एमएचटी सीइटी परीक्षेची संपूर्ण माहिती MHT CET Exam Information In Marathi

MHT CET Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञानाच्या या प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे .मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण एमएचटी सीइटी परीक्षा म्हणजे नक्की काय याबद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत.

मित्रांनो बारावीनंतर विविध शाखांमध्ये प्रवेश घेणे सुलभ व सोपे व्हावे व यात कुठलाही काळाबाजार होऊ नये. याकरिता महाराष्ट्र शासना अंतर्गत बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा घेण्यात येते. अर्थातच इंजीनियरिंग, एग्रीकल्चर, फार्मसी, अशा अनेक क्षेत्रांकरिता एमएचटी-सीईटी ही परीक्षा प्रमुख घटक प्रवेशासाठीचा मानला जात असते. तर मित्रांनो या परीक्षेसाठीची पात्रता या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम तसेच सीईटी परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा यांसारखे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर या लेखांमध्ये आपण याबद्दलच माहिती पाहणार आहोत…

MHT CET Exam Information In Marathi

एमएचटी सीइटी परीक्षेची संपूर्ण माहिती MHT CET Exam Information In Marathi

MHT CET चा संक्षिप्त अर्थ एमएच टी सीइटी चा संक्षिप्त अर्थ म्हणजेच महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट असा होतो .बारावीनंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्स साठी ऍडमिशन घेण्याकरिता महाराष्ट्र शासनांतर्गत राबवली जाणारी प्रवेश परीक्षा अर्थातच एमएचटी-सीईटी होय .या परीक्षेकरिता मुख्य पात्रता म्हणजे इंडियन नॅशनॅलिटी असलेल्या विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा देणे. ही पहिली अट शासनाकडून ठेवण्यात आलेली आहे. या परीक्षेकरिता कोणतीही वयोमर्यादा दिलेली नाही. बारावी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, व मॅथेमॅटिक्स हे विषय असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी पात्र ग्राह्य धरले जाल.

परीक्षेचा अभ्यासक्रम –

ही परीक्षा दोन प्रकारांमध्ये घेतली जाते अर्थातच दोन गटांमध्ये घेतली जाते. एक गट म्हणजेच पीसीएम ग्रुप फिजिक्स केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स व दुसरा गट म्हणजे पीसीबी ग्रुप म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री व बायोलॉजी.

जर तुम्ही पीसीएम या गटातून परीक्षा देत असाल तर तुम्ही खालील कोर्सेस साठी अर्ज भरू शकता.

 • NDA
 • Engineering
 • B.tech
 • BE
 • BBA
 • BCS
 • BCA
 • Hotel management
 • Indian army
 • B arch इत्यादी.

जर तुम्ही पीसीबी या गटामधून सीईटी परीक्षा देत असाल तर तुम्ही खालील कोर्सेस साठी अर्ज भरू शकता.

 • D.ED
 • Bsc biotechnology
 • B pharmacy
 • Bsc diary technology
 • Bsc biotechnology
 • Bsc agriculture, forestry, horticulture,fishery.

परीक्षेची काठिण्यता-

अकरावी बारावी साठी जो फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटीकस व बायोलॉजी या विषयांसाठी जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम सीईटी या परीक्षेसाठी असतो. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या प्रकारची असून काठिण्य पातळी थोडी कठीण असते. त्यामुळे विद्यार्थी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अगदी अकरावीपासूनच या परीक्षेची तयारी करत असतात.

सीईटी या परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा?

 एमएचटी सीइटी च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन cetcell.mahacet.org फॉर्म लिंक वरती क्लिक करावे त्यानंतर न्यू कँडिडेट रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडून आपल्या कॉम्प्युटर्स स्क्रीनवर जो एप्लीकेशन फॉर्म असेल त्यामध्ये संपूर्ण माहिती ही योग्यरीत्या भरून हा फॉर्म सबमिट करणे गरजेचे आहे. याच बरोबर परीक्षेसाठी लागणारा शुल्क देखील ऑनलाइन स्वरूपातच भरणे गरजेचे आहे.

फॉर्म भरण्यासाठी लागणारा शुल्क हा प्रत्येक प्रवर्गासाठी वेगळा असतो. पीसीएम या गटाकरिता जर खुल्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज भरत असाल तर 800 रुपये शुल्क भरावा लागतो. व पीसीएम या गटातून कुठल्याही कॅटेगरी अंतर्गत तुम्ही अर्ज भरत असाल तर शुल्क हा 600 रुपये इतका असतो. पीसीबी या गटातून तुम्ही अर्ज भरत असाल व खुल्या प्रवर्गातून अर्ज असेल तर 800 रुपये व इतर मागासवर्ग व अनुसूचित जाती जमातींसाठी 600 रुपये शुल्क आहे.

या परीक्षेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे-

 •  दहावी बारावीची गुणपत्रिका जन्मदाखला
 •  जातीचा दाखला
 • डोमासाईल सर्टिफिकेट
 • जर डोमासाईल सर्टिफिकेट उपलब्ध असेल तर जन्म दाखला आवश्यक नसतो
 • फोटो व सही स्कॅन केलेली असावी परीक्षा शुल्क भरण्यासाठी विशिष्ट बँक खात्याची माहिती देणे अनिवार्य आहे.

