Flamingo Information In Marathi भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, त्यामध्ये पक्षांचे देखील विविध प्रजाती बघायला मिळतात. त्यातील एक अतिशय आकर्षक पक्षी म्हणजे फ्लेमिंगो पक्षी होय. गुलाबी रंगाच्या पायांचा आणि नेहमी पाण्यामध्ये आढळून येणारा पक्षी म्हणजे फ्लेमिंगो. त्याचा पिसारा हा फिकट गुलाबी रंगाचा असतो. तर काही पक्षांचा पिसारा हा गडद गुलाबी देखील आढळून येतो. त्याचे पाय हे मागील बाजूस वाकलेले दिसून येतात, त्यामुळे तो इतर पक्षांहून वेगळा ठरतो. अशा या सगळ्यात वेगळ्या पक्षाबद्दल म्हणजेच फ्लेमिंगो पक्षाबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत…
फ्लेमिंगो पक्षाची संपूर्ण माहिती Flamingo Bird Information In Marathi
पक्षाचे नाव | फ्लेमिंगो |
साधारण वस्तुमान | २ ते ४ किलोग्राम |
साधारण उंची | १ ते १.५ मी |
साधारण लांबी | ९० ते १०० सेंटीमीटर |
पिसाऱ्याचा झाप | ९० ते १०० सेंटीमीटर |
साधारण वेग | ६० किलो मीटर प्रति तास |
अगदीच आकर्षक अशा या फ्लेमिंगो पक्षाच्या जगभरामध्ये जवळपास सहा प्रजाती आढळून येतात. जगाच्या पाठीवर उथळ पाण्याचे साठे असणाऱ्या ठिकाणी म्हणजेच तलाव किंवा सरोवरांमध्ये अन्नाच्या शोधामध्ये फिरताना हे फ्लेमिंगो पक्षी आढळून येतात. ते थव्याने एकत्र राहणे पसंत करतात, तसेच त्यांना शैवाल आणि लहान जलचर प्राणी खायला आवडतात.
फ्लेमिंगो पक्षाचे वितरण:
फ्लेमिंगो हा पक्षी जगभरात आढळत असला तरी देखील अमेरिकेच्या मध्य आणि दक्षिण भागात याच्या सुमारे चार प्रजाती आढळून येतात. तसेच युरोप, आफ्रिका आणि आशिया या खंडांमध्ये मिळून फ्लेमिंगोच्या जवळपास दोन प्रजाती आहेत.
दक्षिण अमेरिकन प्रजातींमध्ये चिलियन फ्लेमिंगो, अँडीयन फ्लेमिंगो, व पूना फ्लेमिंगो इत्यादी प्रजाती आहेत. आफ्रिका या खंडामध्ये फ्लेमिंगोंची संख्या ही मर्यादित आहे. फ्लेमिंगो च्या इतर प्रजातीमध्ये मेक्सिको आणि कॅरीबियन इत्यादी प्रजातींचा समावेश होतो.
फ्लेमिंगो पक्षांची खाद्यसृष्टी:
सजीव कुठलाही असो जगण्यासाठी आहार हा अतिशय महत्त्वाचा असतो, त्याला हे फ्लेमिंगो पक्षी देखील अपवाद नाहीत. फ्लेमिंगो पक्षांचे सर्वात आवडीचे खाद्य म्हणजे समुद्री शैवाल होय. या शैवालातील कॅरीटिनॉईड या घटकामुळे त्यांच्या पंखांना चक्क गुलाबी रंग प्राप्त होतो.
असे असले तरी देखील वेगवेगळ्या आहार घेतात यातील काही प्रजाती शिकारी तर काही शाकाहारी आहेत. शाकाहारी प्रजाती एकपेशीय वनस्पती किंवा प्लॅक्टन खाण्यास पसंती देतात, तर शिकारी फ्लेमिंगो कोळंबी लहान सहान कीटक किंवा अळ्या आणि मॉलस्क खाण्यास प्राधान्य देतात.
