Peacock Information In Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या या प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आज-काल या धकाधकीच्या जीवनात धावपळ सतत काम पैशांमध्ये धावण्याची माणसाची मनोवृत्ती यामुळे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सुंदर निसर्गाकडे पाहणं तर आपण विसरूनच गेलो आहोत.
मोर पक्षाची संपूर्ण माहिती Peacock Information In Marathi
आपल्या आजूबाजूला अनेक पशुपक्षी असतात. त्यांचे सौंदर्य हे डोळ्यात साठवण्याजोगे असते. मित्रांनो जेव्हा आपण लहान होतो तेव्हा गावी माळ रानात उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळायला गेलो असताना अनेक पक्षी आपल्या नजरेस पडायचे त्यातील एक असा पक्षी असायचा की ज्याला पाहण्यासाठी मुलांची झुंबड उडायची.
पण त्या पक्षाला पिसारा फुलवताना पाहणे हे खूपच मोठं भाग्य म्हणावं लागेल .आत्तापर्यंत तुमच्या लक्षातच आलं असेल की ही सर्व माहिती कोणत्या पक्षाबद्दल होती. अर्थातच मोराबद्दल.मित्रांनो चला तर मग आजच्या लेखात आपण मोराबद्दल संक्षिप्त माहिती पाहूयात.
प्राथमिक माहिती-
जसं की आपणा सर्वांना ठाऊकच आहे की मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी असून या पक्षाचा रंग हिरवट निळा असा असतो .त्याची मान लांब असून डोक्यावर तुरा व लांब व मनमोहक पिसारा या पक्षाच्या अंगावर असतो .मोराला पिसारा फुलवलेला असताना पाहणे ही खूपच दुर्मिळ गोष्ट आहे.
पावसाच्या दिवसांमध्ये मोर आपला पिसारा फुलून नृत्य करत असतो. पक्षी अभ्यासकांचे असे मानणे आहे की मोर आपल्या साथीदाराला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करत असतो. प्राचीन काळापासून म्हणजेच योद्धांच्या देवी-देवतांच्या काळापासून मोराला अनन्यसाधारण महत्त्व असलेले आपण पाहिलेले आहे.
मोराचे प्रकार-
मोर हा पक्षी फॅजिओनिडी कुळातला असून त्याचे तीन प्रकार पहावयास मिळतात .मोर या पक्षाचे वैज्ञानिक नाव पावो क्रिस्टाटस असे आहे.
मोराचा सामान्यतः रंग हिरवा निळा तपकिरी करडा असून सध्या जनुकीय शास्त्रामुळे मोर या पक्षाचे विभिन्न रंग आपल्याला पहावयास मिळतात. मोराची सर्वसाधारण लांबी ही 86 cm ते 105 सेंटीमीटर पर्यंत असते व मोराचे वजन हे 3 ते 6 किलोंच्या दरम्यान असते. मोराचे आयुर्मान हे 12 ते 20 वर्ष इतके असते.
मोरांचा अधिवास-
मोर हा पक्षी थव्यामध्ये वास्तव्य करतो व त्यांच्या कळपामध्ये एक मोर व तीन ते चार लांडोर असतात. मोर हा पक्षी नेहमी पानझडी प्रकारच्या जंगलामध्ये किंवा जास्त शेती असलेल्या भागांमध्ये पहावयास मिळतात .सामान्यतः मोराचे निवास स्थान हे पाणी असलेल्या ठिकाणी जास्त पहावयास मिळते. म्हणजेच नदीकिनारी ओढ्या नाल्याच्या किनारी जास्त करून मोर पहावयास मिळतात .मोर हे पक्षी रात्री झाडावर झोपतात .
मोराचे खाद्य-
मोर हा पक्षी कीटक छोटे मोठे सरपटणारे प्राणी जसे की पाल साप सरडा धान्य झाडाची कोळी पाने असे अन्न खातात.
मोराचे प्रकार-
मोर या पक्षाचे मुख्यत्वे तीन प्रकार पडतात ते म्हणजे इंडियन पिंफॉल ग्रीन पिंफॉल आणि कांगो पिंफॉल .
इंडियन पिंफॉल-
या प्रजाती बद्दल आपण विस्तृत माहिती पाहुयात. इंडियन पिंफॉल हा मोर म्हणजेच निळ्या रंगाचा सामान्य मोर होय. भारतात सापडणारी मोराची मूळ जात म्हणजेच इंडियन पिंफॉल होय .इंडियन पिंफॉल या प्रकारचा मोर भारतामध्ये सर्वत्र पहायला मिळतो व हाच मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी मानला जातो .
