जाहिरात लेखणची संपूर्ण माहिती Jahirat Lekhan Information In Marathi

Jahirat Lekhan Information In Marathi बोलणाऱ्याची मातीही विकली जाते, आणि न बोलणाऱ्याचा गहूही विकत नाही.  अशी म्हण आपण लहानपणापासून कोणाच्या ना कोणाच्या तोंडातून नक्कीच ऐकली असेल. लहानपणी या म्हणीकडे फारसे लक्ष देणे नसले तरी देखील कमवते वय झाल्यानंतर या म्हणीचा अर्थ आपल्या आपोआपच लक्षात आला असेल.

Jahirat Lekhan Information In Marathi

जाहिरात लेखण ची संपूर्ण माहिती Jahirat Lekhan Information In Marathi

आपल्या जवळील कोणतीही गोष्ट असो, मग ती वस्तू असो सेवा असो कला असो किंवा आणखी काही, तिचा जगभर प्रसार करायचा असेल तर आपल्याला कमी अधिक प्रमाणात का होईना त्या गोष्टीची जाहिरात करणे क्रमप्राप्तच असते. मग ती जाहिरात तोंडी असो, लिखित असो, की अगदी हल्ली च्या पद्धतीने डिजिटल स्वरूपातील असो. मात्र समोरच्याला आपल्या उद्योग, व्यवसाय, सेवा, कला, कल्पना याविषयी माहिती द्यायची असेल, तर जाहिरातीला पर्याय नाही.

आजच्या भागामध्ये आपण जाहिरात लेखन या विषयी माहिती बघणार आहोत…

जाहिरात म्हणजे काय:

जाहिरात लेखन याविषयी माहिती घेण्याआधी जाहिरात म्हणजे काय हे माहिती असणे अतिशय गरजेचे असते. मित्रांनो इंग्रजीमध्ये जाहिरातीला ॲडवटाईज म्हणून ओळखले जाते. जाहिरात म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कुठल्याही वस्तू, सेवा, किंवा फर्म बद्दल अतिशय आकर्षक व रचनात्मक रीतीने सादरीकरण करणे, आणि ते ग्राहकांसमोर मांडणे याला जाहिरात असे म्हटले जाते.

जाहिरात ही अशाप्रकारे असावी जी बघून ग्राहक चटकन जाहिरातीकडे आकर्षित होऊन, त्या वस्तू किंवा सेवेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी उत्सुक होतील. जेणेकरून त्या वस्तू किंवा सेवेच्या खपामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होईल. कुठल्याही वस्तूच्या विक्रीच्या यशामागील गमक हे जाहिरातच असते.

कुठल्याही व्यवसायाच्या चांगल्या चालण्यामागे जाहिरातीचा हात नक्कीच असतो, मग ती जाहिरात मौखिक सुद्धा असू शकते. मौखिक जाहिरात म्हणजे, एखादी वस्तू किंवा सेवा आवडली तर ती मी माझ्या मित्रांना घेण्यासाठी सांगतो, किंवा एखाद्या हॉटेलचे जेवण आवडल्यास मी वारंवार तिथे जातो, आणि माझ्या इतरही ओळखीतल्या लोकांना तिथे जाण्यास सांगतो. हे एक मौखिक जाहिरातीचे उदाहरण आहे. यासाठी एकही रुपया खर्च येत नाही, मात्र व्यवसायामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते. याप्रमाणेच जाहिरातीचे अनेक प्रकार पडतात.

हे युग स्पर्धेचे आहे. इथे एका उत्पादनाचे इतके विविध ब्रँड बघायला मिळतात की, काल बघितलेला ब्रँड आज आपण विसरून जातो. आणि अशावेळी ग्राहकांच्या मनावर आपला ब्रँड कायम ठसवत ठेवायचा असेल तर जाहिरातीचा आधार घेणे, आणि वारंवार ती जाहिरात ग्राहकांपर्यंत पोहोचवत राहणं, हे अतिशय महत्त्वाचं ठरतं.

एखाद्या उत्पादनाची जाहिरात केलीच नाही तर, ग्राहकांना ती वस्तू बाजारात आहे की नाही याबद्दल समजणारच नाही. त्यामुळे ती वस्तू मागणी असून आणि त्या वस्तूमध्ये खरे पोटेन्शिअल असून देखील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतील. मित्रांनो आज अशी स्थिती आहे की तुमच्या उत्पादनामध्ये दम असो किंवा नसो जाहिरात उत्तम रीतीची असायला हवी. आजकाल अनेक ब्रँड्स केवळ जाहिरातीच्या जोरावर मोठे झालेले आहेत.

आणि ज्यांनी जाहिरातीच्या मार्ग अवलंबवला नाही, त्यांचे उत्तम दर्जाचे प्रॉडक्ट असून देखील मागे पडलेले आहेत. त्यामुळे समाजानुसार चालत राहून आपण देखील आपल्या उत्पादनांची जाहिरात करणं क्रमप्राप्तच आहे. तसेच जाहिरातीमुळे ग्राहकांना हवी ती, आणि योग्य वस्तू निवडण्यामध्ये देखील मोलाची मदत होते. आणि त्यामुळेच ग्राहकांचा पैसा वाया न जाता त्यांना चांगला अनुभव मिळतो.

जाहिरात लेखनासाठी काही महत्वाच्या टिप्स:

केवळ जाहिरात केली आणि दुसऱ्या दिवसापासून ग्राहकांच्या रांगा लागल्या असे होत नाही. त्यासाठी आपली जाहिरात देखील तेवढी दमदार असावी लागते. आजकाल तुम्ही बघत असाल कोणालाही वेळ नाही, अगदी लहान मुले देखील सगळ्या गोष्टी शॉर्ट मध्ये करायला बघतात.

