मराठी भाषा गौरव दिन वर मराठी निबंध Essay On Marathi Bhasha Gaurav Din

Essay On Marathi Bhasha Gaurav Din मराठी ही आपली मायबोली. आपल्या महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा मराठी होय. आपल्या इथे सर्वजण मराठी बोलतात. या मराठी भाषेचा सन्मान करण्यासाठी, तिचा गौरव करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन  साजरा केला जातो. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करतात. मराठीचे माहात्म्य जपण्यासाठी हा दिन  साजरा केला जातो.  

Essay On Marathi Bhasha Gaurav Din

मराठी भाषा गौरव दिन वर मराठी निबंध Essay On Marathi Bhasha Gaurav Din

मराठी भाषा गौरव दिन वर मराठी निबंध Essay On Marathi Bhasha Gaurav Din in Marathi (100 शब्दांत)

दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन  साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज म्हणजेच वी. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.

कुसुमग्राज हे महाराष्ट्राचे एक महान लेखक होते. त्यांचे संपूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे आहे. त्यांचा जन्म नाशिक मधील शिरवाडे गावात झाला. त्यांनी कुसुमाग्रज नावाने कविता लेखन केले. मराठी भाषेत त्यांनी जागतिक दर्जाचे लेखन करून साहित्यात मराठी भाषेला वेगळ्याच उंचीवर बसवले.

सरकारने मराठी भाषेचा गौर करण्यासाठी आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन  म्हणून जाहीर केला. 2013 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी विविध उपक्रम साजरे होतात. आपली भाषा अशीच चिरंतर जिवंत राहावी म्हणून हा दिवस सर्वजण उत्साहाने साजरा करतात.

मराठी भाषा गौरव दिन हा मराठी भाषेचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.

 मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक टेपेस्ट्री साजरा करतो. इतिहासात रुजलेला हा दिवस मराठी साहित्य, कला आणि भाषिक वारशाचा सन्मान करतो. हे मराठी भाषिकांमधील एकतेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे, ओळख आणि आपलेपणाची भावना वाढवते.

मराठी भाषा गौरव दिन  वर मराठी निबंध Essay on Marathi Bhasha Gaurav Din in Marathi (200 शब्दांत)

27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन  म्हणून साजरा केला जातो. हा दिवस लेखक आणि कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस मराठी भाषा गौरव दिन  म्हणून साजरा करतात.

कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे आहे. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये झाला. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे गावात झाला. त्यांच्या मोठ्या बहिणीचे नाव कुसुम होते म्हणून त्यांना कुसुमाग्रज म्हणून त्यांचे काव्यलेखन केले.

कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यांचे दर्जेदार लेखन जागतिक स्तरावर पुरस्कृत केले गेले. त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. 1 मे 1950 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा मराठी भाषा राज्यभाषा म्हणून स्वीकारली गेली. तेव्हापासून कार्यालये, शाळा येथे मराठी भाषेचा वापर होऊ लागला. आपली भाषा चिरंतर जपली जावी आणि तिचे माहात्म्य टिकले जावे त्यासाठी आणि तिचा गौरव करण्यासाठी कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून त्यांचा जयातीचा दिवस 27 फेब्रुवारी हा 2013 मध्ये मराठी भाषा गौरव दिन  म्हणून घोषित केला. या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रम साजरे केले जातात जेबेकरून मराठीवरील प्रेम आणि आदर लोकांच्या मनात वाढेल.

मराठी भाषेबद्दल जागरूकता यावी आणि मराठी संस्कृती जपून राहावी म्हणून उपक्रम साजरे होतात. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेत अप्रतिम लिखाण केले. अशा कारणांनी आपण त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन त्यांना समर्पित केला आहे.

