Computer Engineering Information In Marathi मध्यंतरीच्या काळामध्ये इंजीनियरिंग या क्षेत्राकडे अनेकांचा कल दिसून येत होता. मात्र त्या कालावधीमध्ये इंजिनीयर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी झाल्यामुळे त्या क्षेत्रातील नोकऱ्यांची कमतरता भासायला लागली. आणि मग नोकरी मिळत नाही म्हणून अनेकांनी इंजिनिअरिंग करण्याऐवजी इतर क्षेत्रांमध्ये वळण्यास सुरुवात केली.
संगणक अभियंताची संपूर्ण माहिती Computer Engineering Information In Marathi
मात्र त्यानंतर आयटी आणि कम्प्युटरचे युग आले, परिणामी पुन्हा या क्षेत्रातील इंजिनिअरिंगला प्राधान्य मिळायला सुरुवात झाली. इतर विषयातील इंजिनिअरिंग केलेले जुने विद्यार्थी देखील काही कोर्स किंवा स्पेशलायझेशन डिग्री घेऊन पुन्हा या क्षेत्रात उतरायला लागले. तर मित्रांनो आजच्या लेखाचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल, आज आपण कम्प्युटर इंजीनियरिंग याविषयी माहिती बघणार आहोत.
संगणक अभियंता अर्थात कम्प्युटर इंजिनियर म्हणजे संगणकासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सॉफ्टवेअर व हार्डवेअर उत्पादनांची निर्मिती किंवा विकास करणारा आणि त्यांना तपासणारा व्यक्ती होय, त्यामध्ये मदरबोर्ड, मेमरी, ऑपरेटिंग सिस्टम, राऊटर, प्रोसेसर इत्यादी घटकांचा समावेश होतो.
याबरोबरच संगणक अभियंता संगणक असेंबल करण्याचे कार्य देखील करत असतो, त्यामध्ये तो वापरकर्त्याच्या गरजेनुसार हार्डवेअर व सॉफ्टवेअर वापरून एक योग्य प्रकारचा संगणक बनवत असतो. चला तर मग वेळ न दवडता आपण या कम्प्युटर इंजीनियरिंग बद्दल माहिती घेण्यास सुरुवात करूयात…
नाव | कम्प्युटर इंजिनियर |
प्रकार | पदवी |
विद्यार्थ्यांची पदवी | संगणक अभियंता किंवा कम्प्युटर इंजिनियर |
पदवीचे प्रकार | सॉफ्टवेअर इंजिनियर व हार्डवेअर इंजिनियर |
पात्रता | पी सी एम ग्रुपसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण व प्रवेश परीक्षा दिलेली असावी |
संगणक अभियंता कोणाला म्हटले जाते:
संगणक क्षेत्रामध्ये जो व्यक्ती कार्य करत असतो, ज्यामध्ये संगणकाच्या नेटवर्क वर काम करणे, विविध पायाभूत सुविधा किंवा संगणक प्रणाली यांची निर्मिती करणे, त्यांना व्यवस्थापित ठेवणे, इत्यादी प्रकारचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला संगणक अभियंता म्हणून ओळखले जाते. सोबतच संगणक अभियंता हार्डवेअर क्षेत्रामध्ये देखील कार्य करत असतो. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या प्रॉब्लेम्सला सोडवण्यासाठी विविध सॉफ्टवेअर देखील तयार करत असतो.
संगणक अभियंत्याचे कार्य हे अतिशय किचकट असते, ज्यामध्ये एखाद्या गोष्टीचे सखोल संशोधन करून त्याची डिझाईन बनवणे, आणि ती प्रत्यक्षात उतरवणे, यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. उदाहरणादाखल बघायचे झाल्यास आज आपण वापरत असलेला मोबाईल, तुमच्या संगणकाचे प्रोसेसर, किंवा अगदी तुमच्या संगणकाचा सीपीयू इत्यादी प्रत्येक गोष्टींच्या निर्मितीसाठी संगणक अभियंतांनी आपले कसब लावलेले आहे, आणि आपल्या बुद्धीचा वापर करून वेळोवेळी त्यामध्ये बदल देखील केलेले आहेत.
संगणक अभियंत्याचे कार्य व जबाबदाऱ्या:
- एक संगणक अभियंता म्हणून त्या व्यक्तीला कंपनीचा डेटाबेस अतिशय स्थिर व सुरक्षित ठेवावा लागतो.
- क्लायंटला विविध प्रकारचे तांत्रिक सहाय्य पुरवणे.
- संगणकाच्या विविध प्रणालींचे डिझाईन किंवा आर्किटेक्चर तसेच युजर इंटरफेस तयार करणे.
- विविध प्रकारचे सॉफ्टवेअर्स व ॲप्स यांची निर्मिती करणे.
- माहितीचे योग्य प्रकारे विश्लेषण किंवा वापर करून त्यातून वापरकर्त्याला आउटपुट देणारे विविध टूल्स बनवणे.
संगणक अभियंता बनण्यासाठीची आवश्यक कौशल्य:
संगणक अभियंता बनायचे असेल तर काही मुख्य कौशल्य असणे अतिशय आवश्यक असते. ज्यामध्ये सर्वात प्रथम कोडींग या कौशल्याचा क्रमांक येतो, संगणक क्षेत्रात काहीही काम करायचे असेल तर कोडिंग येणे खूप महत्त्वपूर्ण समजले जाते. त्याचबरोबर सदर व्यक्तीला संप्रेषण अर्थात माहिती कार्यक्षमता असली पाहिजे. जे संगणकाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे संभाषण करण्यास किंवा संप्रेषण करण्यास उपयुक्त ठरेल.
