Essay On Mahatma Gandhi In Marathi गांधी जयंती ही संपूर्ण भारतात उत्साहाने साजरी होते. गांधी जयंती ही भारताचे महान नेते आणि स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर महात्मा गांधी यांची जयंती आहे. गांधी जयंती दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी असते. हा दिवस संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. गांधी जयंती दिवशी भारतात सर्वत्र महात्मा गांधी यांच्या मूर्तीचे पूजन केले जाते आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. संपूर्ण भारतात हा दिवस मोठ्या उत्साहाने, श्रध्देने आणि आस्थेने साजरा करतात.
गांधी जयंती वर मराठी निबंध | Essay On Mahatma Gandhi In Marathi
गांधी जयंती यावर 100 शब्दांत मराठी निबंध || Essay on Gandhi Jayanti in 100 Words In Marathi
दरवर्षी 2 ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंती साजरी केली जाते. गांधी जयंती ही भारताचे आणि जगातील महान नेत्यांपैकी एक महात्मा गांधी यांची जयंती आहे. 2 ऑक्टोबर 1869 रोजी भारतातील पोरबंदर येथे महात्मा गांधीचा जन्म झाला. त्यांनी अहिंसा आणि सविनय कायदेभंगाच्या मार्गाने ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
1930 मधील गांधींचा प्रसिद्ध मिठाचा सत्याग्रह आणि 1942 मधील भारत छोडो आंदोलन ही ब्रिटिशांविरुद्धच्या अहिंसक प्रतिकाराची प्रतिष्ठित उदाहरणे आहेत. त्यांच्या “सत्याग्रह” आणि “अहिंसा” च्या अनुग्रहणुके जगभरातील अनेक भगातील असंख्य लोकांना अहिंसक मार्गाने न्याय मिळविण्यासाठी प्रेरित केले.
गांधी जयंती ही भारतात सर्वत्र साजरी होते. या दिवशी त्यांच्या मूर्तीला फुले वाहून पूजन केले जाते. गांधी जयंती ही महात्मा गांधीजींच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. या दिवशी त्यांच्या कार्याचे आणि आदर्शाचे स्मरण केले जाते.
गांधी जयंती यावर 200 शब्दांत मराठी निबंध || Essay on Gandhi Jayanti in 200 Words In Marathi
प्रत्येक वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी होते. गांधी जयंती ही महात्मा गांधी यांची जयंती आहे. महात्मा गांधी हे भारतातील एक खूप महत्त्वाचे नेते आणि स्वातंत्र्यवीर होते.
महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1969 मध्ये गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. महात्मा गांधी आपले वकिली शिक्षण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्यांनी तेथे अहिंसक सविनय कायदेभंगाद्वारे वांशिक भेदभावाविरुद्ध लढा दिला. 1915 मध्ये ते भारतात परतले. आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत ज्या प्रकारे लढा दिला त्याच प्रकारे भारतातील ब्रिटिशाविरुद्ध अहिंसेचा मार्ग पकडून लढा देण्याचा त्यांनी निश्चय केला.
त्यांनी मिठाचा सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलन करून देशाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली लाखो भारतीय स्वातंत्र्याच्या शोधात एकत्र आले. त्यांच्या अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने प्रभावित होऊन मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर आणि नेल्सन मंडेला सारखे नेते प्रेरित केले. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतल्यामुळे त्यांनी तुरुंगवास भोगला. 30 जानेवारी 1948 रोजी त्यांच्या तत्त्वांशी असहमत असलेल्या एका धर्मांधाने त्यांची हत्या केली.
महात्मा गांधी जयंती ही पूर्ण भारतात साजरी होते. गांधी जयंती दिवशी त्यांचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. शाळेत आणि शासकीय ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक कार्यक्रम होतात. सामाजिक आणि राजकीय बदल साध्य करण्यासाठी अहिंसा आणि नागरिक प्रतिकारशक्तीचा उपयोग करून बदल घडवणे हा गांधीजींचा वारसा आहे. गांधी जयंती दिवशी हा दिवस महामा गांधींचे विचार लक्षात ठेवून त्याप्रमाणे जीवन जगण्याचा दिवस आहे. त्यांचे आदर्श लक्षात आयुष्यात चांगल्या मार्गाने जाण्यासाठी प्रेरित होण्याचा हा दिवस आहे.