त्यामुळे भरमसाठ मोठी जाहिरात बनविणे म्हणजे जास्त पैसा खर्चून हाती काहीही न लागणे असे होते. त्यामुळे जाहिरात जेवढी संक्षिप्त आणि नेमकी असेल तेवढा त्या जाहिरातीचा फायदा होत असतो. मात्र कमी शब्दात जाहिरात देताना कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टी विसरता कामा नये, हे देखील लक्षात ठेवायला हवे. चांगली जाहिरात लेखन करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत…

पहिली टीप म्हणजे शक्य तेवढे कमी शब्द वापरून जाहिरात लिहिली जावी. मात्र त्यातून उत्पादनाबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला जावा.

दुसरी टीप म्हणजे ज्या गोष्टीची जाहिरात आहे, त्या गोष्टीला जास्त महत्त्व दिले पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा प्रॉडक्ट हायलाईट न होता बाकीच्याच गोष्टी जास्त हायलाईट होतात, त्याने लोकांच्या लक्षामध्ये ते प्रॉडक्ट राहत नाही.

जाहिरातिकडे बघून लोकांना कंटाळा न येता उलट लोक जाहिरातीकडे आकर्षित झाले पाहिजे, अशा प्रकारे जाहिरात लिहिली जावी.

जाहिरात जास्तीत जास्त आकर्षक बनवण्यासाठी त्यामध्ये कवितेच्या एक दोन ओळी घातल्या तर अजून जास्त प्रभावीपणे जाहिरात तयार होते.

जाहिरात लिहिताना सध्या बाजारामध्ये कशाचा ट्रेंड चालू आहे, त्याचे थोडेसे संशोधन करून त्याचा जाहिरातीत खुबीने वापर केला, तर ती जाहिरात अल्पावधीत लोकप्रिय होण्यास कुठलाही अडथळा रोखू शकत नाही.

जाहिरात लिहिताना अगदी मोजक्या शब्दांमध्ये ग्राहकांनी ती वस्तू का खरेदी करावी याविषयी वस्तूंच्या खुबी लिहाव्यात, त्यामुळे ग्राहक आपोआपच त्या वस्तूकडे आकर्षित होतात.

आजकाल सोशल मीडियाचे वारे सर्वत्र फिरत आहे, त्यामुळे आपली जाहिरात सोशल मीडियावरून कशाप्रकारे व्हायरल होईल याचा देखील प्रयत्न करावा. सोशल मीडियावर वारंवार जाहिरात नजरेला पडून ग्राहकांचा त्या वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे वस्तूची विक्री वाढण्यास मदत होते.

निष्कर्ष:

आजच्या भागामध्ये आपण जाहिरात लेखन याविषयीची माहिती घेतली. क्षेत्र कुठलेही असो, जाहिरातीला कुठल्याच क्षेत्रासाठी पर्याय नाही. आजकाल प्रत्येक व्यवसायाची जाहिरात करणे जणू उद्योग व्यवसाय करण्याचा एक भागच बनला आहे. अगदी छोटे छोटे उत्पादनांची देखील जाहिरात केली जाते.

टीव्हीवर आजकाल आपण अनेक उत्पादनांच्या जाहिराती बघतो, त्यामध्ये उत्पादन कसे जरी असले, तरी ते किती आकर्षकपणे मांडले जाते यावर प्रोडक्टचा सक्सेस रेट ठरत असतो. त्यामुळे योग्य जाहिरात उत्पादन प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका बजावत असते. मित्रांनो, एक ग्राहक म्हणून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीकडे तुम्ही चौकस बुद्धीने लक्ष ठेवण्याबरोबरच, एक उत्पादक म्हणून देखील विविध जाहिरात लेखन कल्पना राबवून ग्राहकांना आकर्षित करण्याचे हातखंडे शिकून घेतले पाहिजे.

FAQ

उत्पादनाकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचे सर्वात उत्तम माध्यम कोणते आहे?

यासाठी जाहिरात हे सर्वात उत्तम माध्यम आहे.

जाहिरात का केली जाते?

या स्पर्धेच्या युगामध्ये इतर सर्व उत्पादनाच्या मध्ये आपले उत्पादन टिकावे, आणि त्याचा विक्री खप वाढावा म्हणून जाहिरात केली जाते.

जाहिरातीमधील सर्वात महत्त्वाचा आणि आकर्षक भाग कोणता असतो?

जाहिरातीमधील टॅग लाईन किंवा ज्याला मराठीत घोषवाक्य म्हटले जाते हा जाहिराती मधील सर्वात आकर्षक भाग असतो.

जाहिरात जास्त प्रभावी करण्यासाठी काय केले पाहिजे?

जाहिरात जास्तीत जास्त आकर्षक आणि प्रभावी करण्यासाठी त्यामध्ये अलंकारिक शब्द, काव्यमय ओळी, आणि प्रभावी शब्द इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव करायला हवा.

जाहिरातीतून जास्तीत जास्त विक्री वाढवण्यासाठी काय करायला हवे?

जाहिरातीतून जास्तीत जास्त विक्री वाढवण्यासाठी जाहिरातीमध्ये आपला संपर्क क्रमांक किंवा पत्ता जरूर द्यायला हवा.

आजच्या भागामध्ये आपण जाहिरात लेखन याविषयी माहिती पाहिली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवालच अशी आशा आहे. तसेच ही माहिती तुमच्या इतर उत्पादक आणि बिजनेसमन मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल.

 धन्यवाद…

Leave a Comment