महाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra State Information In Marathi

Maharashtra State Information In Marathi महाराष्ट्र राज्य हे तिथल्या संस्कृती आणि रूढी परंपरांसाठी ओळखले जाते. महाराष्ट्र हे राज्य भारत या देशाच्या दक्षिण मध्य प्रदेशामध्ये आहे तसेच महाराष्ट्र हे अनेक पर्वत तसेच समुद्रकिनारे व वैशिष्ट्यपूर्ण जमिनीचे व्यापलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक जंगल, प्राणी संग्रहालय, किल्ले पाहायला मिळतात. जेथे अनेक पर्यटक देश-विदेशातून येत असतात असा हा प्रदीर्घ महाराष्ट्र देशाचा गौरवशाली इतिहास आहे.

Maharashtra State Information In Marathi

महाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra State Information In Marathi

भारतामधील सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक शहर म्हणजे मुंबई जे महाराष्ट्रामध्ये समाविष्ट आहे. भारतातील सर्वात मोठे शहर आणि देशाचे आर्थिक केंद्र सुद्धा आहे.

देशाची राजधानी म्हणून काम करते. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की, महाराष्ट्र हे नाव कुठून आले तर महा हा संस्कृत शब्द आहे आणि जे राष्ट्रकूट राजवंशातून आले आहे. जे मोठे राष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र असे त्याचे नाव पडले आहे. महाराष्ट्र या राज्याचे क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. आपण महाराष्ट्र या राज्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

महाराष्ट्राची भौगोलिक रचना :

महाराष्ट्र राज्याचा आपण अक्षवृत्तीय विस्तार पाहिला तर तो 15 अंश 44 मिनिटे उत्तर ते 22 अंश सहा मिनिटे उत्तर अक्षांश असा आहे. तसेच आपण रेखावृत्तीय विस्तार पाहिला तर तो 72° 36 मिनिटे पूर्व ते 80 अंश 54 मिनिटे पूर्व रेखांश असा आहे. महाराष्ट्राची पूर्व ते पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर असून उत्तर दक्षिण लांबी ही 720 किलोमीटर एवढी आहे.

भारतामध्ये महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा तिसरा क्रमांक लागतो व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र हे राज्य भारतातील सर्वात विकसनशील राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याला गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि दादरा नगर हवेली यांच्या सीमा जोडलेल्या आहेत तसेच महाराष्ट्र या राज्याला 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी ही अरबी समुद्राची आहे. महाराष्ट्रामध्ये 11 कोटी लोकसंख्या आहे.

महाराष्ट्र राज्याचा इतिहास :

आपण महाराष्ट्र राज्याचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये रामायण, महाभारत याविषयीचे प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा उल्लेख केलेला आहे तसेच त्या ग्रंथांमध्ये उल्लेख केलेले स्थळे आजही आपण पाहू शकतो. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दलची माहिती आपल्याला मिळते.

एवढा जुना महाराष्ट्र राज्याचा इतिहास आहे. येथील सांस्कृतिक, सामाजिक इतिहासाविषयी आपण बोललो तर त्यामध्ये बरेचसे समानता आपल्याला दिसते. येथे जनपद, मगद, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरी, यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम आणि ब्रिटिश लोक इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या अनेक प्रदेशांवर राज्य केले होते.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती :

महाराष्ट्र या राज्याची निर्मिती ही 1 मे 1960 रोजी करण्यात आली होती. त्यामध्ये एकूण सहा विभागाची रचना करण्यात आली होती. त्यामध्ये कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आजही आपल्याला हे विभाग पाहायला मिळतात. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर अनेक प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्यामध्ये भारत सरकारने निर्णय घेतला. तेव्हा मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस त्यांनी नकार दिला होता.

केंद्राच्या या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने खूप आंदोलने केले. 105 व्यक्तींनी यामध्ये आपल्या प्राणाचे बलिदान सुद्धा दिले. परंतु केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, साहेब साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी नायकांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले आणि मराठा या पत्रामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली व 1 मे 1960 ला महाराष्ट्राचे भौगोलिक विभाग देण्यात आले.

महाराष्ट्र राज्याची भाषा :

महाराष्ट्र राज्याची मुख्य भाषा ही मराठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बऱ्याच प्रमाणात मराठी ही भाषा बोलली जाते. त्याचप्रमाणे काही शहरात इंग्रजी भाषा सुद्धा बोलली जाते. वायव्य महाराष्ट्रात अहिराणी भाषा तर दक्षिण आणि कोकणामध्ये कोकणी, मालवणी, गोंडी अशा प्रकारची भाषा बोलली जाते आणि विदर्भामध्ये वऱ्हाडी आणि झाडीबोली या भाषा बोलल्या जातात.

