गणेश चतुर्थी सणाची संपूर्ण माहिती Ganesh Chaturthi Festival Information In Marathi

Ganesh Chaturthi Festival Information In Marathi हिंदू संस्कृतीमध्ये अनेक देवदेवतांना महत्त्व आहे, आणि या देवतांचे विशिष्ट असे सण असतात. त्यातीलच एक सण म्हणजे गणेश चतुर्थी होय. हा सण संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो, मात्र महाराष्ट्रामध्ये तो एका आगळ्यावेगळ्या रूपामध्ये साजरा केला जातो. हा हिंदू धार्मिक देवता श्री गणेश यांना समर्पित असून, या दिवशी श्री गणेश यांचा जन्म झाला होता असे सांगितले जाते.

Ganesh Chaturthi Festival Information In Marathi

गणेश चतुर्थी सणाची संपूर्ण माहिती Ganesh Chaturthi Festival Information In Marathi

गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक ठिकाणी चौका चौकामध्ये श्री गणेशाच्या भव्य मुर्त्या बसविल्या जातात. नऊ ते दहा दिवस या मूर्तीची अगदी मनोभावी पूजा केली जाते. विविध मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी भक्त गण मोठ्या संख्येने येत असतात. त्यानंतर अनंत चतुर्दशी या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते, यावेळी ढोलताशांच्या आणि विविध वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणुका देखील काढल्या जातात.

आजच्या भागामध्ये आपण गणेश चतुर्थी या सणाबद्दल माहिती बघणार आहोत…

नावगणेश चतुर्थी
इतर नावविनायक चतुर्थी
प्रकारसण
भक्तहिंदू धार्मिक लोक
कालावधीनऊ दिवस (दहाव्या दिवशी विसर्जन)
वेळभाद्रपद महिना
महिन्यांचा प्रकार चातुर्मास महिना

गणेश चतुर्थी व विनायक चतुर्थी यामधील फरक:

अनेकांना गणेश चतुर्थी व विनायक चतुर्थी एकच असल्याचे वाटते, मात्र प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असते. मात्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीलाच गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाते. विनायक चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येत असली, तरी देखील गणेश चतुर्थी मात्र वर्षातून एकदाच येते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रींची मूर्ती बसविली जाते, मात्र विनायक चतुर्थीला केवळ उपवास व आरती करून साजरी केली जाते. केवळ चातुर्मास या महिन्यांमध्ये येणारी चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी असते, जी भगवान गणेश यांच्या उपासने करिता खूपच महत्त्वाची मानली जाते. यादरम्यान अनेक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते.

गणेश चतुर्थी चे महत्व:

प्रत्येक भारतीय सण उत्सव साजरा करण्यामागे त्याचे महत्त्व दडलेले असते. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थीचे देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचे जन्मदिवस अर्थात जयंती म्हणून अतिशय महत्त्व आहे.

पुराणांमध्ये असे वर्णन आढळते की, माता-पार्वती यांच्या मळापासून त्यांनी भगवान गणेशाची एक छोटीशी मूर्ती बनवली होती, मात्र शंकरांनी या मूर्तीचे शीर धडापासून वेगळी केल्यामुळे पार्वती माता नाराज झाल्या होत्या. त्यामुळे जंगलातील हत्तीचे डोके या मूर्तीला लावून त्यामध्ये प्राण भरले होते. आणि त्यातून श्री गणेशांचा उगम झाला होता. त्यामुळे या दिवशी श्री गणेशाचे पूजन केले जाते.

वर्षभर चतुर्थीच्या दिवशी व्रत किंवा उपवास करण्याचे महत्त्व:

गणेश चतुर्थी वर्षातून एकदाच येत असली, तरी देखील विनायक चतुर्थी ही संपूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्याला येत असते. या चतुर्थीच्या दिवशी देखील गणेश भक्त मोठ्या भक्तीभावाने उपवास करत असतात. याच चतुर्थीला वरद विनायका चतुर्थी असे देखील म्हटले जाते.

वरद या शब्दाचा अर्थ मागेल ती इच्छा पूर्ण करणारा देव असा होतो, त्यामुळे या दिवशी व्रतवैकल्य करणे हे भगवान गणेश यांना प्रसन्न करण्याचा आणि त्यांच्याकडे आपल्या मागण्यांचे साकडे घालण्याचा एक उत्तम मार्ग समजला जातो. त्यामुळे गणेश चतुर्थी सोबतच विनायक चतुर्थीला देखील उपवास करण्याचे महत्त्व सांगितले जाते.

श्री गणेशाच्या जन्मा बाबत दंतकथा:

श्री गणेश यांना हत्तीप्रमाणे डोके का आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, त्याचे मूळ तुम्हाला या दंतकथेमध्ये सापडेल. ज्यावेळी पार्वती माता तलावात आंघोळ करण्यासाठी चालल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी मळापासून एक पुतळा बनवला, व त्याला पहारा देण्यास सांगितले.

त्यानंतर तेथे भगवान शिव आले, मात्र प्रवेश करण्यापूर्वी या पुतळ्याने अर्थात मुलाने त्यांना अडविले, त्यामुळे क्रोधीत भगवान शिवांनी त्रिशूलाने या मुलाचे डोके धडा वेगळे केले. ज्यावेळी पार्वती माता आपली अंघोळ आटोपून आल्या, तेव्हा त्यांना हे दृश्य दिसले. त्यांनी ओरडून खूप मोठा आकांत तांडव केला, सर्व देव आले तरीदेखील पार्वती माता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.

