प्रतापगड किल्याची संपूर्ण माहिती Pratapgarh Fort Information In Marathi

Pratapgarh Fort Information In Marathi महाराष्ट्र म्हटलं की ऐतिहासिक गड किल्ल्यांची मोठी रेलचेल बघायला मिळते. महाराष्ट्रामध्ये १६ व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्य केले, त्यावेळी त्यांनी अनेक किल्ले जिंकून घेतले. आणि सोबतच मोठ्या प्रमाणावर किल्ल्यांची निर्मिती देखील केली. त्यामुळे आज महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर किल्ल्यांची संख्या बघायला मिळते.

Pratapgarh Fort Information In Marathi

प्रतापगड किल्याची संपूर्ण माहिती Pratapgarh Fort Information In Marathi

असाच एक प्रचंड किल्ला म्हणजे प्रतापगड होय. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये हा प्रतापगड वसलेला असून, महाबळेश्वरच्या टेकडी जवळील एक सुप्रसिद्ध किल्ला आहे. जमिनीपासून ३५०० फूट उंचीवर असणारा हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेला आहे. या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे याची मूळ तटबंदी अजूनही तशीच आहे.

आजच्या भागामध्ये आपण या प्रतापगड किल्ल्याविषयी माहिती बघणार आहोत.…

नावप्रतापगड
प्रकारकिल्ला
उपप्रकारगिरिदुर्ग अर्थात डोंगरी किल्ला
स्थापत्यकारमोरोपंत त्र्यंबक पिंगळे
बांधकाम पूर्ण१६५६
मालकछत्रपती शिवाजी महाराज

प्रतापगड किल्ल्याचा इतिहास:

प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वारे बांधण्यात आलेला आहे, हे आपल्याला माहितीच आहे. यासाठीची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्यावर सोपवली होती. त्यांनी १९५६ ते १९५९ या दरम्यान किल्ल्याचे बांधकाम केले, आणि याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची लढाई झाली.

अफजलखानाचा वध केल्यानंतर मराठा साम्राज्याला चांगले दिवस आले, कारण या विजयानंतर मराठा साम्राज्याच्या वर चाल करून येण्याचे कुणीच धाडस करत नसे. त्यानंतर थेट इंग्रजांच्या काळामध्ये हा किल्ला इंग्रजांना द्यावा लागला, तोपर्यंत हा किल्ला अगदी अभ्यद्य होता. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ३० नोव्हेंबर १९५७ या दिवशी त्या वेळचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शिवाजी महाराज यांचा सुमारे १७ फूट उंचीचा ब्रांझ धातूपासून बनवलेला पुतळा या किल्ल्यावर उभारला.

प्रतापगड किल्ला बघताना लक्षात ठेवण्याच्या काही टीप किंवा सल्ले:

तुम्ही महाबळेश्वर फिरायला गेलात तर तेथून केवळ २५ किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याला नक्की भेट देत असाल.

ज्यावेळी तुम्ही प्रतापगड किल्ला बघायला येतात, त्यावेळेस जवळीलच महाबळेश्वर हिल स्टेशन आणि आसपासच्या अनेक मंदिरांना देखील भेट द्यावी. जेणेकरून तुमच्या एकाच प्रवासामध्ये अनेक ठिकाणांना भेटी देऊन होतील.

बाहेर गेले की काय खावे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. प्रतापगड किल्ल्याजवळ रस्त्याने अनेक चांगल्या दर्जाचे जेवण पुरवणारे भोजनालय आहेत. मात्र तुम्हाला घरगुती जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर जवळीलच वाडा या गावी तुम्हाला घरगुती प्रकारचे जेवण मिळू शकेल.

प्रतापगड हा किल्ला चढताना मोठ्या प्रमाणावर धाप किंवा दम लागत असते. आणि माणसाला पाण्याची आवश्यकता भासते. परिणामी वर जर पाणी मिळाले नाही, तर शरीर डिहायड्रेट होऊ शकते. त्यामुळे वर जातानाच खालून बाटलीमध्ये पाणी घेऊन जावे. मात्र असे असले तरी देखील किल्ल्यावर चार तलाव असून त्यातील पाणी पिण्यासाठी योग्य समजले जाते. अनेक पर्यटक येथे पाणी पितात.

प्रतापगड किल्ल्याला भेट देण्यासाठी कोणता वेळ उत्तम समजला जातो:

वर्षातील कोणत्याही दिवशी या किल्ल्यावर भेट दिली जाऊ शकते. मात्र किल्ल्याची भौगोलिक परिस्थिती आणि हवामानाचा विचार केला तर ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये या किल्ल्याला भेट देणे एक चांगला अनुभव तुमच्या गाठीशी बांधू शकते. या दिवसांमध्ये तुम्हाला प्रतापगडच्या आसपासच्या परिसराचे वैभव बघायला मिळेल. शिवाय तुमचा प्रवास देखील खूपच आरामदायी आणि लक्षात राहण्याजोगा होईल. ते केवळ या कालावधीत असणाऱ्या हवामानामुळे.

