डेबिट कार्डची संपूर्ण माहिती Debit Card Information In Marathi

Debit Card Information In Marathi पूर्वीच्या काळी कुणालाही पैसा हवा असेल, आणि तो जर बँकेत जमा केलेला असेल, तर मोठ्या मोठ्या लाईनीमध्ये उभे राहून या पैशांकरिता कित्येक वेळ खर्च करावा लागत असे. मात्र आजकाल एटीएम मशीन ची सुविधा आल्यामुळे हे काम अतिशय सोपे झालेले आहे.

Debit Card Information In Marathi

डेबिट कार्डची संपूर्ण माहिती Debit Card Information In Marathi

एटीएम मध्ये या डेबिट कार्डचा वापर केला जातो, ज्याला सर्रास एटीएम कार्ड म्हणून ओळखले जाते. मात्र त्याला खऱ्या स्वरूपात डेबिट कार्ड असे म्हणत असतात. क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून, क्रेडिट कार्डद्वारे उसने स्वरूपाचे पैसे काढले जातात, तर डेबिट कार्ड द्वारे स्वतःच्या खात्यामध्ये असणाऱ्या रोख रकमेतून पैसे काढले जातात. ग्राहकांच्या बचत खात्याला या एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डची सुविधा प्रदान केली जाते.

या कार्डच्या अंतर्गत व्यक्ती अनेक डिजिटल व्यवहार देखील करू शकतात. या डेबिट कार्डचा वापर सुरक्षित होण्याकरिता याला एक पिन क्रमांक देखील दिलेला असतो, ज्या शिवाय कुठलाही व्यवहार पूर्ण केला जाऊ शकत नाही. सामान्य ग्राहकांसाठी या डेबिट कार्डच्या वापराला दैनंदिन मर्यादा देखील आखून दिलेली असते. त्यापेक्षा जास्त खरेदी करणे किंवा पैसे काढणे शक्य होत नाही. या बँकेच्या मर्यादा खात्याचा प्रकारानुसार असतात. आजच्या भागामध्ये आपण या डेबिट कार्ड विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावडेबिट कार्ड
इतर नावए टी एम कार्ड
कार्यखरेदी करणे, पैसे काढणे
संलग्न बँकेच्या खात्याशी
वापरसामान्य ग्राहक
प्रणालीएन पी सी आय

डेबिट कार्ड म्हणजे काय:

डेबिट कार्ड म्हणजे एक प्लास्टिक मनी किंवा प्लास्टिक पैशाचा प्रकार असून, या अंतर्गत खिशात कागदी चलनी नोटा नसतील, तरी देखील आपण खरेदी करू शकतो. त्याचबरोबर पैशांची आवश्यकता असताना एटीएम मशीन मधून पैसे देखील काढू शकतो. ज्यावेळी कोणताही ग्राहक बचत खाते सुरू करत असतो, त्यावेळी त्याला बँकेकडून या खात्यासोबत संलग्न असलेले डेबिट कार्ड प्रदान केले जाते.

त्याचा वापर करून ग्राहक ऑनलाईन खरेदी करू शकतो, किंवा आपल्या पैशांचे व्यवहार देखील करू शकतो. डेबिट कार्ड हे प्रीपेड स्वरूपाचे असते, त्यामुळे तुम्हाला कुठेही खरेदी करायची असेल तर तत्पूर्वी तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे असले पाहिजेत. डेबिट कार्डला १६ अंकांचा एक युनिक नंबर प्रदान केलेला असतो.

त्याचबरोबर या कार्डच्या पाठीमागील बाजूने तीन अंकी सी व्ही व्ही कोड देखील दिलेला असतो. ज्याद्वारे वेगवेगळे कार्ड ओळखणे सोपे होते. सोबतच ऑनलाईन व्यवहार करताना देखील या गोष्टी फायदेशीर ठरत असतात.

आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड म्हणजे काय:

अनेक लोक नेहमी परदेशवारी करत असतात. त्या ठिकाणी अशा लोकांना पैशांची देखील आवश्यकता भासत असते. त्यामुळे जेव्हा कुठलेही लोक परदेशात गेल्यानंतर पैशाच्या आवश्यकतेनुसार तेथील एटीएम कार्ड मध्ये आपले कार्ड वापरून पैसे काढू शकतात. अशा स्वरूपाच्या कार्डला आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड म्हणून ओळखले जाते. या कार्डचा वापर करून ग्राहक आंतरराष्ट्रीय ऑनलाईन खरेदी देखील करू शकतो.

डेबिट कार्ड चे प्रकार:

प्रत्येक ग्राहकाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. या संपूर्ण गरजा भागल्या जाव्या, याकरिता डेबिट कार्ड वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सादर केले जाते. यामध्ये रुपे डेबिट कार्ड हे भारतामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे कार्डचे प्रकार आहे. या कार्डचा वापर मार्च २०१२ पासून एन पी सी आय द्वारे केला जात आहे.

त्याचबरोबर जागतिक पातळीवर लोकप्रिय असणारा कार्डचा प्रकार म्हणून मास्टर कार्ड प्रकाराला ओळखले जाते. हे विदेशी कंपनीने तयार केलेले कार्ड आहे. त्याचबरोबर व्हीजा डेबिट कार्ड हे ऑनलाईन व्यवहारांकरिता वापरले जाणारे कार्ड असून, मेस्ट्रो डेबिट कार्ड सुद्धा ऑनलाईन स्वरूपात वापरता येते.