इंडियन पिंफॉल या जातीचा मोर दक्षिण आशिया, श्रीलंका पाकिस्तान येथे देखील पहावयास मिळतो .या पक्षाचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर सामान्यपणे त्याचा रंग निळा किंवा हिरवट निळा असतो. मान लांब असून डोक्यावर तुरा व लांब व मोहक त्याचा पिसारा असतो .परंतु पिसाऱ्याने अर्धे शरीर झाकून गेलेले असते .
मोराचे नर आणि मादी हे दिसायला खूप वेगवेगळे असतात त्यामुळे त्यांना ओळखणे अगदी सोपे आणि सहज असते.
इंडियन पिंफॉल या प्रजातीचे वजन हे 3 ते 6 किलोच्या दरम्यान असते. व त्यांची लांबी ही 200 ते 225 सेंटीमीटर इतकी असते.
कांगो पिंफॉल मोराबद्दल विस्तृत माहिती पाहुयात-
या मोराला आफ्रिकन पिंफॉल या नावाने सर्वत्र ओळखले जाते .या जातीच्या मोरांचे शास्त्रीय नाव आफ्रो पावो काँगेन्सिस असे असून यांचा आकार सामान्य मोरापेक्षा थोडा मोठा असून त्यांचे पंख हे विशेषतः हिरवे किंवा जास्तीत जास्त जांभळ्या रंगाचे असतात.
त्यांची मान ही लाल रंगाची असून पाय राखाडी रंगाचे असतात. या मोराचे वैशिष्ट्य म्हणजे 14 पंख असलेली एक काळ्या रंगाची शेपूट या मोराला असते. या मोराचा मुकुट म्हणजेच तुरा हा पांढऱ्या पंखांनी लांबलचक केसासारख्या असणाऱ्या पंखांनी सुशोभित केलेला असतो .
आफ्रिकन मोराचे वर्णन करायचे झाल्यास तपकिरी रंगाची छाती असून काळ्या रंगाचे उदर असते व हिरव्या रंगाची पाठ असते.
आफ्रिकन मोराचे सामान्यतः वजन 4 ते 6 किलो असून त्याची लांबी 65 ते 70 सेंटीमीटर इतकी असते. मोराच्या या प्रजाती बद्दल विस्तृत माहिती पाहूयात. या प्रकारचे मोर दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या मोरांचा अधिवास हा उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये जास्त करून पहावयास मिळतो. ही प्रजाती खूप दुर्मिळ झाली असून या प्रकारच्या मोरांची संख्या कमी पहावयास मिळते.
या प्रजाती आय यु सी एन अर्थातच इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर मध्ये पहावयास मिळतात. या प्रजातीमध्ये नर आणि मादी दिसायला एक समान असतात त्यामुळे त्यांना ओळखणे खूप कठीण असते. या मोरांचा रंग इंडियन पिंफॉल प्रमाणेच हिरवट असतो. या प्रजातींचे सामान्यतः वजन 4 ते 6 किलो असून त्यांची लांबी 1.8 ते 3 मीटर इतकी पहावयास मिळते.
मोराचा आवाज-
मोर हा पक्षी विविध कारणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढत असतो. मोराचा प्रजनन काळ जेव्हा चालू असतो तेव्हा मोर थोडा कर्कश्य व जोरात ओरडतो ज्यावेळी मोराला वसंत ऋतूमध्ये पाऊस येण्याची चाहूल लागते तेव्हा मोर हा पक्षी आवाज काढताना दिसतो. आपण पाहतो की रात्रीच्या वेळी जेव्हा इतर पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढत असतात तेव्हा मोर हा पक्षी त्यांना सूर देण्यासाठी आवाज काढतो.
वास्तुशास्त्राप्रमाणे मोराच्या पंखांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या घराच्या उत्तरेच्या बाजूला मोराचे पंख ठेवले हे वास्तुशास्त्राप्रमाणे शुभ मानले जाते. कारण त्यामुळे घरामध्ये कधीच धनधान्याची, संपत्तीची, आनंदाची कमी पडत नाही. जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर आपल्या मुख्य दरवाजापाशी गणपतीच्या मूर्तीसह किंवा गणपतीच्या फोटोसह तीन मोराचे पंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो असे मानले जाते.
