Mutual Fund Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आज आपण ह्या लेख मध्ये म्युचल फंड काय आहे? आणि म्युचल फंड मध्ये कशी गुंतवणूक करायची? या लेख मध्ये आपण म्युचल फंड बद्दल संपूर्ण माहिती मराठीत जाणून घेणार आहोत. तर तुम्ही या लेख ला शेवटपर्यंत वाचा. जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल.
म्युचल फंडची संपूर्ण माहिती Mutual Fund Information In Marathi
मित्रांनो तुम्हाला म्युचल फंड बद्दल माहिती असेल तुम्ही TV मध्ये म्युचल फंड Ads बघितले असेल किंवा युट्युबवरती सोशल मीडिया Instagram, Facebook वरती पाहिलं असेल. म्युचल फंड मध्ये लोकं इन्व्हेस्टमेंट करायला सांगतात आणि तुम्ही तुमच्या मित्राकडूनही ऐकले असेल की तुझे पैसे वाया नको जाऊ देऊ ते म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट कर ज्यामुळे तुला चांगले रिटर्न्स मिळतील. आणि याचा तुला पुढे चालून खूप फायदा होईल.
मित्रांनो आपण सर्वांनी म्युचल फंड बद्दल ऐकलेच आहे. परंतु आपण यामध्ये निवेश करण्याचा निर्णय नाही घेऊ शकत. हे पण खरे आहे की अधिक तर लोकांना याबद्दल पूर्ण Knowledge नसते. अशा मध्ये लोक इन्वेस्ट करायचे तर असते. परंतु घाबरतात ही त्यांचे पैसे वाया न जाओ तर आज आपण म्युचल फंड बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
म्युचल फंड्स काय आहे? Mutual Fund काय आहे?
म्युचल फंड हा एक असा फंड आहे जो AMC म्हणजेच ऍसिड मॅनेजमेंट कंपनीज (Asset Management Company) ते ऑपरेट करत असतात. या कंपन्यांमध्ये अनेक लोक त्यांचे पैसे इन्व्हेस्ट (Investment) करत असतात. म्युच्युअल फंड मार्फत या पैशांना स्टॉक्स (Stocks), बाँड (Bond), शेअर मार्केट (Share Market) सोबत इतर ठिकाणी गुंतवणूक केली जाते.
मित्रांनो म्युचल फंड चा फायदा असा असतो. की तुम्ही यामध्ये 500 ते 1000 रुपयापासून सुरुवात करू शकतात. म्हणजे म्युचल फंड मध्ये तुम्ही 500 ते 1000 रुपयाची दर महिन्याला एसआयपी (Monthly SIP) पासून सुरुवात करू शकतात. म्युचल फंड मधून ना फक्त तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. उलट Gold मध्ये सुद्धा तुम्ही Investment करू शकतात.
मित्रांनो म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताना ज्या लोकांमध्ये वेळेचा अभाव असतो. ज्यांच्यामध्ये योग्य चुनाव करण्याची क्षमता आणि योग्य समज नसते आणि जे बँक पेक्षा उच्च दर मिळवण्याची अपेक्षा करत असतात. तर त्यांच्यासाठी म्युचल फंड हे योग्य आहे.
एका गुंतवणूकदार च प्रमुख लक्ष्य त्याच्या धनाला सुरक्षित ठेवून त्याला वाढवणे आणि गरज पडल्यावर त्याला उपयोग मध्ये आणणे. आता डिजिटल युगामुळे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणे खूप सोपे झाले आहे. आपण आपल्या मोबाईलच्या वापराने घरबसल्या म्युच्युअल फंड चा फायदा घेऊ शकतात. परंतु याबद्दल आपल्याला योग्य सल्ला घेणे ही महत्त्वाची आहे.
म्युचल फंड मध्ये एका लहान गुंतवणूक करणाऱ्याला गुंतवणूक संबंधी निवड, त्याचा शोध, योग्य वेळ आणि त्याबद्दल संपूर्ण Knowledge असणे आवश्यक आहे.
मित्रांनो जर अधिक असे लहान गुंतवणूक करणारे सोबत मिळून धन एकत्र केले तर ते सर्वात मोठा Amount म्हणून जमा होईल. या पैशांना ते कोणत्याही व्यावसायिक व्यवस्थापक किंवा पण मॅनेजर जवळ पैसे देऊ शकतात. मग तो फंड मॅनेजर (Fund Manager) वेगवेगळ्या फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट (Investment) करेल. जे त्याला चांगले रिटर्न्स (Returns) देऊ शकतील. या पैशांचा वापर तो शेअर्स (Shares) बॉण्ड्स (Bonds) सोने (Gold) आणि इतर शेअर्स घेण्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करेल.
