रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Raigad Fort Information In Marathi

Raigad Fort Information In Marathi नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राला दैदीप्यमान असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक वास्तू यांचे क्षणोक्षणी स्मरण करून देत असतात. यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर किल्ले मोलाची भूमिका निभावतात. तसेच या ऐतिहासिक वास्तू पासून स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी देखील प्राप्त होत असतात. आजच्या लेखामध्ये आपण रायगड या स्वराज्याची द्वितीय राजधानी असलेल्या आणि स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या रायगड या किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत…

Raigad Fort Information In Marathi
Raigad Fort Information In Marathi

रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Raigad Fort Information In Marathi

सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये महाड या रायगड जिल्ह्यातील ठिकाणापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर रायगड हा किल्ला वसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडाची दुरुस्ती करून त्या स 1674 मध्ये राज्यभिषेकावेळी स्वराज्याची राजधानी म्हणून स्वीकारली, त्यासाठी दुरुस्ती वेळी अनेक नवीन बांधकामे केली गेली. तसेच संरचनेतही भक्कम बदल करण्यात आले.

किल्ल्याचे नाव रायगड किल्ला
किल्ल्याची उंची2700 फूट
किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग
चढाईचा प्रकार सोपा
ठिकाण रायगड, महाराष्ट्र
जवळचे गाव महाड
डोंगररांग सह्याद्री
किल्ल्याची स्थापना 1030
किल्ल्याला पायऱ्या 1435
मालकी भारत सरकार

रायगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर अर्थातच 2700 फूट उंचीवर आहे. हा गिरीदुर्ग प्रकारातला चढण्यास सोपा आणि सुलभ असा किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम छत्रपतींच्या निवडक सहकार्यांपैकी हिरोजी इंदुलकर यांनी केले आहे. या बांधकामासाठी मुख्य महाल हा संपूर्णतः लाकडी बनविण्यात आला होता. आता मात्र काल ओघाने त्याचे फक्त आधारस्तंभ शिल्लक आहेत.

रायगडास जाज्वल्य इतिहास लाभलेला आहे. रायगड हा  पाचशे वर्षांपूर्वी फक्त एक टेकडीच्या स्वरूपात होता. रायगड या किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी असे ठेवण्यात आले होते. युरोपातील लोक रायगडास ईस्टर्न जिब्राल्टर म्हणून ओळखत असत. रायगड अतिशय दुर्गम आणि अजिंक्य असा किल्ला आहे. याला नंदादीप म्हणूनही ओळखले जाते. याचे कारण म्हणजे त्याचा विस्तीर्ण असा आकार समुद्रसपाटीपासूनची चांगली उंची आणि आसपासच्या दऱ्याखोऱ्यांमुळे यास अजिंक्यत्व प्राप्त झाले होते. शिवरायांपूर्वी हा किल्ला निजामाकडे होता

निजाम याचा वापर प्रामुख्याने कैद्यांना ठेवण्यासाठी करत. तदनंतर छत्रपती शिवरायांनी हा किल्ला रायरीचा वेढा मोहिमेत 6 एप्रिल 1656 मध्ये जिंकून घेतला आणि त्या किल्ल्याची डागडुजी केली. या डागडुजीसाठी कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेला खजिना वापरण्यात आला. आणि अखेर डागडुजी पूर्णत्वास आल्यानंतर समुद्रापासून अगदी जवळ आणि दुर्गम भागात असणाऱ्या या किल्ल्याचे महत्त्व ओळखून शिवरायांनी रायगडास राजधानी करण्याचा निर्णय घेतला.

रायगड किल्ल्याचे विविध दरवाजे

मित्रांनो रायगड किल्ल्यावर महादरवाजा नगरखाना दरवाजा पालखी दरवाजा मेना दरवाजा टायगर दरवाजा हे पाच दरवाजे आहेत. जे किल्ल्याला शत्रूपासून अभेद्य बनविण्याबरोबरच शिवरायांना लढाईसाठीही सोयीचे पडत.

