखील वापर केला जातो. जेणेकरून कुठलीही वास्तू असू देत, जसे की घर, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल्स, किंवा सार्वजनिक इमारती.… त्या प्रत्येक ठिकाणी आर्किटेक्चर आपले कसब लावून उत्तम उत्तम इमारती बनवत असतो.
आर्किटेक्चर चे काम काय असते?
मित्रांनो, आर्किटेक्चर म्हणजे केवळ इमारतीचे डिझाईन करत नाही, तर त्यांना अनेका जबाबदारी देखील पार पाडाव्या लागतात. ज्यामध्ये प्रकल्प व्यवस्थापन, सार्वजनिक सुरक्षा, इत्यादी गोष्टींचा देखील समावेश होतो. आर्किटेक्चरला केवळ इमारतीचे डिझाईन करणेच महत्त्वाचे नसून, त्या इमारतीमुळे सार्वजनिक सुरक्षा अबाधित राहिली जाईल, कोणाच्या प्रॉपर्टी अथवा जीविताला धोका होणार नाही, याची देखील काळजी घ्यावी लागते.
तसेच एकदा आर्किटेक्चर कडे एखाद्या प्रकल्पाचे काम आल्यास तो सर्वप्रथम अनेक संभाव्य डिझाईन तयार करत असतो. त्या त्याच्या ग्राहकांना दाखवल्यानंतर जी डिझाईन आवडेल त्या डिझाईन नुसार काम करत असतो. एकदा डिझाईन फायनल झाली, की त्याला कागदपत्रे तयार करावी लागतात. त्यानुसार तो कॅड सारखे सॉफ्टवेअर वापरून, इमारतीच्या टूडी आणि थ्रीडी डिझाईन बनवतो. तसेच सर्व कायदेशीर माहिती तयार करून, त्याचा एका दस्ताऐवज बनवतो. हा दस्ताऐवज त्याला मंजूर करून घ्यावा लागतो.
आर्किटेक्चर चा अभ्यासक्रम आणि पात्रता:
मित्रांनो, आर्किटेक्चर हा कोर्स बी आर्क या नावाने ओळखला जातो. जो पाच वर्षांचा असतो. ज्या विद्यार्थ्यांनी आपला बारावीचा अभ्यासक्रम पीसीएम या गटातून पूर्ण केलेला असतो, त्यांच्यासाठी हा कोर्स करता येणे शक्य असते. मात्र त्याकरिता बारावी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळालेले असावे. तसेच या पदवीला प्रवेश घेण्यापूर्वी, प्रवेश परीक्षा देखील द्यावी लागते. जी नाटा या नावाने ओळखली जाते. या प्रवेश परीक्षांमध्ये देखील उमेदवाराला उत्तीर्ण व्हावे लागते. जेणेकरून त्याला प्रवेश मिळवणे सोपे जाते.
आर्किटेक्चर होण्याच्या काही महत्त्वपूर्ण पायऱ्या:
मित्रांनो, ज्या उमेदवारांना आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे, त्यांनी बारावीला ऍडमिशन घेताना पीसीएम या ग्रुप अंतर्गत विज्ञान शाखेमधून ऍडमिशन घ्यावे. आणि बारावीची परीक्षा किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी.
बारावीनंतर त्यांनी नाटा नावाची प्रवेश परीक्षा देऊन, त्यात योग्य गुण घेऊन आपला बी आर्क पदवीसाठीचा प्रवेश निश्चित करावा. मित्रांनो लक्षात ठेवा की या कोर्ससाठी शक्यतो नामांकित महाविद्यालयांचाच पर्याय निवडावा, जेणेकरून पुढे तुम्हाला करिअरच्या संधीमध्ये आणखी फायदा होईल.
कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर हा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करावा. जेणेकरून तुम्हाला बी आर्क नावाची पदवी मिळेल. या पदवीनंतर कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर येथे तुम्ही आर्किटेक्चर असल्याची नोंदणी करून घ्या, जेणेकरून तुम्ही वैयक्तिकरित्या कुठलीही कामे घेऊ शकता. आणि एक आर्किटेक्चर म्हणून नावारउपास येऊन चांगला पैसा कमवू शकता.
