विस्तार अधिकारीची संपूर्ण माहिती Extension Officer Information In Marathi

Extension Officer Information In Marathi शासन आपल्या नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. आणि या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणे देखील फार महत्त्वाचे असते.अन्यथा त्या योजना केवळ कागदावरच उरतात. त्या योजनांना अगदी त्यांच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे विस्तार अधिकारी करत असतात.

Extension Officer Information In Marathi

विस्तार अधिकारीची संपूर्ण माहिती Extension Officer Information In Marathi

ग्रामीण भागामध्ये कृषी किंवा सामाजिक क्षेत्रावरील विविध योजना पोहोचवणे आणि त्या मार्फत समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणणे हे मुख्य कार्य विस्तार अधिकाऱ्याचे असते. आजच्या भागामध्ये आपण विस्तार अधिकारी यांच्या बद्दल माहिती, तसेच त्यांचे कार्य, जबाबदाऱ्या, या पदासाठी आवश्यक त्या पात्रता, आणि या करिअरमधील पुढील संधी याबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा लेख नक्की वाचावा…

नावविस्तार अधिकारी
प्रकारसरकारी पद
कार्यशासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे
शैक्षणिक पात्रताकृषी क्षेत्रातील पदवी
अनुभवफ्रेशर सुद्धा चालतात
भाषाजेथे कार्य करत आहे तेथील भाषा अवगत हवी

विस्तार अधिकारी यांचे कार्य व कर्तव्य:

कुठलीही नोकरी करायची म्हटली की कार्य व जबाबदाऱ्या तसेच विविध कर्तव्य ही ओघाने आलीच. त्यातही ग्रामीण स्तरावर कार्य करायचे असेल फार मोठी जबाबदारी पार पाडावी लागते. ग्रामीण लोकांचे जीवनमानाचे स्तर उंच व्हावे आणि त्यांचा विविध क्षेत्रांमध्ये विकास व्हावा याकरिता विविध योजना आणि उपक्रम यांची अंमलबजावणी करणे हे विस्तार अधिकारी यांचे मुख्य कार्य किंवा जबाबदारी असते.

त्याच पद्धतीने त्यांची नेमणूक केलेल्या ठिकाणी लोकांच्या ज्या गरजा आहेत त्यांचे मूल्यांकन करणे, तसेच लोकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्यावर उपाययोजना शोधणे, आणि त्या संदर्भातली सर्व माहिती शासनापर्यंत पोहोचवणे जेणेकरून शासन योग्य त्या योजना आखू शकेल इत्यादी कार्य विस्तार अधिकाऱ्यांना करावे लागतात.

तसेच स्थानिक स्तरावरील समाजाला, सरकारी संस्थांना आणि बिगर सरकारी संस्था यांना एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य किंवा दुवा म्हणून विस्तार अधिकारी कार्य करत असतात. त्यांच्या कार्यालयीन जबाबदाऱ्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो…

ग्रामीण समाजाला अतिशय तातडीच्या असणाऱ्या गरजा पुरवणे. यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सेवा, कृषी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये अर्थसहाय्य इत्यादींचा समावेश होतो. शाश्वत शेती, समाजाचे आरोग्य, पोषणमान, उद्योजकता व त्याचबरोबर इतरही सामाजिक प्रश्न इत्यादी गोष्टींचे मूल्यांकन करून त्यानुसार त्या क्षेत्रासाठीचे विविध कार्यक्रम तयार करणे आणि राबवणे.

स्थानिक स्तरावरील राजकीय नेते आणि सरकारमधील व्यक्ती यांच्याशी सल्लामसलत करून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणे.

दरडोई उत्पन्न कमी असलेल्या क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना आणि मजुरांना तांत्रिक प्रकारचे प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे, जेणेकरून त्यांची उत्पादकता आणि उत्पन्न मर्यादा देखील वाढण्यास मदत होईल.

त्या क्षेत्रामध्ये राबवण्यात येणारे विविध कार्यक्रमांचे आणि योजनांचे मूल्यमापन करणे, आणि या योजना यशस्वी झाल्या आहेत का, व त्यात काही बदलाची आवश्यकता आहे का याबद्दल माहिती घेणे.

विस्तार अधिकारी होण्यासाठीच्या पात्रता:

विस्तार अधिकारी व्हायचे असेल तर उमेदवारांनी अर्थशास्त्र, कृषी किंवा सामाजिक कार्य या विषयांमधील किमान पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तसेच ग्रामीण क्षेत्रात कार्य करण्यासाठी लागणाऱ्या विविध कौशल्यांना देखील आत्मसात करायला हवे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या क्षेत्रात कार्य करावे लागेल, अशा क्षेत्राच्या स्थानिक भाषेबद्दल ज्ञान असावे. जेणेकरून लोकांपर्यंत प्रभावीपणे योजनांची अंमलबजावणी करता येईल.

विस्तार अधिकारी यांचे वेतन:

विस्तार अधिकारी यांनी किती काळ सेवा केलेली आहे, आणि त्यांना किती अनुभव आहे यानुसार त्यांचे वेतन मान ठरत असते. मात्र सर्वसाधारणपणे विचार केल्यास अनुभवी अधिकाऱ्यांना ५० ते ६० हजार रुपये प्रत्येक महिन्याला पगार मिळतो. तर नुकतेच रुजू झालेल्या विस्तार अधिकाऱ्यांना २० ते ३० हजार रुपयांपर्यंत मासिक पगार मिळत असतो.