गांधी जयंती यावर 300 शब्दांत मराठी निबंध || Essay on Gandhi Jayanti in 300 Words In Marathi
गांधी जयंती ही महात्मा गांधी यांची जयंती आहे. भारतात दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केले जाते. 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आहे. महात्मा गांधी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक मुख्य नेते होते.
भारतातील गुजरात मधील पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 869 रोजी महात्मा गांधीजींचा जन्म झाला. महात्मा गांधी हे सत्य अहिंसा आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारे नेते होते. त्यांचा हा प्रवास दक्षिण आफ्रिकेत सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेत त्यांनी भारतीय लोकांना भेदभावाची वागणूक मिळत होती त्याविरुद्ध लढा दिला. त्यांनी परिवर्तन घडवण्यासाठी सत्य आणि अहिंसेच्या सामर्थ्यावर लढा देण्याचा मार्ग स्वीकारला.
1915 मध्ये महात्मा गांधी भारतात परतले. त्यावेळेस भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते आणि भारतात ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य चळवळ सुरू होती. भारतात परतल्यानंतर गांधीजींनी या चळवळीत जोमाने सहभाग घेतला थोड्याच काळात ते स्वातंत्र्य चळवळीचा एक मुख्य चेहरा बनले.
त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सविनय कायदेभंग मोहिमेंमधून देशाचे नेतृत्व केले. 1930 मध्ये मीठ कर कायद्याविरोधात मिठाचा सत्याग्रह , 240 मैलांची निदर्शने केले. 1942 मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलन केले. त्यांच्या नेतृत्वाखालील लाखो भारतीय एकत्र आले.
आजही महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग जुनियर यासारख्या नागरी हक्क नेत्यांनी त्यांच्या तत्वांपासून प्रेरणा घेतली त्यामुळे महात्मा गांधीचा प्रभाव भारताच्या पलीकडे जाऊन पोहचला. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधीजींना अनेक वेळा तुरुंगवास भोगावे लागला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत अनेक वेळा शांतता नाई न्यायासाठी उपोषण केले.
महात्मा गांधींनी ब्रिटिश वस्तूंवर बंदी घालण्याची आणि ती खरेदी न करण्याचे जनतेला आवाहन केले. स्वदेशी वस्तू खरेदी करण्यावर भर देण्यासाठी लोकांना प्रेरित केले. दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 मध्ये त्यांच्या विचारधारे असहमत असलेल्या एका कट्टरपंथी व्यक्तीने महात्मा गांधीजींची हत्या केली. त्यांच्या निधनाने भारताला आणि त्यासोबत जगाला देखील मोठा धक्का बसला.
गांधी जयंती दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते. प्रत्येक शाळेत, कार्यालयात ही जण्यंती उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महात्मा गांधीजींच्या जीवनावर भाषणे होतात. महात्मा गांधी जयंती हा भारतीयांसाठी फक्त जयंती नसून एक उत्सव आहे.गांधी जयंती ही महात्मा गांधी यांना एक आदरांजली आहे.
गांधी जयंती यावर 400 शब्दांत मराठी निबंध || Essay on Gandhi Jayanti in 400 Words In Marathi
गांधी जयंती ही भारतात साजरी करण्यात येते. गांधी जयंती ही भारतातील महान नेते आणि स्वातंत्र्यवीर महात्मा गांधी यांची जयंती आहे. दरवर्षी 2 ऑक्टोबर यa दिवशी गांधी जयंती साजरी केली जाते. 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात मधील पोरबंदर येथे महात्मा गांधीजींचा जन्म झाला.
भारतात जन्मलेले महात्मा गांधी हे जगाच्या इतिहासात एक प्रतिष्ठित व्यक्ती मानले जातात. 1893 मध्ये महात्मा गांधी वकिली करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले. दक्षिण आफ्रिकेमध्ये वांशिक भेदभाव खूप जास्त प्रमाणात होत असे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत पहिली नागरी हक्क चळवळ सुरू केली. तेथेच त्यांनी सत्याग्रह ही संकल्पना विकसित केली.
