कंप्यूटर ची संपूर्ण माहिती Computer Information In Marathi

Computer Information In Marathi नमस्कार मित्रांनो आजच्या काळात पहायला गेलो तर सारे जग हे डिजिटल युगाणे व्यापलेले आहे. आज काल सर्वकाही डिजिटली होते.बरीचशी कामे ही आजकाल ऑनलाईन होत आहेत. जसे की ऑनलाईन तिकीट बुकिंग, बँक ट्रान्सफर, ऑनलाइन शॉपिंग व हे सर्व आपले आयुष्य नक्कीच सोपे करत आहे. या टेक्निकल युगामध्ये संगणक हे अतिशय महत्त्वाचे साधन बनलेल आपण पहातोच.

Computer Information In Marathi

कंप्यूटर ची संपूर्ण माहिती Computer Information In Marathi

आजकाल संगणक किंवा लॅपटॉप या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आपण पाहतो. शाळा कॉलेज रुग्णालय ऑफिसेस प्रॅक्टिकल व या अशा बऱ्याचशा ठिकाणी संगणकाचा वापर केला जातो. आजच्या या आधुनिक तसेच डिजिटल युगामध्ये संगणकाची माहिती असणे किंवा संगणक वापरता येणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

म्हणूनच आजच्या या पोस्टमध्ये आपण संगणकाचे महत्त्व, संगणक कसा वापरावा या सर्वांची माहिती घेणार आहोत. ही सर्व माहिती विद्यार्थ्यांसाठी तसेच कुठल्याही वयोगटातील मुलांसाठी किंवा माणसांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

संगणकाबद्दल काही महत्त्वाची माहिती

कम्प्युटरचा वापर हा मुख्यतः तीन कार्यांसाठी केला जातो.

पहिला वापर म्हणजे माहिती किंवा डेटा स्वीकार करणे ज्याला इनपुट म्हटले जाते.

दुसरा वापर म्हणजे त्या माहितीवर प्रोसेस करणे किंवा ती माहिती प्रोसेस करून स्टोअर करणे.

आणि शेवटचा म्हणजेच तिसरा वापर म्हणजे ती प्रोसेस केलेली माहिती आउटपुट म्हणून दाखविणे.

चार्ल्स बॅबेज यांना मॉडर्न कम्प्युटरचा जनक म्हणजे आधुनिक संगणकाचे जनक म्हणून ओळखले जाते. चार्ल्स बॅबेज यांनी सर्वात पहिले संगणक तयार केले होते व याच कम्प्युटरच्या सहाय्याने पंच कार्डवर माहिती इनपुट केली जायची. सुरुवातीच्या काळामध्ये कम्प्युटरचा वापर हा फक्त माहिती स्टोअर करणे व त्यावर प्रोसेस करणे या दोन कारणांपुरताच मर्यादित होता.

मात्र अशा काळामध्ये संगणक हा सर्वात महत्त्वाचा भाग बनलेला आहे. मग तो बिझनेस असो, व्यवसाय असो किंवा फिल्म इंडस्ट्री असो. स्पेस सेंटर, फिल्म इंडस्ट्री , बँकिंग सेक्टर,तसेच वाहतूक, उद्योगधंदे, रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेजेस , व एअरपोर्ट या सर्व ठिकाणांमध्ये संगणकाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आपण पाहतो.

कंप्यूटर या शब्दाचा फुल फॉर्म

C: CommonlyO:Operated  M:Machine  P: Particularly  U:Used for T:Technical and  E:Educational  R:Reasearch

कंप्यूटर चा फुल फॉर्म कॉमनली ऑपरेटेड मशीन पर्टिक्युलर यूज्ड फॉर टेक्निकल अँड एज्युकेशनल रिसर्च असा आहे. म्हणजेच मराठीमध्ये सांगायला गेलो तर सामान्यतः वापरले जाणारे आणि विशेषता तांत्रिक व शैक्षणिक संशोधनासाठी वापरले जाणारे मशीन.

कंप्युटरची व्याख्या

जसे की आपल्या सर्वांनाच माहित आहे कम्प्युटर किंवा संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. जी तुम्हाला माहिती साठवायची असेल किंवा तुम्ही दिलेल्या माहितीच्या निष्कर्ष काढणे तसेच त्या माहितीवर प्रक्रिया करणे व ब्राउझिंग, ई-मेल पाठवणे, किंवा गेम्स खेळणे इत्यादी. या सर्व गोष्टींसाठी कम्प्युटरचा वापर केला जातो.

तसेच बँकिंग सेक्टर, गव्हर्मेंट सेक्टर, आयटी सेक्टर या सर्वांमध्येच कम्प्युटरचा वापर हा सगळ्यात जास्त केला जातो. कम्प्युटर वापरात आल्यानंतर मनुष्यबळाची आवश्यकता ही कमी झाली. कंप्यूटर ह्या नावाचे संशोधन लॅटिन शब्द कंप्युटर ह्या पासून झाल्याचे आपल्याला कळते. या शब्दाचा अर्थ म्हणजे कॅल्क्युलेशन किंवा हिशोब करणे असा आहे.