महादरवाजा-

महादरवाजा हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा असून महादरवाजाद्वारेच रायगडात प्रवेश करता येतो. विशेष म्हणजे अगदी हत्ती देखील या दरवाजाला तोडू शकत नाही अशी रचना या दरवाजाची करण्यात आली आहे .याचे बांधकाम सुमारे साडेतीनशे वर्षे पूर्वीचे आहे .हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद होऊन सकाळी सूर्योदयानंतरच उघडतो.

नगाराखाना दरवाजा-

नगरखाना दरवाजा हा बालेकिल्ल्यात जाणाऱ्या मुख्य दरवाजांपैकी एक आहे. हा अगदी सिंहासनासमोरच आहे. विशेष म्हणजे रायगडामध्ये दरवाज्यापासून सिंहासनापर्यंत आवाज जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखी दरवाजा-

पालखी दरवाजे देखील बाले किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी वापरला जातो. 31 पायऱ्या चढल्या की पालखी दरवाजाचे दर्शन होते. हा दरवाजा रायगडावरील स्तंभाच्या पश्चिम दिशेला आहे.असे म्हणतात ,की छत्रपती शिवाजी राजांबरोबरच मासाहेब जिजाऊ आणि राणी या सर्वांच्या पालख्या या दरवाजाने जात म्हणून यास पालखी दरवाजा नाव पडले असावे.

मेना दरवाजा-

मेना दरवाजा हा पालखी दरवाज्याच्या सरळ रेषेत आहे. आपण रोपवे मार्गे गडावर गेलात तर अगदी काहीशा पायऱ्या चढलं की मेना दरवाजा लागतो.

टायगर दरवाजा-

छत्रपतींच्या दूरदृष्टीचा अंदाज कोणासही लागण शक्य नव्हते. छत्रपतींनी आपत्कालीन वेळी वापरता यावा म्हणून या दरवाजाची निर्मिती केली होती. या दरवाजा ने गडावर जाणे अत्यंत कठीण काम होते त्यासाठी कुशावर्त या तलावावरून उतारावर जाऊन गडात प्रवेश करावा लागे. हा दरवाजा शत्रूच्या निदर्शनास पडणार नाही अशा रीतीने बांधण्यात आला होता.

रायगडाबरोबरच पाहण्यासारखे काही ठिकाणे-

माँसाहेब जिजाऊ यांचा पाचाडचा वाडा-

उतार वयात मासाहेब जिजाऊंना रायगडावरील थंड हवा आणि जोरदार वारे सहन होत नसे. म्हणूनच शिवरायांनी जिजा मातेसाठी पाचाड येथे एक वाडा बांधला होता. येथे जिजामातेसाठी छानशी पायऱ्यांची विहीर बांधली होती. आणि त्यावर बसण्यासाठी दगडी आसन देखील घडविले होते. त्या विहिरीला तक्काची विहीर म्हणून संबोधले जाते.

चोर दिंडी-

महादरवाज्यापासून उजवीकडच्या टकमक टोकाकडे जाताना तटबंदीच्या कडेने शेवटी चोर दिंडी दिसते. या बुरुजाच्या आतल्या बाजूने दरवाजापर्यंत पायऱ्या आहेत.

खूबलधा बुरुज-

गडावर अगदी सुरुवातीलाच चढणीला हा बुरुज आढळून येतो. या बुरुजा पुढील दरवाजास चित्र दरवाजा म्हणून ओळखले जाते. मात्र आज हा दरवाजा मोडण्यात आलेला आहे.

हत्ती तलाव-

छत्रपतींच्या सैन्यात हत्तींची कुमक देखील मोठ्या प्रमाणात होती. या हत्तींना अंघोळीसाठी तसेच पाणी पिण्यासाठी गडावर व्यवस्था हवी म्हणून हत्ती तलावाची निर्मिती करण्यात आली होती.

