भुजंगासनची संपूर्ण माहिती Bhujangasan Information In Marathi

Bhujangasan Information In Marathi आजकाल योग हा सर्वत्र अतिशय लोकप्रिय झालेला आहे. कारण सध्या धकाधकीच्या जीवनात प्रदूषणामुळे आणि बीझी शेड्युलमुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच आपल्याला कामामुळे व्यायामाला देखील वेळ मिळत नाही, परिणामी अगदी काहीसा वेळ योगा करून आपण आपल्या शरीराला फिट ठेवू शकतो.

Bhujangasan Information In Marathi

भुजंगासनची संपूर्ण माहिती Bhujangasan Information In Marathi

योगा हा व्यायामाचे एक प्रकार असून त्याला वेळ मात्र थोडासा कमी लागतो. आणि कुठे बाहेर देखील जायची गरज पडत नाही. नेहमी योगा करणाऱ्या लोकांना शक्यतो लवकर आजार होत नाहीत, तसेच त्यांचे शरीर देखील अगदी तंदुरुस्त राहते. आणि ते एका चांगल्या जीवनशैली जगण्याचे पात्र ठरतात. आजच्या भागामध्ये आपण अशाच एका योग बद्दल अर्थात भुजंगासन याबद्दल माहिती घेणार आहोत…

नावभुजंगासन
इंग्रजी नावकोब्रा स्ट्रेच किंवा कोब्रा पोज
प्रकारव्यायामप्रकार
उपप्रकारयोगप्रकार
कार्यशरीर तंदुरुस्त ठेवणे
स्वरूपभुजंग अर्थात नागप्रमाणे तोंड वर करून शरीराला ताण देणे
योग्य वेळ सकाळची वेळ

योगासन करणे हे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितले आहे. आयुर्वेद मध्ये सुद्धा योगासन आणि व्यायाम याला अतिशय महत्त्वाचे मानले गेलेले आहे. व्यायामामुळे शरीर चपळ आणि प्रसन्न बनते. व्यायामाचे अनेक प्रकार असू शकतात. ज्यामध्ये प्राणायाम, योगासन, सूर्यनमस्कार इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

आपण घालत असलेले सूर्यनमस्कार हे भुजंगासनासारखेच असतात. यामध्ये नागाप्रमाणे शरीराला वळविले जाते. याचे अनेक आरोग्यदायी फायदे असून शरीरातील लवचिकता वाढविणे हे याचे मुख्य उद्देश आहे. सूर्यनमस्काराचे बारा प्रकार पडतात. त्यातील सातवा प्रकार म्हणजे भुजंगासन आहे.

भुजंगासनाचे अनेक फायदे असले तरी देखील काही परिस्थितीमध्ये हे असं करणे निशिद्ध मानले गेलेले आहेत. ज्यामध्ये गरोदर स्त्रिया, पोटाचे आजार असलेले व्यक्ती, किंवा पोटांच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेले रुग्ण, पाठीच्या कण्याचा त्रास असलेले रुग्ण यांचा समावेश होतो.

भुजंगासन म्हणजे नेमके काय:

भुजंगासन हा एक योगा प्रकार असून त्याला कोबरा स्ट्रेच किंवा कोबरा पोज म्हटले जाते. तसेच मराठीमध्ये इतर नावांपैकी त्याला सर्पासन असे देखील म्हटले जाते  सूर्यनमस्कार घालत असताना सातव्या क्रमांकावर येणारे आसन म्हणजे भुजंगासन. यामध्ये शरीर वळविण्याबरोबरच श्वासावर नियंत्रण ठेवणे देखील गरजेचे असते.

भुजंगासन करण्याच्या पायऱ्या:

भुजंगासनाचे कितीतरी फायदे असले तरी देखील अनेक लोकांना योग्य पद्धतीने भुजंग आसन करता येत नाही. त्यासाठी येथे काही पायऱ्या दिलेल्या आहेत.

सर्वप्रथम जमिनीवर चटई अथवा गोधडी किंवा असेल तर योगा मॅट अंथरावी. आता जमिनीवर पालथे किंवा पोटावर झोपावे, आणि आपल्या पायाची फक्त बोटे जमिनीला स्पर्श करतील अशा पद्धतीने ठेवावे. नंतर हाताची तळवे आपल्या छातीच्या बाजूने खांद्याच्या खाली ठेवून कपाळ जमिनीवर टेकवावे. त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्यावा, आणि अगदी हळुवारपणे आपले डोके वर उचलत जावे. यावेळी छाती सुद्धा वर उचलली जाईल, मात्र नाभी किंवा बेंबीचा स्पर्श जमिनीलाच राहील अशा पद्धतीने वर उचलावे.

हातावर भार देत उर्वरित शरीर मागच्या दिशेने खेचावे, यावेळी तुमच्या पाठीचा कणा वक्र झालेला असावा. त्यानंतर तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार ही पोज किती वेळ ठेवायची ते ठरवा. त्यानंतर श्वास सोडून हळुवार पद्धतीने पुन्हा पोट छाती आणि डोके या क्रमाने जमिनीला स्पर्श करा. आता थोडा वेळ आराम करून पुन्हा हा प्रकार पाच वेळा करा.

