Ghonas Snake Information In Marathi आपण प्रत्येकाने लहानपणापासून एकदा तरी साप बघितलाच असेल. साप हा तसा शांत प्राणी, शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्राण्याला उंदीर फार आवडत असल्यामुळे तो शेतातील नुकसान करणारे उंदीर खाऊन शेतकऱ्यासाठी जणू देवदूतच बनून येतो.
घोणस सापाची संपूर्ण माहिती Ghonas Snake Information In Marathi
मात्र असे असले तरी, सापाच्या अनेक प्रजाती विषारी देखील असतात. त्या नकळत चावतात देखील, त्यामुळे वेळप्रसंगी मानवाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे माणसांमध्ये सापाबद्दल अनामिक अशी भीती पसरलेली आहे. त्यामुळे माणूस साप दिसला की, लगेच काठी घेऊन त्याला मारायला धावतो, मात्र सगळेच साप विषारी नसतात. याचा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता दिसेल त्या प्रत्येक सापाला मारले जाते. त्यामुळे सापांची प्रजाती धोक्यात येऊ लागली आहे, आणि निसर्गाचा समतोल ढासळत चाललेला आहे.
आजकाल ही परिस्थिती बदलत चाललेली आहे, सर्पमित्रांनी केलेल्या जनजागृतीमुळे आजकाल साप मारण्याचे प्रमाण कमी झालेले असून, साप आढळून आल्यास सर्पमित्रांना बोलवून त्याला जंगलामध्ये सोडले जाते. ही एक चांगली सुरुवात म्हणता येईल. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण घोणस या सापाबद्दल माहिती बघणार आहोत.…
नाव | घोणस साप |
इंग्रजी नाव | डायोबा |
शास्त्रीय नाव | Rusell viper |
कुळ | वाईपरिडे |
वयोमान | १० ते १५ वर्षे |
रंग | पिवळसर तपकिरी |
लांबी | सुमारे: १५० ते २०० सेमी |
विणीचा कालावधी | वर्षाच्या सुरुवातीला |
गर्भ कालावधी | ६ महिने |
उत्पादन | प्रत्येक विताला २० ते २५ पिल्ले |
पुनुरुत्पादनास सज्ज | २ ते ३ वर्षे वयानंतर |
घोणस हा साप आशिया खंडात सर्वात जास्त आढळणारा एक विषारी साप आहे. भारतामध्ये आढळणाऱ्या सर्वात मोठ्या चार विषारी सापांच्या प्रजाती पैकी घोणस या सापाचा क्रमांक लागतो. यावरून तुम्ही याच्या विषारीपणाचा अंदाज घेऊ शकता. हा अतिशय आक्रमकपणे दंश करणारा साप असून, त्याची सर्वात जास्त संख्या तैवान भारत आणि जावा या बेटावर आढळते. जेथे उंदीर जास्त असतात, तेथे हे साप राहणे पसंत करतात.
हे साप मानवी वस्तीमध्ये देखील अगदी सहजतेने आढळून येतात, कारण धान्यांच्या ठिकाणी उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. आणि त्या उंदरांना खाण्यासाठी घोणस साप मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात. रंगाने पिवळसर तपकिरी रंगाचा असणारा हा साप सुमारे दीड ते दोन मीटर लांबीचा असतो. तसेच त्याच्या अंगावर मोठमोठे गडद रंगाचे काळे ठिपके असतात. आणि या ठिपक्यांना पांढऱ्या रंगाची बॉर्डर असते.
या सापाचे डोके लांबट आणि सपाट असते, त्याचा आकार त्रिकोणी असून ते मानेपासून वेगळे ओळखून येते. या सापाच्या तोंडाच्या दोन्ही बाजूंनी दोन नाकपुड्या असतात, ज्या स्पष्टपणे दिसून येतात.
घोणस सापाचे वास्तव्य:
घोणस हे साप रात्रीच्या वेळी बाहेर पडतात, आणि दिवसभर झाडे झुडपे, जंगले, शेत, धान्याचे गोदाम, अडगळीच्या खोली येथे आढळून येतात. ज्या ठिकाणी सर्वात जास्त उंदीर आढळतात, तेथे या सापाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे उंदरांचे निर्मूलन करणे या सापांना दूर करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.
देशांचा विचार केल्यास घोणस हा साप मोठ्या प्रमाणावर भारत देशामध्ये आढळतो. त्याचप्रमाणे हा साप भारतीय उपखंडातील नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, म्यानमार, चीन, इंडोनेशिया, पाकिस्तान, तैवान इत्यादी देशांमध्ये देखील आढळतो.
घोणस सापाचा आहार:
घोणस हा साप लहान मोठे प्राणी खाऊन आपले उदरभरण करत असतो. यामध्ये बेडूक, विंचू, खेकडे, सरडे, यासारख्या लहान प्राण्यांचा समावेश होतो. या सापाचे सर्वात जास्त आवडीचे खाद्य म्हणजे उंदीर होय. उंदीर खाण्यासाठी हे साप कितीही लांब पाठलाग करू शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मित्र म्हणून या सापाला ओळखले जाते.