कोणत्याही प्रकारच्या प्रोग्राम मधील त्रुटी शोधणे, ज्याला डी बग म्हणतात ते करणे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा उमेदवाराकडे संशोधन तंत्र असणे आवश्यक ठरते. त्यानुसार विविध आव्हानांना सामोरे जाणे त्यासाठी शक्य होते.
लवचिकता देखील असणे महत्त्वाचे ठरते, जेणेकरून वेळप्रसंगी परिस्थितीनुरूप निर्णय घेणे या अभियंत्याला शक्य होईल. आणि सर्वात महत्त्वाचे आणि शेवटचे कौशल्य म्हणजे गोपनीयता होय. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला गोपनीयता राखणे फारच महत्त्वाची ठरते. जेणेकरून सायबर हल्ल्यांमध्ये बळी पडणाऱ्या सॉफ्टवेअरची संख्या कमी होते.
एक चांगला कमावणारा संगणक अभियंता होण्यासाठीचे टप्पे:
संगणक अभियंता या पदावर तुम्हाला चांगला पैसा कमवायचा असेल तर त्यासाठी सर्वात प्रथम पदवी व पदव्युत्तर पदवी घेऊन तुम्ही चांगल्या मार्कांनी यशस्वी व्हायला हवे. त्यानंतर तुमच्या कौशल्यांचा विकास करण्याकरिता या क्षेत्रातील एक प्रमाणपत्र कोर्स करणे खूप महत्त्वाची ठरते. त्यानंतर लगेच पैशाची आशा न धरता काही काळ इंटरनशीप जॉईन करावी, त्या ठिकाणावरील तुमच्या अनुभवावर आधारित तुम्हाला अनेक प्रकारच्या चांगल्या नोकरी शोधता येतील.
निष्कर्ष:
आजच्या भागामध्ये आपण कम्प्युटर इंजिनियरिंग याविषयीची माहिती पाहिली. ज्यामध्ये संगणक अभियंता बद्दल देखील आपल्याला संपूर्ण माहिती मिळाली. आणि या करिअरमध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या माहितीचा नक्कीच फायदा झाला असेल.
या लेखामध्ये तुम्हाला संगणक अभियंता बद्दल माहिती, त्यांचे कार्य व जबाबदाऱ्या, हा अभियंता होण्यासाठी लागणारी कौशल्ये, तसेच अभियंत्यांचे प्रकार, संगणक अभियंता कसे व्हावे, तसेच कोणकोणते अभ्यासक्रम या संदर्भात आहेत, यासाठी पात्रता काय आवश्यक असते, अर्ज कसा केला जावा, आणि पुढे भविष्यात करिअरच्या संधी शोधताना काय केले जाऊ शकेल इत्यादी गोष्टींची माहिती बघितली आहे. या माहितीचा फायदा तुम्हाला नक्कीच झाला असेल अशी आशा.
FAQ
कंप्यूटर इंजीनियरिंग करियर साठी एक चांगला पर्याय ठरू शकेल काय?
नक्कीच कम्प्युटर सायन्स हे आज-काल करिअरच्या संधी देणारे चांगले प्रभावी क्षेत्र म्हणून विकसित झालेले आहे. आज काल आयटी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे या कम्प्युटर इंजिनियर्सची खूपच मागणी वाढलेली आहे.
संगणक अभियंते मुख्यत्वे कोणकोणत्या प्रकारची कामे करतात?
संगणक अभियंते हे माहितीच्या पद्धतशीर दळणवळणासाठी जबाबदार असतात, ते विविध प्रकारचे नेटवर्क व हार्डवेअर तयार करून त्याची देखभाल ठेवणे, व ते मॅनेज करणे इत्यादी कार्य करतात. शिवाय संगणकाच्या विविध गरजांसाठी वेगवेगळे अल्गोरिदम तयार करणे, आणि सॉफ्टवेअर सोल्युशन डिझाईन करणे यामध्ये त्यांचा जास्त हातखंडा असतो.
संगणक अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर केले जाऊ शकेल?
संगणक अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी अनेक क्षेत्रात कार्य करू शकतात, त्यामध्ये एक संगणक शिक्षक होणे, सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्य करणे, हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर प्रणाली तयार करणे इत्यादी गोष्टीचा समावेश होतो.
करिअरच्या दृष्टीने संगणक अभियांत्रिकीची पदवी करणे योग्य आहे का?
सध्या संगणकाचे युग चालू आहे, त्यात आयटीमध्ये अनेक नोकरीचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे या संगणक अभियांत्रिकी मध्ये हातोटी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरते. जेणेकरून ते एक चांगले करिअर करू शकतात.
संगणक अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर साधारणपणे किती पगाराची नोकरी मिळू शकेल?
मित्रांनो, कुठल्याही क्षेत्रात कार्य करायचे असेल तर पगार हा अनुभव आणि करत असलेल्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असतो. मात्र अंदाजे सांगायचे झाल्यास संगणक अभियंत्याला पाच ते सात लाख रुपये प्रति वर्ष इतका सुरुवातीला पगार मिळत असतो, जो अनुभवाच्या प्रमाणानुसार १४ ते १८ लाखांपेक्षाही अधिक होऊ शकतो.
आजच्या भागामध्ये आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग याविषयी माहिती पाहिली. जी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, कारण ही माहिती प्रत्येक करिअरभिमुख लोकांसाठी फारच महत्त्वाची आहे. तुमच्यासह इतरांनाही फायदा व्हावा याकरिता ही माहिती शेअर करणे तुमचे कर्तव्यच आहे. आणि माहिती आवडल्याबद्दल अभिप्राय म्हणून तुम्ही कमेंट मध्ये दोन शब्द लिहितानाच काही सूचना किंवा अधिकची माहिती असेल तर ती देखील अवश्य लिहू शकता.
धन्यवाद…