महाराष्ट्र राज्यात साजरे होणारे सण :

महाराष्ट्र या राज्यांमध्ये अनेक जण उत्सव साजरा केले जातात तसेच हे सण उत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने लोक साजरे करतात. त्यामध्ये गुढीपाडवा, दिवाळी, होळी, रंगपंचमी, अक्षय तृतीया, रामनवमी, हनुमान जयंती, गणेश उत्सव, नवरात्री, नारळी पौर्णिमा दसरा, महावीर जयंती, गोकुळाष्टमी, मोरम, बकरी ईद तसेच हे सण साजरे करण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्या सुद्धा दिल्या जातात.

महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध मंदिरे व पर्यटन :

महाराष्ट्र या राज्यांमध्ये अनेक मंदिरे आहेत. जी खूप जुनी आहेत, मंदिरांची शिल्पकला अतिशय अप्रतिम आहे. मंदिरावर हिंदू बौद्ध व जैन संस्कृतीचा वारसा आपल्याला पाहायला मिळतो. धार्मिक स्थळांमध्ये मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, कपालेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, त्रंबकेश्वर मंदिर इत्यादी प्रसिद्ध आहे तसेच औरंगाबाद जवळ असलेल्या अजिंठा वेरूळची लेणी तर जगप्रसिद्ध आहेत.

मुघल शिल्पशैलीची झलक म्हणजे औरंगाबाद येथील बीबी का मकबरा आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र मध्ये अनेक दुर्ग व किल्ले आहेत जसे प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, दौलताबाद इ. आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत व व्यक्ती :

महाराष्ट्र राज्याला संतांचे राष्ट्र म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रामध्ये अनेक थोर संत व नेते होऊन गेले आहेत. यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया

संत तुकाराम महाराज : संत तुकाराम महाराज हे भक्तिमार्गाच्या वैष्णो पंथाचे उपासक होते. तसेच त्यांनी पंढरपूरचे श्री विठ्ठल यांना समर्पित असे भजन कीर्तन केले आहे. त्यांनी कीर्तनाद्वारे भगवंताशी नाते जोडले आणि समाजामध्ये भक्तीचा संदेश पोहोचविला. त्यांनी समाजातील भक्ती जागृत केली.

लोकांच्या मनाला त्यांनी बळकट केले तसेच त्यांनी सतराव्या शतकामध्ये समाजाची चेतना आणि अस्मिता जागृत करण्याचे काम केले. त्यांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यासारखा महापुरुष उदयास आला, ज्याने स्वराज्यातील स्वप्न पूर्ण केले.

संत नामदेव महाराज : संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत होते तसेच ते वारकरी संप्रदायातील वैष्णव पंथाचे वारकरी होते. त्यांनी शीख धर्माचा पवित्र ग्रंथ ग्रंथसाहेब याचा अभ्यास केला आणि त्यांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर अनेक राज्यांमध्ये देवाची भक्ती पसरविले तसेच त्यांनी या भक्तिमार्गाचा अवलंब करून समाजातील लोकांच्या मनात भक्ती मार्ग जागृत केला.

संत एकनाथ महाराज : संत एकनाथ महाराज हे मूड महाराष्ट्राचे होते, त्यांनी भक्तिमार्गामध्ये येऊन पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची भक्ती पूर्णपणे केली. त्यांचे कीर्तन भारुड आजही खूप प्रसिद्ध आहेत, त्यांनी हरिभक्तीचा विस्तार केला.

रामदास स्वामी : महाराष्ट्रात जन्माला आलेले थोर संत होऊन गेले आहेत. जे प्रभू श्रीराम यांची भक्ती करत होते तसेच त्यांचा प्रभू श्रीरामचंद्राच्या भक्तींवर खूप दृढ विश्वास होता, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये हनुमानाची अनेक मंदिरे सुद्धा उभारली तसेच त्यांनी त्या काळामध्ये अनेक आरत्या, स्तोत्रे म्हटले आणि देवाशी आपले अलौकिक नाते निर्माण करण्याचा जनसामान्यांना सल्ला दिला.

महाराष्ट्रामध्ये अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती होऊन गेलेले आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, लोकमान्य टिळक, सचिन तेंडुलकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय भटकर, दादासाहेब फाळके, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई इ.

FAQ

महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली?

1 मे 1960 रोजी.

महाराष्ट्र या राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?

3,08,713 चौरस किलोमीटर आहे.

महाराष्ट्र राज्यांना किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?

720 किलोमीटर.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे?

एकनाथ शिंदे.

महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

शेकरू

Leave a Comment