Jasmine Flower Information In Marathi फुल आपल्याला नेहमीच प्रसन्न करत असते. असेच एक सुंदर सुवासिक फुल म्हणजे जस्मिन होय. जास्मिनम ऑफिसिनेल असे शास्त्रीय नाव असलेले हे फुलझाड झुडूपवर्गीय असते. या फुलाला यास्मिन या पारशी शब्दावरून नाव मिळालेले आहे, असे म्हटले जाते. आणि यालाच मराठीमध्ये चमेली तर इंग्रजीमध्ये जास्मिन म्हणून ओळखले जाते. याच्या नावाचा अर्थ बघितला तर तो देवाची भेट असा आहे.
चमेली फुलाची संपूर्ण माहिती Jasmine Flower Information In Marathi
हिमालयाच्या दक्षिण पायथ्याला मोठ्या प्रमाणावर उगवणारे हे फुल सर्वप्रथम पश्चिम चीन मध्ये आणि हिमालयाच्या काही भागांमध्ये उगवले अशा नोंदी आढळतात. आज संपूर्ण भारतात चमेलीचे फुल आर्थिक फायद्यासाठी घेतले जाते, तसेच युरोपमध्ये देखील अनेक देश या फुलांची लागवड करतात.
दिवसा या चमेलीचे अस्तित्व जाणवत नसले, तरी देखील अंधार पडताच या फुलापासून मोठ्या प्रमाणावर सुगंध पसरायला लागतो. जो लोकांना अक्षरशः वेड लावतो. ज्यावेळी जास्मिनच्या कळ्या फुलायला लागतात, त्यावेळी संपूर्ण वातावरण चमेलीच्या सुगंधानेच भरून जाते. या फुल झाडाच्या जगभरात सुमारे २०० पेक्षाही अधिक प्रजाती आढळून येतात.
आजच्या भागामध्ये आपण जास्मिन अर्थात चमेलीबद्दल माहिती बघणार आहोत…
नाव | चमेली |
इंग्रजी नाव | जास्मिन |
फारसी नाव | यास्मिन |
नावाचा अर्थ | देवाची भेट |
शास्त्रीय नाव | जास्मिनम ऑफिसिनेल |
हायर क्लासिफिकेशन | जास्मिनि |
कुटुंब किंवा कुळ | ओलेएसी |
किंगडम | प्लांटी |
जगभरात सुमारे २०० पेक्षाही अधिक प्रजाती आणि भारतामध्ये ४० प्रजाती व त्याचे शंभरहून अधिक प्रकार आढळणारे फुल म्हणजे चमेलीने फुल होय. भारतात ओल्या व कोरड्या अशा दोन्ही हवामानामध्ये हे पीक घेतले जाते. केवळ थंडीपासून याचे संरक्षण करणे गरजेचे असते. एकदा तुम्ही कटिंगद्वारे या फुलाची लागवड केली की पुढील दोन ते तीन वर्षात तुम्हाला यापासून फुले मिळतात.
भारतामध्ये आढळणाऱ्या चमेलीचे पांढऱ्या व गुलाबी रंगांमध्ये फुले येतात, तर काही देशांमध्ये जमिनीला पिवळ्या रंगाचे देखील फुले येतात. चमेलीचे झुडूप सुमारे दहा ते पंधरा फुटांपर्यंत देखील वाढू शकते.
चमेलीची वनस्पती सर्वसाधारणपणे सदाहरित म्हणून ओळखली जाते, मात्र शरद ऋतूमध्ये काही वेळेस त्याची पाने गळू देखील शकतात.
चमेलीची फुले खाण्याचे फायदे:
चमेली या सुरेख सुगंध पसरवणाऱ्या फुलांचे सेवन देखील केले जाऊ शकते, मात्र त्यासाठी काही पूर्व खबरदारी घेणे गरजेचे ठरते. या फुलांमध्ये खूप तीव्र सुगंध असल्यामुळे चहा मध्ये देखील या फुलांचा वापर केला जातो, जेणेकरून चहा सुगंधी बनवला जातो.
निसर्गामध्ये चमेलीच्या फुलाप्रमाणे दिसणारे आणखी फुले देखील आढळतात, चुकून चमेली समजून असे फुले खाल्ल्यास आरोग्यासाठी बाधक ठरू शकते. त्यामुळे जास्मिन च्या फुलांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला जावा. तसेच आयुर्वेदिक डॉक्टरांना देखील विचारले जावे.
चमेली पासून बनवण्यात येणारे तेल व त्याचे असंख्य फायदे:
चमेलीच्या झाडापासून आणि फुलांपासून तेल बनवले जाते हे आपल्याला माहितीच आहे. हे तेल खूप सुगंधी असल्यामुळे अनेक सौंदर्यप्रसाधने व सेंट किंवा डियोड्रट यामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या तेलाने काही काळाकरिता डोक्याला मसाज केली तर डोक्यामध्ये असणारा कोंडा आणि इतर खाजेसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. खोबरेल तेल व चमेलीचे तेल एकत्र करून मसाज करावी, आणि अर्ध्या तासानंतर केस धुवावेत. यामुळे केस अतिशय घनदाट काळे आणि कोंडाविरहित होतात.
तोंडामधील दुर्गंधी दूर करण्याकरिता सुद्धा चमेलीचे तेल वापरले जाते. तसेच शरीरावरील दुर्गंधी देखील दूर केली जाऊ शकते. याकरिता बाजारामध्ये चमेलीचे अनेक स्प्रे मिळतात.