सत्याग्रह म्हणजे अहिंसेच्या मार्गाने सत्य आणि नैतिक धैर्याने होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार करणे. ही संकल्पना त्यांच्या जीवनातील पुढच्या कार्याचा आधारस्तंभ बनली.
1915 मध्ये भारत महात्मा गांधी भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारण्याच्या मार्गाने त्यांनी वाटचाल सुरू केली. त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला आणि जनसहभागाद्वारे ब्रिटिश राजवटीला आवाहन करण्यासाठी अनेक चळवळी केल्या.
या चळवळीमध्ये महात्मा गांधीजींचे नेतृत्वाने असंख्य भारतीय एकत्र आले. महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ सविनय कायदेभंग चळवळ मिठाचा सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलन अशा संख्या चळवळी घडवून आणल्या. भारताच्या या चळवळीचे ते प्रेरणा स्थान बनले.
महात्मा गांधीजींचा अहिंसेचा मार्ग मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यासारख्या नेत्यांना प्रेरक वाटला. या नेत्यांनी नागरी हक्क आणि न्यायाच्या लढाईसाठी संघर्ष करताना महात्मा गांधीजींच्या मार्गाचा अवलंब केला. त्यामुळे महात्मा गांधीजींचा प्रभाव जगभर पसरला. सामाजिक आणि राजकीय बदल घडवून आणण्याचा हा मार्ग जगभरातील अत्याचारित लोकांसाठी आशेचा किरण होता.
गांधीजींनी जो अहिंसा साधेपणा याचा उपदेश केला तो त्यांच्या वैयक्तिक जीवनात देखील दिसून येतो. त्यांनी साधे कपडे परिधान केले आणि अतिशय विनम्र जीवन जगले. त्यांनी चरख्यावर स्वत काढण्यासारख्या उपक्रमातून आर्थिक स्वयंपूर्णतेस प्रोत्साहन दिले.
गांधीजींचे मार्ग अवलंबणारे अनेक लोक होते पण त्यासोबतच काही विरोधी लोक सुद्धा होते. एक अशाच एका महात्मा गांधीजींच्या विचारांशी असहमत असलेल्या व्यक्तीने 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची हत्या केली. त्यांच्या मृत्यूने भातासोबत जगाचे देखील मोठे नुकसान झाले.
महात्मा गांधीजींचा वारसा म्हणजे त्यांची अहिंसा आणि नैतिक नेतृत्व. त्यांची सामाजिक न्याय धार्मिक आणि सांप्रदायिक सलोखा या यांच्या शिकवणी आजही पिढ्यांना प्रेरणा देतात. संघर्ष आणि अन्यायाने आज ग्रासलेले आहे. पण ज्याप्रकारे गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या अतूट बांधिलकीतून शांततापूर्ण बदल घडून आणला हे आजही तसाच बदल घडवून आणण्यासाठी एक प्रेरणा आहे हे नक्कीच.
गांधी जयंतीनिमित्त आपण हा वारसा चालू ठेवण्याचा संकल्प केला जातो. गांधी जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांच्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. शाळा आणि कार्यालयांत त्यांच्या मूर्तीचे पूजन करून आदरांजली वाहिली जाते. गांधी जयंती हा भारतात राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असतो. या दिवशी गांधी जयंती ही सर्व स्तरावर उत्साहाने साजरी होते.
निष्कर्ष | Conclusion:
गांधी जयंती ही महात्मा गांधी यांची जयंती आहे. संपूर्ण भारतात गांधी जयंती उत्साहाने साजरी केली जाते. संयुक्त राष्ट्राने देखील महात्मा गांधी जयंती दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. गांधी जयंती दिवशी महात्मा गांधींची मूर्ती सजवली जाते, त्यांच्याशी संबंधित महत्त्वाची स्थळे जसे की त्यांचे जन्मस्थान, साबरमती आश्रम इत्यादी ठीकबे सजवली जातात.
महात्मा गांधींनी अहिंसा, सत्य याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या शिकवणीनुसार समाजाने चालावे यासाठी गांधी जयंती साजरी केली जाते. गांधी जयंती ही महात्मा गांधींना आदरांजली म्हणून पूर्ण भारतात साजरी होते. या दिवशी नेक कार्यक्रम केले जातात ज्यातून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली जाते आणि त्यांच्या कार्य लोकांपर्यंत पोहचवले जातात.