Farmers Information In Marathi भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळख आहे, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. कारण भारत देशामधील संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे ६८% वाटा हा कृषी क्षेत्रातून येत असतो. शेतकऱ्याला उभ्या जगाचा पोशिंदा किंवा अन्नदाता म्हणून ओळखले जाते, कारण काळ्या मातीमध्ये घाम गाळून आणि आपले सर्वस्व मातीमध्ये गाडून तो काळ्या आईची सेवा करत असतो, आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादनावर संपूर्ण जग आपले पोट भरत असते.
शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती Farmers Information In Marathi
पूर्वी कमी शिक्षित लोक शेती करण्याकडे वळत असत. त्यामुळे त्यांना विविध योजना आणि जगराहाटीचा फायदा होत नसेल, मात्र आजकाल किमान शैक्षणिक मूल्य असणारी लोक शेती करू लागल्यामुळे शासकीय योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आजकाल शेतकरी केवळ पिकांवर अवलंबून न राहता इतरही जोडधंदा जसे की, पशुपालन, कोंबडी पालन, इत्यादी व्यवसायाकडे वळत आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये कित्येक दशकापर्यंत शेतकऱ्यांचे जीवनात हलाखीचे होते, त्यांवर येणारे अनेक रोग किडी आणि पिके उभे करण्यासाठी लागणारे कर्ज यामुळे शेतकरी अगदी हवालदिल होत असत, आणि आत्महत्येकडे प्रवृत्त होत असत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना, विमा सुरक्षा कवच, यांसारखे उपक्रम सुरू केल्यामुळे हल्ली शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा होत आहे.
आजच्या भागामध्ये आपण शेतकरी या विषयावर संपूर्ण माहिती बघणार आहोत, चला तर मग सुरु करूया माहितीच्या सुंदर पर्वाला…
नाव | शेतकरी |
इंग्रजी नाव | Farmer |
इतर नावे | किसान, कास्तकार, कुणबी इ. |
व्यवसाय | शेती |
इतर व्यवसाय | पशुपालनासारखे जोडधंदे |
व्यावसायिक शिक्षण | कृषी शिक्षण (कृषी पदविका, कृषी पदवी, आणि कृषी पदव्युत्तर पदवी) |
वास्तव्य | शक्यतो खेडेगाव |
पूर्वीच्या काळापासूनच भारतामध्ये घरातील एक व्यक्ती तरी शेती करत असे, आणि मुलांना शाळेत फारशी रूची नसल्यामुळे मुले शेतीतच आपला वेळ घालवत. परिणामी शेतीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या मध्यंतरीच्या काळात वाढली, मात्र नंतरच्या काळात शिक्षणाचा दर्जा वाढल्यामुळे अनेक लोक शिक्षित झाली.
त्यामुळे शेती करण्याकडे लोकांचा कल कमी झाला, त्यामुळे शेतकरी कुटुंब देखील कमी झाली. अनेक लोक नोकरी निमित्त शहराच्या ठिकाणी स्थलांतरित झाली, आणि आपली शेती त्यांनी वाट्याने द्यायला सुरुवात केली, त्यामुळे हल्लीच्या पिढीला शेतीमधील बरीचशी माहिती नाही.
अशिक्षित पणामुळे शेतकरी अनेक योजनांना मुकत आहे, त्यामुळे त्यांना भांडवलाची कमी पडत आहे. परिणामी कर्ज घेणे किंवा कमी प्रमाणामध्ये पिके उगवणे, या गोष्टी शेतकऱ्यांकडून केल्या जातात. त्यामुळे त्यांना घर खर्च चालवण्यासाठी पैशांची कमतरता पडते. आणि त्यामुळेच शेतकरी आत्महत्या कडे वळतो, यासाठी शासनाने तर उपाययोजना करायला हव्यातच, मात्र एक जागरूक नागरिक म्हणून आपल्यातील प्रत्येकाने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना केल्या पाहिजेत.
शेतकऱ्यांना रोजच्या आयुष्यामध्ये शेती करताना भेडसावणाऱ्या समस्या:
व्यवसाय कुठलाही करा समस्या या येतच असतात. तसेच शेतीमध्ये सुद्धा अनेक समस्या असतात. शेतीमधील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे पिकाला योग्य बाजारभाव न मिळणे होय. यामुळे वाढत्या उत्पादन खर्चाचा मेळ न बसल्यामुळे शेतकऱ्यांना तोट्यामध्ये पिके विकावी लागतात.
काही पिके साठवून ठेवली जाऊ शकतात, मात्र त्याला देखील काही मर्यादा आहे. परिणामी व्यापारी वर्ग आणि कंत्राटदार शेतकऱ्यांहूनही अधिक पैसा मिळवतात तेही एसी ऑफिस मध्ये बसून. मात्र शेतकऱ्यांचा स्वतःचा माल असून देखील शेतकऱ्याला थोड्याशा पैशांवर समाधान मानावे लागते.
त्यानंतरची सर्वात महत्त्वाची समस्या पाण्याची कमतरता ही आहे. आजही मराठवाड्यासारख्या ठिकाणी पिकांना वेळेवर पाणी देणे शक्य होत नाही. परिणामी इतका खर्च करून आणलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जळून जातात.
