Kite Bird Information In Marathi ‘घार उडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी’ ही ओळ तर आपल्यातील सर्वांनीच नक्की ऐकली असेल. मित्रांनो घर हा वजनाने हलका, मात्र तेवढाच बलाढ्य असलेला पक्षी आहे. घार हवेत उंच उडत असते, आणि लक्ष ठेवून जमिनीवरील शिकार करत असते. काही लोकांनी एवरेस्ट या हिमालयातील सर्वात उंच शिखरावर घार हा पक्षी उडत असल्याचा दावा केलेला आहे, मात्र यामध्ये किती तथ्य आहे हे सांगता येणार नाही.
घार पक्षाची संपूर्ण माहिती Kite Bird Information In Marathi
घार हा एक पक्षी असला तरी देखील तो शिकारी प्रजातीतील आहे. जगभरात घार या पक्षाच्या सुमारे वेगवेगळ्या २५ प्रजाती आढळतात. घार हा पक्षी जगभरातील अंटार्टिका सोडून सर्वच देशांमध्ये आढळून येतो. खास करून अमेरिकेचे सर्व टोक, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप, आणि आशिया इत्यादी ठिकाणी घार मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
आपला दिवसातील बराचसा वेळ आकाशात उडण्यात घालणाऱ्या या पक्षाचे पंख अतिशय मजबूत आणि विस्तीर्ण असतात. मात्र असे असूनही त्यांचे पाय थोडेसे कमकुवत असतात. म्हणूनच जमिनीवर त्यांना फारसे बघितले जात नाही.
पक्षाचे नाव | घार |
इंग्रजी नाव | काईट बर्ड |
कुटुंब | Accipitridae |
साधारण वस्तुमान | पाऊण ते दोन किलो |
साधारण लांबी | दीड ते दोन फूट |
इंग्रजी मध्ये काईट बर्ड या नावाने प्रसिद्ध असलेला घार हा अतिशय करडी नजर असलेला आणि आकारमानाने देखील मोठा असलेला पक्षी आहे. त्याच्या तुलनेत बाकीचे पक्षी लहान तर दिसतातच, मात्र त्याच्या इतके उंच देखील उडू शकत नाहीत. रंगाने हे पक्षी वेगवेगळे असतात. ज्यामध्ये काही पक्षी पांढरट, राखाडी, तपकिरी, काळे, पिवळसर तपकिरी, किंवा लालसर तपकिरी इत्यादी रंगांमध्ये आढळून येतात.
भारतामध्ये काळ्या रंगाची घार आढळून येते. भारतीय वंशाची असलेली ही प्रजाती शिकारीसाठी अत्यंत घातक समजली जाते. हा पक्षी जवळपास दिवसातला बराच वेळ आकाशात व्यतीत करते. हा पक्षी मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणेदेखील पसंत करतो. घार हा प्राणी बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास अतिशय समर्थ ठरला आहे.
वाढते शहरीकरण आणि प्रदूषण यामध्ये देखील घार या पक्षाने स्वतःला जुळवून घेतलेले आहे. त्यामुळे यांची संख्या फार काही कमी झालेली नाही. घारीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे घार ही अतिशय सूक्ष्म गोष्टी देखील आपल्या डोळ्यांच्या साहाय्याने अगदी सहजतेने बघू शकते.
ती १०० मीटर उंचीवर आकाशात उडत असताना देखील उंदीर आणि बेडकासारखे छोटेसे प्राणी देखील अचूकतेने टिपते. यावरून तिचे डोळे किती उत्कृष्ट असतील याची प्रचिती येते. तसेच अगदी लहान लहान मांसाचे तुकडे देखील ती सहजतेने बघू शकते.
घार प्राण्याबद्दल काही महत्त्वाची तथ्ये:
या सृष्टीमध्ये अनेक प्राणी, पक्षी, कीटक इत्यादी आढळतात. या प्रत्येकाची आपली काहीतरी खासियत असते. जी त्यांना इतरांपासून वेगळे करते.तसेच घार देखील इतर प्राण्यांपासून वेगळी असून, तिच्याबद्दलची काही आकर्षक तथ्ये आपण जाणून घेणार आहोत.
घार ही सगळ्यात उंच उडणारी पक्षांची प्रजाती आहे. घार अगदी १०० मीटर उंचीवर उडत असेल तरी देखील जमिनीवरील छोट्यात छोटा तुकडा किंवा शिकारही सहज बघू शकते.
घार आकाशात शिकारीच्या शोधात उडत असली तरी देखील जमिनीवर असलेल्या आपल्या पिलांकडे तिचे फार बारीक लक्ष असते. जेव्हा कोणी त्या पिलांच्या जवळ जाते तेव्हा ती क्षणार्धात खाली येते.
घार ही विषारी सापाला देखील हरवू शकते, आणि त्याची शिकार करून खाऊ शकते. काही लोकांच्या मते घार ही अगदी माऊंट एव्हरेस्टच्या उंचीवरही उडू शकते, मात्र याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.
घार आणि मानव यांच्यातील संबंध:
माणसाला बुद्धीचे वरदान मिळालेले असल्यामुळे माणूस हा विविध प्राण्या पक्षांना पाळण्यात यशस्वी झालेला आहे. असे असले तरी देखील मानवाने आजपर्यंत घार पाळलेली नाही. मात्र मानव आणि घार यांचा संबंध फार दूरचा देखील नाही.
