होळी सणाची संपूर्ण माहिती Holi Information In Marathi

Holi Information In Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती मनोरंजन अध्यात्म भारतीय संस्कृती या सर्व गोष्टींची माहिती जिथे प्राप्त होते त्या लेखांच्या खजिन्यात तुमचे सहर्ष स्वागत आहे. जसे तुम्हाला ठाऊकच आहे की भारतीय संस्कृतीमध्ये सण समारंभ यांना किती महत्त्व आहे .सण साजरे करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपली संस्कृती परंपरा जपली जाते. लोकांच्या भेटीगाठी होतात व प्रेम, एकोपा आपुलकी वाढते .अशाच एका सणाबद्दल आजच्या लेखात आपण माहिती पाहणार आहोत.

Holi Information In Marathi

होळी सणाची संपूर्ण माहिती Holi Information In Marathi

प्रारंभिक माहिती-

 हा सण जरी हिंदूंचा सण म्हणून ओळखला जात असला तरी जगभरामध्ये विविध जाती धर्मांचे लोक हा सण साजरा करतात. हा सण म्हणजेच होळी होय.

 मित्रांनो होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो. ज्यामध्ये पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते व दुसऱ्या दिवशी रंगांनी रंगपंचमी अर्थात धुलिवंदन खेळले जाते. फाल्गुनी पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण साजरा केला जातो. हा सण भारतामध्ये अगदी उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. होळी या सणाला ग्रामीण भागामध्ये शिमगा या नावाने देखील ओळखले जाते.

 शहरी भागामध्ये हा सण अनेक लोक संगीत नृत्य व मनोरंजनाचे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन देखील साजरा करत असतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जात असतो. दरवर्षी हा सण वेगवेगळ्या तारखेला येत असतो .

कामदहन या नावाने देखील होळी या सणाला ओळखले जाते व  हुताशनी उत्सव असे देखील होळीला म्हटले जाते. होळी हा सण धार्मिक व वसंतोत्सव प्रकारचा सण असून काही ठिकाणी दोन दिवस तर काही ठिकाणी तीन दिवस हा सण साजरा केला जातो. होळी हा सण भारतातच नव्हे तर नेपाळ पाकिस्तान या देशांमध्ये देखील खूप उत्साहाने साजरा केला जातो.

होळी साजरी करण्याची कारणे-

 होळी या सणाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की समोर येणाऱ्या वसंत ऋतूने रंगांची उधळण करत आयुष्यात आनंद घेऊन यावा व सध्या हिवाळ्याला निरोप देण्याचा हा सण असतो.

होळी या सणाचा इतिहास –

होळी हा सण इतिहासकारांच्या मते सुरुवातीला बंगालमध्ये खेळला जात होता. पण अनेक पोथी पुराणांमध्ये होळी हा सण भारतातील ब्रज या प्रांतातील भगवान श्रीकृष्णांच्या वृंदावन मथुरा बरसाना नंदागाव या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर खेळला जात होता. त्यामुळेच होळी या सणाच्या वेळी या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळते.

होळी साजरी करण्यामागची मूळ कथा-

 होळी हा एक प्राचीन सण असून वसंत ऋतुच्या आगमनासाठी हा सण साजरा केला जातो. हा एक कृषी महोत्सव म्हणून देखील साजरा केला जातो. होळी या सणाविषयी अशी कथा प्रचलित आहे की एक दुष्ट राजा म्हणजेच हिरण्यकश्यपू नामक एक दुष्ट राजा होता व भक्त प्रल्हाद या दोन पात्रात संबंधी ही कथा प्रचलित आहे .

भक्त प्रल्हाद हे श्री विष्णू देवांचे फार मोठे भक्त होते व ते दुष्ट राजा हिरण्यकश्यपू यांचे पुत्र देखील होते. भक्त प्रल्हाद हे श्रीविष्णूंची खूप भक्तीभावाने पूजा करत असे पण हिरण्यकश्यभूराजाला प्रल्हादाचा हा देव भोळेपणा अजिबात आवडत नव्हता त्यामुळे त्यांनी प्रल्हादाला या भक्ती मार्गातून दूर करण्यासाठी हिरण्यकश्यपूची बहिण होलिका हिच्यावर एक विशेष कामगिरी सोपवली.

 हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला एक वर मिळाला होता. तो वर असा होता की होलिकेचे शरीर अग्नीमध्ये कधीच जळू शकत नाही. भक्त प्रल्हादाला मारून टाकण्यासाठी होलिकेने कट रचला व लाकडाच्या रचलेल्या सरणावर भक्त प्रल्हादाला जिवे मारण्यासाठी होलिका घेऊन गेली.

होलिका तर अग्नीमध्ये नष्ट होणार नव्हती पण भक्त प्रल्हादाच्या विष्णू वरील अपार श्रद्धेमुळे व भक्ती मुळे त्यांना कोणतीही इजा होऊ शकली नाही .पण होलिका ही आगीत जळून राख झाली .तेव्हापासून अहंकाराचा नाश होणे याचे प्रतीक म्हणून होळी हा सण सर्वत्र साजरा केला जातो.

कोणत्या देशांमध्ये होळी साजरी केली जाते?

 होळी हा सण मुख्यत्वे करून भारत व नेपाळ या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भारतामधील अनेक राज्यात व छोट्या-मोठ्या खेड्यापाड्यांमध्ये देखील हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. होळी दहन करून गोडाधोडाचा नैवेद्य होळीला दाखवला जातो.

सण साजरा करण्याची पद्धत-

 होळी हा सण सर्व दूर साजरा केला जात असून बऱ्याच ठिकाणी दोन ते तीन दिवस हा सण साजरा केला जातो. यातील पहिल्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी होळी सजवून लाकडं, शेणाच्या गौऱ्या, उसाचा शेंडा, एरंडाचे पान ,इत्यादी गोष्टींचा वापर करून होळी सजवली जाते व आजूबाजूला रांगोळी काढून शुभ मुहूर्तावर होळी पेटवली जाते. होळी पेटवण्याचे कारण म्हणजे या होळीमध्ये अहंकाराचा, वाईट हेतूंचा नाश होतो व चांगल्या आयुष्याला सुरुवात होते .

दुसऱ्या दिवशी सर्वत्र धुळवड साजरी केली जाते म्हणजेच रंगांची उधळण केली जाते. या दिवशी संगीताच्या तालावर लोक नाच गाणे करतात. काही काही ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवसाला पुनो या नावाने ओळखले जाते. या दिवशी होलिकेच्या प्रतिमा देखील जाळल्या जातात व लोक भक्त प्रल्हादाची कहाणी लक्षात ठेवण्यासाठी प्रकाश झोत लावत असतात.

अग्नीदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मुलाबाळांसह अग्नीच्या भोवती पाच फेऱ्या देखील मारल्या जातात. धुळवडीनंतर तीन ते चार दिवसांनी ग्रामीण भागामध्ये रंगपंचमी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सण रंग लावून नाच गाणे करून साजरा केला जातो.

होळी विषयी काही विशेष तथ्य-

 होळी हा हिंदू धर्मीयांचा प्राचीन सण असून वसंतोत्सव म्हणून देखील या सणाला ओळखले जाते.

 नरसिंह नारायण म्हणून भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूवर विजय मिळवून भक्त प्रल्हादाची भक्ती खरी ठरवली याचे प्रतीक म्हणून देखील हा सण साजरा केला जातो.

 हिवाळ्याची समाप्ती व वसंत ऋतूच्या सुरवातीला हा सण साजरा केला जातो.

होळी साजरी करण्याच्या विशिष्ट पद्धती-

 प्रत्येक प्रांतांमध्ये होळी ही निरनिराळ्या पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रातील काही ठिकाणी होळीच्या आदल्या दिवशी बारा वाजता तर काही ठिकाणी पहाटे होलिका दहन केले जाते काही ठिकाणी छोटी तर काही ठिकाणी मोठी सार्वजनिक होळी तयार केली जाते. गावकरी एकत्र जमतात व मंत्र उच्चार करून होळीचे दहन केले जाते.

