लता मंगेशकर यांची संपूर्ण माहिती Lata Mangeshkar Information In Marathi

Lata Mangeshkar Information In Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या या प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो जेव्हा आपण खूप थकलेले असतो किंवा दिवसभराचे काम करून आपण घरी परततो तेव्हा एखादे सुंदर जुने गाणे आपल्या कानावर पडले की डोक्याला थोडे शांत वाटते. मन देखील थोडे हलके होते तर असेच आपले मन हलके करणाऱ्या अनेक गाण्यांच्या गायिका व रचित्या म्हणजेच स्वर कोकिळा लता मंगेशकर होय.

Lata Mangeshkar Information In Marathi

लता मंगेशकर यांची संपूर्ण माहिती Lata Mangeshkar Information In Marathi

संपूर्ण विश्वामध्ये सुप्रसिद्ध गायिका अशी ख्याती मिळवलेल्या लता मंगेशकर यांच्या आवाजाची किमया केवळ भारतावरच नव्हे तर विदेशातील नागरिकांवर देखील पसरलेली पहावयास मिळते .

असे म्हणणे गैर ठरणार नाही की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे यांचे अस्तित्व आहे तोपर्यंत लता मंगेशकर यांच्या आवाजाचे श्रोते हे पृथ्वीवर राहणार आहेत. जे यशाचे शिखर लता मंगेशकर यांच्या आवाजाने गाठले आहे ते बहुतेक पुढच्या काळात कोणीच करू शकणार नाही .अशी अलौकिक संगीत क्षेत्रातील पदवी त्यांनी धारण केलेली आहे. तर अशाच या गानकोकिळेबद्दल या लेखात आपण माहिती पाहणार आहोत.

त्यांच्या आवाजावरील संशोधन-

लता मंगेशकर यांच्या आवाजावर देखील अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले होते. त्यांच्या कंठाचा अभ्यास अनेक जीवशास्त्रज्ञांनी देखील केलेला होता. अमेरिकेतील वैज्ञानिकांचे असे म्हणणे होते की त्यांच्या आवाजा इतका सुरेल होता की असा आवाज यापूर्वी  पृथ्वीतलावर नव्हता व येणाऱ्या काळात देखील नसेल. यावरून त्यांच्या आवाजाची किमया तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल.

लता मंगेशकर यांची कारकीर्द-

त्या एक उत्तम पार्श्वगायिका व संगीतकार म्हणून सर्व दूर प्रचलित आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय सिनेसृष्टीला लता मंगेशकर यांनी आपला मधुर आवाज दिलेला आहे. 1942 रोजी जेव्हा लता मंगेशकर अवघ्या 13 वर्षांच्या होत्या तेव्हापासून त्यांनी सिनेमांमध्ये गाणी गाण्यास सुरुवात केली.

आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत लता मंगेशकर यांनी हजार पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये व 36 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये गाणी देखील गायलेली आहेत. अनेक विदेशी भाषांमध्ये देखील लतादीदींनी गायन केलेले आहे. त्यांची सर्वाधिक गाणी ही हिंदी व मराठी भाषेतील आहेत.

संपूर्ण विश्वामध्ये सर्वाधिक गाणे रेकॉर्ड करणाऱ्या म्युझिक आर्टिस्ट म्हणून देखील लतादीदींची ओळख आहे. एका कार्यक्रमा वेळी जेव्हा लतादीदींनी ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी हे गाणं गायलं तेव्हा मंचावर उपस्थित पंतप्रधानांसहित म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूं समवेत सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते.

लता मंगेशकर यांनी भारतासाठी संगीत क्षेत्रामध्ये दिलेल्या अभूतपूर्व योगदान करिता त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेले आहे .संगीतकार एमएस सुबूलक्ष्मी यांच्यानंतर लता मंगेशकर या एकमेव अशा गायिका आहेत ज्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.

त्यांच्या जीवनासंबंधी काही माहिती –

त्यांचे पूर्ण नाव लता दीनानाथ मंगेशकर असे होते. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1939 रोजी यूपीतील इंदोर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर तर आईचे नाव शेवंती मंगेशकर असे होते. त्यांच्या बहिणींची नाव आशा भोसले, उषा मंगेशकर ,मीना मंगेशकर, अशी होती . त्यांना एक भाऊ सुद्धा होता ज्याचे नाव हृदयनाथ मंगेशकर असे आहे. लता मंगेशकर या कायम अविवाहितच राहिल्या.

 लता मंगेशकर यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे एक शास्त्रीय गायक असून एक थिएटर कलावंत देखील होते ,त्यामुळे लतादीदी यांना संगीत क्षेत्रातील बाल कडू हे आपल्या घरातूनच मिळाले होते .लता मंगेशकर यांचे मूळ आडनाव हड्डीकर असे होते परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांचे आडनाव बदलले व मंगेशकर असे नाव ठेवले .त्यांच्या जन्मानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब हे महाराष्ट्रातच स्थलांतरित झाले.