मित्रांनो यामुळेच म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या ही वाढली आहे. आणि आता अत्याधिक सोशल मीडियाचा वापरामुळे लोकांना म्युच्युअल फंडचं नॉलेजही आले आहे. आणि आपल्या हातात युट्युब आहे. त्यावर आपण म्युचल फंड बद्दल खूप व्हिडिओज पाहू शकतो आणि योग्य ते म्युचल फंड मध्ये माहिती घेतल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करू शकतो.
आपण म्युचल फंड बद्दल अनेक लेख सुद्धा वाचू शकतो ज्यामध्ये आपल्याला म्युचल फंड बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. म्युचल फंडशी 5 महिन्यांमध्ये 70 लाखों लोकं जुळलेले आहेत.
मित्रांनो जर म्युचल फंड ला सोप्या शब्दात सांगायचे असले. तर म्युचल फंड म्हणजे खूप साऱ्या लोकांच्या पैशांनी बनलेला एक फंड असतो. येथे एक फंड मॅनेजर असतो जो फंड ला सुरक्षित मार्गाने थोडे-थोडे करून वेगवेगळ्या स्थानांमध्ये गुंतवणूक करत असतो. म्युचल फंड मधून तुम्ही न फक्त शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. परंतु गोल्ड मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतात.
ॲसेट मॅनेजमेंट कंपनी काय आहे (AMC)?
मित्रांनो आपण एमसी म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (Asset Management Company) बद्दल ऐकले असेल किंवा या लेख मध्ये तुम्हाला माहित पडले असेल. मित्रांनो ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये अशी कंपनी असते की जे तुमच्या पैशांना वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये गुंतवतात.
जसे इक्विटी बॉन्ड, गोल्ड ई. मध्ये गुंतवणूक करत असते आणि या गुंतवणूक पासून मिळणारे रिटर्न्स गुंतवणूक करणाऱ्यांच्या फंड युनिट नुसार वाटले जातात. एक चांगला फंड मॅनेजर पडला योग्य प्रकारे गुंतवणूक करून त्यावर जास्त जास्त रिटर्न मिळू शकतो. ज्यामुळे गुंतवणूक करणाऱ्याला चांगले रिटर्न्स प्राप्त होतील. मित्रांनो चला आता आपण जाणून घेऊया म्युचल फंड कशाप्रकारे काम करत असतो.
म्युचल फंड कशाप्रकारे काम करतो?
मित्रांनो म्युचल फंड सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लाखो रुपयांची गरज नसते. तुम्ही 500 रुपयांपासूनही यामध्ये सुरुवात करू शकतात. समजून घ्या तुम्हाला कुठल्या कंपनीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची आहे.
परंतु त्याच्या एक शेर ची किंमत 25 हजार रुपये आहे. म्युचल फंड च्या माध्यमातून तुम्ही अशा कंपन्यांमध्ये पाचशे रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात. म्युचल फंड हे अनेक लोकांच्या 500-500 रुपये जमा करून त्या कंपनीमध्ये मोठी रक्कम म्हणून गुंतवत असते.
म्युचल फंड मध्ये गुंतवणूक कशी करायची?
मित्रांनो म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातात. ते तुम्हाला खालील प्रकारे Clear करण्यात आले आहेत.
म्युचल फंड चे दोन प्लॅन्स असतात. त्यामध्ये पहिला प्लॅन म्हणजे डायरेक्ट प्लॅन (Direct Plan) आणि दुसरा प्लॅन म्हणजे रेगुलर प्लॅन (Regular Plan) असतो.
1) डायरेक्ट प्लॅन (Direct plan)
मित्रांनो जेव्हा गुंतवणूक करणारा म्युचल फंड कंपनी किंवा वेबसाईट वरून सरळ खरेदी करतो. तर त्या योजनेला डायरेक्ट प्लॅन (Direct Plan) म्हटले जाते.
यामध्ये कोणताही ब्रोकर किंवा एजंट चा समावेश नसतो आणि कंपनी ला कमिशन किंवा ब्रोकरेज पेमेंट द्यावे लागत नाही. यासाठी गुंतवणूक करणाऱ्याला डायरेक्ट प्लॅन सोपा असतो.
2) रेगुलर प्लॅन (Regular plan)
जेव्हा गुंतवणूक करणारा म्युचल फंड भागीदार मध्ये जसे ब्रोकर किंवा एजंट च्या माध्यमातून खरेदी करतो तर अशा योजनेला रेगुलर प्लॅन म्हटले जाते. एम सी या भागीदारांना त्यांच्या सेवेसाठी कमिशन देत असते यामुळे हे डायरेक्ट प्लॅन (Direct Plan) पेक्षा महाग असतं. तुलनात्मक रूपापेक्षा रेगुलर प्लॅनमध्ये खर्चाचे प्रमाण जास्त आणि एनव्ही कमी आणि रिटर्न्स पण कमी असतात
मित्रांनो यामध्ये हे समजणे महत्वाचा आहे की दोघेही योजना सारखे आहेत. एकाच संपत्तीमध्ये गुंतवणूक केले जातात आणि एकाच फंड मॅनेजर (Fund Manager) द्वारा हे सर्व व्यवस्थापित केले जाते.