भुजंगासन करण्याचे फायदे:

  • भुजंगासनामुळे खांदे व मान या अवयवांना होणाऱ्या वेदना कमी होतात.
  • भुजंगासनामुळे छाती आणि बाहू भारदस्त होतात.
  • ज्या लोकांना थकवा जाणवत असेल अश्यांसाठी भुजंगसान अतिशय फायदेशीर ठरते.
  • भुजंगासन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होण्यास मदत मिळते.
  • भुजंगासणामुळे हृदय आणि फुफ्फुसे बळकट होण्यास मदत मिळते. त्यामुळे कोविड सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी देखील या आसनाचा सल्ला दिला जातो.
  • या आसनामुळे शरीरातील नकारात्मक विचारांना मात दिली जाऊ शकते.
  • लठ्ठ लोकांसाठी हे आसन पोटावरील चरबी जाळण्याचे एक उत्तम साधन म्हणून सिद्ध झालेले आहे.
  • हे आसन केल्यामुळे ज्या महिलांना मासिक पाळी अनियमित आहे, त्यांची समस्या दूर करण्यास मदत मिळते. तसेच मासिक पाळी मध्ये होणाऱ्या वेदना देखील दूर होण्यास मदत मिळते.
  • ज्या लोकांना मूत्रमार्गाचे आजार असतील किंवा मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होत नसेल त्यांच्यासाठी हे आसन खूपच फायदेशीर ठरते.
  • भुजंगासन कोणासाठी निषिद्ध सांगितलेले आहे:
  • गरोदर स्त्रियांसाठी हे आसन करू नये, असे सांगितले जाते.
  • पाठीच्या कण्याला गॅप असेल किंवा त्यासंबंधी कुठलाही त्रास असेल तर अशा लोकांनी भुजंगासन करू नये.
  • कार्पल टनल सिंड्रोम सारखे आजार किंवा समस्या असेल तरीदेखील भुजंगासन न करण्याचा सल्ला दिला जातो.
  • पोट किंवा त्याखालील कुठल्याही भागात काही इजा असेल किंवा शस्त्रक्रिया झालेली असेल तर भुजंगासन घातक ठरू शकते.
  • हर्निया चा त्रास असलेल्या व्यक्तींनी भुजंगासन करू नये.
  • नॉर्मल व्यक्तीला जरी डोकेदुखी जाणवत असेल त्यावेळी भुजंगासन करणे टाळावे.

निष्कर्ष:

जान हे तो जहाँ है असे आपण नक्की ऐकले असेल. त्याचाच अर्थ म्हणजे आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवले तर कुठलेही काम आपण सहजतेने करू शकतो. यासाठी व्यायाम हा फार महत्त्वाचा ठरतो. व्यायामांमध्ये योग हा एक प्रकार महत्त्वाचा आहे.

आज आपण भुजंगासन या योग्य प्रकाराविषयी माहिती घेतली. भुजंगासनामध्ये तुम्ही शरीराला ताण देत असल्यामुळे शरीर मोकळे होण्यास मदत होते. तसेच नेहमी बसून काम असणाऱ्या लोकांसाठी शरीराच्या आखडलेल्या नसा किंवा स्नायू मोकळे होण्यास मदत होते. आणि शरीर अगदी प्रसन्न आणि ताजेतवाने वाटते. त्यामुळेच शरीराच्या अनेक आरोग्य समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

लठ्ठपणा मधुमेह यांसारख्या रुग्णांनी तर योग नक्कीच करायला पाहिजे. भुजंगासनामध्ये तुम्ही शरीराला आडवे झोपवून वर तोंड करत असताना शरीरातील प्रत्येक स्नायू ताणला जातो, आणि परिणामी शरीराच्या स्नायूंमध्ये निकोप वाढ देखील घडून येते.

FAQ

भुजंगासन हे नाव या योगासनाला कसे पडले?

या योगप्रकारामध्ये शरीर नागासारखे ताणून फणा काढल्याप्रमाणे केले जाते, त्यामुळे नागाचे नाव भुजंग म्हणून भुजंगासन असे नाव पडले.

भुजंगासन हा कोणत्या प्रकारातील व्यायाम आहे?

भुजंगासन हा एक योगासनातील व्यायाम प्रकार आहे.

भुजंगासनाला इंग्रजी मध्ये काय म्हटले जाते?

भुजंगासनाला इंग्रजीमध्ये कोबरा पोज किंवा कोबरा स्ट्रेच असे म्हटले जाते.

भुजंगासन हे किती मिनिटांसाठी करावे लागते?

आपण नवीनच भुजंग आसन करण्यासाठी सुरुवात करीत असाल तर ९० सेकंद भुजंगासन करावे. त्यानंतर आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार ही वेळ वाढवत न्यावी.

भुजंग आसन करण्यामागे सर्वात महत्त्वाचा फायदा कोणता आहे?

भुजंगासन करण्यामागे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीर हे अतिशय लवचिक आणि चपळ बनते.

आजच्या भागामध्ये आपण एक उत्तम व्यायाम प्रकार समजला जाणारा भुजंग आसन या योग्य प्रकाराविषयी माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही कळवालच, मात्र ज्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना योग करण्याची नितांत गरज आहे. अशा मित्रमैत्रिणींना ही माहिती अवश्य पाठवा, तसेच या माहितीमध्ये काही चुकी आढळलेल्यास तसे आम्हाला नक्की कळवा. जेणेकरून सर्वांपर्यंत योग्य माहिती पोहोचण्यासाठी वेळेवर दुरुस्ती करणे शक्य होईल.

 धन्यवाद…

Leave a Comment