निष्कर्ष:
मित्रांनो, कुठल्याही घराला एक सुंदरते मध्ये रूपांतरित करण्याचे कार्य आर्किटेक्चर करत असतो. अगदी तुमच्या घराची वीट रचना कोणत्या डिझाईन मध्ये असावी, तसेच कोणत्या दिशेला काय असावे, आतील फर्निचर कसे असावे, तसेच बेसिन सारख्या गोष्टी कशा असाव्या, कोणत्या बाजूला कशा टाइल्स लावाव्या, रंग कोणता द्यावा, छत कसे करावे, यांसारख्या अनेक गोष्टी आर्किटेक्चर डिझाईन करत असतात, त्यामुळे घर अतिशय सुंदर होते.
आजच्या भागामध्ये आपण आर्किटेक्चर याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. यामध्ये तुम्हाला आर्किटेक्ट म्हणजे काय, आर्किटेक्चर काय करत असतात, त्याचे विविध डिझाईन, बांधकामामध्ये काय भूमिका असते, आर्किटेक्चर होण्यासाठीचे अभ्यासक्रम, तसेच काय पात्रता असाव्या लागतात, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर बद्दल माहिती, त्यामध्ये नोंदणी कशी करावी, या सर्व गोष्टी बघण्याबरोबरच, काही प्रश्नोत्तरे देखील बघितलेली आहेत.
FAQ
आर्किटेक्चर हे करिअर का निवडावे?
मित्रांनो, आर्किटेक्चर ही एक कला असून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्जनशीलता या दोघांचा एक सुरेख मेळ आहे. या गोष्टींच्या आधारावर आर्किटेक्चर सुंदर संरचना तयार करत असतो. जिथे लोक आपले संपूर्ण आयुष्य घालत असतात. त्यामुळे अशा वास्तूला अतिशय सुरेखपणे बनवणे, हे आर्किटेक्चर चे काम असते. आणि या रीतीने तुम्ही तुमच्या ग्राहकांना खुश करून मानसिक आनंदाची अनुभूती देखील घेऊ शकता.
आर्किटेक्चर केल्यानंतर करिअरमध्ये काय स्कोप आहे?
मित्रांनो, आर्किटेक्चर झाल्यानंतर विविध बांधकाम व्यवसायिकांची कार्यालय, तसेच वास्तुविशारद तुम्हाला काम देऊ शकतात. तसेच तुम्ही वैयक्तिक बांधकाम साइटवर देखील एक डिजाइनर म्हणून काम बघू शकता. तसेच विविध कार्यालय, दुकाने, वसाहती, घरे, हॉटेल, फ्लॅट्स, औद्योगिक संकुल, किंवा व्यापारी संकुल इत्यादींचे डिझाईन करू शकता.
घर बांधण्यामध्ये आर्किटेक्चर महत्त्वाचा का असतो?
मित्रांनो, शक्यतो एक मनुष्य त्याच्या पूर्ण हयातीत केवळ एकदाच घर बांधत असतो, किंवा फार तर दुसऱ्यांदा घर बांधतो. मात्र घर बांधताना घाई मध्ये काही चुका झाल्या, तर आयुष्यभर माणूस त्याबद्दल पस्तावा करत राहतो. या गोष्टी होऊ नयेत त्यामुळे आर्किटेक्चर निवडला जातो. ज्याला अनेक घरांच्या डिझाईनचे अनुभव असल्यामुळे तो तुम्हाला चांगल्यात चांगले पर्याय सुचवू शकतो.
आर्किटेक्चर कोर्स संपूर्ण पार पडल्यानंतर कुठे नोंदणी करावी लागते, जेणेकरून आर्किटेक्चर चा सराव करता येईल?
आर्किटेक्चर चा सराव अर्थात प्रॅक्टिस करण्याकरिता कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर मध्ये नोंदणी करणे गरजेचे ठरते.
आर्किटेक्चर चा कोर्स करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असायला लागते?
आर्किटेक्चर चा कोर्स करण्याकरिता उमेदवारांनी किमान बारावीची परीक्षा पीसीएम या विषयांसह पूर्ण केलेली असावी, तसेच आर्किटेक्चर साठी असणारी प्रवेश परीक्षा देखील उत्तीर्ण व्हायला हवी.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आर्किटेक्चर या विषयाची संपूर्ण माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली तर असेलच, शिवाय फायदेशीर देखील ठरली असेल. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊ द्या, आणि ही माहिती शेअर देखील करण्यास विसरू नका.
धन्यवाद…