सर्वच बाबतीत फ्लेमिंगो पक्षी वेगळा ठरत असल्यामुळे त्याची खाण्याची पद्धत देखील वेगळीच असते. खाताना हा पक्षी आपले डोके उलटे करून खातो, आणि पाणी देखील पिताना तोंडभर पितो.
मानव व फ्लेमिंगो यांचा संबंध:
मानवाने आपल्या फायद्यासाठी अनेक प्राण्यांचा उपयोग करून घेतला आहे यातील बऱ्याचशा प्राण्यांना तर मानवाने पाळीव करून त्यांच्यापासून आपला फायदा करून घेतला आहे. याच प्रकारे मानवाने फ्लेमिंगो हा पक्षी देखील अन्न व औषध म्हणून कित्येक दिवसापासून वापरणे सुरू केले आहे. शिसे या धातू सारख्या विषबाधेमुळे फ्लेमिंगो पक्षांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. १९८९ यावर्षी शिष्याच्या गोळ्यामुळे अनेक फ्लेमिंगो पक्षी मारले गेले होते.
मानवाने प्राणी आणि पक्षांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप केला असला, तरी देखील त्यांच्या संवर्धनासाठी देखील उपाययोजना केलेल्या आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून चिली देशाने राष्ट्रीय फ्लेमिंगो रिझर्व स्थापन केलेले आहे. ज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तसेच विविध प्रकारचे फ्लेमिंगो स्पेशलिस्ट ग्रुप देखील स्थापन करण्यात आलेली आहेत. जेणेकरून फ्लेमिंगो प्रजातीचे रक्षण केले जाईल.
अनेक प्राणी किंवा पक्षांच्या प्रजातींना पाळल्यामुळे त्यांच्या प्रजातीचे रक्षण झालेले आहे, मात्र फ्लेमिंगो हा पक्षी अतिशय दुर्गंधी सोडत असल्यामुळे हा पक्षी शक्यतो कोणी पाळत नाही. तसेच कळपामध्ये राहण्याची सवय असल्यामुळे हे पक्षी नेहमी गोंधळ करत असतात. त्यांना आहार देखील विशिष्ट प्रकारचाच हवा असतो, आणि राहण्यासाठी उथळ पाण्याच्या क्षेत्राची आवश्यकता असते. या सर्व गोष्टींमुळे शक्यतो कोणी फ्लेमिंगो या पक्षाला पाळत नाही.
फ्लेमिंगो पक्षी आणि काही तथ्ये:
फ्लेमिंगो हा बारीक पायांचा पक्षी असला तरी देखील त्याचे पाय हे मागील बाजूस वाकतात. फ्लेमिंगो पक्षाच्या पिसांचा रंग हा मूळ रंग नसून त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे म्हणजेच कोळंबी किंवा शैवाल खाल्ल्यामुळे मिळणारा रंग आहे, जो या दोन्हीही खाद्यपदार्थातील कॅरिटीनाईड या घटकामुळे त्यांना मिळतो. हेच कॅरीटीनाईड गाजरांना देखील रंग देण्याचे कार्य करते.
जंगलामध्ये राहणाऱ्या फ्लेमिंगो पक्षाच्या रंगावरून त्याच्या आरोग्याबाबत अंदाज बांधला जाऊ शकतो, सर्वात तेजस्वी गुलाबी रंग असणारा फ्लेमिंगो पक्षी हा निरोगी समजला जातो, तर इतरांना कमी निरोगी समजले जाते. मात्र असे असले तरी देखील हा नियम प्राणी संग्रहालयातील फ्लेमिंगो पक्षांना लागू पडत नाही, कारण त्यांच्या खानापानामध्ये जंगली फ्लेमिंगो पेक्षा फरक असतो.
