Mustard Oil Information In Marathi आजकाल प्रत्येकजण आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त झालेला आहे. आणि डॉक्टर कडे गेले की या सगळ्या समस्यांचे एक मूळ कारण लक्षात येते ते म्हणजे कमी दर्जाच्या तेलाचे सेवन करणे होय. मित्रांनो आजकाल कुठलेही तेल भेसळ विरहित मिळणे अगदी मुश्किल झालेले आहे. त्यामुळे अनेक जण घाण्याच्या तेलाचा वापर करण्यास प्राधान्य देतात.
मोहरी तेलाची संपूर्ण माहिती Mustard Oil Information In Marathi
अशाच एका तेलाचा प्रकार म्हणजे मोहरीचे तेल होय. इतर प्रकारच्या तेलांपेक्षा बऱ्याच प्रमाणात आरोग्यदायी असणारे हे तेल महाग देखील आहे. त्यामुळे मोजकेच लोक याचा वापर करत असतात. उत्तर भारतामध्ये अगदी हजार वर्षांपासून मोहरीच्या तेलाचा खाद्यपदार्थांमध्ये वापर केला जात आहे. मात्र अलीकडच्या काळात त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे लक्षात येत आहेत. स्वयंपाकासाठी वापर होत असला तरी देखील बरोबरीने इतरही अनेक उपयोगामध्ये हे मोहरीचे तेल वापरले जाते.
किरकोळ स्वरूपाच्या आजारांवर मात करण्यापासून ते मोठ्या आरोग्याच्या समस्या दूर करणे इथपर्यंत अनेक ठिकाणी या मोहरीच्या तेलाचा वापर होतो. मात्र केवळ मोहरीच्या तेलाने सर्व काही ठीक होईल अशी भाबडी आशा बाळगणे देखील चुकीचेच आहे. या तेलाचे सेवन करणे चांगले असले तरीदेखील यासाठी आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.
आजच्या भागामध्ये आपण आरोग्यदायी असणाऱ्या या मोहरी तेला बद्दल माहिती घेणार आहोत…
नाव | मोहरी तेल |
इंग्रजी नाव | मस्टर्ड ऑइल |
प्रकार | खाद्यतेल |
रंग | पिवळसर सोनेरी |
वापर | स्वयंपाक बनवणे |
इतर वापर | रोगाच्या इलाजकरिता औषध म्हणून वापर |
मोहरीचे तेल म्हणजे काय:
मोहरीचे तेल हे मोहरी नावाच्या वनस्पती पासून मिळणाऱ्या बियांपासून काढले जाते. त्याचे शास्त्रीय नाव ब्रासिका जुनसिया असे आहे. या मोहरी तेलाला मराठी मध्ये मोहरी म्हणत असले तरीदेखील इतर भाषांमध्ये वेगवेगळे नाव आहे. ज्यामध्ये सरसो का तेल हे नाव सर्वात प्रसिद्ध आहे. अन्य नावांमध्ये अवन्यून, कडूगेना, मस्टर्ड इत्यादी नावांचा समावेश होतो.
मोहरी वनस्पतीच्या बिया या रंगाने तपकिरी किंवा पिवळ्या असतात. त्यांच्यापासून यंत्राच्या साहाय्याने तेल मिळवले जाते. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मोहरीचे तेल काढण्याचे उद्योग एकवटलेले आहेत, या तेलामुळे जेवणाची चव खूप पटीने वाढते याशिवाय जेवण आरोग्यदायी देखील बनते.
मोहरी तेलाचा प्रभाव:
मोहरीच्या तेलामध्ये तापमान वाढ हा गुणधर्म आढळून येतो. ज्यामुळे सर्दी किंवा खोकला यांसारख्या आजारावर मोहरीचे तेल खूपच फायदेशीर ठरते. हे तेल थोड्याशा घर्षणाने ही गरम होत असल्यामुळे मालिश करण्याकरिता या तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र असे असले तरी देखील उन्हाळ्याच्या दिवसात हे तेल मोठ्या प्रमाणावर न वापरण्याचा सल्ला दिला जातो.
मोहरीच्या तेलाचे विविध प्रकार:
मोहरीच्या तेलाचे दर्जा अनुसार वेगवेगळे प्रकार पडतात. हे तेल ऑटोमॅटिक यंत्राद्वारे काढलेले आहे की लाकडी घाण्यापासून, त्याची चव कशी आहे, तसेच ते रिफाइंड केलेले आहे का? यानुसार त्याचे विविध प्रकार पडतात. यामध्ये ग्रेड वन आणि ग्रेड टू या प्रकारांचा समावेश होतो.
ग्रेड वन प्रकारालाच कच्ची घाणी तेल असे देखील म्हणतात. जे अतिशय शुद्ध स्वरूपात असते. ज्याला रिफाइंड देखील केलेले नसते, त्यामुळे अनेक गृहिणी या तेलालाच प्राधान्य देताना दिसतात. यामुळे आरोग्याला तोटा न होता फायदाच होतो. तर ग्रेड टू प्रकारातील तेल हे स्वयंपाकाकरिता वापरत नाहीत, त्याचा वापर मालिश करणे, केसांना लावणे, किंवा इतर उपचारात्मक गोष्टींसाठी केला जातो.