परीक्षेचे स्वरूप-

 अभियांत्रिकी या शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व गणित या विषयांमधून परीक्षा देणे गरजेचे असते .तसेच वैद्यकीय शाखांमधील प्रवेशासाठी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयातून परीक्षा देणे गरजेचे असते.

निगेटिव्ह मार्किंग ची पद्धत या परीक्षेसाठी लागू नसते.

 200 गुणांची ही एकूण परीक्षा असून त्यामधील शंभर गुण भौतिकशास्त्र व रसायन शास्त्र या विषयांचे असतात. तर 50 टक्के गुण हे गणित व जीवशास्त्र या गटाला असतात. एकूण 180 मिनिटांचा हा पेपर असतो.

तर मित्रांनो आता आपण बारावीनंतर विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठीची सीईटी याबद्दल माहिती पाहिली. आता आपण बीएड, एमबीए या क्षेत्रांसाठी ज्या सीईटी परीक्षा घेतल्या जातात त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

 मित्रांनो पदवीनंतर एमबीए ला प्रवेश घेण्यासाठी जी प्रवेश परीक्षा राबवली जाते त्याला एमबीए सीईटी या नावाने ओळखले जाते. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण महामंडळाकडून घेतली जाते. यात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे मिळालेल्या गुणांच्या क्रमवारीनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतात यासाठीची पात्रता म्हणजे सीईटी परीक्षा देणारा उमेदवार हा आपले पदवी शिक्षण 50% गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा.

जर तो उमेदवार मागासवर्गीय असेल तर 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. या परीक्षेसाठी वयोमर्यादा ही 21 वर्ष इतकी ठेवलेली आहे. हा पेपर एकूण दोन तासांचा असून यामध्ये 200 प्रश्न असतात .निगेटिव्ह मार्किंग ची पद्धत या परीक्षेमध्ये वापरली जाते. लॉजिकल रीजनिंग या विषयासाठी 75 गुण व अबसट्रॅक्ट रीजनिंग यासाठी 25 गुण ,

quantitative aptitude या विषयासाठी 50 गुण ,वरबल अबिलिटी व रीडिंग कॉम्प्रिएशन verbal ability and reading comprehension यासाठी 50 गुण असतात.

महाराष्ट्र बीएड सीईटी महाराष्ट्र शासना अंतर्गत बॅचलर्स पदवी मिळवल्यानंतर बीएड या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी ची ही सीईटी आहे .जे विद्यार्थी बीए बी कॉम व बीएससी या क्षेत्रातून आपले पदवी शिक्षण पूर्ण करून शिक्षक बनू इच्छितात त्यासाठी बीएड या क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश परीक्षा राबवली जाते.

हा पेपर एकूण 90 मिनिटांचा असून 100 गुणांची ही परीक्षा असते .प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपाचे असतात .या परीक्षेसाठी खालील विषयांकरिता पेपर घेतला जातो. मानसिक क्षमता या विषयासाठी 40 प्रश्न असून प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण दिला जातो. या विषयांमध्ये पुढील विषयांचा समावेश होत असतो.

 त्यामध्ये सामान्य ज्ञान या संदर्भात 30 प्रश्न विचारले जातात.

 शिक्षक योग्यता या विषयातून 30 प्रश्न विचारले जातात.

तर मित्रांनो प्रवेश परीक्षा अर्थातच सीईटी परीक्षेबद्दल आपण जी संक्षिप्त माहिती पाहिली ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा..

 धन्यवाद!!!!!!!

FAQ

1. MHT CET परीक्षा म्हणजे काय?

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET), ही एक राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे जी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्जदारांची निवड करण्यासाठी वापरली जाते.

2. MHT CET साठी किती टक्केवारी आवश्यक आहे?

MHT-CET परीक्षेसाठी अर्ज करण्यास सक्षम होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण मिळवलेले असावेत. तर, राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 40% आवश्यक आहे

3. MH CET परीक्षेचा अर्थ काय?

मएचटी सीईटी (किंवा महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट ) ही एक सामान्य राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे जी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र सरकारद्वारे दरवर्षी पदवीपूर्व अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम जसे की बी. टेक/बीई, फार्मा डी यांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. आणि बी.

4.पहिली MHT CET परीक्षा कधी झाली?

एप्रिल 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या धक्कादायक निर्णयानंतर जून 2004 मध्ये महाराष्ट्र राज्यात 50 दिवसांच्या आत एमएचटी-सीईटी प्रथम घाईघाईने सुरू करण्यात आली होती. एमएचटी-सीईटीच्या प्रारंभाने 2005-2013 पासून अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी बारावी बोर्डांना दिलेले महत्त्व बदलले.

5. MHT CET मध्ये OBC साठी पात्रता गुण किती आहेत?

सामान्य श्रेणीतील उमेदवारांनी त्यांच्या 12वीमध्ये किमान 50% एकूण गुण मिळवणे आवश्यक आहे. तर SC/ST/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी, MHT CET साठी पात्र होण्यासाठी किमान गुण 45% आहेत.

Leave a Comment