Bahinabai Chaudhari Information In Marathi ‘अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर’ या ओळी ऐकल्या की आपल्यासमोर बहिणाबाई चौधरी या संत कवयित्री उभ्या राहतात. मित्रांनो बहिणाबाई या बहिणी या नावाने प्रसिद्ध आहेत. त्या एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारकरी कवयित्री किंवा संत कवयित्री आहेत. बहिणाबाई या जन्माने ब्राह्मण होत्या, तरुणपणी त्यांचे लग्न एका विधुर व्यक्तीशी झाले.
बहिणाबाई चौधरी यांची संपूर्ण माहिती Bahinabai Chaudhari Information In Marathi
बालपणी संपूर्ण महाराष्ट्र फिरल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रतिभा होती, त्या संत असून देखील त्यांनी वैवाहिक जीवनाचा कधीही त्याग केला नाही. हे त्यांचे वेगळेपण ठरते. त्यांच्या वैवाहिक जोडीदाराने त्यांच्यावर अनेक अत्याचार केले, त्यांनी अध्यात्मिक मार्ग स्वीकारल्यामुळे जोडीदाराकडून त्यांचा नेहमी छळ होत असे, मात्र शेवटी त्यांच्या या जोडीदाराने देखील छळ सोडून भक्ती मार्ग स्वीकारला हे त्यांच्या अध्यात्मिक साधनेचे फळच म्हणता येईल.
बहिणाबाईंनी अनेक मराठी अभंग रचून त्यांच्या वैवाहिक जीवनातील दुःख, तसेच स्त्री जन्माला प्राप्त होणारे भोग जगासमोर मांडले. ते प्रत्येक स्त्रीला आपले वाटल्यामुळे त्यांच्या या अभंगारचना प्रत्येक स्त्रीच्या तोंडावर खेळत असत, तसेच बहिणाबाईंनी विठोबा अर्थात पंढरीचा विठ्ठल यांच्यावर देखील अनेक कविता आणि अभंग रचले. पती कसाही असला तरी देखील पतीसोबत एकनिष्ठ राहणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांची निष्ठा व श्रद्धा त्यांच्या अभंगवाणीतून दिसून येते. आजच्या भागामध्ये आपण बहिणाबाई चौधरी या संत कवयित्री बद्दल माहिती घेणार आहोत…
संपूर्ण नाव | बहिणाबाई नथुजी चौधरी |
ओळख | संत कवयित्री |
इतर नावे | बहिणाबाई, बहिणी |
जन्म दिनांक | ११ ऑगस्ट १८८० |
वडील | उखाजी महाजन |
आई | भिमाई |
पती | नथुजी खंडेराव चौधरी |
स्वर्गवास | ३ डिसेंबर १९५१ |
बहिणाबाईंचा जीवनप्रवास:
बहिणाबाई या स्वातंत्रपूर्व काळात होऊन गेल्या. त्याकाळी स्त्रियांसाठी अनेक प्रथा परंपरा होत्या. त्यानुसार बहिणाबाई यांचे देखील बालवयातच लग्न झाले. एकदा कोल्हापूर मध्ये भागवत पुराणासाठी गेले असताना त्यांच्या पतीला एक गाय भेट देण्यात आली. त्या गाईने एका गोंडस वासराला जन्म दिला.
बहिणाबाईंचे या वासराशी अतूट नाते जुळले. त्या जेथे जात तेथे हे वासरू जात असे. एकदा बहिणाबाई जयराम स्वामींच्या सत्संगाला गेल्या असता वासरू देखील बहिणाबाईंच्या पाठोपाठ सत्संगात आले. हे मालकाचे प्रेम बघून जयराम स्वामी यांनी वासरासह बहिणाबाईंच्याही डोक्यावर थोपटले. हे त्यांच्या पतीला समजतात त्यांनी बहिणाबाईंना मारहाणकरात घरात आणले व डांबून ठेवले. अशा रीतीने बहिणाबाई यांचे जीवन खूप हालाखीत गेलेले होते. त्यामुळे त्यांनी कवितेलाच आपला आधार मानला.
बहिणाबाईंचे साहित्य:
बहिणाबाई चौधरी यांनी साहित्य क्षेत्रात फार मोठे कार्य केलेले आहे. त्यांनी आपले आत्मचरित्र तर लिहिलेच, सोबतच विठोबाची स्तुती, संतत्व, आत्मा, ब्राम्हणत्व, सद्गुरू, आणि भक्ती इत्यादी वेगवेगळ्या विषयांवर अभंग रचना केलेल्या आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील दैनंदिन गोष्टींवर भाष्य केलेले आहे. ज्यामध्ये त्यांचे वैवाहिक जीवन, तसेच त्यांच्यामधील व त्यांच्या पती मधील संघर्ष इत्यादी विषयांना हात घातलेला आहे.
बहिणाबाई या आज सर्वत्र प्रसिद्ध कवयित्री असल्या, तरी देखील त्यांनी स्वतःचे अभंग व कविता कुठेही लिहून ठेवल्या नव्हत्या. या कविता त्यांच्या मुलाने व नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यू पश्चात लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्या सर्व सामान्य लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध झाल्या. त्यामुळे त्यांच्या या कार्यामध्ये या दोघांचा देखील मोठा वाटा आहे.
बहिणाबाई चौधरी यांचे कविता संग्रह:
बहिणाबाई चौधरी यांनी अनेक कविता देखील लिहिल्या आहेत. या कवितांचा एकत्र लिहून संकलन करण्याचे कार्य कवी सोपान देव जे की बहिणाबाई यांचे सुपुत्र होते, आणि त्यांचे एक नातेवाईक ज्यांचे नाव पितांबर चौधरी असे होते या दोघांनी केले. त्यांनी बहिणाबाईंच्या कवितासंग्रहांना ‘बहिणाबाईची गाणी’ असे नाव दिलेले आहे.
