दिवाळी सणाची संपूर्ण माहिती Diwali Information In Marathi

Diwali Information In Marathi नमस्कार मित्रांनो सण समारंभ म्हटलं की सगळीकडे अगदी उत्साहाचं व आनंदाचे वातावरण असतं .सध्या तरी सगळीकडे सण उत्सवाचेच वातावरण चालू आहे .गणपती, नवरात्री, दसरा आणि त्यानंतर येणारी दिवाळी सर्व सणांमध्ये सर्व प्रचलित असलेला व प्रसिद्ध असणाऱ्या महत्त्वाच्या स्थानांमध्ये दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण दिवाळी या सणाबद्दल माहिती पाहणार आहोत. दिवाळी हा सण कुठल्याही एका विशिष्ट धर्माचा सण नसून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी हा रोषणाईचा, उत्साहाचा ,उल्हासाचा, मैत्रीचा, मानवतेचा सण म्हणून ओळखला जातो.

Diwali Information In Marathi

दिवाळी सणाची संपूर्ण माहिती Diwali Information In Marathi

दिवाळी हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नुकताच पावसाळा संपवून शेतीमधील धनधान्य शेतकऱ्यांच्या हातात आलेले असताना, धान्याचे कोठार भरले जाण्याची चाहूल शेतकऱ्यांना लागलेली असताना, शरद पौर्णिमेच्या चांदण्यांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही साजरी झालेली असते व हळूहळू गुलाबी थंडीचे चाहूल सर्वत्र सुरू झालेली असते.

अशाच वेळी दिवाळी या सणाची लगबग देखील चालू झालेली पाहावयास मिळते. अश्विन महिना संपत असताना दिवाळीची सुरुवात होते व कार्तिक शुद्ध द्वितीयेला म्हणजेच भाऊबीजेनंतर दिवाळी हा सण संपतो .ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळी साजरी करण्यामागची कारणे –

दिवाळी हा प्राचीन सण असून त्यासंदर्भात अनेक कथा देखील प्रचलित आहेत. काही इतिहासकारांचा असा समज आहे की आर्यलोक उत्तर ध्रुवावर राहत असताना या सणाची सुरुवात झाली. तसेच काही खगोल शास्त्रांचे असे मत आहे की सहा महिन्यांची मोठी रात्र संपवून सहा महिन्यांचा नवीन दिवस सुरू होताच त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना नवजीवन प्राप्त झाल्याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो.

तर काही लोकांमध्ये अशी आख्यायिका प्रचलित आहे की 14 वर्षांचा वनवास भोगून रावणाला पराभूत करून प्रभू श्रीरामचंद्र सीतेसह जेव्हा आयोध्या नगरीत परतले तेव्हा त्यांच्या स्वागत प्रीत्यर्थ तेथील लोकांनी रांगोळ्या काढून दिवे लावून रोषणाई करून आपला आनंद साजरा केला. तेव्हापासून हा सण दिव्यांचा, रोषणाईचा सण, म्हणून आपण साजरा करतो.

दिवाळीच्या पूर्वी घराची साफसफाई करून सर्वत्र रंगरंगोटी करून फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी घरातील गृहिणींचे धावपळ चालू होते. बाजारपेठा या विविध नवनवीन वस्तूंनी ,सजावटीच्या वस्तूंनी व रांगोळ्यांनी सजलेल्या असतात. लोक नवनवीन दागिने कपडे खरेदी करण्यास बाजारामध्ये झुंबड उडवतात .त्यावेळी दिवाळीच्या तयारीमध्ये लोक इतके मग्न झालेले असतात की वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होते.

दिवाळी या सणाबद्दल चे ऐतिहासिक महत्त्व-

दिवाळी या सणाबद्दल अनेक ऐतिहासिक व पौराणिक कथा प्रचलित असून काही लोकांमध्ये अशी चर्चा आहे की लक्ष्मी देवीचा जन्म हा कार्तिक महिन्यातील अमावस्येला झाला असून हिंदू मध्ये विविध विधी पूजा करून हा सण साजरा केला जातो.