त्यानंतरची समस्या म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या भांडवलाची कमतरता होय. शासनाच्या कर्ज योजना असल्या तरी देखील त्यामध्ये बरेचसे शेतकरी पात्र ठरत नाहीत. परिणाम ते खाजगी सावकाराकडून कर्ज घेतात, आणि व्याजाच्या चक्रव्यूहात अडकतात.
चौथा मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृषी निवेष्ठांच्या वाढत्या किमती, हल्ली खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, मात्र त्या प्रमाणात कृषी मालाचा भाव वाढला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक ताळेबंद व्यवस्थित बसत नाही.
हल्ली शेतकऱ्याने ट्रॅक्टर किंवा तत्सम अत्याधुनिक यंत्र सामग्री खरेदी करणे म्हणजे खूपच जिकिरीचे काम ठरले आहे. कारण आधीच लॉकडाऊन नंतर वाढलेल्या किमती आणि त्यात विविध टॅक्सेस यामुळे या गोष्टी खूप महाग झालेल्या आहेत. ज्या सामान्य शेतकरी खरेदी करू शकत नाही, परिणामी त्याला मनमानी भाडे देऊन इतर मोठ्या शेतकऱ्यांकडून ही साधने भाड्याने घ्यावी लागतात.
या समस्या वरवर साध्या दिसत असल्या तरी देखील त्याचा परिणाम फार गंभीर होत आहे. पैशांच्या कमतरतेमुळे शेतकरी पुढील वर्षी पिकावर जास्त पैसा खर्च करू शकत नाही, परिणामी पुढच्या वर्षी आणखी उत्पादन खालावते आणि हे दृष्ट चक्र चालूच राहते. आणि साधे घर खर्च भागवायलाही पैसे कमी पडल्यामुळे शेतकरी आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊ शकत नाही, आणि नाईलाजास्तव शेतकऱ्यांच्या मुलांना देखील पुन्हा याच शेतीच्या गर्तेत यावे लागते.
निष्कर्ष:
आजच्या भागामध्ये आपण शेतकरी याविषयीची माहिती पाहिली. आपल्या वाडवडिलांपैकी आजोबा किंवा आई वडील कोणीतरी नक्कीच शेतकरी असेल. तसेच आपल्याकडे शेती देखील असेल. शेती नसणारे असे आपल्याकडे फार थोडे लोक बघायला मिळतात. त्यामुळे आपण सर्वांनीच शेती हा व्यवसाय अगदी जवळून बघितलेला आहे.
त्यामुळे त्याविषयी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, मात्र अनेक गोष्टींमुळे शेतकरी जीवन अगदी हलकीचे असते. त्यातले त्यात अलीकडील काही वर्षांमध्ये तर निसर्ग अगदी लहरीप्रमाणे वागत आहे. गरजेच्या वेळी पाऊस न पडणे आणि पिके हातात आली, की धो धो पाऊस पडून सर्व नेस्तनाबूत होणे इत्यादी परिस्थिती ला शेतकरी खंबीरपणे तोंड देत असतो.
आपल्याही आसपास अनेक शेतकरी लोक असतील, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायला हवे. जेणेकरून आपण शेतकरी आत्महत्या थांबवू शकत नसलो तरी देखील कमी मात्र नक्कीच करू शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन कार्य करायला हवे.
FAQ
शेतकरी कोणाला म्हटले जाते?
जी व्यक्ती काळ्या मातीमध्ये बियाणे पेरून त्यापासून नवीन पीक उत्पादित करत असतो त्यांना शेतकरी म्हटले जाते.
भारत या कृषीप्रधान देशांमध्ये साधारणपणे शेतकऱ्यांची संख्या किती आहे?
शेतकऱ्यांची निश्चित संख्या सांगता येत नसली तरी देखील भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये सुमारे ११८ दशलक्ष पर्यंत शेतकरी आहेत असे सांगितले जाते.
शेतकरी कुठली कुठली कामे करतात?
शेतकरी जगण्यासाठी लागणारे अन्नधान्य पिकवण्याबरोबरच फळे भाजीपाला इत्यादी पिके देखील घेतात. तसेच शेतीची मशागत करणे, त्यामध्ये खते वगैरे घालून पिकांची लागवड करणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे, पाणी देणे, औषधे फवारणी, आणि कापणी करून त्यापासून खाण्यायोग्य पीक मिळवणे इत्यादी कामे करतात. सोबतच विविध जोडधंदा जसे की दुग्ध व्यवसाय, पशुपालन, कुकुटपालन इत्यादी कामे देखील करतात.
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्याचे महत्त्व काय आहे?
मित्रांनो, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाते. शेतकरी हा संपूर्ण देशाला किंबहुना जगाला आपल्या पिकवलेल्या अन्नधान्यांवर पोसत असतो. त्यामुळे एक शेतकऱ्याला अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्व आहे.
शेतीमधील उत्पन्नाचे प्रमाण किती आहे?
मित्रांनो, दरडोई शेतीमधील उत्पन्न हे कमी असले तरी देखील भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुमारे ६८ टक्क्यांपर्यंत भागीदारी ही शेती व्यवस्थेची आहे.
आजच्या भागामध्ये आपण शेतकरी या विषयावर माहिती पाहिली, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही कळवालच. मात्र आपल्या इतर शेतकरी मित्रांना ही माहिती नक्कीच शेअर करा. तसेच शेतकऱ्यांसोबत हितगुज करून त्यांच्या समस्या सोडविण्यास नक्की मदत करा.
धन्यवाद…