चमेलीच्या तेलाचा वापर करून बनवलेला चहा पिल्यामुळे नैराश्याच्या समस्या दूर होतात, आणि मेंदू तल्लख व ताजा तावाना होतो. तसेच आपली चेतासंस्था देखील सक्रिय व्हायला मदत मिळते.
काही लोकांचे केस अजिबात ओले राहत नाहीत, नेहमी रखरखीत पडतात. तर त्यांच्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये चमेलीची फुले टाकून उकळल्यामुळे केसांना योग्य पोषण मिळण्यास मदत होते. आणि केस नेहमी ओलसर असल्याचे दिसतात. अर्थात चमेलीचे तेल किंवा पाणी केसांसाठी कंडीशनर चे काम करत असते.
चमेली पासून डिओडरंट बनविण्याकरिता एका स्प्रे च्या बाटलीमध्ये काहीसे पाणी घेऊन त्यात चमेलीच्या तेलाचे थोडेसे थेंब घालावेत. आणि हे पाणी झाकण लावून व्यवस्थित हलवावे. हा स्प्रे तुम्ही वापरू शकता. असे असले तरी देखील डायरेक्ट चमेलीचे तेल त्वचेवर लावले तर ते ऍलर्जी करू शकते.
घरामध्ये चमेलीचे रोपटे लावल्यामुळे चिंता आणि ताणतणाव दूर होण्यास मदत मिळते, आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होते.
चमेलीच्या फुला बद्दल काही तथ्य:
- चमेलीच्या झाडापासून १८ ते २० वर्षापर्यंत फुले मिळू शकतात.
- चमेलीच्या फुलांमध्ये साधारणपणे पाच पाकळ्या असतात, ज्या उत्तम प्रकारचा सुगंध हवेत मिसळतात.
- दक्षिण भारतामध्ये चमेली या फुलाची मोठ्या प्रमाणावर शेती आढळून येते.
- चमेलीचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात त्यामुळे चमेलीची फुले किंवा पाणी वाळवून चहाच्या मसाल्यामध्ये त्याचा वापर केला जातो.
- आयुर्वेदामध्ये चमेलीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
- चमेली पासून अत्तर देखील बनवले जाते.
- चमेली पासून बनवलेला रस हा चवीला तिखट असतो.
- चमेलीच्या फुल समूहाला जास्मिन ब्लॉसम असे म्हटले जाते, जो नितळ सौंदर्याचा एक झराच असतो.
निष्कर्ष:
फुल शेती ही भारतामध्ये फार पूर्वीपासून केली जाते. अगदी प्राचीन भारतापासून मध्ययुगीन आणि आता आधुनिक भारतामध्ये सुद्धा फुलशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये चमेली अर्थात जस्मिन या फुलाची देखील मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे त्याची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते.
या फुलाला सर्वप्रथम चीनच्या काही भागांमध्ये व हिमालयाच्या पायथ्याला उगवल्याचे बघितले आहे, अशा नोंदी आढळतात. आज आपण या चमेलीच्या फुलाबद्दल माहिती बघितलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला चमेलीच्या फुलाबद्दल शास्त्रीय वर्गीकरण, अनेक मुद्दे, त्याचे उपयोग, चमेलीचे फुले सेवन केले असता होणारे फायदे, तेल बनवण्याची गरज आणि फायदे तसेच लागवडीबद्दल काही माहिती मिळालेली आहे.
FAQ
चमेलीचे फुले कोणत्या ठिकाणी उगवली जातात?
मित्रांनो मुख्यत्वे चमेली हे झुडूप समस्येतोष्णपट्ट्यामध्ये तग धरून राहते. मात्र उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय हवामान यामध्ये सुद्धा याची लागवड केलेली आढळून येते. केवळ थंड तापमानापासून संरक्षण केले की चमेलीची फुले कुठेही वाढू शकतात.
चमेलीच्या फुलांबाबत काय वैशिष्ट्ये आहेत?
चमेलीची फुले मोठ्या प्रमाणावर सुगंधासाठी ओळखली जातात. पिन व्हील आकारांमध्ये येणारी ही फुले मुख्यत्वे पांढऱ्या, पिवळ्या रंगांमध्ये असतात. मात्र काही वेळेस गुलाबी रंगांमध्ये देखील आढळून येतात.
चमेलीची फुले लोकप्रिय होण्यामागे काय कारण आहे?
मित्रांनो, चमेलीची फुले फुलल्यानंतर सायंकाळच्या वेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुगंध सोडत असतात, जो अतिशय सुरेख असतो. या सुगंधामुळे चमेलीच्या फुलांचा वापर साबण, सौंदर्यप्रसाधने किंवा अगरबत्ती इत्यादी गोष्टींमध्ये केला जातो.
भारतामध्ये चमेलीच्या फुलांच्या साधारणपणे किती प्रजाती आढळून येतात?
भारतामध्ये चमेलीच्या फुलांच्या साधारणपणे २०० पेक्षाही अधिक प्रजाती आढळून येतात.
चमेलीच्या फुलांचा रस बनवल्यास त्याची चव कशी असते?
चमेलीच्या फुलांचा रस बनवून पिल्यास त्याची चव तिखट प्रकारची लागते, मात्र असे असले तरी देखील हा रस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानला जातो.
आजच्या भागामध्ये आपणच चमेली अर्थातच जास्मिन या फुलाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला आवडली तर असेलच, मग विचार कसला करताय? लगेच आपल्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती पाठवा. आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट मध्ये कळवायला विसरू नका.
धन्यवाद….