संध्याकाळच्या वेळी लोक लक्ष्मीची पूजा करून तिला संपत्तीची देवी म्हणून तिची आराधना करतात. म्हणूनच अनेक लोकांचे मानने आहे की देवी लक्ष्मीचा जन्म म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. तर काहींचे मानने असे आहे की भगवान राम जेव्हा आयोध्येतून परतले हेच  दिवाळी साजरा करण्याचे मुख्य कारण होय.

दिवाळी सणाच्या पाच दिवसांचे असणारे महत्त्व –

पहिला दिवस म्हणजे वसुबारस अश्विन वैद्य द्वादशी पासून खरंतर दिवाळीला सुरुवात होत असते याच दिवसाला वसुबारस असे म्हणतात. या दिवसाला गोवत्स्यबारस असे देखील म्हटले जाते .यामधील गो म्हणजे गायमाता व वत्स्य म्हणजे त्या गाईचे वासरू. भारत देशामध्ये कृषी प्रधान संस्कृती प्रचलित असून या दिवशी सायंकाळी गायांची वासरांची पूजा करण्याची प्रथा प्रचलित आहे. लक्ष्मी देवीची सतत आपल्यावर कृपादृष्टी असावी आपल्याला ,आपल्या मुलांना, आपल्या जनावरांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी धेनु पूजा केली जाते. या दिवशी आपल्या गायी बद्दल वासरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.

दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस-

अश्विन वैद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे देखील म्हणतात. धनत्रयोदशीबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत परंतु धन्वंतरी हे वैद्यराज होते त्यामुळे घरादारातील सर्व व्यक्तींना चांगली आरोग्य लाभावे म्हणून आयुर्वेदिक चिकित्सक धन्वंतरी म्हणजे देवांचे वैद्य यांची पूजा मनोभावे केली जाते. या दिवशी प्रसाद म्हणून कडुलिंबाची बारीक केलेली पान साखरे सह देतात .त्यामुळे शरीरातील सर्व व्याधी नष्ट होतात असे मानले जाते .

नरक चतुर्दशी या दिवशी श्रीकृष्ण यांनी नरकासुराचा वध करून जुलमी राजवटीतून सर्व लोकांना मुक्त केले अशी आख्यायिका सांगितली जाते. श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो .या दिवशी अभ्यंग स्नानाला अत्यंत महत्त्व दिले जाते. सूर्योदयाच्या पूर्वी उठून तेल उटणे लावून स्नान करणे म्हणजेच अभ्यंगस्नान होय. अभ्यंग स्नान करून कुटुंबातील सर्वजण फराळाचा आनंद घेतात .त्यानंतरचा दिवस म्हणजे अश्विन अमावस्येचा दिवस.

अर्थातच लक्ष्मीपूजनाचा दिवस या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते हा दिवस दिवाळीतील मुख्य दिवस मानला जातो. त्यावेळी शुभ मुहूर्तावर पाटावर रांगोळी घालून त्यावर तांदूळ ठेवून एका तबकामध्ये दागिने, सोने नाणे, नोटा ठेवून लक्ष्मीची पूजा केली जाते. व नैवेद्य देखील दाखवला जातो .

आपल्या घरात असणाऱ्या नवीन केरसुनीची अर्थात झाडूची हळदीकुंक व फुल वाहून पूजा केली जाते.त्यानंतर अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यावर कार्तिक शुद्ध प्रतिपदा बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा या नावाने साजरा केला जातो.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच दिवाळी पाडव्याचा मुहूर्त होय. या दिवशी सोने खरेदीस सुहासिनींकडून प्राधान्य दिले जाते. पतीला औक्षण करणे, व्यापाऱ्यांकडून नवीन वर्षाचा प्रारंभ या दृष्टिकोनातून या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.

त्यानंतर कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण सर्व दूर साजरा केला जातो. या दिवसाची आख्यायिका अशी सांगितली जाते की यम आपल्या बहिणीच्या घरी जेवायला गेला असताना यमद्वितीया म्हणून हा सण साजरा केला जातो. बीज याचा अर्थ होतो द्वितीया तिथी .