मात्र त्यानंतर नंदीला सांगण्यात आले की पृथ्वीवर जाऊन जो कोणता प्राणी आपल्या मुलाकडे पाठ करून झोपला असेल, त्याचे डोके घेऊन यावे. नंदिने सर्वप्रथम अशा हत्तीनीला बघितले, आणि छोट्या हत्तीच्या बाळाचे डोके आणले. जे डोके लावून भगवान गणेशांना जीवनदान मिळाले, त्यानंतर सर्व गणांचा अधिपती म्हणून यांना गणपती असे नाव देण्यात आले.

श्री गणेशांना विघ्नविनाशक म्हणून का ओळखले जाते:

एकदा ब्राह्मण समाजावर संकट आले असता, ते सर्वजण भगवान शिवांकडे गेले. मात्र यावेळी पार्वतीने म्हटले की हे भोलेनाथा या समस्येचे समाधान करण्यासाठी तुम्ही आपल्या दोन मुलांपैकी कुणालाही निवडायला हवे, मात्र कोणाला निवडावे हा प्रश्न पडल्यामुळे भगवान शिवांनी सांगितले की जो कोणी सर्वप्रथम ब्रम्हांडाची प्रदक्षिणा पूर्ण करेल, त्याला हे काम दिले जाईल.

हे ऐकताच कार्तिकेय आपल्या मोर वाहनावर बसून निघाले, मात्र भगवान गणेश यांनी केवळ आपल्या मातापित्यांना प्रदक्षिणा घातली. यावर खुश होऊन शिवांनी या समस्येबरोबरच अखिल मानव जातीच्या सर्व समस्या किंवा विघ्न सोडवण्यासाठी श्री गणेशाची निवड केली. म्हणून त्यांना विघ्नविनाशक म्हटले जाते.

निष्कर्ष:

आजच्या भागामध्ये आपण गणेश चतुर्थी या सणाविषयी माहिती पाहिली. ज्यामध्ये तुम्ही गणेश चतुर्थी व विनायक चतुर्थी यामधील फरक व साम्य, साजरा करण्याची पद्धत व ठिकाणे, या सणाचे महत्त्व, तसेच पौराणिक इतिहास किंवा संदर्भ, या दिवशी करण्यात येणाऱ्या व्रताचे महत्त्व, तसेच हा सण साजरा करण्यामागील दंतकथा, श्री गणेश यांच्या बद्दल माहिती, इत्यादी गोष्टी नक्कीच वाचल्या असतील.

महाराष्ट्र मधील एक सर्वात लोकप्रिय व भक्तीभावाने साजरा केला जाणारा उत्सव म्हणून गणेश चतुर्थीचे महत्त्व आहे. त्या दिवशी घरगुती स्तरावर उत्सव साजरा केला जातोच, शिवाय सार्वजनिक स्तरावर अनेक चौकाचौकांमध्ये हा उत्सव तरुण मंडळांच्या मार्फत साजरा करण्यात येतो.

FAQ

गणेश चतुर्थी हा सण सार्वजनिक रित्या केव्हापासून सुरू करण्यात आला?

गणेश चतुर्थी हा सण इसवी सन १९९३ यावर्षी सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांनी पुणे या शहरामधून साजरा करण्यास सुरुवात केली.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन का केले जाते?

भगवान गणेश हे जन्मचक्राचे प्रतीक मानले जातात, त्यामुळे मातीपासून निर्माण झालेले गणेश पुन्हा मातीमध्ये परततात, याला गणेश आपल्या घरी पुन्हा परतणे म्हणले जाते.

गणेश चतुर्थी साजरी करण्यामागे काय कारण आहे?

गणेश चतुर्थीच्या दिवशी या बुद्धीच्या देवतेचा अर्थात श्री गणेशाचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी श्री गणेश यांची मूर्ती स्थापन करून हा सण साजरा केला जातो. जो भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी येत असतो.

गणेश चतुर्थीच्या उत्सवाचे स्वरूप कसे असते?

गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, आणि पुढील नऊ दिवस आरती आणि मंत्रोच्चर करत गणेशाची मनोभावे पूजा केली जाते. आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी मूर्तीचे विसर्जन केले जाते.

श्री गणेश यांची वेग वेगळी बारा नावे पुराणात आढळतात, ती कोणती आहेत?

पुराना मध्ये नमूद केलेल्या श्री गणेशाच्या बारा नावांमध्ये एकदंत, सुमुख, कपिल, विकट, गजकर्ण, विघ्नविनाशक, लंबोदर, विनायक, भालचंद्र, दृमकेतू, गजानन, आणि गणाध्यक्ष इत्यादी नावाचा समावेश होतो.

आजच्या भागामध्ये आपण गणेश चतुर्थी या सणाविषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळविण्याबरोबरच तुम्ही तुमच्या इतरही गणेश चतुर्थी ची आतुरतेने वाट बघणाऱ्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती आठवणीने शेअर करा.

धन्यवाद…

Leave a Comment