दहीहंडीची संपूर्ण माहिती Dahihandi Information In Marathi

Dahihandi Information In Marathi नुकतंच काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने दहीहंडी याला महाराष्ट्राचा अधिकृत खेळ म्हणून घोषित केलेले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांच्या मदतीने शिंक्या वरील दही काढून सर्व मित्रांमध्ये वाटून घ्यायचे त्याचे प्रतिक म्हणून हा दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील असते. ज्यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी कृष्ण जन्म होतो त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम घेतला जातो.

Dahihandi Information In Marathi

दहीहंडीची संपूर्ण माहिती Dahihandi Information In Marathi

दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी अनेक तरुणांची पथके हिरिरीने सहभाग घेतात. यावेळी दहीहंडी फोडण्यासाठी स्पर्धा देखील लागते, आणि या स्पर्धेचे रूपांतर खेळामध्ये होते. अनेक ठिकाणी या दहीहंडी कार्यक्रमासाठी बक्षिसांचे देखील आयोजन केलेले असते. साधारणपणे इंग्रजी महिन्यानुसार ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

आजच्या भागामध्ये आपण दहीहंडी या उत्सवाबद्दल माहिती घेणार आहोत…

नावदहीहंडी
प्रकारउत्सव (खेळाचे स्वरूप)
देवताभगवान श्रीकृष्ण
प्रतीकभगवान श्रीकृष्ण यांच्या लीलांपैकी एक असणाऱ्या माखन खाण्याची लीला
स्वरूपउंचावरील दहीहंडी मानवी मनोरा करून फोडणे, व त्यातील प्रसाद वाटून खाणे

दहीहंडी उत्सव का साजरा केला जातो:

बाल गोपाळांच्या सर्वाधिक आवडीचा खेळ आणि हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा उत्सव म्हणून दहीहंडी कडे बघितले जाते. मात्र हा खेळ का साजरा केला जातो याचा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? यामागे देखील एक खूप महत्त्वाचे कारण आहे.

बालवयामध्ये ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आपल्या सवंगड्यांसोबत वाढत होते, त्यावेळी ते अतिशय खोडकर असे होते. तसेच त्यांना लोणी देखील खूप आवडत असे, त्यामुळे ते आपल्या सवंगड्यांच्या मदतीने आसपासच्या गवळणींच्या घरी जाऊन लोण्याची चोरी करत असत. मात्र गवळणी आपले दही, दूध, ताक, लोणी हे शिंक्यावर टांगून उंचावर ठेवत असत.

बालवयातील श्रीकृष्णांना आणि त्यांच्या सवंगड्यांना मात्र उंचावरील हे खाद्यपदार्थ काढता येत नसत, म्हणून मग ते एकमेकांच्या अंगावर चढत मानवी मनोरा तयार करत असत. आणि सर्वात वर असणाऱ्या सदस्यावर ते अन्नपदार्थ काढण्याची जबाबदारी असे. ते अन्नपदार्थ काढल्या नंतर सर्वजण वाटून खात असत, मात्र कधी कधी काढताना ती मटकी फुटत असत, आणि सगळीकडे हे खाद्यपदार्थ पसरत असत.

मात्र अशातही भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची सवंगडी हे खाद्यपदार्थ उचलून खातच असत. त्यानंतर मात्र त्यांना एखाद्या पदार्थ फोडून खाण्याची सवय लागली, त्यामुळे गवळणींच्या खाद्यपदार्थांची तर चोरी होईच, मात्र मडक्यांची देखील नासधूस होत असे. याला कंटाळून गवळणी कृष्णाच्या आई अर्थात यशोदेकडे तक्रार घेऊन जात असत. ही तक्रार करताना अनेक गवळणी म्हणून प्रसिद्ध असणारी गाणी देखील आपल्याला ऐकायला मिळतात.

भगवान श्रीकृष्णांच्या याच दही, दूध, माखन खाण्याच्या लीलाचे प्रतीक म्हणून दरवर्षी श्रीकृष्ण जन्मानंतर दहीहंडी साजरी करण्याची प्रथा पडली.

भारत देश आणि दहीहंडी उत्सवाचे स्वरूप:

संपूर्ण भारतभर दहीहंडी उत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि थाटामाटात साजरा होतो. इस्कॉन ही अशी एक मोठी संस्था आहे, जी सर्वात मोठ्या स्तरावर दहीहंडी उत्सवाच्या आयोजन करते. संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्र राज्य देखील मोठ्या उत्साहाने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करते, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाण समजले जाणाऱ्या जुहू चौपाटीवर देखील दहीहंडी उत्सव आयोजित केला जातो.

तसेच विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये तर चौकाचौकांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. पुण्यात दहीहंडीचा उत्सव सर्व धार्मिक विधींचे सोपस्कार पार पाडून केला जातो. महाराष्ट्र मध्ये दहीहंडी उत्सव साजरा करताना गोविंदा आला रे अशा आरोळ्या दिल्या जातात, याचा अर्थ भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असा होतो.

भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या मथुरेमध्ये तर कित्येक दिवस आधीपासूनच दहीहंडी उत्सवाची तयारी सुरू केली जाते.  या प्रसंगी संपूर्ण मथुरा नगरी सजवली जाते. देशभरातून  अनेक कृष्णभक्त मथुरा नगरीत एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. यावेळी मथुरेत एक वेगळेच नवचैतन्य आणि उत्साह पसरतो.

वृंदावन मध्ये जेथे भगवान श्रीकृष्ण लहानाचे मोठे झाले, या ठिकाणी देखील दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्णाची अनेक मंदिरे बघायला मिळतात, या प्रत्येक मंदिरामध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माचा सोहळा आणि त्यानंतर लगेचच दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.

वृंदावन येथे एकच ठिकाणी मोठा उत्सव होत नसला तरी देखील प्रत्येक भागामध्ये हा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. येथे प्रत्येक मंदिर छोटेखानी का होईना मात्र दहीहंडी उत्सव आयोजित करून साजरा करतेच.

दहीहंडी उत्सव कसा साजरा करतात:

ज्यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. यासाठी उंचावर एक मातीचे भांडे टांगले जाते, ज्यामध्ये काला भरला जातो. त्यानंतर मानवी मनोरा तयार करून गोविंदाची पथके या मातीच्या भांड्याला फोडण्याचे प्रयत्न करतात.

त्यासाठी एकमेकांच्या अंगावर उभा राहून एकमेकांना आधार देतात आणि सर्वात वर असणाऱ्या गोविंदाला ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळतो. ज्यातून सर्वत्र खाली काला पडतो, जो सर्वजण वाटून घेतात.

निष्कर्ष:

भारतीय संस्कृतीमध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात त्यातील एक महत्त्वाचा आणि सर्वांच्या आवडीचा उत्सव म्हणजे दहीहंडी उत्सव होय. कारण या दिवशी तरुण मुलांना दहीहंडी फोडण्याची संधी मिळते. यामध्ये त्यांना खूप उत्साह वाटतो. भगवान श्रीकृष्ण लहान असताना आपल्या सर्वांगड्यांच्या मदतीने आसपासच्या घरातील शिंक्यावर ठेवलेल्या दही, लोणी, किंवा माखन यांच्या मटक्या मानवी मनोरा करून काढत असत.

बऱ्याचदा या मटक्या फुटत, मात्र तरी देखील सर्वजण त्यातील पदार्थ वाटून आवडीने खात. मात्र सर्व गवळणी श्रीकृष्ण भगवान यांच्या आई यशोदा यांच्याकडेच तक्रार करत, त्यांची ही लीला एका प्रतीकात्मक स्वरूपामध्ये साजरी करणे म्हणजे दहीहंडीचा उत्सव होय. हा उत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला त्या तिथीला श्रीकृष्ण जन्मानंतर साजरा केला जातो.

FAQ

दहीहंडी फोडणे सर्वात प्रथम कोणी सुरू केले?

वृंदावन मध्ये ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण आपल्या इतर सवंगड्यांसोबत लहानाचे मोठे  होत होते त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम दहीहंडी फोडण्याची सुरुवात केली.

दहीहंडी मधील मटकी मध्ये कोणकोणते घटक घातले जातात?

दहीहंडीतील घटकांमध्ये स्थलपरत्वे बदल होतो, मात्र सर्वसाधारणपणे दही, तूप, मिठाई, लोणी, काजू, मुरमुरे, मिरची इत्यादी घटक दहीहंडी मध्ये घातले जातात.

दहीहंडी खेळण्यासाठी किमान वयाची तरतूद आहे का? आणि असेल तर किती?

दहीहंडी खेळण्यासाठी किमान वयाची तरतूद असून ती वेळोवेळी न्यायालयाच्या विविध निर्णयांमध्ये बदललेली आहे. सध्या १४ वर्षे इतकी करण्यात आलेली आहे.

दहीहंडी हा उत्सव वर्षाच्या कोणत्या भागामध्ये साजरा केला जातो?

दहीहंडी हा उत्सव इंग्रजी वर्षाच्या साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो.

दहीहंडी हा उत्सव असून देखील त्यावर नियम का घातले गेलेले आहेत?

दहीहंडी हा उत्सव असला तरी देखील २०१२ या वर्षी सुमारे २२५ गोविंदांना दुखापत झाल्याचा कारणास्तव महाराष्ट्र सरकारने अनेक नियम बनवले आहेत.

आजच्या भागामध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या औचित्याने साजरा केला जाणाऱ्या दहीहंडी या उत्सवाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला आवडली ना?,  नक्कीच आवडली असणार. त्यामुळे भरभर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये कळवा, आणि इतरही दहीहंडी उत्सवाची आतुरतेने वाट बघणारे आपल्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करा.

धन्यवाद…

Leave a Comment