कवी सोपान देवांचे गुरु आचार्य यांना सोपान देवांनी बहिणाबाईंचा हा कवितासंग्रह दाखवला. त्यांनी वाचल्यानंतर ते म्हणाले की ‘बहिणाबाईंची ही गाणी हेच खरे सोने आहे, इतक्या दिवस त्यास लपवून ठेवणे म्हणजेच महाराष्ट्राच्या दृष्टीने गुन्हा आहे.’ आणि त्यांनी हा कवितासंग्रह प्रकाशित करण्याचे वचन दिले.
त्यांनी आपल्या वचनाप्रमाणे इसवी सन १९५१ मध्ये हा कवितासंग्रह प्रकाशित केला, ज्यामध्ये केवळ ३५ कवितांचा समावेश होता. मात्र त्यांनी दररोज गायलेल्या कविता मात्र त्यांच्या सोबतच आसमंतात विरून गेल्या.
निष्कर्ष:
स्त्री धर्म खरा काय असतो हे बहिणाबाई यांच्याकडून शिकावे. आजकाल अनेक स्त्रिया नवऱ्याने थोडेसे वाईट वाकडे बोलले, की घटस्फोटाचा मार्ग अवलंबतात, मात्र बहिणाबाई चौधरी यांनी या समस्येला अतिशय काळजीपूर्वक हाताळून योग्य वळण दिले.
नवरा अतिशय अमानुष छळ करीत असताना देखील आणि शारीरिक अत्याचार करीत असताना देखील त्यांनी पती परमेश्वर म्हणून आपल्या पतीशी नेहमी एकनिष्ठा ठेवली. त्या कधीही पती बद्दल वाईट बोलत नसत. त्यामुळे त्यांच्या पतीच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आले, आहे त्या नवऱ्याला सोडण्यापेक्षा त्यांनी चांगला मार्ग अवलंबून भक्ती मार्गाद्वारे नवऱ्याला सुधरवण्याचे कार्य केले, त्यामुळे त्या एक पत्नी म्हणून अतिशय अजरामर झाल्या. तसेच त्या कविता देखील छान करत त्यामुळे त्या एक कवयीत्री म्हणून देखील अजरामर झाल्या.
त्या आपल्या कविता कुठेही लिहून ठेवत नसत, काम करताना मनानेच काहीही कविता रचत आणि त्या गात असत. त्या कविता इतक्या सुंदर आणि उत्कृष्ट असत की सोबत काम करणाऱ्या स्त्रिया देखील त्या कविता गुणगणत आणि अशा रीतीने बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा प्रसार झाला. त्यांनी ईश्वर भक्ती मध्ये लिन होत अनेक अभंग देखील रचले. त्यांनी आपल्या काव्यामधून समाजातील अनेक विषयांना हात घातला.
तसेच एक स्त्री म्हणून मिळालेले जीवन कसे असते, याबाबतचे विवेचन देखील त्यांनी आपल्या काव्यात्मक शैलीतून अतिशय उत्कृष्टरित्या केले. त्यामुळे स्त्रियांना या कविता आपल्याशा वाटू लागल्या. तसेच समाजातील विविध गोष्टींवर भाष्य केल्यामुळे पुरुष देखील त्यांच्या कवितांचे चाहते झाले.
अशा या बहिणाबाई चौधरी एक बहुरूपी व्यक्तिमत्व होत्या. त्या उत्कृष्ट पत्नी, कवयित्री, अभंग रचित्या, संत कवियत्री, तसेच विठ्ठलाच्या भक्त अशा अनेक रूपांनी आपल्यासमोर येत असतात. अशा या बहिणाबाई चौधरी बद्दल आज आपण माहिती पाहिली.
FAQ
बहिणाबाई चौधरी यांचे संपूर्ण नाव काय होते?
बहिणाबाई चौधरी यांचे संपूर्ण नाव बहिणाबाई नथुजी चौधरी असे होते.
बहिणाबाई चौधरी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता?
बहिणाबाई चौधरी यांचा जन्म दिनांक ११ ऑगस्ट १८८० या दिवशी झालेला होता.
बहिणाबाई चौधरी यांच्या आई वडिलांचे नाव काय होते?
बहिणाबाई चौधरी यांच्या आईचे नाव भिमाई महाजन, तर वडिलांचे नाव उखाजी महाजन असे होते.
बहिणाबाई चौधरी यांच्या आत्मवृत्ताचे किंवा आत्मचरित्राचे नाव काय आहे?
बहिणाबाई चौधरी यांचे आत्मचरित्र ‘आत्मनिवेदना’ किंवा ‘बहिणाबाई गाथा’ या नावाने ओळखले जाते.
बहिणाबाई यांनी रचलेला कविता आणि अभंग लिहून ठेवण्याचे कार्य कोणी केले?
बहिणाबाई यांचे सुपुत्र कवी सोपान देव, व त्यांचेच एक नातेवाईक श्री पितांबर चौधरी या उभयंतांनी बहिणाबाई यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अभंग व कविता लिहून ठेवल्या.
आजच्या भागामध्ये आपण संत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जीवन चरित्र जाणून घेतले. त्यांच्या विषयी माहिती घेताना आपल्याला नक्कीच अभिमान वाटला असेल. त्यामुळे ही माहिती शेअर करणे तर बनतेच. तसेच आपल्या प्रतिक्रिया देखील तुम्ही आम्हाला पाठवाल अशी अपेक्षा ठेवतो, आणि तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका वेगळ्या विषयासह ज्ञानवर्धक माहिती घेऊन.
धन्यवाद.