मराठी भाषा गौरव दिन  वर मराठी निबंध Essay on Marathi Bhasha Gaurav Din in Marathi (300 शब्दांत)

27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन  म्हणून साजरा केला जातो.  दिवस मराठी साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात. कुसुमाग्रज हे मोठे मराठी साहित्यिक आहे. त्यांनी मराठी भाषेत केलेल्या लिखाणाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन  म्हणून घोषित करण्यात आला. 2013 मध्ये महाराष्ट्र शासनाने हा दिवस घोषित केला तेव्हापासून 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन  म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे आहे. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात शिरवाडे गावात त्यांचा जन्म झाला. नंतर पुढे जाऊन त्यांनी मराठी भाषेत खूप लिखाण केले.  त्यांच्या बहिणीचे नाव कुसुम होते म्हणून त्यांनी त्यांच्या काव्य लिखाणासाठी कुसुमाग्रज हे नाव वापरलं.

1987 मध्ये त्यांना त्यांच्या लिखाणासाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. तसेच 1991 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी स्वातंत्र्य काळात अनेक स्वातंत्र्य चळवळीत आणि आंदोलनात सहभाग घेतला. अनेक वृत्तपत्रांचे ते संपादक झाले.

कुसुमाग्रजांनी समाजातील वेगवेगळ्या भागांवर लिखाण केले. फक्त कवी म्हणून लिखाण करणारे कुसुमाग्रज नंतर नाटककार, कथाकार, कादंबरीकार म्हणून प्रसिध्द झाले. त्यांच्या नटसम्राट सारख्या नाटकांनी लोकांची मने जिंकली. मराठी भाषेतील त्यांचे लिखाण एक सांस्कृतिक वारसा बनला.

मराठी साहित्यातील कुसुमाग्रजांचे लेखन हे मराठी सांस्कृतिक क्षेत्रातील मोलाचं ठेवा आहे. त्यांचे नाव आज ज्या सन्मानाने घेतले जाते त्यावरून हे समजते. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन  म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषा ही सर्वात जुन्या भाषांपैकी एक आहे. तिच्यातील गोडवा सर्वांपर्यंत पोहचला जवा, तीच्य साहित्यातील ज्ञान सर्वांना मिळावे यासाठी सर्व मराठी भाषिक प्रयत्न करतात. तसेच मराठी भाषेला हा सन्मान आणि तिच्यातील कार्य निरंतर चालत राहावे यासाठी मराठी भाषा गौरव दिन  साजरे करणे हा एक प्रयत्न.

मराठी भाषा गौरव दिन  हा कुसुमाग्रज यांचा सन्मान आणि मराठी भाषेचा गौरव सदैव रहावा यासाठी एक प्रयत्न आहे. शाळेत, साहित्य क्षेत्रात आणि सर्व स्तरांवर वेगवेगळे उपक्रम ठेवून हा दिवस मराठी भाषिक साजरा करतात. या दिवशी निबंध लेखन, नाटक, यांसारख्या वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन हा दिवस साजरा केला जातो. मराठी साहित्य हे अत्यंत उत्कृष्ट सहित्यापैकी एक आहे. त्यामुळे मराठी भाषा गौरव दिन  हा मराठी संस्कृतीचा एक दिवस आहे आणि तो असाच चिरंतर राहो.

मराठी भाषा गौरव दिन  वर मराठी निबंध Essay on Marathi Bhasha Gaurav Din in Marathi (400 शब्दांत)

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे” म्हणणारे आपण मराठी भाषिक. आपल्या भाषेवर अत्यंत प्रेम करणारे मराठी भाषिक. मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे मराठी भाषिक. गोडवा असणारी मराठी. स्वाभिमान असलेली मराठी. आणि या मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी हा साजरा केला जाणारा मराठी भाषा गौरव दीन.

मराठी भाषा गौरव दिन  हा मराठी भाषेचं सन्मान करण्यासाठी, तिचा गौरव करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस. हा दिवस म्हणजे महान कवी आणि लेखक कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या मराठी साहित्यातील अनमोल लेखन आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन  म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षी महाराष्ट्र राज्यात 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन  म्हणून साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. 27 फेब्रुवारी 1912 रोजी कुसुमाग्रज यांचा जन्म झाला कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे आहे. त्यांनी कुसुमाग्रज या नावाने कविता लेखन केले त्यांच्या बहिणीचे नाव कुसुम होते म्हणून त्यांनी काव्य लेखनासाठी कुसुमाग्रज या नावाचा वापर केला.