 कोकणामध्ये तर अशी प्रथा प्रचलित आहे की होळी दहन केल्यावर बोंब मारली जाते. होळीमध्ये नारळ अर्पण करून नैवेद्य देखील दाखवला जातो. होळीमधील हा नैवेद्य खाण्यासाठी किंवा अर्पण केलेला नारळ मिळवण्यासाठी राजे राजवाड्यांच्या काळामध्ये स्पर्धा देखील ठेवल्या जात असे. गावातील तरुणांमध्ये व तरबेज व्यक्तींमध्ये हा नारळ मिळवण्यासाठीची स्पर्धा लागत असे .शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील अशा स्पर्धा होत असे.

ज्यात अनेक मावळे सहभाग घेत असे जिंकणाऱ्या किंवा जळणाऱ्या होळीतून नारळ काढणाऱ्या पठ्यस महाराजांकडून मानाचे कडे दिले जात होते .तसेच वसंत ऋतुच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला असतो सर्वत्र होळी दहन झाल्यामुळे थोडासा उबदारपणा वातावरणात निर्माण होतो.

होळीचे विशिष्ट खाद्यपदार्थ-

 या दिवशी प्रत्येक प्रांतातील काही विशिष्ट गोडाधोडाचे पदार्थ सर्वत्र बनवले जातात. यात महाराष्ट्रात सर्वत्र गोड पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो .होळी या सणांमध्ये थंडाई पिण्याची देखील परंपरा आहे. घरोघरी थंडाई बनवली जाते व येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना देखील थंडाई दिली जाते.

होळी या दिवशी अनेक भागांमध्ये विशिष्ट पदार्थ बनवले जातात. जसे की राजस्थानमध्ये गुजिया या पदार्थाला विशेष महत्त्व आहे .तसेच मालपुवा हा खास पदार्थ होळीच्या दिवशी बनवला जातो .मालपुवा म्हणजेच केक च्या स्वरूपातील छोटे छोटे पॅन केक असतात, जे उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बंगाल, ओरिसा, राजस्थान, महाराष्ट्र येथे बनवले जातात. तसेच दहिवडे, पाणीपुरी ,भांगेच्या पानांची भजी इत्यादी गोष्टींचा आस्वाद घेतला जातो.

होळी झाल्यावर दुसऱ्याच दिवशी सर्वत्र धुळवड साजरी केली जाते, धुळवड साजरी करताना सेंद्रिय किंवा नैसर्गिक रंगांचा वापर करणे खूप आवश्यक आहे .यावेळी अंगभर कपडे घालणे गरजेचे आहे कारण की जर कोणी रासायनिक रंग वापरत असेल तर त्या रासायनिक रंगांचा तुमच्या शरीराला स्पर्श होता कामा नये.

 धुळवड खेळायला जाताना शरीरावर केसांना तेल लावून जा जेणेकरून रंग अंगाला किंवा केसांना लागणार नाही. तर मित्रांनो होळी या सणाबद्दल ची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद!!!!!

FAQ

1. होळी सण म्हणजे काय?

शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे ‘होळी. ‘ देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते.

2. होळी का साजरी केली जाते?

मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या नावाने ओळखली जाते, अपप्रवृत्ती ना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरेतर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागता साठी सिद्ध होण्याच हा सण.

3. होळीत रंग का वापरतात?

कृष्णाने तिचा चेहरा तेजस्वी, रंगीबेरंगी पेंटने मंद केला आणि राधा प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्न केले. होळीचा सण कृष्णाने राधेवर व्यक्त केलेले प्रेम उत्साही रंगांद्वारे साजरे करतो , म्हणून रंगीत पावडर आणि द्रव फेकून.

4. होळी सणाचा उगम कोठे झाला?

भारतात होळीचे अनेक प्रकार साजरे केले जातात आणि पौराणिक कथा सांगते की होळीच्या सणाची सुरूवात मथुरा, नांदगाव, वृंदावन आणि बरसाना यासह भारतातील बरसाना प्रदेशात पहिल्यांदा पाहिली आणि सुरू झाली.

5. आपण मुलांसाठी होळी का साजरी करतो?

होळी सणाला अनेक अर्थ जोडलेले आहेत. हे हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात, प्रेमाचा बहर, मित्र आणि कुटुंबाचा उत्सव, वाईटावर चांगल्याचा विजय आणि तुटलेली नाती सुधारण्याची आणि दुरुस्त करण्याची संधी दर्शवते.

Leave a Comment