Ganga River Information In Marathi भारतामधून अनेक नद्या वाहत असतात, या प्रत्येक नद्यांची आपली काहीतरी विशेषता किंवा खासियत असते. यामध्ये प्रत्येक नदी ही वेगवेगळी असली, तरी भारतातील सगळ्या नद्यांबद्दल एक गोष्ट सारखी आहे ती म्हणजे भारतातील लोक नद्यांना देवतांचे स्वरूप मानत असतात. अशीच एक देव स्वरूप प्राप्त झालेली आणि भारतातील सर्वात महत्त्वाची नदी म्हणून गंगा नदीला ओळखले जाते.
गंगा नदीची संपूर्ण माहिती Ganga River Information In Marathi
भारतातील सर्वात लांब नदी म्हणून जिला मानसन्मान मिळाला, आहे अशी गंगा नदी भारताच्या उत्तराखंड राज्यांमधील गंगोत्री या ठिकाणी उगम पावून, पश्चिम बंगाल मधून बांगलादेशमध्ये जाते. आणि तिथून पुढे बंगालच्या उपसागराला मिळते. तिला पद्मा या नावाने देखील ओळखले जात आहे. पूर्व दिशेला वाहणारी ही नदी भारताची जलवाहिनी किंवा जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. आजच्या भागामध्ये आपण या गंगा नदीबद्दल माहिती बघणार आहोत…
नाव | गंगा |
प्रकार | नदी |
इतर नाव | पद्मा |
उगम देश | भारत |
उगम स्थळ | गंगोत्री, उत्तराखंड |
राज्य | उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल |
देश | भारत आणि बांगलादेश |
उपनद्या | गोमती, यमुना, महानंदा, दामोदर, पुनपुन, गंडकी, ब्रह्मपुत्रा, कोसी |
गंगोत्री या ठिकाणी उगम पावणारी गंगा नदी सुमारे २५१० किलोमीटरचा मोठा प्रवास करत, बांगलादेश मार्गे बंगालच्या उपसागराला मिळत असते. भारतातील सर्वात मोठी नदी आणि पवित्र नदी म्हणून ज्या नदीला ओळखले जाते अशा या गंगा नदीने सुंदरबन सारखा अतिशय सुंदर त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे, त्यामुळे या नदीच्या सौंदर्यामध्ये फार मोठी भर पडत असते. सिंहस्थ कुंभमेळासाठी ओळखली जाणारी ही नदी हिंदू धर्मामध्ये मातेच्या ठिकाणी पुजली जाते.
गंगा नदी बद्दल ऐतिहासिक माहिती:
गंगा नदीला पवित्रता प्राप्त होण्यामागे तिच्या पुराणातील किंवा ऐतिहासिक गोष्टींबद्दल माहिती असले पाहिजे. असे म्हटले जाते की, राजा भगीरथ यांनी फार मोठा यज्ञ केला होता आणि स्वर्गात वाहणाऱ्या या गंगा नदीला प्रसन्न करून पृथ्वीवर येण्यास भाग पाडले होते.
या गंगा नदीचा उल्लेख रामायण व महाभारत यासारख्या महाकाव्यामध्ये देखील करण्यात आलेला असून, शास्त्रोक्त वेद व पुराण इत्यादी ठिकाणी देखील गंगा नदीचा उल्लेख दिसून येतो. अनेक भारतीय ऋषी व मुनी यांनी या गंगेच्या काठी वास्तव्य केलेले असून, या गंगा नदीवर अनेक गीत देखील रचलेली आहेत.
ज्यावेळी भगीरथ राजाने गंगा नदीला पृथ्वीवर येण्याची विनंती केली, त्यावेळी ती जर पृथ्वीवर आदळली तर पृथ्वीचा नाश होऊ शकेल, अशी शंका निर्माण झाली होती. त्यावेळी भगवान शिव अर्थात महादेव यांनी आपल्या डोक्यावर अर्थात जटामध्ये या नदीला सामावून घेतले होते, असे सांगितले जाते. या नदीच्या पाण्यामध्ये अंघोळ केली तर मानवाचे सर्व पाप धुतले जातात, अशी श्रद्धा असल्यामुळे दरवर्षी लाखो लोक या नदीमध्ये स्नान करण्याला येत असतात.
गंगा नदीचे भौगोलिक महत्त्व:
भौगोलिक दृष्ट्या भारताच्या उत्तरेकडे उगम पावणारी ही नदी भारतातील बऱ्याचशा राज्यांना पाणीपुरवठा करत असते. या गंगा नदीचे खोरे तसेच तिच्या उपनद्यांचे खोरे मिळून सुमारे ११ राज्यांचा हा विस्तीर्ण प्रदेश पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय समृद्ध समजला जातो.
त्याचबरोबर मासेमारी करणे, विविध नदीच्या पाण्यावर केले जाऊ शकतील असे उद्योगधंदे चालविणे, शेती करणे, यासाठी ही नदी खूपच फायदेशीर असून, ती ज्या क्षेत्रामधून वाहते तेथील आसपासचा सर्व प्रदेश या नदीमुळे सुजलाम सुफलाम झालेला आहे.