कम्प्युटर चा इतिहास

आता जर आपण पाहायला गेलो तर कम्प्युटरचा इतिहास हा खूपच प्राचीन असल्याचे आपल्याला कळते. व ज्यांना आपण मॉडर्न कंप्यूटर चे जनक म्हणतो म्हणजेच चार्ल्स बॅबेज यांनी डिफरन्शियल  इंजिन या नावाचे एक यंत्र तयार केले होते ,व हे यंत्र मोजणी करण्याबाबत त्याकाळी सर्वात वेगवान यंत्र मानले जायचे व याला जगातला पहिला कम्प्युटर म्हटले जाते.

व त्याकाळी गणित तज्ञांना बिनचूक आकडेवारी करणे हे अवघड जायचे व यासाठी चार्ल्स बॅबेज यांनी ही अडचण दूर करण्यासाठी या संगणकाचा शोध केला होता. जेव्हा चार्ल्स बॅबेज यांनी पहिल्यांदा कम्प्युटर बनवण्यास सुरुवात केली होती तेव्हा सरकारने त्यांना आर्थिक मदत ही जाहीर केली होती. पण तब्बल २५ हजार स्पेअर पार्ट्स आणि १७००० पौंड्स एवढा खर्च केल्यानंतर देखील काहीही यश हाती आलं नव्हतं .

व पुढे सरकारच्या वतीने या प्रोजेक्टसाठी कुठलीही आर्थिक मदत जाहीर केली नाही व या प्रोजेक्टला बंद करण्यात आले होते. मात्र चार्ल्स बॅबेज यांनी हार मानली नव्हती.१८३२ ह्या साली चार्ल्स बॅबेज यांनी नव्या जोमाने डिफरेन्शियल इंजिन तयार करायला सुरुवात केली व या डिवाइसला त्यांनी “डिफरन्स इंजिन २” हे नाव दिले.

व डिफरन्स इंजिन ही पहिल्यापेक्षा सर्वात जास्त वेगवान आणि परिणामकारक ठरली आणि जगाला पहिला कम्प्युटर मिळाला होता. चार्ल्स यांनी बनवलेला पहिला कम्प्युटर आज देखील कॅलिफोर्नियाच्या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळतो.सन १८३३ मध्ये त्यांनी डिफरन्स इंजिनचे विकसित रूप तयार केले व त्यांनी या डिवाइसला ‘अनालिटीकल इंजन’ हे नाव दिले व आधीच्या डिवाइस च्या तुलनेमध्ये हे डिवाइस सर्वात जास्त प्रगत होते.

यापुढे डॉक्टर होवर्ड एकिन्स यांनी आयबीएम या कंपनीच्या मदतीने त्या कंपनीमधील चार इंजिनिअर यांना सोबत घेऊन सन १९४४ मध्ये एक विकसित कम्प्युटर तयार केला. व हा कम्प्युटर विजेवर चालणारा होता व याचे नाव ऑटोमॅटिक सिक्वेन्स कंट्रोल कॅल्क्युलेटर असे ठेवण्यात आले होते. त्याकाळी हा कम्प्युटर सहा सेकंदांमध्ये एक गुणाकार व बारा सेकंदांमध्ये एक भागाकार करायचा.

काही काळानंतर सन १९४५ मध्ये अतानासॉफ व क्लिकफॉर्ड यांनी मिळून एक इलेक्ट्रॉनिक मशीन तयार केले व त्या मशीनचे नाव एबीसी (ABC) असे ठेवण्यात आले म्हणजेच  अतानासॉफ बेरी कम्प्युटर याचे एक ऍडव्हान्स रूप.

कंप्यूटर चे भाग

आजच्या काळामध्ये कम्प्युटर म्हणजे काय असे विचारायला गेलो तर सरळ भाषेमध्ये कम्प्युटर म्हणजे आज सर्व काही आहे. कंप्यूटर शिवाय कोणतेही काम करणे आजकाल शक्य होत नाही. माणसाच्या कार्य तत्परतेला वाढवण्याबरोबरच हे मानवाचे प्रत्येक काम अगदी बिनचूक करू शकते. जसे की आपण पाहिले कम्प्युटर हे एक असे मशीन आहे जो डेटा प्रोसेस करून रिझल्ट देते.

कम्प्युटरचे मुख्यतः दोन भाग पडतात सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर.

सॉफ्टवेअर-

सॉफ्टवेअर एक प्रोग्राम चा ग्रुप असतो जो कम्प्युटर हार्डवेअर मॅनेज करतो. व सॉफ्टवेअर नसल्याशिवाय आपण कम्प्युटरचा वापर करू शकत नाही.

