NCC Information In Marathi शाळेत असताना अनेक लोकांना एनसीसी मध्ये सहभागी व्हावे असे वाटत असे. आपल्यातील प्रत्येकाला एनसीसी म्हणजे काय हे नक्कीच माहिती असेल, किंवा त्याबद्दल तुम्ही ऐकले तरी असेलच. या एनसीसी मध्ये खाकी वर्दी घालायला मिळाल्यामुळे अनेकांना एनसीसी आकर्षित करत असे. यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी शिकवल्या जात असत. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्त होती.

एनसीसी विषयी संपूर्ण माहिती NCC Information In Marathi
एनसीसी चे ब्रीदवाक्य हेच एकता और अनुशासन असल्यामुळे सर्वांनी मिळून मिसळून शिस्त पाळणे हे खरेतर या एनसीसी चे उद्दिष्ट होते. शालेय मुलांना पुढे आयुष्यात जाऊन शिस्तीचा लळा लागावा, त्याचबरोबर भारतीय सैन्य कशा रीतीने वागत असते याचा अंदाज यावा, याकरिता या एनसीसीचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला होता. आजच्या भागामध्ये या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रिय असणाऱ्या एनसीसी बद्दल आपण माहिती बघणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता माहितीला प्रारंभ करूया…
| नाव | एन सी सी |
| संपूर्ण स्वरूप | नॅशनल कॅडेट कोर्पस |
| स्थापना दिवस | १५ जुलै |
| स्थापना वर्ष | १९४८ |
| बोधवाक्य | एकता व शिस्त, किंवा एकता और अनुशासन |
| मुख्यालय | नवी दिल्ली |
भारताच्या सशस्त्र दलांनी तयार केलेला एक युवा विभाग म्हणून एनसीसीला ओळखले जाते. तीनही दलांच्या एकत्रित अधिपत्याखाली या संस्थेचे कार्य चालत असते. ज्याद्वारे विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या संस्थेच्या अंतर्गत नफा ना तोटा या सूत्राला पाळत विद्यार्थ्यांना शिस्त व एकतेचे धडे दिले जातात. शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांना कवायती व लष्करी संचालनाच्या बाबींमध्ये निपुण केले जाते.
एनसीसी चा झेंडा तीन रंगाने बनवलेला असून, याच्यामध्ये लाल, आकाशी आणि गडद निळा या तीन रंगांचा समावेश होतो. हे तीनही रंग उभ्या स्वरूपात लावलेले आहेत. या तीन रंगांनी भारतीय लष्कराचे तीनही दल सुचित केले जातात, असे सांगितले जाते. यामध्ये लष्कर, नौदल, व हवाई दल इत्यादींचा समावेश होतो.
एनसीसी बद्दल ऐतिहासिक माहिती:
एनसीसी या संस्थेचे मूळ हे आपल्याला ब्रिटिश भारतामध्ये आढळून येते. ज्या वेळेला पहिले महायुद्ध झाले, त्यावेळी ब्रिटिश राजसत्तेला सैन्याची मोठी टंचाई भासली होती. पुढे जेव्हा कधी युद्ध होईल, त्यावेळी अशी टंचाई भासू नये, म्हणून त्यांनी उपाययोजना करण्याचे ठरविले. त्याकरिता भारतीय विद्यार्थ्यांना आणि शाळा महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्यांना पुढे युद्धामध्ये सहभागी करून, त्यांचा वापर करून घेतला जाऊ शकेल या हेतूने ब्रिटिश सरकारने युनिव्हर्सिटी कोर्पस ची स्थापना केली.
ते वर्ष होते १९१७. या संस्थेअंतर्गत तीन नोव्हेंबर १९१७ या दिवशी कलकत्ता विद्यापीठातून पहिली तुकडी तयार करण्यात आली. पुढे १९४२ या वर्षी या यु सी अर्थात युनिव्हर्सिटी कोर्स ला परावर्तित करून त्यापासून युनिव्हर्सिटी ऑफिसर ट्रेनिंग कोर्स या संस्थेची निर्मिती करण्यात आली.
मात्र येथे विद्यार्थ्यांनी अतिशय कमी सहभाग दर्शविला होता, त्यामुळे दुसऱ्या महायुद्धामध्ये या तुकडीचा वापर करून घेण्याचे उद्दिष्ट ब्रिटिशांना साध्य करता आले नाही. पुढे भारताने स्वतःची नॅशनल कॅडेट समिती स्थापन केली, ते वर्ष होते १९४६, आणि या संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून पंडित हृदयनाथ कुंजरू यांना नियुक्त करण्यात आले होते.
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे भारतीय संरक्षण मंत्रालयाने १६ जुलै १९४८ या दिवशी या सर्व गोष्टींच्या एकत्रीकरणातून एनसीसी अर्थात नॅशनल कॅडेट कोर्स ची स्थापना केली, जी आजतागायत सुरू असून चांगले कार्य करत आहे.
एन सी सी मध्ये काय कार्य चालते:
- एनसीसी ही शालेय व महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना संघटित करून त्यांना एकत्रतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्य करत असते. या अंतर्गत विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जाते, त्याचबरोबर विविध ठिकाणी कॅम्प आयोजित करून शत्रूशी भिडण्याबाबत प्रशिक्षित केले जाते.