घोणस सापाबद्दल काही महत्त्वाचे तथ्ये:
- घोणस साप एका वेळी तब्बल वीस ते पंचवीस पिल्लांना जन्म देऊ शकतो.
- घोणस हा साप घुबड पक्षाप्रमाणेच निशाचर आहे, अर्थात ते दिवसभर शांत राहून रात्रीच्या वेळी आपल्या भक्षाच्या शोधात निघतात. मात्र थंडीच्या दिवसात ते दिवसादेखील बाहेर दिसून येतात.
- हे साप उंदरांच्या बिळामध्ये, खडकांच्या भेगेमध्ये किंवा अडगळीच्या ठिकाणी आणि गवतामध्ये आढळून येतात.
- भारतामध्ये आढळणाऱ्या सर्वात जास्त विषारी सापांच्या चार प्रजाती पैकी घोणस हा एक साप आहे.
- तामिळनाडू राज्यात प्रत्येक वर्षी घोणस सापाच्या दंशामुळे सुमारे नऊ ते दहा हजार लोकांचा मृत्यू होतो.
- मित्रांनो, त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये हे साप राहिल्यास सुमारे नऊ ते दहा वर्षे हे जगतात, मात्र यांना बंदी करून ठेवले, आणि सगळे काही जागेच्या जागी दिले तर हे साप तब्बल पंधरा वर्षे देखील जगू शकतात.
- घोणस सापाचे सर्वात आवडीचे खाद्य उंदीर आहे.
निष्कर्ष:
आज आपण घोणस या सापाबद्दल माहिती पहिली, घोणस हा एक प्रचंड विषारी सापांपैकी एक साप आहे. त्यामुळे या सापाबद्दल अनेक समज गैरसमज देखील समाजात पसरलेले आहेत, मात्र असे असले तरी देखील हा साप सहसा स्वतःहून कोणाच्या वाट्याला जात नाही.
हा शेतकऱ्यांचा एक उत्तम मित्र आहे, त्यामुळे हा साप असो की अन्य कुठलाही साप मारण्याऐवजी सर्पमित्राला बोलावून त्यास योग्य पद्धतीने जंगलामध्ये सोडून देणे फायदेशीर ठरते. तसेच आपले घर जर शेतापासून लांब असेल, तर घराजवळ निघालेला साप शेतामध्ये सोडला तर फायदा होऊ शकतो.
असे असले तरी देखील मित्रांनो साप हा प्राणी विषारीच आहे, त्यामुळे त्याचा दंश झाल्यास योग्य उपचाराअभावी माणूस दगावू देखील शकतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे साप आणि त्याचे प्रकार ओळखता येणे अतिशय गरजेचे असते. बिगर विषारी साप असेल, आणि त्याबद्दल रुग्णाला माहिती नसेल तर केवळ भीतीनेच माणूस दगावण्याची शक्यता असते, तसेच विषारी साप चावल्यानंतर साप कोणता होता हे ओळखता आले नाही, तर प्रतिविष देण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे देखील रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी साप आणि त्याचे प्रकार याविषयी जागरूक असणे गरजेचे असते.
याविषयीची माहिती तुम्हाला इंटरनेट, यूट्यूब इत्यादी माध्यमातून सहज उपलब्ध होते, त्यामुळे सापांची माहिती करून घ्या. आणि शेतामध्ये काम करताना अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन काम करा. जेणेकरून कुठलाही होणारा अनर्थ टाळला जाऊ शकतो.
FAQ
घोणस हा साप विषारी आहे की बिनविषारी?
घोणस हा अतिशय विषारी गटातील साप आहे.
घोणस हा साप दिवसाच्या कोणत्या वेळेत सर्वाधिक सक्रिय असतो?
घोणस हा साप निशाचर प्राणी असल्यामुळे तो बहुतेक वेळा रात्री सक्रिय असतो.
घोणस हा साप मोठे प्राणी खातो की लहान?
घोणस हा प्राणी मांसाहारी असला तरीदेखील तो बेडूक, विंचू, सरडे, खेकडे, यांसारखे छोटे प्राणी खायला प्राधान्य देतो.
घोणस सापाचे वास्तव्य शक्यतो कोठे जास्त प्रमाणात आढळून येते?
घोणस हा साप गवताळ प्रदेश, शेत, आणि दाट झाडीचा प्रदेश येथे राहण्यासाठी प्राधान्य देतो.
घोणसचे आवडते खाद्य कोणते आहे?
घोणस सापाचे आवडते खाद्य उंदीर हे आहे.
आजच्या भागामध्ये आपण घोणस या सापाबद्दल माहिती पाहिली, ती माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना आणि शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा.
धन्यवाद…