घार हा प्राणी मानवाशी जुळून घेण्यात धन्यता मानतो. मानवाने केलेल्या प्रदूषणामुळे बदलत चाललेल्या हवामानाला जुळवून न घेतल्यामुळे अनेक मोठमोठ्या प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झालेल्या आहेत, मात्र घार या गोष्टीला अपवाद ठरते. घारीने आपल्या स्वतःमध्ये बदलत्या जीवनशैलीनुसार बदल करून घेत, आणि मानवाच्या आयुष्याला जुळवून घेत आपले आयुष्य सुखर केलेले आहे.
जगामध्ये घारीच्या अनेक प्रजाती आढळतात. तसेच अंटार्टिका हा खंड सोडता उर्वरित जगाच्या सर्वच ठिकाणी घार हा पक्षी आढळून येतो. त्यामुळे घार मानवाशी अत्यंत ओळखीचा झालेला असा पक्षी आहे.
घार हा शिकारी पक्षी असला तरी देखील त्याला आपल्या मादी सोबत जोडीने घरट्यामध्ये राहणे देखील पसंत पडते. ते दिवसभर आकाशात उडत असले तरी देखील संध्याकाळच्या वेळी ते विश्रांती घेतातच. मानवाप्रमाणेच घार या पक्षाच्या काही प्रजाती एकाच जोडीदारांसोबत संपूर्ण आयुष्य काढतात. मात्र अपवादात्मक काही पक्षी हे वेगवेगळ्या जोडीदारासोबत आपले पुनरुत्पादन करतात.
निष्कर्ष:
आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रत्येक प्राणी पक्षाकडून काहींना काहीतरी गुण हा घेतलाच पाहिजे असे म्हणतात. कुत्र्याकडून घ्यावा तो प्रामाणिकतेचा गुण, तसेच घारीकडून घ्यावा तो डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याचा आणि आपल्या पिलांसाठी किंवा आपल्या माणसांसाठी कुठल्याही परिस्थितीत सदैव तत्पर राहण्याचा गुण. घार हा एक शिकारी प्राणी असल्यामुळे तो नेहमी आकाशामध्ये उडत असतो, आणि आपल्या शिकारीवर लक्ष ठेवतो.
ज्यावेळी शिकार त्याच्या टप्प्यात येते त्यावेळेस तो अगदी डोळ्याची पापणी लवण्याच्या आधीच खाली येतो. आणि त्या शिकारीला उंच हवेत घेऊन जातो. जमिनीवरील प्राणी हवेत असाहाय्य झाल्यामुळे त्यांचे शिकार करणे घार या पक्षाला अतिशय सोपे जाते. घार हा पक्षी खूप मोठ्या सापांना देखील सहजासहजी मारून त्यांची शिकार करतो. त्यामुळे घार हा एक शिकारी आणि सर्वात उंच उडणारा पक्षी म्हणून ओळखला जातो.
FAQ
सामान्यपणे घार कोठे राहणे पसंत करते?
सामान्यपणे जिथे ताज्या पाण्यातील मासे आणि शिकार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असेल अशा ठिकाणी म्हणजेच नद्यांच्या काठी आणि झाडांनी भरपूर असलेल्या ठिकाणी घार पक्षी राहण्यास पसंती देतात.
घार हा पक्षी कोणते अन्न खातो?
घार हा अतिशय बहुविध प्रकारचा आहार घेणारा प्राणी असून ते मेलेल्या प्राण्यांचे मांस देखील खातात. तसेच उंदीर, ससे, कावळे, साप, कबूतर तसेच लहान प्राणी यांची शिकार करून देखील ते खातात. विशेषतः वसंत ऋतू मध्ये ते छोटे किडे आणि अळ्या खाण्यास देखील प्राधान्य देतात.
घार या पक्षाचे वैशिष्ट्ये काय सांगता येतील?
घार हा पक्षी सर्वात उंच उडणारा, शिकारी प्रकारचा, वजनाने हलका मात्र मजबूत पंखाचा पक्षी म्हणून वैशिष्ठिकृत आणि प्रसिद्ध आहे.
घार या पक्षाला इंग्रजी मध्ये आणि ब्रिटिश लष्करी भाषेत काय नाव आहे?
घाऱ या पक्षाला इंग्रजीमध्ये काईट बर्ड तर ब्रिटिश लष्करी भाषेमध्ये शाइट हॉक असे नाव आहे.
घार हा पक्षी पाळता येऊ शकतो का?
घार हा पक्षी जंगली आणि शिकारी आहे, त्यामुळे त्याला नेहमी मांस खायला लागते. जे रोज रोज उपलब्ध करून देणे शक्य होत नाही परिणामी घार पाळणे शक्य नाही.
आजच्या भागामध्ये आपण शिकारी पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घार या पक्षाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आमच्यापर्यंत तुम्ही कमेंटच्या माध्यमातून पोहोचवू शकता. तसेच ही माहिती आपल्या आप्तेष्टांना नक्कीच शेअर करा.
धन्यवाद…