ससा प्राण्याची संपूर्ण माहिती Rabbit Animal Information In Marathi

Rabbit Animal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो इंग्रजी मध्ये रॅबिट म्हणून ओळखला जाणारा प्राणी म्हणजे ससा. एक अतिशय सुंदर आणि गोंडस असणारा हा प्राणी लोक आवडीने घरी पाळतात. ससा हा प्राणी खूप हुशार असतो, आणि तेवढाच धूर्त देखील असतो. मांजर व ससा यांच्यामध्ये एका गोष्टीमध्ये साम्य आहे, ते म्हणजे ज्यावेळी सशाची पिल्ले जन्माला येतात तेव्हा ते देखील आंधळे असतात.

Rabbit Animal Information In Marathi

ससा प्राण्याची संपूर्ण माहिती Rabbit Animal Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण ससा या प्राण्याबद्दल सखोल माहिती बघणार आहोत.

नावससा
इंग्रजी नावRabbit
हिंदी नावखरगोष
शास्त्रीय नावओरिक्टोलागस क्यूनिक्युलस
सरासरी आयुर्मान ७ ते १२ वर्षे
सरासरी झोप ८.४ तास
सश्याचा वेगप्रतितास ४० किमी
वजनएक ते अडीच किलो
प्रकारसस्तन प्राणी

मित्रांनो, ससा हा एक अतिशय छोटासा मात्र तितकाच सुंदर प्राणी आहे. तो लहान असला तरी सस्तन प्राण्यांच्या गटांमध्ये मोडतो. जगभरात ससा या प्राण्याच्या तब्बल आठ प्रजाती बघायला मिळतात. गवताळ ठिकाण, जंगल, वाळवंट, वन इत्यादी ठिकाणी राहणारे हे ससे खूपच चपळ असतात, त्यामुळे सहसा ते शिकाऱ्याच्या हाती लागत नाहीत.

४० ते ५० सेंटिमीटर लांबीचा हा प्राणी वजनाने दोन किलो पर्यंत असतो, ज्याचा कुठलाही फायदा नसूनही लोक त्याच्या सौंदर्यामुळे पाळतात.

ससा या प्राण्याची शारीरिक रचना:

मित्रांनो, ससा हा प्राणी दिसायला लहान असला, तरी देखील त्याची शारीरिक रचना अतिशय गुंतगुंतीची आणि किचकट असते. या लहानशा सशाला तब्बल २८ दात असतात. ज्यांची संख्या प्रजननानंतर नेहमीच वाढत असते. त्यांचे शरीर खूप मुलायम आणि चांगला पोत असलेले असते.

जास्तीत जास्त वेळा, पाळण्यासाठी काळा किंवा पांढऱ्या सशाची निवड केली जाते. मात्र जंगलामध्ये तुम्हाला करड्या, तपकिरी, भूरक्या यांसारख्या विविध रंगछटांमध्ये ससे आढळून येतात. सशाचे डोळे हे अतिशय अचूक आणि दहा सेंटिमीटर घेर असलेले असतात. ज्यामुळे त्यांना ३६० अंशावर म्हणजेच सर्वच दिशांना बघणे सहज शक्य होते.

ससा या प्राण्याची मादी एकावेळी तब्बल नऊ किंवा त्याहूनही अधिक पिल्ले सांभाळू शकते, यावरून या लहानश्या सशाच्या इच्छाशक्ती बद्दल आणि ताकतीबद्दल तुम्हाला कल्पना येऊ शकेल.

ससा या प्राण्याच्या खानपानाच्या सवयी:

मित्रांनो, ससा हा एक शाकाहारी प्राणी असल्यामुळे तो नेहमी शाकाहारी अन्नच खात असतो. ज्यामध्ये गवत, फळभाज्या, पालेभाज्या, फळे, अन्नधान्य इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. सशाचे दात अत्यंत मजबूत असल्यामुळे ते कठीण भाज्या देखील सहजतेने कापू शकतात, जसे की गाजर. ज्यावेळी ससा गाजर खायला सुरुवात करतो त्यावेळेस गाजर काढून विक्रीसाठी परिपक्व झाले असा मापदंड अनेक शेतकरी वापरताना दिसतात.

ज्यावेळी ससा पाळला जातो त्यावेळी त्याला मुख्यत्वे करून जनावरांना खाऊ घालण्याचा घास खायला दिला जातो. या बरोबरीनेच विविध पालेभाज्या, त्यांचे देठ आणि सशाचे सर्वात आवडीचे अन्न म्हणजे गाजर खायला दिले जाते. मात्र हे अन्न खाण्यापूर्वी ससा त्याची दरवेळी चाचपणी करत असतो.

ससा या प्राण्यांमधील प्रजनन व्यवस्था:

ससा या प्राण्याची मादी सर्वसाधारणपणे ३५ दिवसांपर्यंत गर्भधारणा करत असते. आणि पिले जन्माला घालताना त्यांची संख्या तब्बल नऊ पर्यंत सुद्धा असू शकते. जन्माला येताना पिले अगदीच मानवाप्रमाणे म्हणजेच अंगावर कुठेही केस नसलेले असतात. आणि मांजराप्रमाणे त्यांचे डोळे देखील बंद असतात. त्यांचे हे डोळे जन्मानंतर तब्बल पंधरा दिवसांनी उघडतात, तोपर्यंत मादी ससा या पिल्लांची काळजी घेत असतो.

ससा या प्राण्याचे साधारण वय:

मित्रांनो, कुठलाही प्राणी असो त्याला एक निश्चित आयुष्यमान लाभलेले असते. त्याचप्रमाणे सशाला देखील साधारणपणे आठ ते बारा वर्षांचे आयुर्मान लाभलेले आहे. ससा हा प्राणी खूपच ऍक्टिव्ह आणि सतत उड्या मारत असल्यामुळे त्याचे आयुष्यमान कमी होते, असे काही लोक सांगतात.