सुरुवातीला फक्त काव्य लेखन करणारे कुसुमाग्रज नंतर जाऊन नाटक कथा आणि कादंबरी देखील लिहू लागले तेव्हा त्यांनी त्यांच्या वापर केला. वि. वा. शिरवाडकर या नावाने त्यांनी गद्य लेखन केले. मराठी भाषेत त्यांनी केलेले लिखाण हे मराठी भाषकांसाठी अनमोल ठेवा आहे. त्यांच्या लेखनासाठी त्यांना 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यासोबत त्यांना पद्मा भूषण आणि साहित्य अकादमी पुरस्कार देखील देण्यात आला.

वि. वा. शिरवाडकर यांनी मराठी भाषेत लेखन केले. त्यांचे लेखन इतर भाषांत देखील भाषांतरित झाले. त्यांना सर्व स्तरावरून सन्मानित करण्यात आले आणि त्यांनी मराठी साहित्याची वाढवली. त्यांच्या स्मरणार्थ आणि त्याच बरोबर इतर लेखक जसे की वि. स. खांडेकर यांच्यासारख्या लेखकांच्या स्मरणार्थ आणि मराठी भाषेच्या गौरव करण्यासाठी मराठी भाषा साजरा करण्यास सुरुवात झाले.

महाराष्ट्र सरकारने 2013 पासून 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन  म्हणून घोषित केला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत झालेल्या गोष्टींचा मागोवा मराठी भाषा गौरव दिन  घेतो. मराठी भाषा गौरव दिन  हा दिवस फक्त मराठी भाषेपुरता मर्यादित नाही. हा दिवस भाषेपलीकडे जाऊन संस्कृती, इतिहास, भक्ती, चळवळी आणि साहित्यावर होतो.

मराठी भाषा गौरव दिन  हा मराठी भाषा ज्या प्रकारे घडली, वाढली त्यास कारणीभूत असणाऱ्या गोष्टींना एक श्रद्धांजली आहे. भाषा ही फक्त बोलण्यासाठी मर्यादित नसते. भाषा ही बोल्याच्या पलीकडे जाऊन दोन लोकांतला संवाद घडवून आणते, मनातील भावना पोहाचावते. प्रत्येक भाषेची काही विशेषतः असते तसे मराठीची आहे. आपण भाषा टिकवली तर ते व8शिष्ट्या टिकते म्हणून मराठी भाषेसाठी आणि मराठी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींसाठी मराठी भाषा गौरव दिन  हा एक अस्मितेचा दिवस आहे.

आपण मराठी भाषा दिन  सारखे उत्सव साजरे करायला हवेत जेणेकरून आपला जो भाषेचा वारसा आहे तो चिरंतर राहील. याचसोबत आपला इतिहास अमर राहील आणि आपल्या भाषेने हे काही आपल्याला, समाजाला दिले आहे ते सुद्धा चिरायू राहील.

निष्कर्ष :

मराठी भाषा ही सर्वात जुन्या भाषांपैकी एक. मराठी बहशिक मराठी मोठ्या अभिमानाने बोलतात. या मराठी भाषेत आणि मराठी मातीत अनेक थोर व्यक्तिमत्त्व होऊन गेले. एखादी भाषा ही फक्त भाषा म्हणून मर्यादित राहत नाही तर ती भाषा बोलणाऱ्या लोकांचा इतिहास असते.

ती त्या लोकांना व्यक्त करते. मराठी बहशा देखील तशीच आहे. तिच्या गोडवा आहे, तिच्यात राठपणा आहे. तिच्यासाठी एक दिवस राखीव म्हणून मराठी भाषा गौरव दिन  साजरा केला जातो. हा दिवस विष्णू वामन शिरवाडकर या मराठी भाषेतील महान लेखकाच्या जन्मदिवस साजरा केला जातो. हा दिवस सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवसाने मराठी भाषेचा सांस्कृतिक वारस जपून ठेवण्याचं प्रयत्न होतो आणि तो असाच होत राहो.

Leave a Comment