Pigeon Bird Information In Marathi एक शांत आणि नीटनेटका पक्षी म्हणून कबुतराला ओळखले जाते. प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा आसपास आपण कबूतर नावाचा पक्षी बघितलाच असेल. हा पक्षी पाळला देखील जातो. कबूतर पक्षी पाळणे हे भाग्याचे लक्षण समजले जाते. ज्या ठिकाणी कबूतर निवास करतो तेथे साक्षात लक्ष्मी राहते, असे सांगितले जाते. अगदी पूर्वीच्या काळापासून कबुतरे माणसांनी पाळलेले आहेत. जे अगदी संदेश वाहनाचे देखील कार्य करत असतात.
कबुतर पक्षाची संपूर्ण माहिती Pigeon Bird Information In Marathi
कबूतर हे अतिशय हुशार आणि चांगली स्मरणशक्ती असणारे असते. कबुतराने एकदा एखादी गोष्ट किंवा ठिकाण बघितले की ते जन्मभर कधीही विसरत नाहीत. म्हणूनच पूर्वी संदेशवहनाच्या कार्यासाठी कबुतराची निवड केली जात असे.
आपण पूर्वीच्या चित्रपटांमध्ये देखील या कबुतराचा वापर करताना बघितलले असेल, त्यामध्ये नायक नायिकेच्या मधील संवादाचा दुवा हे कबूतर ठरत असे. गरुड पक्षाच्या खालोखाल म्हणजेच सुमारे ६००० फूट उंचीपर्यंत हे कबूतर पक्षी उडू शकतात.
आजच्या भागामध्ये आपण कबूतर या पक्षाविषयी माहिती बघणार आहोत…
नाव | कबुतर |
इंग्रजी नाव | पीजन |
शास्त्रीय नाव | Columba livia |
साधारण आयुष्य | २० ते २५ वर्षे |
स्मरण क्षमता | २००० किलोमीटर न चुकता किंवा पत्ता न विसरता उडू शकतात (अर्थात एकाच वेळी नाही) |
उडण्याची उंची | ६००० फूट उंच |
उडण्याचा वेग | सुमारे ७७.८ किमी प्रति तास |
अंडी उबवण्याचा कालावधी | १९ ते २० दिवस |
जगभरामध्ये कबुतरांच्या ३०० पेक्षाही अधिक प्रजाती आढळून येतात. कबुतर हा शब्द आपल्याला मराठी वाटत असला तरी देखील तो लॅटिन शब्द पपीओ यावरून आलेला आहे. कबूतर हे पक्षी जगभरात सर्वच देशांमध्ये आढळतात. आणि ते मानवाच्या अगदी जवळ राहतात, म्हणूनच कबुतरांना पाळणे अतिशय सोपे गेले. हे पक्षी विविध रंगांमध्ये उपलब्ध असतात.
कबुतरांच्या पंखा शिवाय त्यांची चोच देखील त्यांना उडण्यासाठी मदत करत असते, जेणेकरून हवेचा रोध व्यवस्थित रित्या कापला जातो. साधारणपणे ५० ते ६० किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकणारे हे पक्षी काही प्रसंगी ७७ किलोमीटर प्रति तास इतका वेग देखील धारण करू शकतात.
कबुतरांना हरभरे आणि डाळ मोठ्या प्रमाणावर आवडते. हे कबूतर शाकाहारी असले तरी देखील लहान आकाराचे किडे व अळ्या देखील खातात.
कबूतर हे अतिशय शांत असणारे आणि दयाळू स्वभावाचे पक्षी असतात. म्हणून कबुतराला शांततेचे प्रतिक म्हणून देखील ओळखले जाते. हे पक्षी पांढऱ्या, राखाडी किंवा तपकिरी रंगांमध्ये आढळून येतात. भारतातील कबूतर शक्यतो राखाडी रंगात आढळतात. पाळण्यासाठी वापरण्यात येणारे कबूतर मात्र पांढऱ्या रंगांमध्येच असतात.
कबुतराची शारीरिक रचना:
कबूतर शरीराची रचना इतर पक्षांप्रमाणेच असते. मात्र त्याच्या शरीरावर अतिशय लहान असे मऊ तलम केस असतात. ज्यामुळे कुठल्याही ऋतूमध्ये त्यांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत मिळते. याशिवाय त्यांच्या पायांना अतिशय तीक्ष्ण अशा नख्या असतात. आणि त्यांच्या मानेवर निळ्या, जांभळ्या किंवा हिरव्या रंगांमध्ये हलकेसे पट्टे असतात. चोचेवर असणाऱ्या दोन छिद्ररूपी नाका मधून ते आपला श्वास घेत असतात.
कबुतराच्या विविध प्रजाती:
जगभरात कबुतराच्या तिनशेहूनही अधिक प्रजाती आढळतात. जे प्रजातीनुसार पांढऱ्या, तपकिरी, किंवा राखाडी या रंगांमध्ये दिसतात. त्यांच्या प्रजातीनुसार त्यांच्या पायांचा रंग देखील काही प्रमाणात बदलत असतो. शांततेचे प्रतीक असणारे पांढरे कबूतर दिसायला अतिशय सुरेख असतात. त्यामुळे त्यांना पाळले जाते.
कबुतरांमधील प्रजनन:
मानवाप्रमाणे कबुतर देखील आपल्या मादी जोडीदाराला कधीही सोडत नाहीत. वसंत ऋतुच्या दरम्यान त्यांच्यामध्ये प्रजनन होते. मादी एका वेळी ला दोन अंडी देत असते. ज्यांना नर व मादी असे दोघेही उबवतात. यातील मादी रात्री तर नर दिवसा अंडी उबवत असतात. या अंड्यांमधून सुमारे १९ ते २० दिवसानंतर पिल्ले बाहेर येतात.