विस्तार अधिकारी यांच्यासाठी करिअरच्या संधी:

आज काल शासन अनेक योजना राबवत आहे, त्यामुळे या योजनांना लोकांपर्यंत पोहोचवणे व त्यांची अंमलबजावणी करणे यासाठी विस्तार अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, येत्या काही काळामध्ये विस्तार अधिकारी यांच्या पदामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे यामध्ये करिअरच्या खूप संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी जर अजून चांगल्या नोकरीच्या शोधात असेल, तर त्यांना पदोन्नती चे देखील पर्याय आहेत. आणि सोबतच त्यांना कृषी मधील एमपीएससीची परीक्षा देऊन कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांसारख्या नोकऱ्या देखील मिळवता येऊ शकतात.

निष्कर्ष:

आजकाल सरकारी नोकरी म्हटलं की प्रत्येकाला कापरे भरते, कारण सरकारी नोकरी मिळवणे आजकाल सोपे राहिलेले नाही. मात्र कृषी पदवीधरांसाठी नामी संधी असणारे पद म्हणजे कृषी विस्तार अधिकारी किंवा विस्तार अधिकारी होय.

येत्या काही काळामध्ये विस्तार अधिकारी या पदाची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे कृषी पदवीधरांना चांगले दिवस येण्याचे संकेत दिले जात आहेत. कृषी विस्तार अधिकारी हे शासन आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करत असतात.

ते नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, शासकीय संस्था किंवा एजन्सी, ग्रामीण विकासासाठी असणाऱ्या संस्था यांच्यासाठी देखील कार्य करत असतात. विस्तार अधिकारी यांना त्यांच्या नोकरीच्या कालावधीनुसार व अनुभवानुसार वेगवेगळे वेतन दिले जाते. त्यामुळे विस्तार अधिकारी हे देखील एक चांगले करिअरचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते.

शासनाद्वारे निर्माण करण्यात आलेल्या विविध योजनांची राबवणूक करण्याचे कार्य हे विस्तार अधिकारी करत असतात. विस्तार या शब्दाला इंग्लिश मध्ये एक्सटेन्शन असे म्हटले जाते. ज्याचा अर्थ होतो विस्तार करणे किंवा सर्वत्र पोहोचवणे. त्यानुसार विस्तार अधिकारी चे कार्य असते. आज आपण या विस्तार कृषी अधिकारी विषयी माहिती पाहिलेली आहे.

FAQ

ग्रामीण क्षेत्राचे विकासामध्ये  विस्तार अधिकारी कशा पद्धतीने हातभार लावतात.

मित्रांनो ग्रामीण क्षेत्रांमध्ये असणारे लोक हे खऱ्या अर्थाने योजनांचे मूळ लाभार्थी असतात. मात्र साक्षरतेचा अभाव आणि जनजागृती नसणे या गोष्टीमुळे या लाभार्थ्यांपर्यंत सरकारी योजना पोहोचत नाहीत. मात्र विस्तार अधिकारी या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. त्यामुळे लोकांचा विकास होतो परिणामी ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत मिळते.

विस्तार अधिकारी होण्यासाठी उमेदवाराला कोणकोणती पात्रता धारण करणे आवश्यक असते?

विस्तार अधिकारी हे पद प्राप्त करण्यासाठी उमेदवार हा बारावीचे परीक्षा शास्त्र विषयातून उत्तीर्ण झालेला असावा. आणि त्या आधारावर त्यांनी कृषी विषयातील किमान बॅचलर पदवी तरी घेतलेली असावी. मास्टर्स पदवी घेतली असेल तर अजूनच उत्तम समजले जाते.

विस्तार अधिकारी यांचे मूळ कार्य काय असते?

सरकारी योजनांना त्यांच्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, आणि त्यांना या गोष्टीचा फायदा करून देणे हे विस्तार अधिकारी यांचे मूळ कार्य असते.

विस्तार अधिकारी हे पद मिळविण्यासाठी उमेदवाराकडे अनुभव असावा लागतो का?

विस्तार अधिकारी हे पद मिळवण्यासाठी उमेदवाराला अनुभव नसला तरी चालते, मात्र अनुभवी व्यक्तीला प्राधान्य देण्यात येत असते.

विस्तार अधिकारी होण्यासाठी कोणकोणती कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असते?

विस्तार अधिकारी होण्यासाठी उत्कृष्ट संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण, संवाद साधण्याची क्षमता, लोकांना योजनांची माहिती पटवून देण्याची क्षमता, लोकसंख्येबद्दल ज्ञान, ग्रामीण लोकांच्या गरजा व अडचणी समजून घेण्याचे कौशल्य या प्रकारचे कौशल्य असणे गरजेचे असते.

आजच्या भागामध्ये आपण विस्तार अधिकारी या पदाविषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा. तसेच या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना व कृषी क्षेत्रातील पदवीधरांना ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Leave a Comment