तसेच ते आंतरराष्ट्रीय वापराला देखील योग्य आहे. कार्ड मधील सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणून व्हिसा इलेक्ट्रॉन डेबिट कार्ड ला ओळखले जाते. मात्र या कार्डद्वारे ग्राहकांना ओव्हरट्राफ्ट सुविधा मिळत नाही.

डेबिट कार्ड हे केवळ साक्षर लोकांनाच प्रदान केले जाते. त्याचा मुख्य उद्देश या कार्डचा गैरवापर केला जाऊ नये हा असतो. त्याचबरोबर डेबिट कार्ड हरवले असता इतर व्यक्तीकडून ते वापरले जाऊ नये, याकरिता त्याला एक पिन देखील देण्यात आलेला असतो.

निष्कर्ष:

आज काल म्हणण्यापेक्षा अगदी पूर्वीच्या काळापासूनच पैशाला फार महत्त्व आहे. कुठलेही कार्य करायचे असेल तर पैसा हा हवाच असतो. अगदी पूर्वीच्या काळी देखील कुठलीही गोष्ट हवी असेल, तर त्यासाठी बदल्यात दुसरी कोणती तरी गोष्ट द्यावी लागत असे. यालाच वस्तुविनिमय पद्धत असे म्हणत असे. नंतर या व्यापाराकरिता पैशांची कल्पना राबविण्यात आली.

आज भारताने अधिकृतरित्या रुपया हे आपले चलन स्वीकारले असून, त्या अंतर्गत भारतामध्ये सर्व प्रकारचे व्यवहार पार पडत असतात. लोकांच्या बचती सुरक्षित ठेवण्याकरिता बँका फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्या बँकेमधून पैसे काढण्याकरिता अनेक ग्राहक गर्दी करत असत, त्यामुळे प्रचंड मनस्ताप बँकेसह ग्राहकांना देखील सहन करावा लागत असे.

त्यामुळे यावर काहीतरी तोडगा असावा, या संकल्पनेतून एटीएम व्यवस्था आणि डेबिट कार्डची निर्मिती करण्यात आली. ज्या अंतर्गत कोणताही ग्राहक स्वतःच्या खात्यातून हवे तेव्हा हवे त्या स्वरूपात पैसे काढू शकतो. अगदी २४ तास पैसे काढण्याची सुविधा या एटीएम मुळे ग्राहकांना उपलब्ध झालेली आहे.

त्याचबरोबर या डेबिट कार्डचा वापर करून कोणत्याही ठिकाणी खरेदी करायला गेले असेल, तरी सहजरित्या खरेदी करणे शक्य होत असते. आजच्या भागामध्ये आपण या डेबिट कार्ड विषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. यामध्ये डेबिट कार्ड म्हणजे काय, याचा वापर कशासाठी केला जातो, डेबिट कार्ड चे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल असे दोन प्रकार असतात ते काय आहे, या डेबिट कार्ड चे कार्य कसे चालते, त्याचे कोणकोणते प्रकार पडत असतात, ऑनलाइन व्यवहारांकरिता डेबिट कार्ड कसे वापरावे, डेबिट कार्डला पिन कसा सेट करावा, क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड यांच्यामधील फरक काय आहे, हे डेबिट कार्ड वापरल्यामुळे कोणकोणते फायदे होतात, इत्यादी स्वरूपाची माहिती बघितली आहे.

FAQ

डेबिट कार्ड म्हणजे काय?

डेबिट कार्ड म्हणजे ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यामध्ये ठेव किंवा बचत ठेवलेली रक्कम काढण्याकरिता वैयक्तिक स्तरावर पुरवण्यात येणारी सेवा असून, या अंतर्गत तुम्ही कुठल्याही ठिकाणी खरेदी करू शकता, किंवा एटीएम मधून पैसे देखील काढू शकता.

डेबिट कार्ड चे कोणकोणते प्रकार पडत असतात?

डेबिट कार्ड चे मुख्यतः राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे दोन प्रकार पडत असतात. त्यामध्ये पुन्हा रुपे डेबिट कार्ड, मास्टरकार्ड डेबिट कार्ड, मेस्ट्रो डेबिट कार्ड, विसा डेबिट कार्ड, आणि व्हिसा इलेक्ट्रॉन डेबिट कार्ड इत्यादी उपप्रकार पडत असतात.

डेबिट कार्ड साधारणपणे कोणत्या स्वरूपाच्या खात्याशी संलग्न केलेले असते?

डेबिट कार्ड मुख्यतः बचत खात्याशी संलग्न केलेले असते.

डेबिट कार्ड साठी कोणकोणत्या संख्यात्मक आकडेवारीची आवश्यकता असते?

डेबिट कार्ड ला एक डेबिट कार्ड नंबर असतो. त्याचबरोबर पाठीमागील बाजूने तीन अंकांचा सी व्ही व्ही क्रमांक देखील असतो. सोबतच या कार्डच्या वापराकरिता पिन क्रमांकाची देखील आवश्यकता असते.

डेबिट कार्ड कोणत्या प्रणालीवर कार्य करत असते?

पूर्वीच्या काळी डेबिट कार्ड हे चुंबकीय पट्टीच्या प्रणालीवर कार्य करत असत. मात्र आजकाल यासाठी सिम कार्डप्रमाणे तंत्रज्ञान विकसित केले गेलेले आहे. जेणेकरून कार्ड क्लोनिंग थांबविली जाऊ शकेल.

Leave a Comment