Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या या अखंड प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार मानले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारताचे सर्वप्रथम राहिलेले न्यायमंत्री यांच्या बद्दल या लेखात आपण माहिती पाहणार आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi
त्यांनी आपले सारे आयुष्य दलितांच्या उद्धाराकरिता झोकून दिले होते. आज आपल्या समाजात दलित लोकांना जो मान सन्मान किंवा प्रतिष्ठा मिळालेली आहे ते सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच जात.
पूर्ण नाव | भीमराव रामजी आंबेडकर |
जन्म | 14 एप्रिल 1891 |
जन्मस्थान | महू , मध्यप्रदेश |
मृत्यू | 6 डिसेंबर 1956 |
आई | भीमाबाई सकपाळ |
वडील | रामजी सकपाळ |
पत्नी | रमाबाई आंबेडकर |
मुलगा | यशवंत आंबेडकर |
धर्म | बौद्ध |
राष्ट्रीयत्त्व | भारतीय |
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्राथमिक माहिती:-
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म सन 1891 साली 14 एप्रिल रोजी महू या गावात इंदोर मध्यप्रदेश मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव हे रामजी मालोजी सपकाळ असे होते तर त्यांच्या आईचे नाव हे भीमाबाई मुबारदकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नीचे नाव हे रमाबाई आंबेडकर होते तर दुसऱ्या पत्नीचे नाव हे सविता आंबेडकर असे होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सुरुवातीचा जीवनकाळ:-
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म एका दलित घराण्यात झाला होता .त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील हे भारतीय सेनेमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते .व त्यावेळी त्यांची नेमणूक इंदोर शहरांमध्ये झालेली होती. सन 1894 साली म्हणजेच एकूण तीन वर्षानंतर त्यांच्या वडिलांची सेवानिवृत्ती झाली व ते संपूर्ण परिवारासमवेत महाराष्ट्रातील साताऱ्यात स्थलांतरित झाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या आई-वडिलांचे 14 वे व शेवटचे आपत्य होते. ते कुटुंबातील सर्वात छोटे व लाडके सदस्य देखील होते. त्यांच्या परिवाराचं मूळ गाव म्हणायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यातील अंबवडे हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचा जन्म महार जातीमध्ये झाला असल्याने त्यांना समाजात खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप हुशार होते, पण जातीपातीच्या भेदभावामुळे त्यांना उच्च शिक्षण करण्यासाठी देखील फार संघर्ष करावा लागला .त्यांचा शिक्षणासाठीचा हा प्रवास अतिशय संघर्षमय ठरला होता. पण त्यांनी सगळ्या परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेऊन भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी बनले व देशाची घटना लिहिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण:-
त्यांचे वडील हे भारतीय सेनेमध्ये नोकरीला असल्याकारणाने त्यांच्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व हे चांगलेच माहिती होते. पण शाळेत प्रवेश घेण्यापासूनच त्यांना जातीपाती चा सामना करावा लागला होता .त्यांच्या जातीतील सर्व मुलांना वर्गात बसण्याची म्हणजेच वर्गातील बाकांवर बसण्याची परवानगी नव्हती ,तसेच त्यांना शाळेतील पाणी देखील पिण्याची परवानगी नव्हती.
शाळेतील इतर मुलांसोबत खेळण्याची ,डबा खाण्याची ही कसलीच परवानगी त्यांना नव्हती. शाळेत काम करणारा चपरासी त्यांच्या हातावर पाणी टाकत त्यावेळी या मुलांना पाणी पिण्यास मिळत असे .जर हा चपरासी कधीमधी नसला किंवा सुट्टीवर असला तर या बिचार्या मुलांना पाणी देखील मिळत नसे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण हे आपल्या मूळ गावी म्हणजेच दापोली येथेच पूर्ण केले त्यानंतर त्यांनी मुंबईतील एलफिस्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. असे उच्च शिक्षण घेणारे ते पहिले दलित ठरले होते. सन 1907 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रिकची डिग्री देखील प्राप्त झाली.
मॅट्रिकची डिग्री देण्यासाठी एक दीक्षांत समारोह आयोजित करण्यात आला होता तेथे कृष्णाजी अर्जुन केमुस्कर या त्यांच्या शिक्षकांनी स्वतःच्या हाताने लिहिलेले “बुद्ध चरित्र” हे पुस्तक भीमराव आंबेडकर यांना भेट म्हणून दिले. पुढे बाबासाहेब आंबेडकर यांना बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या अंतर्गत फेलोशिप मिळाली असल्याने त्यांनी आपले पुढचे शिक्षण सुरू ठेवले.