बीजेच्या चंद्रकोरीच्या प्रमाणे बहीण भावांमधील प्रेम हे सदैव वृद्धिंगत व्हावे हा या सणाचा उद्देश आहे. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन औक्षण करून घेतो व आपल्या भावाचे स्वागत गोडधोड पदार्थांनी बहीण करत असते. भाऊ बहिणीला ओवाळणी देत असतो भावा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. अश्या प्रकारे दिवाळी या सणाचे सहा दिवस अवघ्या भारतभर खूप उत्साहाने साजरे केले जातात.

मित्रांनो पर्यावरण पूरक दिवाळी सण साजरा करणे ही काळाची गरज आहे पण  मित्रांनो दिवाळी सण म्हणटल की रोषणाई, दिवे पणत्या, फराळ नवीन कपडे या सर्व गोष्टी आल्याच याबरोबर प्रश्न पडतो तो म्हणजे यावर्षी कोणते फटाके आणायचे.

 फटाके हे ज्वलनशील रासायनिक पदार्थ वापरून तयार केलेले असतात. ते विषारी देखील असतात. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण यांसारखे गंभीर परिणाम आपल्या पृथ्वीला भोगावे लागतात. फटाक्यांचा विषारी धूर आपल्या डोळ्यात गेल्याने आपल्याला डोळे गमावण्याची देखील नामुष्की येऊ शकते. त्यामुळे फटाक्यांची आतिषबाजी करताना आपण आपल्या पर्यावरणाचे देखील भान ठेवले पाहिजे .

काही फटाके हे इतके जोरात वाजतात की त्यामुळे कानाला देखील इजा होण्याची शक्यता असते .अनेकांच्या घरात वृद्ध माणसे लहान मुले प्राणी हे देखील असतात फटाक्यांच्या आवाजामुळे व त्यांच्या ज्वलनामुळे या सर्व पशुपक्ष्यांना खूप खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तर मित्रांनो आपल्या पृथ्वीच्या व पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरा करण्याची संकल्पना ही हळूहळू जन समाजामध्ये रुजली  पाहिजे.

 आपण जरी दिवाळी साजरी करत असलो नवनवीन कपडे घालत असलो फराळ खात असलो तरी तुम्हाला माहिती आहे का तुमचे फटाके ज्या फॅक्टरीमध्ये बनवले जातात त्या फॅक्टरीमध्ये कोण काम करतं?

 तर त्याचे उत्तर आहे की अशा फॅक्टरीमध्ये बालकामगार अर्थातच बालमजूर हे काम करत असतात. बालमजूर किंवा बालकांना कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा असून दिवाळी हा सण जवळ येत असल्याने अनेक फॅक्टरी मालक हे बेकायदेशीररित्या लहान मुलांना कामावर ठेवतात व फटाके बनवण्याच्या कामात त्यांना गुंतवतात.

अशांनी त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचतोच पण त्यांचे बालपण देखील हरवले जाते. जर दुसऱ्याचा आयुष्य अंधारात टाकून आपण दोन मिनिटांच्या फटाक्यांच्या रोषणाईसाठी व आतिषबाजी साठी दिवाळी हा सण साजरा करत असू तर ते मानवतेला धरून नाही. त्यामुळे दिवाळी हा सण रोषणाईचा ,दीपपूजनाचा, फराळाचा, सणसमारंभाचा आहे. पण अशा फटाक्यांच्या आतिषबाजीचा नव्हे.

 तर आज पासून आत्तापासून आपण संकल्प करूया ही येणारी दिवाळी ही पर्यावरण पूरक दिवाळी म्हणूनच मी साजरी करेल.

 धन्यवाद!!!!!!

FAQ:

दिवाळी म्हणजे काय इन मराठी?

दिवाळी या शब्दाचा अर्थ “रोशनाईचा सण’ किंवा “दिपोत्सव” असा आहे.

दिवाळी सणाचे प्राचीन नाव काय आहे?

प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीपप्रतिपदुत्सव आणि आताची दिवाळी.

भारतात दिवाळी का साजरी केली जाते?

पुराणातील कथांनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. रावणाचा वध करून ते अयोध्यानगरीत आल्यानंतर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळवण्यात आली होती. सुख-समृदी वाईट किंवा अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणजे दीपावली.

2023 मध्ये दिवाळी किती तारखेला आहे?

13 नोव्हेंबरला

Leave a Comment