मोराच्या पंखांचे अनेक फायदे देखील आहेत .असे मानले जाते की जर घरामध्ये बासरी सोबत मोराचे पंख ठेवले तर घरातल्या व्यक्तींमधील नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी वाढते. लक्ष्मी देवता ही संपत्ती संपन्नता सौभाग्य समृद्धी अशी जी वैशिष्ट्ये आहेत ती आत्मसात करून घेण्यासाठी मोराच्या पंखाचा उपयोग करून घेते असे मानले जाते.
मोर या पक्षाविषयी काही तथ्य- मोराच्या पंखांमध्ये एका विशिष्ट प्रकारची रचना आढळून येते ज्यामुळे त्यांचे पंख हे क्रिस्टल सारखे पहावयास मिळतात. मोराच्या शेपटीमुळे त्यांच्या शरीराचा जवळजवळ 60 टक्के भाग हा झाकला जात असतो. मोराच्या प्रत्येक पायाला चार बोटं असून जर या पक्षाला आपण घरात व्यवस्थित रित्या पाळले तर हा पक्षी 45 ते 50 वर्ष देखील जगू शकतो. मोराचे मुख्य शत्रू म्हणजे वाघ बिबट्या रानमांजर व कोल्हा होय.
मोराला पक्षांचा राजा म्हणण्याचे कारण म्हणजे त्याच्या डोक्यावर असणारा तुरा व मुकुट होय .या तुर्यामुळे मोराची सौंदर्यता वाढते .मोराच्या नर पक्षाला मोर तर मादी पक्षाला लांडोर म्हणून संबोधले जाते. पक्षी अभ्यासकांच्या मते मोरा मधील नर हा खूप आकर्षक व दिसायला सुंदर असतो त्याप्रमाणे लांडोर इतकी सुंदर व आकर्षक नसते .त्यामुळे नर आणि मादी मधील फरक आपण सहज ओळखू शकतो.
मोर हे पक्षी जास्त काळ उडू शकत नाही अगदी थोड्या उंचीपर्यंत ते उडू शकतात व जास्त काळ हवेमध्ये देखील राहू शकत नाहीत. त्यामुळे मोर सर्वसाधारणपणे जमिनीवर चालताना आपल्याला पहावयास मिळतात. मोर हा असा पक्षी आहे की जो भारतीय संस्कृतीचा व सभ्यतेचा एक अविभाज्य भाग आहे .संस्कृत या भाषेमध्ये मोराला मयूर तर इंग्रजी भाषेमध्ये पीकॉक या नावाने ओळखले जाते .
मित्रांनो तुम्हालाही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा.
धन्यवाद….
FAQ
1. मोराची मादी ला काय म्हणतात?
गोव्यात मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात.
2. मोर कुठे राहतो?
मोर शेतामध्ये, जंगलामध्ये आणि उष्ण ठिकाणी राहतो. मोरांना अशा ठिकाणी राहायला आवडतं जिथे झाडांची उंची कमी असेल. मोर हा जगातील सर्वात मोठा उडणाऱ्या पक्ष्यापैकी सुद्धा एक आहे. त्याच्या पंखाचा पिसारा 1.5 मीटर च्या आसपास असतो.
3. मोराचे आयुष्य किती असते?
मोराची मान दिसायला सुंदर आणि लांब असते. मान निळ्या रंगाची आणि चमकदार असते. मुकुटा सारखा दिसणारा एक तुरा मोराच्या डोक्यावर असतो. मोराचे आयुष्य हे साधारणतः 15 ते 25 वर्ष इतके असते.
4. मोर किती वर्षे जगतो?
मोराचे आयुष्य 10 ते 25 वर्षे असते. पावो क्रिस्टॅटस हे मोराचे वैज्ञानिक नाव आहे. नर पक्ष्यांना रंगीबेरंगी शेपटीची पिसे आणि मादी नसल्यामुळे नर मोर मादीपेक्षा अधिक आकर्षक असतात.
5. कोणत्या मोराला पिसे असतात?
मादी मोरापासून नर मोर ओळखण्याचा मुख्य मार्ग म्हणजे त्यांची पिसे आणि रंग. नर मोर त्यांच्या प्रभावशाली शेपटीच्या पंखांसाठी प्रसिद्ध आहेत, ज्याची मादी मोरांमध्ये पूर्णपणे कमतरता असते.