त्यांना लहानपणापासूनच शिक्षणात व अभ्यासात रुची होती त्यामुळे त्यांनी आपल्या प्रत्येक परीक्षेत उत्तुंग यश मिळवलं होतं. त्यामुळे जातीपातीचा भेदभाव करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात त्यांनी झणझणीत असे अंजन घातले होते. सन 1908 ला त्यांनी एलफिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तेथे देखील प्रवेश घेणारे ते पहिले दलित ठरले होते.
सन 1912 रोजी मुंबई विश्वविद्यालया मधून ते पदवी परीक्षा देखील उत्तीर्ण झाले. दलित असल्याकारणाने त्यांना संस्कृत भाषेतून शिक्षण घेण्यास विरोध केला जात होता. त्यामुळे त्यांनी फारसी भाषेतून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अर्थशास्त्र व राजनीति विज्ञान हे विषय पदवी अभ्यासक्रमासाठी निवडले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे परदेशी शिक्षण:-
भीमराव आंबेडकर यांना बडोदा राज्य सरकारने बडोदा येथील रक्षा मंत्री केले होते .पण तेथेही काही जातीभेद करणाऱ्या लोकांमुळे त्यांनी तेथे जास्त काळ काम केले नाही .त्यांना न्यूयॉर्क येथील कोलंबिया विश्वविद्यालयामधून शिक्षण घेण्याची संधी मिळाली. सन 1913 रोजी त्यांनी अमेरिकेला जाण्यास प्रस्थान केले.
त्यांनी 1950 साली अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयामधून समाजशास्त्र इतिहास दर्शनशास्त्र मानव विज्ञान व अर्थशास्त्र या विषयांमधून एम ए ची डिग्री प्राप्त केली. तेथेच राहून त्यांनी प्राचीन भारताचे वाणिज्य या विषयावर बरेच संशोधन केले .सन 1916 रोजी अमेरिकेमधील कोलंबिया विश्वविद्यालयामधूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा पीएचडीचा विषय हा “ब्रिटिश भारतात प्रांतीय वित्त यांचे विकेंद्रीकरण” हा होता .
अमेरिकेतून भारतात परत आल्यानंतर त्यांनी बडोदा राज्य सरकार अंतर्गत बरीच कामे देखील केली पण जातीपातीच्या भेदभावामुळे बराच काळ त्यांनी काम केले नाही .त्यानंतर ते मुंबईला परतले व त्यांनी मुंबईमधील सिडनी हॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी केली.
त्यांनी शिकवण्यासाठी अर्थशास्त्र हा विषय घेतला होता नोकरी करत असताना त्यांची पुढे शिकण्याची इच्छा अजूनही प्रगल्भ होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पुढील शिक्षणाकरिता पैसे जमवायला सुरुवात केली. सन 1920 साली ते पुन्हा एकदा भारतामधून इंग्लंडला गेले. सण 1921 साली त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मधून आपली मास्टर डिग्री मिळवून दोन वर्षांनी त्यांनी आपली डी एस सी ही पदवी देखील प्राप्त केली.
न्याय शास्त्राचा अभ्यास करत असताना आंबेडकर यांनी ब्रिटिश बार मध्ये बॅरिस्टर म्हणून देखील आपले कार्य बजावले. सन १९२७ रोजी तारीख होती 8 जून याच दिवशी कोलंबिया विश्वविद्यालयाकडून त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय वाटचाल:-
सन 1936 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या राजकीय वाटचालीस सुरुवात केली. व त्यांनी आपली स्वतंत्र लेबर पार्टी देखील स्थापन केली. त्यांनी सन 1937 रोजी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पार्टीच्या 15 सीटस निवडून आणल्या होत्या.