आजकाल कमी वयातल्या सशांची शिकार करण्याकडे शिकारी वळताना दिसत आहे, त्यामुळे सश्यांची संख्या कमी होण्याबरोबरच त्यांचा साधारण आयुष्य मानाचा कालावधी देखील खाली आल्याचे दिसून येत आहे.

ससा या प्राण्याबद्दल काही महत्त्वपूर्ण तथ्य:

मित्रांनो, ससा हा प्राणी खाण्याच्या बाबतीमध्ये खूपच परर्टिक्युलर आहे. तो त्याला आवडणाऱ्या पदार्थांचेच सेवन करतो. तसेच जेवणाआधी त्या पदार्थांचा सर्व पद्धतीने वास घेतल्यानंतर आणि खात्री झाल्यानंतरच तो हा पदार्थ खाण्यास घेतो. तोपर्यंत त्या पदार्थाला तो तोंड देखील लावत नाही.

ससा हा सुमारे सात तास खात असतो.

सशाचे डोळे खूपच शक्तिशाली असून, त्यांचा घेर हा तब्बल दहा मिलिमीटर पर्यंत असतो. या डोळ्यांचा वापर करून ससा चारही दिशांना सहजतेने पाहू शकतो. म्हणून त्याचे डोळे 360 अंश फिरतात असे म्हटले जाते.

मित्रांनो, चीन हा देश विविध प्राण्यांचे मांस खाण्यामध्ये अग्रेसर आहे हे आपल्याला माहितीच आहे. मात्र त्यांनी सशाच्या बाबतीत एक विक्रम केलेला आहे, जो म्हणजे जगातील सर्वाधिक सशाचे मांस तयार करणाऱ्यांमध्ये चीनचा प्रथम क्रमांक लागतो.

ससा हा प्राणी दिवसभर उड्या मारत असला तरी देखील त्याची झोप देखील खूप आहे. हा प्राणी सुमारे सात ते नऊ तास सलग झोपू शकतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, ससा हा अतिशय गोंडस दिसणारा मात्र तेवढाच हुशार व धुर्त असणारा प्राणी आहे. ससा हा जंगलात राहणारा प्राणी असला तरी देखील आजकाल त्याच्या चांगल्या दिसण्यामुळे आणि आकर्षक केसांमुळे त्याला पाळले जाते. जंगलामध्ये विविध काळ्या, करड्या, तपकिरी, यांसारख्या रंगांमध्ये आढळणारा हा ससा पाळण्यासाठी मात्र पांढऱ्या रंगाची निवड केली जाते.

मित्रांनो, ससा पाळणे हे वैभवाचे लक्षण समजले जाते. जंगलामधील ससा विविध झाडे, कोवळी पाने, लहान आणि कोवळ्या भाज्या यांवर आपली उपजीविका करतो. तर पाळीव सशाला खाण्यासाठी घास, गवत, गाजर, विविध भाज्या इत्यादी गोष्टी दिल्या जातात. मित्रांनो, आज आपण या सशाबद्दल इत्यंभूत माहिती पाहिली. या माहितीनुसार तुम्हाला विविध प्रजाती, त्यांचे राहणीमान, सशाबद्दलच्या विशेष गोष्टी, त्याची शरीर रचना आणि विशेष तथ्य इत्यादी गोष्टींबद्दल नक्कीच माहिती मिळालेली असेल.

FAQ

ससा या प्राण्याची वैशिष्ट्ये काय सांगता येतील?

ससा हा प्राणी अतिशय चपळ आणि नेहमी उड्या मारत राहणारा आहे. त्यांना इकडून तिकडे उड्या मारणे, आणि बराच काळासाठी झोप घेणे या गोष्टी फार आवडतात. ज्यावेळी सशाकडे कुठलीही गोष्ट असते तेव्हा तो तिला फेकून आनंद घेत असतो. त्यांना खेळणी देखील आवडत असतात.

सशाच्या आहारामध्ये मुख्यत्वे कोणत्या गोष्टींचा समावेश असतो?

ससा या प्राण्याच्या आहारामध्ये प्रामुख्याने ताज्या आणि कोवळ्या भाज्या, गाजर, गवताची पाने, इत्यादी घटक असतात. तर पाळीव सशाला या गोष्टी आयत्या आणून दिल्या जातात.

सशाचे डोळे कसे असतात?

सशाचे डोळे हे नेहमी ऍक्टिव्ह असतात, आणि या डोळ्यांच्या माध्यमातून तो अगदी चौफेर म्हणजेच ३६० अंशांवर देखील बघू शकतो.

ससा दिवसातील किती वेळ झोप काढतो?

ससा हा प्राणी अतिशय झोपाळू आहे, त्यामुळे तो प्रत्येक दिवशी किमान सात तास तर कमाल नऊ तास झोप घेतो.

ससा या प्राण्याचे अंदाजित आयुष्य किती वर्षांचे असते?

ससा या प्राण्याचे अंदाजीत आयुष्य साधारणपणे आठ ते बारा वर्षे इतके असते. काही ठिकाणी तुम्हाला नऊ वर्षे इतके देखील आयुष्य बघायला मिळेल.

आजच्या भागामध्ये आपण ससा या मूळचा जंगली असणाऱ्या, मात्र आजकाल पाळल्या जाणाऱ्या प्राण्याबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर त्याबाबत प्रतिक्रिया आणि नसेल आवडली तर सूचना आम्हाला कमेंट मध्ये कळवा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती अवश्य शेअर करा .

धन्यवाद…

Leave a Comment