- या अंतर्गत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपत्कालीन प्रसंगी युद्ध कसे करावे याबाबत शिकविले जाते.
- भारतीय सैन्याच्या तीनही दलांमधील महत्त्वाच्या गोष्टींबाबत अगदी सामान्य पातळी किंवा मूलभूत स्वरूपाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.
- बंदुकीने नेम साधने याबाबत देखील प्रशिक्षण देणे एनसीसीच्या कार्यामध्ये समाविष्ट आहे.
- देश हा अंतिम असून, देशासाठी प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. वेळाकरिता एकजूट व शिस्त महत्त्वाची आहे, हा संदेश या एनसीसी अंतर्गत दिला जातो.
एन सी सी चे विविध नियम:
- एनसीसी शिस्तप्रिय असल्यामुळे येथे नियमांचे पालन करणे फारच गरजेचे ठरते.
- एनसीसी मध्ये वेळेचे पालन करणे फारच बंधनकारक असते. ज्यावेळी विद्यार्थ्यांना कॅम्पमध्ये घेऊन जातात, तेथे त्यांना योग्य वेळेला कार्य केले नाही तर शिक्षा देखील केली जाते.
- एन सी सी मध्ये कोणतेही कार्य करताना अचूकतेला फार महत्त्व दिले जाते. त्यामुळे कुठल्याही कामांमध्ये त्रुटी आढळून येऊ नये, असा देखील नियम असतो.
- एन सी सी मध्ये कधीही खोटे बोलू नये असे शिकवले जाते, जर कोणाचाही प्रशिक्षणार्थी विद्यार्थी खोटं बोलताना आढळल्यास त्याला योग्य व कठोर शासन केले जाते. त्याचबरोबर कुठल्याही कर्तव्या करिता बहाने देणे इथे मंजूर नाही.
एन सी सी मध्ये सामील होण्याच्या पात्रता:
- शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या एनसीसी मध्ये सहजतेने सहभागी होता येते, मात्र या ठिकाणी वयाची अट ठेवलेली आहे. जी किमान १३ वर्ष ते कमाल २६ वर्ष इतकी आहे.
- एन सी सी च्या पहिल्या स्तरावर प्रवेशासाठी उंचीची अट देखील ठेवली जाऊ शकते.
- एनसीसी चे विविध स्तर असतात, त्यामुळे पुढील स्तरावर प्रवेश मिळवण्याकरिता मागील कराचे प्रमाणपत्र आवश्यक असते.
- मित्रांनो, एनसीसी मध्ये सहभागी होणे अतिशय फायद्याचे असते, कारण इथे मिळालेले प्रमाणपत्र पुढे उपयोगी पडत असते.
निष्कर्ष:
शाळेमध्ये खाकी कपडे घातलेले विद्यार्थी दिसले, की आपण एनसीसी चे विद्यार्थी आले असे म्हणत असू. मित्रांनो एनसीसी हा विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व एकता जोपासणारा किंवा विकसित करणारा कार्यक्रम असून, शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे मिळण्याबरोबरच भारतीय सैन्याबद्दल आकलन व्हावे हा या एनसीसीचा मुख्य उद्देश होता.
१५ जुलै १९४८ या दिवशी स्थापन झालेल्या एनसीसी नंतर महाराष्ट्राने देखील एमसीसी स्थापन केली होती. आज आपण या एनसीसी बद्दल माहिती बघताना एनसीसी म्हणजे काय, त्याचा इतिहास काय आहे, या ठिकाणी काय कार्य केले जाते, मुख्य लक्ष किंवा ध्येय काय आहे, एनसीसी मधील विविध नियम, सामील होण्यासाठीच्या पात्रता, एनसीसी चा ध्वज, एनसीसी प्रमाणपत्र इत्यादी गोष्टीबद्दल माहिती बघितलेली आहे. सोबतच एनसीसी द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा व त्या संदर्भातील काही मनोरंजक तथ्य इत्यादी माहिती बघितलेली आहे.
FAQ
एन सी सी म्हणजे काय?
एनसीसी हे शालेय स्तरावरील एक पायदळ प्रकारातील सैन्य म्हणून ओळखले जाऊ शकते. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता व शिस्तीची भावना जोपासण्याकरिता हे दल प्रसिद्ध आहे.
एन सी सी चे संपूर्ण स्वरूप काय आहे?
एन सी सी चे संपूर्ण स्वरूप नॅशनल कोर्पस असे आहे.
एनसीसी ची स्थापना कोणात्या दिवशी झाली होती?
एन सी सी ची स्थापना स्वातंत्र्यानंतर ११ महिन्यांनी अर्थात १५ जुलै १९४८ या दिवशी झाली होती.
एन सी सी चे ब्रीदवाक्य किंवा बोधवाक्य म्हणून कोणते वाक्य ओळखले जाते?
एन सी सी चे ब्रीदवाक्य अथवा बोधवाक्य एकता व शिस्त आहे, ज्याला एनसीसीच्या झेंड्यामध्ये हिंदी भाषेमध्ये एकता और अनुशासन असे लिहिले जाते.
एन सी सी चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी वसलेले आहे?
एन सी सी चे मुख्यालय हे भारताच्या राजधानीच्या ठिकाणी अर्थात नवी दिल्ली या ठिकाणी वसलेले आहे.