लता दीदी यांना घरात सर्वजण हेमा या नावाने हाक मारत असे परंतु त्यांच्या वडिलांनी भावबंधन हे नाटक पाहिले व त्यानंतर प्रभावित होऊन त्यांनी हेमा हे नाव बदलून लता हे नाव ठेवले .भावंडांमध्ये लतादीदी या सर्वात मोठ्या होत्या .बालपणापासूनच कानावर सूर पडत होते त्यामुळे त्यांनाही गायनाची आवड लहानपणापासूनच होती .त्यांनी गाण्याचे धडे आपल्या वडिलांकडूनच गिरवायला सुरुवात केली. आपल्या वडिलांसमवेत आपल्या भावंडांना घेऊन लतादीदी शास्त्रीय संगीत शिकत असे.

 पाच वर्षांच्या असतानाच आपल्या वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये अभिनय देखील केलेला आहे .गायनाची आवड असल्याने लहानपणापासूनच लतादीदींनी शास्त्रीय संगीताचे धडे आपले शिक्षक उस्ताद अमानत खान, बडे गुलाम अली खान, पंडित तुलसीदास शर्मा ,यांच्याकडून घेण्यास सुरुवात केली होती.

 वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी ही लता मंगेशकर यांच्याच खांद्यावर आली. लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता .त्यावेळी लतादीदी या केवळ 13 वर्षांच्या होत्या.  लतादीदी सगळ्यात मोठ्या असल्याने सगळ्या भावंडांची जबाबदारी त्यांच्यावरच आली. त्यामुळे तेरा वर्षांच्या असतानाच लतादीदींनी कामाला सुरुवात केली.

गायन क्षेत्रातील वाटचालीस सुरुवात- 13 वर्षांच्या असतानाच लतादीदींनी हिंदी सिनेमांना आपला आवाज देण्यास सुरुवात केली. आता दीदींनी आपले पहिले गाणे 1942 रोजी एका मराठी चित्रपटात गायले होते किती हसाल या चित्रपटाकरिता “नाचू या ना गडे खेळू सारी मनी हौस भारी” हे गाणे त्यांनी गायले होते.

 या गीताला सदाशिवराव नेवरेकर यांनी संगीतबद्ध केलेले होते पण काही कारणास्तव चित्रपटाच्या एडिटिंग दरम्यान या गाण्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर नवयुग फिल्म कंपनी चे सर्वेसर्वा व लतादीदी यांच्या वडिलांचे खास मित्र मास्टर विनायक यांनी त्यांच्या परिवारास सावरण्यासाठी व वडिलांच्या मृत्यू पश्चात लतादीदींना मदत करण्यासाठी त्यांना खूप सहाय्य केले .

मास्टर विनायक यांनी सन 1942 रोजी मराठी चित्रपट” पहिली मंगळागौर” या चित्रपटामध्ये लतादीदींना एक छोटीशी भूमिका दिली व त्यात त्यांनी एक गाणे देखील गायलेले होते. असेच छोटे-मोठे काम करत असताना 1945 रोजी मास्टर विनायक कंपनी यांच्यासोबत लतादीदी यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला व तेथूनच त्यांची संगीत क्षेत्रातील उज्वल कारकीर्द सुरू झाली.

तेथे त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली .लता दीदींना सुरुवातीला अनेक अवहेलनांना सामोरे जावे लागले त्यांच्या आवाजाला कर्कश्य असे म्हणून अनेक जणांनी त्यांचा आवाज नाकारला होता. तेवढ्यातच 1948 रोजी मास्टर विनायक या त्यांच्या आधार वडाचे निधन झाले व या मुंबई शहरात लतादीदी या एकाकी पडल्या .

त्यामुळे त्यांचा सुरुवातीचा काळ हा अत्यंत संघर्षमय वातावरणात गेला. मास्टर विनायक यांच्या निधनानंतर गुलाम हैदर यांनी लतादीदींना खूप मदत केली त्यानंतर लतादीदींना खरी ओळख मिळाली ती 1948 रोजी “मजदूर” या चित्रपटात गायलेल्या “दिल मेरा तोडा मुझे कही काना छोडा” या गाण्यासाठी मिळाली.

त्यानंतर 1949 रोजी महल या चित्रपटासाठी लतादीदींनी त्यांचे पहिले सुपरहिट गाणे “आयेगा आयेगा आयेगा आनेवाला” हे गीत गायले .या गाण्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली व अनेक मोठमोठ्या गीतकारांच्या नजरेत लतादीदींनी आपले स्थान मिळवले.