15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्यांनी आपल्या स्वतंत्र लेबर पार्टीचे नाव बदलून अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ असे ठेवले. 1946 रोजी झालेल्या संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पराभव पचवावा लागला होता .त्यानंतर काँग्रेस व महात्मा गांधींच्या प्रयत्नांनी अखंड दलित वर्गाला हरिजन ही उपाधी बहाल केली. व संपूर्ण दलित वर्ग हा हरिजन या नावानेच ओळखला जात होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गांधीजींनी दिलेले हरिजन हे नाव अजिबातच पसंत नव्हते त्यामुळे त्यांनी या उपाधीला कडाडून विरोध केला. त्यांनी त्यांच्या एका भाषणात असे विधान केले की , “दलित म्हणजेच अश्पृश्य समाजातील लोक देखील माणसेच आहेत ते देखील समाजाचा एक अविभाज्य भाग आहे.” त्यांना इतर सदस्यांप्रमाणेच सामान्य वागणूक दिली गेली पाहिजे त्यानंतर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना व्हॉइस रॉय एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल मध्ये श्रम मंत्री व रक्षा सल्लागार ही पदे देण्यात आली.
त्यानंतर ते भारताचे पहिले कायदेमंत्री ठरले. सर्वप्रथम काँग्रेस व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आंबेडकरांना विरोध केला होता पण त्यांचं मसुदा समितीतील काम पाहून त्यांचा विरोध संपुष्टात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली संविधानाची निर्मिती:-
घटना निर्मिती करताना त्यांच्यासमोर एकच उद्देश होता तो म्हणजे अस्पृश्य समाजातील लोकांना इतर लोकांप्रमाणेच सर्व अधिकार व प्राधिकार बहाल केले जावेत व समाजातील सर्व लोक हे एक समान वागवले गेले पाहिजे.
मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून 29 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यांनी घटना निर्मिती करताना श्रीमंत व गरीब तसेच उच्च व निम्न यांच्यातील फरक कमी करण्यामध्ये जास्त लक्ष केंद्रित केले. त्यांनी असे मत मांडले की श्रीमंत गरीब व उच्च निम्न ही दरी जर कमी झाली नाही तर देशाची एकात्मता टिकवणे हे फार अवघड जाईल.
त्याचबरोबर त्यांनी जाती समानतेवर धार्मिक व लिंग समानतेवर देखील विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांनी शिक्षण ,सहकारी क्षेत्रातील नोकऱ्या, तसेच नागरी सेवांमध्ये अनुसूचित जाती जमातीतील लोकांना आरक्षण सुरू करण्यात विधानसभेचे समर्थन या विषयासाठी प्राप्त करण्यास अमुलाग्र कामगिरी बजावली.
भारतीय संविधान बनवायला दोन वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला असून मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्यांचा अध्यक्ष मिळवून समावेश होता.
26 नोव्हेंबर 1949 रोजी ज्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती होते तेव्हा भारताचे संविधान तीन वेळा वाचन करून व त्यात सुधारणा करून राष्ट्रपतींकडे सोपवण्यात आले व 26 जानेवारी 1950 ला या महान भारत देशाचे संविधान स्वीकारण्यात आले. आज तोच दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणजेच गणराज्य दिवस म्हणून साजरा करतो .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अखेरचा प्रवास:-
सन 1940 रोजी मसुदा पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांची तब्येत ही फारच खालावली होती .त्यांना अनेक आजारांनी ग्रासले देखील होते. उपचार घेण्यासाठी ते मुंबईला रवाना झाले तेथेच त्यांची भेट डॉक्टर शारदा कबीर ज्या ब्राह्मण समाजातील एक महिला डॉक्टर होत्या त्यांच्याशी झाली. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला व 1948 रोजी ते एकमेकांशी विवाहबद्ध झाले.
लग्नानंतर शारदा यांनी आपले नाव बदलून सविता आंबेडकर असे ठेवले .त्यानंतर 1954 -55 रोजी त्यांची प्रकृती खूपच खालावली. मधुमेह,अस्पष्टदृष्टी यांसारखे अनेक आजार त्यांना जडले. व त्यांची तब्येत खालावली. 6 डिसेंबर 1956 रोजी दीर्घ आजारामुळे दिल्लीतील आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला .
जसे आपण जाणताच की भीमराव आंबेडकर यांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला होता त्यामुळे या धर्मांच्या रीतीप्रमाणेच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतदर्शनासाठी खूप मोठा जनसागर लोटला होता अशा या महान महापुरुषाला त्रिवार मानाचा मुजरा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न:-
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव काय?
भीमराव रामजी आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला?
त्यांचा जन्म सन 1891 साली 14 एप्रिल रोजी महू या गावात इंदोर मध्यप्रदेश मध्ये झाला होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती भाषा येत होत्या?
आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय?
रमाबाई आंबेडकर