मोहरीच्या तेलाच्या वापराने होणारे फायदे:
मोहरीचे तेल केसांच्या आरोग्यासाठी देखील खूपच फायदेशीर ठरते. या तेलाने डोक्याची मालिश केल्यामुळे आपल्या टाळूवरील त्वचेमध्ये रक्त संचारण वाढते, जेणेकरून केसांचा चांगला विकास होतो. तसेच या तेलामध्ये असणारे विविध खनिजे, बिटाकेरोटीन, इत्यादी गोष्टी केसांना पांढरे होण्यापासून रोखतात. तसेच अकाली केस गळणे, किंवा टक्कल पडणे या समस्यांवर देखील प्रभावीपणे कार्य करतात. शिवाय केसांमध्ये बुरशी देखील होऊ देत नाहीत.
मोहरीच्या तेलामध्ये खोबरेल तेल मिसळून त्वचेवर मालिश केल्यामुळे त्वचा अतिशय तजेलदार होते. तसेच त्वचेवरील सुरकुत्या देखील नष्ट होतात. या तेलाने मसाज करण्यापूर्वी सुती कापडाने आपला चेहरा स्वच्छ करावा, आणि मगच मालिश करावी. हे तेल तुम्हाला सनस्क्रीन म्हणून देखील कार्य करते.
अनेक बुरशीजन्य संसर्ग मोहरीच्या तेलाने रोखले जातात, कारण यातील गुणधर्म बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करत असतो. त्यामुळे त्वचेवरील पुरळ मुरूम यांसारख्या गोष्टींना देखील आळा बसतो.
मोहरीच्या तेलामुळे फाटलेले ओठ अतिशय मऊ मुलायम होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावर आणि संपूर्ण हाता पायावर लावल्यामुळे शरीराला होणाऱ्या टैनिंगचा धोकादेखील कमी होतो. याशिवाय कर्करोग यांसारख्या आजारावर देखील हे मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर आहे. या तेलामधील ग्लुकोसिनोलेट कॅन्सर मधील अनियंत्रित वाढणाऱ्या पेशींवर नियंत्रण आणण्याचे कार्य करतो, जेणेकरून कर्करोगाशी योग्य प्रकारे लढा दिला जाऊ शकतो.
निष्कर्ष:
तेल हे शरीरासाठी हानिकारक असते. ज्याने कोलेस्ट्रॉल व चरबीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र असे असले तरी देखील आजच्या खानापानाच्या सवयी बघता तेलाशिवाय स्वयंपाक करणे कठीण झालेले आहे. त्यामुळे कुठले ना कुठले तरी तेल वापरणे गरजेचे ठरते. यामुळे अनेक लोक त्यातही चांगले असणारे तेल शोधतात.
यामध्ये मोहरीच्या तेलाचा देखील समावेश होतो. त्याच मोहरीच्या तेलाबद्दल आज आपण माहिती बघितली. ज्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल म्हणजे काय, त्याचा काय प्रभाव पडतो, त्याचे प्रकार आहेत का व कोणते, त्यापासून काय फायदे मिळतात, शरीराच्या त्वचेची व केसांच्या आरोग्याशी मोहरीच्या तेलाचा कसा संबंध आहे.
तसेच कर्करोगा विरोधी काही गुणधर्म आहेत का? इत्यादी प्रकारची माहिती मिळाली. सोबतच मोहरीच्या तेलामुळे होणारे तोटे, किंवा नकारात्मक परिणामाची देखील माहिती मिळाली. हे मोहरीचे तेल कसे वापरावे आणि किती प्रमाणात वापरावे याबाबत देखील आपण माहिती घेतली.
FAQ
मोहरीचे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले समजले जाते का?
मित्रांनो, अनेक प्रकारचे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी घातक समजल्या जातात. मात्र मोहरीचे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर समजले जाते. आशीया खंडामध्ये सर्वात जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या तेलापैकी मोहरीचे तेल एक आहे, याला क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाने मान्यता देखील दिलेली आहे.
मोहरीच्या तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढते का?
मोहरीच्या तेलामध्ये असणाऱ्या मोनो अनसेच्युरिटेड फॅटी ऍसिड्स मुळे उलट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी केले जाते. त्यामुळे हृदयासाठी देखील हे तेल चांगले मानले जाते.
मोहरीच्या तेलाचा काय फायदा आहे?
मित्रांनो, मोहरीचे तेल अतिशय शुद्ध असते. या तेलामुळे त्वचा अतिशय तजेलदार होते. तसेच केसांची वाढ देखील मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होते. या तेलामुळे शरीरावरील जळजळ किंवा वेदना देखील शमवील्या जाऊ शकतात. या तेलाच्या माध्यमातून फेसपॅक बनवला जाऊ शकतो, तसेच मसाज देखील केला जाऊ शकतो.
मोहरीचे तेल कोणत्या प्रकारच्या स्वयंपाकात वापरले जाते?
मोहरीचे तेल हे शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या आहारामध्ये वापरले जाते.
मोहरीच्या तेलामुळे कोणत्या खाद्यपदार्थाला अतिशय सुरेख चव येते?
मित्रांनो, मोहरीच्या तेलामुळे पनीर टिक्का, आणि कोबी मंचुरियन यांसारख्या पदार्थांना अतिशय सुरेख चव येते.
आजच्या भागामध्ये आपण मोहरीच्या तेलाबद्दल माहिती पाहिली. एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल, आणि आपल्या जवळच्या लोकांना ज्यांचे आरोग्य चांगले राहावे असे तुम्हाला वाटते त्यांना देखील ही माहिती अवश्य शेअर करा.
धन्यवाद…