फ्लेमिंगो चे लहानपिल्ले त्यांच्या आई वडिलांसारखे बिलकुल दिसत नाहीत, तर ज्यावेळी अंडी उबवून पिल्लांचा जन्म होतो तेव्हा ते पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचे असतात. कारण त्यांनी कुठल्याही प्रकारच्या कोळंबी किंवा शैवलाचे सेवन केलेले नसते. मात्र जसजसे हे पिल्ले कोळंबी आणि शैवाल खायला सुरुवात करतात तसं तसा त्यांच्या पिसाऱ्यांचा रंग बदलून तो गुलाबी व्हायला लागतो.
निष्कर्ष:
निसर्गाने विविधतेच्या माध्यमातून ही सृष्टी चालू ठेवण्यासाठी व्यवस्था करून ठेवली आहे. यामध्ये तुम्हाला विविध अन्नसाखळ्या विविध घटकांची चक्रे आणि मनोरे बघायला मिळतील. हे निसर्गाचे एकमेकांवर अवलंबून असण्याचे द्योतक आहे. आणि या विविधतेमध्ये फ्लेमिंगो नावाचा पक्षी देखील एक भर घालत असतो.
आज आपण अशा या अनोख्या पक्षाबद्दल माहिती पाहिली. त्यामध्ये तुम्हाला फ्लेमिंगो पक्षाच्या वजन, उंची, लांबी, याबरोबरच त्याचा वेग आणि इतरही गोष्टींबद्दल माहिती मिळाली असेल, तसेच काही तथ्यांची देखील माहिती मिळाली असेल. हा पक्षी म्हणजे एक अचंबाच आहे, कारण अगदी छोट्याशा पायांवर इतका मोठा शरीराचा भार फिरवणे म्हणजे कठीणच काम, मात्र या पक्षासाठी ते अतिशय सोयीचे आहे.
FAQ
फ्लेमिंगो हा पक्षी बुद्धिमान आहे का?
फ्लेमिंगो हा पक्षी शक्यतो मानवी वसाहतीत राहत नसल्यामुळे त्याला फारसा संघर्ष करावा लागत नाही, तसेच कळपाने राहत असल्यामुळे त्यांना सुरक्षेची ही चिंता नसते. त्यामुळे फ्लेमिंगो हे पक्षी शक्यतो हुशार किंवा बुद्धिमान नसतात.
फ्लेमिंगो या पक्षाचा रंग गुलाबी का असतो?
फ्लेमिंगो पक्षाचा रंग गुलाबी असण्यामागे त्यांच्या खानपानाच्या सवयी आहेत. फ्लेमिंगो हे कॅरोटीनाईड नावाची रंगद्रव्य असणाऱ्या शैवालाला खातात, त्यामुळे त्यांना देखील गुलाबी रंग प्राप्त होतो.
फ्लेमिंगो पक्षाचा मोठा आकार बघता त्याला उडता येते का?
फ्लेमिंगो हा पक्षि मोठा असला तरी देखील पाय मागे करून आणि डोके समोर पसरून तो उडू शकतो. त्याचा उडण्याचा वेग हा ताशी ५० ते ६० किलोमीटर इतका असून, एका रात्रीत तब्बल दहा तास म्हणजेच पाचशे ते सहाशे किलोमीटर प्रवास करणे देखील फ्लेमिंगो पक्षाला शक्य असते.
फ्लेमिंगो पक्षाच्या सर्वाधिक प्रजाती कोणत्या देशांमध्ये आढळून येतात?
फ्लेमिंगो पक्षाच्या सर्वाधिक प्रजाती या अमेरिका देशांमध्ये आढळून येतात.
फ्लेमिंगो पक्षाचे साधारण वजन किती किलोग्राम पर्यंत असते?
फ्लेमिंगो पक्षाचे साधारण वजन दोन ते चार किलोग्राम पर्यंत असते.
आजच्या भागामध्ये आपण अतिशय आगळ्यावेगळ्या फ्लेमिंगो या पक्षाबद्दल इत्यंभूत माहिती पाहिली, ती माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हा पर्यंत पोहोचवा. तसेच ही माहिती देखील शेअरच्या माध्यमातून इतर मित्र-मैत्रिणींपर्यंतही पोहोचवा.
धन्यवाद…