हार्डवेअर-

हार्डवेअर म्हणजेच कम्प्युटरचे शरीर ज्याला आपण बघू शकतो आणि आपण त्याला स्पर्श देखील करू शकतो. हार्डवेअर मध्ये कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर, मदरबोर्ड, मेमरीचीप, इलेक्ट्रॉनिक सर्किट, एक्सप्रेस कार्ड, केबल स्वीच, जॉईस्टिक या सर्वांचा समावेश होतो. माऊस कीबोर्ड स्कॅनर वेब कॅमेरा तसेच माइक , फोन यांना इनपुट डिव्हाइसेस म्हणजे इनपुट उपकरणे असे म्हटले जाते.

कंप्यूटर चे प्रकार

डेस्कटॉप-

डेस्कटॉपचा वापर आज काल घर, शाळा ,कॉलेजेस, ऑफिसेस, बँक, गव्हर्मेंट ऑफिसेस व इतर सरकारी कार्यालय या सर्व ठिकाणी डेस्कटॉप चा वापर केला जातो. कम्प्युटरला डेस्क म्हणजे टेबलावर ठेवले जाते व याचा मॉनिटर, कीबोर्ड ,माऊस, सीपीयू, प्रिंटर इत्यादी हे सर्व वेगवेगळे भाग असतात. व डेस्कटॉप कम्प्युटर वापरत असताना तुम्हाला पूर्ण वेळ विद्युत पुरवठा करावा लागतो व याला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी नेणे हे फारच कठीण असते.

लॅपटॉप-

दुसरा व सर्वात उपयुक्त किंवा कुठेही वापरता येणाऱ्या कंप्यूटरला लॅपटॉप म्हटले जाते. लॅपटॉप हा तुम्ही कुठेही वापरू शकता त्याला कीबोर्ड माऊस सीपीयू वेग वेगळे लागत नाहीत. लॅपटॉप हा बॅटरीवर चालतो व याचे वजन देखील कमी असते म्हणून लॅपटॉप चा वापर करणे सर्वात सोयीस्कर असते.

टॅबलेट-

टॅबलेटला हँड हेल्ड कॉम्प्युटर या नावाने देखील ओळखले जाते. टॅबलेट हा आकाराने लहान असतो याला तुम्ही खिशात देखील ठेवू शकता. व टॅबलेटला कीबोर्ड व माउस याची गरज लागत नाही टॅबलेटला टच स्क्रीन वापरली जाते. टॅबलेटचे एक सोपे उदाहरण म्हणजे आयपॅड.

पामटॉप-

एक प्रकारचा पोर्टेबल कम्प्युटर असतो ज्याला आपण मोबाईल देखील म्हणतो. व आजच्या या युगात मानवाचे मोबाईल शिवाय काम होणे हे काहीसे अशक्य झालेले आहे.मोबाईल चा वापर आपण कोठेही करू शकतो व सर्वात सोईस्कर असतो.

FAQ

1. संगणक ला काय म्हणतात?

Computer ला मराठी मध्ये संगणक असे म्हणतात. Computer हा शब्द Compute या इंग्रजी क्रियापदा पासून बनला आहे. Compute म्हणजे गणना करणे किंवा आकडेमोड करणे असा अर्थ होतो.

2. तुम्हाला संगणकाबद्दल काय माहिती आहे?

संगणक हे एक मशीन आहे जे माहिती संग्रहित आणि प्रक्रिया करू शकते . बहुतेक संगणक बायनरी प्रणालीवर अवलंबून असतात, जे डेटा संचयित करणे, अल्गोरिदमची गणना करणे आणि माहिती प्रदर्शित करणे यासारखी कार्ये पूर्ण करण्यासाठी 0 आणि 1 या दोन चलांचा वापर करतात.

3. संगणकाचा डाटा म्हणजे काय?

संगणकावर साठवल्या जाणाऱ्या माहितीच्या एककाला विदा (इंग्रजी: Data – डेटा किंवा डाटाम्हणतात. माहितीसाठ्याला विदागार (इंग्लिश : database – डेटाबेस) असे म्हणतात. विद् म्हणजे जाणणे; विद् या संस्कृत धातूवरून विदा हा शब्द आला आहे.

4. संगणकाची योग्य व्याख्या खालीलपैकी कोणती आहे

संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे गुणात्मक आणि परिमाणात्मक दोन्ही डेटा जलद आणि अचूकपणे संचयित, पुनर्प्राप्त आणि प्रक्रिया करू शकते .

5. संगणकात स्टोरेज कसे कार्य करते?

स्टोरेजमध्ये तुमचे अॅप्लिकेशन, ऑपरेटिंग सिस्टम आणि फाइल्स अनिश्चित काळासाठी असतात . संगणकांना माहिती लिहिण्याची आणि स्टोरेज सिस्टममधून ती वाचण्याची आवश्यकता असते त्यामुळे स्टोरेजची गती तुमची सिस्टीम किती वेगाने बूट करू शकते, लोड करू शकते आणि तुम्ही जतन केलेल्या गोष्टींमध्ये प्रवेश करू शकते हे निर्धारित करते.

Leave a Comment