Paramvir Chakra Information In Marathi सशस्त्र सेना किंवा आर्मी म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगळेच नवचैतन्य संचारते. प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो, आणि आपले हात आपोआपच सलाम करण्यासाठी कानाजवळ जातात. मित्रांनो, देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या या जवानांचा कुठेतरी सत्कार केला जावा याकरिता त्यांना विविध पदके दिली जातात. त्यामधील एक म्हणजे परमवीर चक्र होय.
परमवीर चक्रची संपूर्ण माहिती Paramvir Chakra Information In Marathi
परमवीर चक्र हे भारतामधील सैन्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गणले जाते. ज्या सैनिकांनी युद्ध काळामध्ये शौर्य दाखवले असेल, किंवा काहीतरी अतुलनीय कामगिरी केली असेल, त्या सैनिकांना या परमवीर चक्रांनी सन्मानित करण्यात येते. व त्यांचा गौरव करण्यात येतो.
परमवीर चक्राची सुरुवात ही अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच म्हणजे ऑगस्ट १९४७ पासूनच करण्यात आलेली असून, हे पुरस्कार मात्र २६ जानेवारी १९५० या दिवसापासून दिले जातात. आजच्या भागामध्ये आपण परमवीर चक्र म्हणजे काय आणि त्याविषयीची इतरही इत्यंभूत माहिती घेणार आहोत.
नाव | परमवीर चक्र |
प्रकार | सर्वोच्च सैन्य |
स्थापना | २६ जानेवारी १९५० |
पुरस्कारास सुरुवात | ऑगस्ट १९४७ |
परमवीर चक्र पुरस्काराची रचना:
सर्वोच्च सैन्य पुरस्कार म्हणून ओळखले जाणारे परमवीर चक्र या पुरस्काराचे पदक हे कांस्य या धातूपासून बनलेले असते, आणि ते आकाराने वर्तुळाकार असते. परमवीर चक्राची रचना कशी असावी हे सावित्रीबाई खानोलकर या व्यक्तीने ठरवले होते.
या चक्राच्या समोरील बाजूस अगदी मध्यभागी भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोरलेले असते, आणि त्या भोवती चार वज्रच्या प्रतिकृती असतात. तर पाठीमागील बाजूने देवनागरी आणि इंग्रजी अशा दोन्ही लिपी मध्ये परमवीर चक्र हे नाव कोरलेले असते. आणि या दोन्ही नावाच्या मध्यभागी कमळाची प्रतिकृती कोरलेली असते.
परमवीर चक्र हा पुरस्कार कोण मिळवू शकतो:
परमवीर चक्र हा पुरस्कार मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर व्यक्ती सैन्य दल, हवाई दल, किंवा नौदल या कोणत्यातरी दलाचा सैनिक अथवा राखीव दल प्रादेशिक सैन्य, किंवा इतर कोणतेही सशस्त्र दलाचा अधिकारी असावा. मग तो पुरुष असो की महिला यामध्ये भेदभाव केला जात नाही.
याबरोबरच सैनिक क्षेत्रातील नर्स, सिस्टर, नरसिंग कर्मचारी, रुग्णालयाचा स्टाफ किंवा त्यांच्याशी संबंधित सेवा देणारे कोणत्याही दलाचे तात्पुरत्या स्वरूपातील व्यक्ती असतील तरी देखील या पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतात.
परमवीर चक्र पुरस्कार मिळवण्यासाठी च्या पात्रता निकष:
परमवीर चक्र मिळवायचे असेल तर काही पात्रता निकष पार पाडावे लागतात. ज्यामध्ये उमेदवाराने किमान तिन्ही दलापैकी एक दलामध्ये सेवा बजावलेली पाहिजे, आणि त्या दलामध्ये काहीतरी धाडसाचे काम किंवा शौर्य दाखवलेले असावे.
ज्या ठिकाणी शत्रु उपस्थित असेल, अशा ठिकाणी जाऊन मग ते जमिनीवर असो, पाण्यात असो, की हवेत असो काहीतरी सहासी कार्य केलेले असावे. किंवा शत्रूला धुळीस मिळवलेले असावे. तसेच एखाद्या सैनिकांनी आत्मबलिदान दिले असेल तर त्याला देखील मरणोत्तर परमवीर चक्र हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. याचे उदाहरण म्हणजे प्रथमतः परमवरीर चक्र पुरस्कार जिंकणारे मेजर सोमनाथ शर्मा होय.
परमवीर चक्र पुरस्काराविषयी प्राथमिक माहिती:
परमवीर चक्र हा पुरस्कार जरी ऑगस्ट १९४७ पासून देण्याचे सुरुवात करण्यात आले असले, तरी देखील खऱ्या अर्थाने या पुरस्काराची स्थापना २६ जानेवारी १९५० या दिवसापासून करण्यात आलेली आहे.