प्रतापगडावर कसे जावे:

प्रतापगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील एक मार्ग महाड पोलादपूर मार्गे जातो. तर दुसरा मार्ग महाबळेश्वर मार्गे जातो. वाडा या जवळीलच गावातून प्रतापगडापर्यंत एक रस्ता आहे. तसेच तुम्ही विमानाने येत असाल तर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून तुम्ही टॅक्सी किंवा बसणे प्रतापगडावर पोहोचू शकता.

तसेच बसने जायचे असेल तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक एसटी बसेस उपलब्ध आहेत. तसेच प्रतापगड दर्शन नावाची एक स्पेशल बस सेवा देखील आहे. ज्याद्वारे तुम्ही थेट गडावर देखील पोहोचू शकता.

निष्कर्ष:

प्रतापगड हा किल्ला डोंगरामधील एक किल्ला असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत या किल्ल्याचे बांधकाम केले होते. जे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्यावर सोपविले होते.

इसवी सन १६५६ मध्ये पूर्ण झालेल्या या किल्ल्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे, कारण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये मोठी लढाई झाली होती. जेथे महाराजांनी अफजल खानाचा वध करून मोठा विजय प्राप्त केला होता.

ज्यामुळे गनिमांमध्ये एक भीतीचे वातावरण पसरले होते, हा विजय स्वराज्याच्या वाढीसाठी खूप मोठा फायदेशीर ठरला होता. त्यामुळे शक्यतो कोणी मुघल स्वराज्यावर चालून येण्याचे धाडस करायला घाबरत असे. आज आपण या घटनेची साक्ष असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याची माहिती बघितली. यामध्ये तुम्हाला प्रतापगड किल्ल्याचा इतिहास, त्यावरील काही महत्त्वाच्या इमारती, किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ, किल्ल्यावर पोहोचण्यासाठी चे पर्याय यांसह अनेक प्रश्न उत्तरे देखील बघितली.

FAQ

प्रतापगड किल्ल्याला पूर्वी काय नाव देण्याचे ठरले होते?

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ ते १६५९ या कालावधीमध्ये प्रतापगड किल्ल्याची निर्मिती केली, हे आपल्याला माहितीच आहे. मात्र हा किल्ला ज्या डोंगरावर बांधण्यात आला त्या डोंगराचे नाव भोरप्या डोंगर असे होते. त्यामुळे या किल्ल्याला देखील भोरप्या किल्ला असे नाव द्यावे असे ठरत होते, मात्र त्याऐवजी प्रतापगड हे नाव देण्याचे ठरले.

प्रतापगड किल्ल्यावरील पायऱ्यांची संख्या किती आहे?

तुम्ही जर कधी प्रतापगड किल्ल्याला भेट दिली असेल तर तुमच्या लक्षात येईल, की या किल्ल्यावरील पायऱ्या अतिशय उंच आहेत. ज्यांची संख्या सुमारे ५०० इतकी असून या पायऱ्या चढताना त्यांच्या उंचीमुळे खूप दम लागतो.

प्रतापगड किल्ल्या जवळील महत्त्वाचे शहर कोणते आहे व तेथून किती अंतरावर आहे?

प्रतापगड किल्ल्याच्या सर्वात जवळील शहर म्हणून महाबळेश्वरला ओळखले जाते. जे प्रतापगड किल्ल्यापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर आहे. आणि यासाठी तुम्हाला केवळ चाळीस मिनिटांचा प्रवास करावा लागेल.

प्रतापगड किल्ल्याचे वैशिष्ट्य काय सांगता येईल?

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३५४३ फूट उंचीवर असून, अतिशय खडतर मार्गातून येथे पोहोचता येते. त्यामुळेच १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाशी केलेल्या लढाईमध्ये महाराजांनी विजयी मिळवला. इत्यादी घटनांमुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

प्रतापगड किल्ला बघताना खानापानाच्या गोष्टींबद्दल काही सल्ला द्याल?

प्रतापगड किल्ला बघायला जाताना वाटेत अनेक उच्च दर्जाचे जेवण पुरवणारे भोजनालय मिळतात. तसेच जवळीलच वाडा या गावांमध्ये तुम्हाला घरगुती स्वरूपाचे अन्न देखील खायला मिळेल. तसेच किल्ल्यांच्या जवळ काही खाद्यपदार्थ विक्रेते देखील बसलेले असतात, मात्र गडावर फिरताना तुम्ही खालूनच पाणी घेऊन जाणे महत्त्वाचे ठरते.

आजच्या भागामध्ये आपण प्रतापगड या अजिंक्य किल्ल्याबद्दल माहिती घेतली, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा. याशिवाय तुम्ही कधी प्रतापगड किल्ल्यावर गेले आहात काय? आणि येथील कोणत्या गोष्टीने तुमचे मन वेधून घेतले याबाबत देखील तुमचे विचार मुक्तपणाने कमेंट सेक्शन मध्ये लिहा. तसेच तुमच्या सोबत प्रतापगड बघण्यासाठी आलेल्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती शेअर करून जुन्या आठवणींना नक्की उजाळा द्या.

धन्यवाद…

Leave a Comment