म्युचल फंड कसे खरेदी करावे?
• मित्रांनो म्युचल फंड खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही सिंपले तुमच्या मोबाईल वरून म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एप्लीकेशन डाउनलोड करावे लागतील जसे Zeroda, Upstox, Angel One etc. सारख्या ॲप्स मधून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा तुम्ही यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणाहून ही म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात
• मित्रांनो सुरुवातीला आपल्याकडे म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी माध्यम नव्हते परंतु आता आपण घरबसल्या मोबाईल होऊन ऑनलाईन म्युचल फंड खरेदी करू शकतो. एवढेच नाही तर आपण म्युचल फंड स्कीम त्याची वाढ रिटर्न्स पण पाहू शकतो. ऑनलाइन मुळे म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. मित्रांनो म्युचल फंड मध्ये निवेश करण्याआधी तुम्ही योग्य माहिती गोळा करून घ्यायची किंवा योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यायचा तेव्हाच यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं. कारण यामध्ये तुम्हाला नुकसानही होऊ शकतात.
म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे 3 फायदे
1) म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला सूचनाची गरज नसते की ज्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करत आहेत. त्यांची ग्रोथ काय आहे. हे सर्व कामे फंड मॅनेजर करत असतो.
2) म्युचल फंड सर्वात मोठा फायदा असा असतो की यामध्ये तुमचे पैसे वेगवेगळे सेक्टर आणि ऍसिड मध्ये गुंतवणूक केले जातात. जसे बँकिंग सेक्टर किंवा ऑटो सेक्टर (Auto Sector) किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये मंदी येऊन जाते. तर यामुळे तुमच्या पोर्टफोलिवर (Portfolio) कुठलाही फरक पडत नाही. कारण या सेक्टरमध्ये तुमचं थोडसं निवेश असतो ज्यामुळे संपूर्ण पोर्टफोलियोवर कुठलाही प्रभाव पडत नाही
3) मित्रांनो म्युचल फंड मध्ये तुम्ही 500 ते 1000 रूपया पासून Monthly SIP सुरू करू शकतात. तुम्ही ठरवू शकतात की यामध्ये किती काळपर्यंत गुंतवणूक करायला पाहिजे. गुंतवणूक ही Weekly, Monthly किंवा Year च्या आधारावर असू शकते.
FAQ
1. म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी?
म्युच्युअल फंड विविध प्रकारच्या मालमत्ता आणि समभागांमध्ये गुंतवणूक करून पोर्टफोलिओ जोखीम कमी करतात. परिणामी, एक मालमत्ता/स्टॉक खराब कामगिरी करत असला तरीही, इतर मालमत्तेची कामगिरी भरपाई करू शकते आणि तरीही तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर अनुकूल परतावा मिळवू शकता.
2. मुतुअल फंड म्हणजे काय ?
म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय ? म्युच्युअल फंड (Mutual Fund) म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवले जातात आणि त्यावर मिळणारा लाभांश सर्वांना समान वाटून दिला जातो. शेअर मार्केटमध्ये ही गुंतवणूक करण्याचे काम एखादी कंपनी करत असते.
3. म्युच्युअल फंडाचे कार्य काय आहे?
म्युच्युअल फंड ही एक कंपनी आहे जी अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते आणि स्टॉक, बाँड आणि अल्पकालीन कर्ज यासारख्या सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवते . म्युच्युअल फंडाची एकत्रित होल्डिंग्स त्याचा पोर्टफोलिओ म्हणून ओळखली जातात. गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील शेअर्स खरेदी करतात.
4. म्युच्युअल फंड फायदे काय आहेत?
म्युच्युअल फंड उच्च तरलता, लवचिकता, सुविधा, तज्ञ निधी व्यवस्थापन आणि कर बचत लाभ देतात. अशा प्रकारे, दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी ते एक चांगला पर्याय आहेत. मी म्युच्युअल फंडात 1000 रुपये गुंतवू शकतो का? म्युच्युअल फंडात एसआयपी किंवा एकरकमी गुंतवणूक करता येते.
5. म्युच्युअल फंड कधी खरेदी करावे?
म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम वेळ सांगण्यासाठी कोणताही नियम किंवा निश्चित निकष नाहीत . म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी बेअर मार्केट हा एक आदर्श काळ दिसत असला तरी, बेअर मार्केटची ओळख पूर्णपणे फंड व्यवस्थापकाच्या कौशल्यावर अवलंबून असते.