भारताचे रक्षण करण्यासाठी असलेल्या कोणत्याही दलातील सैनिकांनी शत्रू विरुद्ध धाडसाचे कार्य केले असेल, तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो. भारतामध्ये सर्वात प्रथम हा पुरस्कार मिळवण्याचे भाग्य मेजर सोमनाथ शर्मा यांना मिळाले होते. जे कुमाऊ रेजिमेंट मधील मेजर होते. आणि त्यांनी बडगम येथील लढाईमध्ये आपल्या शौर्याचे प्रदर्शन केले होते.
तर अगदी अलीकडील काळामध्ये जम्मू आणि काश्मीर रायफल्स चे कॅप्टन श्री विक्रम बत्रा यांना ऑपरेशन रायफल्स साठी हा पुरस्कार मिळालेला आहे. परमवीर चक्र विजेते रोख भत्ता मिळवण्यास पात्र असतात. कांस्य धातू पासून बनवण्यात आलेले हे पदक भारताच्या राष्ट्रीय चिन्हाने आणि कमळाने चिन्हांकित केलेले असते. ज्याची निर्मिती सावित्रीबाई खानोलकर या स्त्रीने केलेली आहे.
परमवीर चक्र हे युद्धातील शौर्यासाठी देण्यात आलेले असले, तरीदेखील बऱ्याचदा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मानकरी हयात नसतात. असेच ज्यावेळी ०३ नोव्हेंबर १९४७ या दिवशी मेजर सोमनाथ शर्मा यांना पुरस्कार देण्यात येणार होता, त्यावेळी ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी हयात नव्हते. कारण त्यांनी काश्मीरमध्ये आपले बलिदान दिलेले होते.
आज पर्यंत सुमारे २१ भारतीयांना या परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये सोमनाथ शर्मा, जदुनाथ सिंह, रामा राघोबा राणे, बिरू सिंग, करम सिंग, गुरुबचन सिंग सलारिया, धनसिंग थापा, जोगिंदर सिंग, शैतान सिंग, अब्दुल हमीद, परदेशीर तारापोर, अल्बर्ट एक�����का, निर्मल जीतसिंगझ सेखो, अरुण खेतरपाल, होशियार सिंग दहिया, बाणा सिंग, रामास्वामी परमेश्वरन, मनोज कुमार पांडे, योगेंद्र सिंह यादव, आणि विक्रम बत्रा इत्यादी सैनिकांचा समावेश होतो.
निष्कर्ष:
आजच्या भागामध्ये आपण परमवीर चक्र याविषयी माहिती बघितली. ज्यामध्ये तुम्हाला परमवीर चक्र म्हणजे काय, त्याची स्थापना कधी झाली, केव्हापासून हा पुरस्कार देण्यात येतो, त्याची रचना कशी असते, या पुरस्कारासाठी कोण पात्र असतात, तसेच पात्र होण्यासाठी काय निकष लावले जातात इत्यादी गोष्टींची माहिती मिळाली असेल.
FAQ
परमवीर चक्र हे पुरस्कार कोणाला दिले जातात?
सशस्त्र सेनादलामध्ये अर्थातच हवाई दल, नौदल किंवा सैन्य दलातील सैनिकांना युद्धामध्ये काही विशेष कामगिरी केली तर हा पुरस्कार दिला जात असतो.
परमवीर चक्र या पुरस्काराची स्थापना केव्हा करण्यात आली?
परमवीर चक्र या पुरस्काराची स्थापना २६ जानेवारी १९५० या दिवशी करण्यात आली.
सर्वप्रथम परमवीर चक्र हा पुरस्कार कोणी पटकावलेला आहे?
सर्वप्रथम परमवीर चक्र हा पुरस्कार पटकावण्याचे मानकरी मेजर सोमनाथ शर्मा हे ठरलेले आहेत.
अलीकडील काळात कोणत्या सैन्य अधिकाऱ्यांनी परमवीर चक्र पुरस्कार मिळवलेला आहे?
अलीकडील काळामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांनी परमवीर चक्र पुरस्कार मिळवलेला आहे.
अलीकडीलच परमवीर चक्र विजेते विक्रम बत्रा यांच्या विषयी थोडक्यात काही सांगता येईल?
अलीकडीलच परमवीर चक्र विजेते विक्रम बत्रा यांच्या विषयी थोडक्यात सांगायचे झाल्यास, ते जम्मू आणि काश्मीर रायफल्स या युनिटचे कॅप्टन असून, त्यांना ऑपरेशन रायफल्स या युद्धा करिता हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
आजच्या भागामध्ये आपण परमवीरचक्र या सर्वोच्च सैन्य पुरस्काराबद्दल माहिती पाहिली. एक अभिमानी भारतीय म्हणून तुम्हाला ही माहिती अवश्य आवडली असेल, त्यामुळे आपल्या अजूनही देशभक्त बंधू-भगिनींना ही माहिती वाचण्यास मिळण्यासाठी नक्की शेअर करा.
धन्यवाद…