नदीमुळे फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील झाली असल्यामुळे, या नदीला अनेक लोक देवता मानत असतात. या गंगेच्या पाण्याचा उपयोग करून विद्युत निर्मिती देखील केली जाते. आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये पाच ठिकाणी या नदीवर जलविद्युत प्रकल्प आहेत. ज्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विद्युत निर्मिती केली जाते.
गंगा नदी बद्दल काही महत्त्वाची तथ्य:
- गंगा ही नदी भगीरथ राजा यांनी केलेल्या यज्ञामुळे किंवा आराधनेमुळे निर्माण झालेली आहे, असे पौराणिक कथांमध्ये सांगितले जाते.
- गंगा नदी, गंगोत्री येथे ज्या ठिकाणी उगम पावते त्या ठिकाणाला गोमुख म्हणून संबोधले जाते. प्रमुख उपनदी म्हणून गंगेच्या भगीरथी या उपनदीला ओळखले जाते.
- गंगा नदीला भारताच्या राष्ट्रीय नदीचा सन्मान प्राप्त झालेला आहे.
- गंगा ही नदी भारतातील सर्वात मोठी नदी असली, तरी देखील जागतिक पातळीवर विचार करता जगातील सर्वात लांब म्हणून तिसरी नदी आहे.
- समुद्रसपाटीपासून गंगा नदीची उंची सुमारे ३४० मीटर इतकी आहे.
- ज्या ठिकाणी गंगा नदीला यमुना ही नदी येऊन मिळते, त्या ठिकाणी एक धार्मिक शहर निर्माण झालेले असून, त्याला प्रयागराज किंवा अलाहाबाद या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी हिंदू धार्मिक तीर्थस्थळ असून, येथे मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्य सुरू असतात.
- गंगा नदी जीवसृष्टीसाठी देखील फार महत्त्वाचे असून, या नदीमध्ये सुमारे ३७५ प्रजातींचे विविध मासे आढळून येत असतात.
- माता म्हणून पुजली जाणारी जागतिक पातळीवरील एकमेव नदी म्हणून गंगा नदीला ओळखले जाते.
निष्कर्ष:
भारत हा असा देश आहे जो नद्यांच्या बाबतीत अतिशय समृद्ध आहे. राजस्थानसारखे काही देश सोडले, तर भारतातील प्रत्येक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नात्यांची संख्या आढळून येते. प्रत्येक राज्यामध्ये एक तरी मोठी नदी असते. त्याचबरोबर अनेक लहान उपनद्या, ओढ़ी, नाले, यांनी भारत अतिशय समृद्ध झालेला आहे.
भारत हा असा देश आहे, जिथे प्रत्येक गावामध्ये एक तरी पाण्याचा प्रवाह वाहताना दिसतो. त्यामुळे भारताला सुजलाम सुफलाम होण्यामध्ये देखील फार मोलाची मदत मिळाली आहे. असे असले तरी देखील काही दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवत असते. या राज्यांमध्ये राजस्थानचा देखील समावेश होतो.
आजच्या भागामध्ये आपण भारताचे जीवनदायी म्हणून ओळखली जाणारी गंगा नदी याबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. त्यामध्ये तुम्हाला गंगा नदी बद्दल ऐतिहासिक माहिती, तिचा उगम, उगमाच्या नंतर ती कशी वाहते, तिच्या काठावर असणारी विविध शहरे, ती कोणकोणच्या देशांमधून व राज्यांमधून वाहते. या नदीशी असणाऱ्या अनेक पौराणिक कथा, तसेच या नदीचे धार्मिक महत्त्व, या नदीचे काही मनोरंजक तथ्य, आणि महत्त्वाची माहिती इत्यादी गोष्टी बघितलेले आहेत.
FAQ
गंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो?
गंगा ही एक भारतीय उगमाची नदी असून, भारताच्या उत्तराखंड राज्यातील गंगोत्री या ठिकाणी या गंगा नदीचा उगम होत असतो.
गंगा नदी आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये किती किलोमीटरचे अंतर कापते?
गंदी आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये सुमारे २५१० किलोमीटरचे अंतर कापत असते, व ती पूर्व दिशेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते.
गंगा ही नदी भारतातील कोणकोणत्या राज्यांमधून वाहते?
गंगा ही नदी पूर्ववाहिनी असून, उत्तराखंड राज्यातील गंगोत्री या ठिकाणी उगम पावल्यानंतर ती उत्तर प्रदेश मध्ये प्रवेश करते. तिथून ती बिहार मार्गे पश्चिम बंगाल मध्ये आल्यानंतर थोडीशी दक्षिणेकडे वाहते, आणि तिथून बांगलादेश या देशामध्ये प्रवेश करत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.
गंगा नदीच्या उपनद्यांमध्ये कोणकोणत्या नद्यांचा समावेश होतो?
गंगा नदीच्या उपनद्यांमध्ये गंडकी, यमुना, गोमती, दामोदर, महानंदा, ब्रह्मपुत्रा, कोसी या सरकारने त्यांचा समावेश होतो.
हिंदू धर्मामध्ये गंगा नदीला इतके मानाचे स्थान का दिले जाते?
हिंदू धर्मामध्ये गंगा या नदीला मातेचे स्थान देण्यात आलेले असून, अनेक भक्त या नदीला देवासमान पुजत असतात. त्याचबरोबर हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा समजणारा सिंहस्थ कुंभमेळा देखील या गंगेच्या काठावर भरत असतो.