कबुतरा बद्दल काही मनोरंजक तथ्य:
- कबूतर अतिशय चांगल्या नजरेचा असतो, �����ो जवळपास २६ मैल दूर अंतरावरील गोष्टी देखील बघू शकतो.
- जगाच्या पाठीवर सुमारे ४०० दशलक्ष पेक्षाही अधिक कबूतर सध्या वास्तव्य करत आहेत.
- मित्रांनो, आरशासमोर घेऊन गेल्यास इतर प्राणी त्याला तोच मारतात,मात्र कबूतर असा पक्षी आहे जो स्वतःला आरशामध्ये देखील ओळखू शकतो.
- आपल्याला मानवी वस्तीमध्ये एकट्याने आढळणारे हे कबूतर मात्र जंगलामध्ये २० ते ३० च्या टोळीने राहतात.
- मादी कबूतर एका वेळी फक्त दोन ते तीनच अंडी घालते.
- इतर पक्षांपासून वेगळी वैशिष्ट्य म्हणजे, कबुतराच्या पिल्लांचे पालन पोषण व अंडी उबविण्याचे कार्य नर आणि मादी दोघेही समान प्रमाणात करतात.
- कबुतराचे नर व मादी दोघेही आपल्या पिल्लांना खाऊ घालतात.
निष्कर्ष:
या लेखांमध्ये आपण कबूतर या पक्षाविषयी माहिती बघितली. ज्यामध्ये तुम्हाला कबुतराच्या शरीराचे प्रकार, त्यांच्या प्रजाती, अन्न खाण्याच्या आणि आहाराच्या सवयी, राहण्याचे ठिकाण, पुनरुत्पादनाची पद्धत, आणि विविध तथ्ये वाचायला मिळाली असतील.
कबूतर हा खूपच हुशार असा प्राणी आहे, जो स्मरणशक्तीसाठी ओळखला जातो. कारण सुमारे दोन हजार किलोमीटर लांब उडल्यानंतर देखील हा पक्षी त्याच मार्गाने न चुकता आणि पत्ता न विसरता पुन्हा येऊ शकतो. तसेच त्याने एकदा एक ठिकाण बघितले, की पुन्हा तो कधीही आयुष्यभर हे ठिकाण विसरत नाही. त्यामुळे कबुतराचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. ज्यामध्ये प्रामुख्याने संदेशवहनाचे कार्य समाविष्ट होते.
कबूतर या पक्षाकडून मानवाने चांगल्या बुद्धीचा गुण घेतला पाहिजे, जेणेकरून मानवाला प्रगती करणे आणखीनच सोयीचे होईल. हा पक्षी माता लक्ष्मी यांचा अधिवास घेऊन येत असतो, त्यामुळे अनेक लोक कबुतर पाळण्याला प्राधान्य देतात. मात्र पाळण्याकरिता शक्यतो पांढऱ्या रंगातील कबुतराचा वापर करण्याकडे लोकांचा कल असतो.
FAQ
कबुतरांचा नैसर्गिक अधिवास कोणता आहे?
कबूतर हे पृथ्वीवरील प्रत्येकाच ठिकाणी आढळून येतात. ज्यामध्ये दलदलीचे जंगले, वर्षावने व समशितोषण पानझडी जंगलांचा समावेश होतो. या बरोबरीनेच अनेक इमारतींच्या बेचक्यामध्ये या कबुतरांचे घरटे आढळून येतात.
कबुतरांचे प्रमुख अन्न कोणते आहे?
मित्रांनो, कबुतरे हे विविध प्रकारचे अन्न खातात. ज्यामध्ये कीटक, शिळे अन्न, किंवा मानवांनी फेकलेल्या खाद्य पदार्थांचा देखील समावेश होतो. जंगलात राहणारे कबूतर विविध फळे, बिया, भाज्या, किडे, आणि लहान कीटक यांचे सेवन करतात.
कबुतरा बद्दल वैशिष्ट्ये काय सांगता येतील?
कबूतर हा लहान आकाराचा पक्षी असून अतिशय हुशार असतो. हा पक्षी अतिशय जलदरीत्या उडू शकतो, कारण त्याचे पंख अतिशय मजबूत स्नायू असलेले असतात. तसेच कपाळाच्या जवळ त्वचेची खोगी आढळून येतात. हा पक्षी विशिष्ट फुंकर मारत गूटरगु आवाज काढत असतो.
कबूतर या पक्षाचे साधारण आयुष्यमान किती समजले जाते व त्यांची संख्या पृथ्वीवर किती आहे?
कबूतर या पक्षाचे साधारण आयुष्यमान हे २० ते २५ वर्षे इतके समजले जाते. आणि आपल्या पृथ्वीवर सुमारे ४०० दशलक्ष पेक्षाही अधिक कबुतरांची संख्या आढळून येते.
कबुतराच्या स्मरणशक्ती बद्दल काय सांगता येऊ शकते?
कबूतर हे एकदा बघितलेले स्थळ कधीही विसरत नाहीत, आणि त्यांना सूचित केल्यास ते त्या ठिकाणी संदेशवहनाचे कार्य करू शकतात. याशिवाय कबूतर पक्षी २००० किलोमीटर दूर जाऊन देखील संपूर्ण रस्ता लक्षात ठेवू शकतो, आणि त्याच मार्गाने न चुकता परत देखील येऊ शकतो.
आजच्या भागामध्ये आपण कबूतर या पक्षाविषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना कबुतराची माहिती आणि त्याच्या ज्ञानाविषयी आणि वैशिष्ट्यांविषयी माहिती व्हावी म्हणून हा लेख त्यांच्यापर्यंत शेअर करा.
धन्यवाद…