1950 रोजी सुप्रसिद्ध संगीतकार अनिल विश्वास, शंकर जयकिसन ,एस डी बर्मन, सलील चौधरी, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी यांच्यासोबत गाण्याची संधी लतादीदींना मिळाली. अनेक संघर्षमय प्रवासातून लतादीदींच्या आयुष्यातील एक सुखद वळण मिळाले ते ज्यावेळी त्यांनी संगीतकार सलील चौधरी यांच्या मधुमती या चित्रपटातील एक गीत म्हणजे “आजा रे परदेसी” हे गायले व या गाण्याला सर्वोत्कृष्ट फीमेल प्लेबॅक सिंगर या पुरस्काराने फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये  गौरविण्यात आले. तेव्हा पासून ते आज पर्यंत लतादीदी यांच्या गाण्याची जादू ही संपूर्ण भारतावर व परदेशात देखील आहे.

पुरस्कार –

लता दीदी यांना आपल्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीसाठी अनेक राष्ट्रीय मानसन्मान देऊन गौरविण्यात आलेले आहे .ज्यामध्ये भारताचे सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री व भारतरत्न यांचा देखील समावेश होतो. त्याचबरोबर 1958 1960 1965 व 1969 रोजी लतादीदी यांना फिल्मफेअर अवॉर्ड ने देखील गौरविण्यात आलेले आहे .

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे देखील लता दीदी यांना विशेष सन्मान देण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकार मार्फत त्यांच्या नावाने दरवर्षी एक लाखाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 1989 रोजी लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील गौरविण्यात आलेले होते .खालील पुरस्कारांची यादी ही त्यांच्या नावे आहे-

 नॅशनल फिल्म अवॉर्ड 1972 -1974 व 1990 पद्मभूषण

 1969 संपूर्ण विश्वामध्ये सर्वात जास्त गाणे रेकॉर्ड केल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 1974 मध्ये त्यांची नोंद झाली आहे.

 दादासाहेब फाळके पुरस्कार 1989 ,फिल्म फेर लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड 1993, स्क्रीन लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड 1996. राजीव गांधी पुरस्कार 1997.

 1999 चा पद्मविभूषण,  नूर जहान पुरस्कार 2001 .महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2001 तसेच भारताच्या साठाव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लतादीदी यांना वन टाइम अवॉर्ड फॉर लाईफ टाईम अचीवमेंट देऊन 2008  गौरविण्यात आले होते

. लतादीदींच्या आवाजात इतकी ताकद होती की त्यांचा आवाज ऐकून ऐकनार्यांच्या डोळ्यात अश्रू तरळे तर कधी कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना हिम्मत मिळाली.

भारतरत्न लतादीदी यांनी 92 व्या वर्षी मुंबई येथील रुग्णालयामध्ये 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांनी सकाळी आपला शेवटचा श्वास घेतला. वृद्धापकाळमुळे व दीर्घ आजारामुळे लता मंगेशकर यांचे निधन झाले .अशा या भारताच्या सुंदर मुकुटामध्ये मानाचा तुरा रोवणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका गान कोकिळा लता मंगेशकर यांना मानाचा मुजरा .तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा .

धन्यवाद!!!!

FAQ

1. लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी किती?

लताताई एक हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली आहेत. छत्तीसहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषा आणि परदेशी भाषांमधून गायन करण्याचे श्रेयही त्यांच्याकडे आहे. लता मंगेशकर या गायिका आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि मीना मंगेशकर यांच्या मोठ्या भगिनी आहेत.

2. लता मंगेशकर यांचे पूर्ण नाव काय होते?

इस क्वीनचे पूर्ण नाव कुमारी लत दीनानाथ मंगेशकर होते.

3. भारताची गानसम्राज्ञी कोण?

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा सुरेल आयुष्यपट!

4. लता मंगेशकर कोण आहेत इतिहास?

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे झाला आणि त्या बॉलीवूडच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय पार्श्वगायिका बनल्या. तिने नर्गिस ते प्रीती जी झिंटा या अभिनेत्रींसाठी 50 वर्षांहून अधिक काळ गायले, तसेच सर्व प्रकारचे (गझल, पॉप इ.) रेकॉर्ड केलेले अल्बम.

5. लता मंगेशकरांना कोणत्या गुणाने इतके यश मिळवून दिले?

तिचा संयम, विश्वास आणि तिच्या प्रतिभेवरचा आत्मविश्वास यामुळे तिचा यशाचा मार्ग मोकळा झाला. लताजींनी त्यांच्या मुलाखतींमध्ये अनेकदा सांगितले की त्या एक प्रतिभाशाली गायिका होत्या. एक व्यक्ती म्हणून, ती तिच्या जन्मजात संगीत प्रतिभेबद्दल कृतज्ञ होती, तरीही तिने तिचे कौशल्य सुधारण्याचे आणि सुधारण्याचे प्रयत्न चालू ठेवले.

Leave a Comment