गंगासागर तलाव-

या तलावाचे पाणी प्रामुख्याने शिबंदीसाठी वापरण्यात येत असे. महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर सप्तसागर तसेच महान्यांनी घेऊन आलेली देवळे या तलावात फेकल्यामुळे यास गंगासागर असे म्हटले जाते अशी आख्यायिका आहे.

रत्नशाळा

राजवाड्याच्या पूर्व दिशेला मोकळ्या परिसरात एक तळघर आढळून येते. यास रत्नशाळा म्हणून ओळखले जाते. काही इतिहासकारांच्या मते ही गुप्त चर्चेची खोली असावी असाही कायास बांधला जातो.

राज्यसभा-

राज्यसभा ही तीच जागा आहे जिथे छत्रपती शिवरायांचा स्वराज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्यसभा लांबीला 220 फूट आणि रुंदीला 124 फूट या मापाची आहे. येथे पूर्व दिशेला तोंड करून छत्रपतींचे 32 मनांचे रत्नजडित सुवर्ण सिंहासन स्थापन करण्यात आले होते.

शिरकाई देवी मंदिर-

शिवरायांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूने दिसणारे छोटे खाणी मंदिर म्हणजे शिरकाई देवीचे मंदिर होय. शिरकाई देवीला रायगड किल्ल्याची मुख्या देवता म्हटले जाते. हे मंदिर लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये मावळकर या स्थापत्यशास्त्रज्ञाने बांधले असे सांगितले जाते. हे मंदिर मूळ मंदिर जरी नसले तरी त्यातील मूर्ती मात्र प्राचीनच आहे. शिरकाई देवीचे मूळ मंदिर राजवाड्यालगत होळीच्या टेकडीवर डाव्या बाजूने होते.

छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ-

मंदिराच्या पूर्व दरवाज्यापासून काहीशा अंतरावर जो अष्टकोनी चौक दिसतो ती छत्रपती शिवरायांची समाधी आहे. ही समाधी भवानी टोकाच्या पश्चिमेला तर धान्याचे कोठार आणि बारा टाकी यांच्या डावीकडे आहेत.

हिरकणी बुरुज-

मित्रांनो हिरकणी नावाची गवळी दूध विकण्यासाठी गडावर आली असता सूर्यास्त झाल्यानंतर दरवाजे बंद झाल्यामुळे गडाची तटबंदी उतरून आपल्या घरी गेल्यामुळे छत्रपती शिवरायांनी ति ज्या ठिकाणावरून उतरली तेथे एक बुरुज बांधला. आणि हिरकणीच्या सन्मानार्थ त्यास हिरकणी बुरुज असे नाव दिले.

तसेच छत्रपती शिवरायांचा वाघ्या कुत्रा त्यांच्या निधनानंतर महाराजांसोबत आगीत उडी घेऊन गेला अशी नोंद इतिहासात सापडते. त्याची देखील समाधी गडावर स्थापन करण्यात आली आहे.

रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी चे विविध मार्ग-

रेल्वे मार्गे गडावर जाण्यासाठी गडापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन ही माणगाव रेल्वे स्टेशन आहे. माणगाव रेल्वे स्टेशनला आपण अगदी मुंबई, चेन्नई, बेंगलोर आणि दिल्ली या ठिकाणाहूनही जाऊ शकता. स्टेशनवर पोहोचल्यानंतर पुढे आपण रायगडापर्यंत बस अथवा टॅक्सीने जाऊ शकता.

हवाई मार्गाने रायगडाला भेट देण्यासाठी रायगडाजवळ अगदी जवळ असे कुठलेही विमानतळ नाही. मात्र त्यातही पुणे आणि मुंबई येथील विमानतळे जवळ आहेत. पुणे विमानतळावर उतरल्यानंतर बसने आपण अवघ्या दोन तासात रायगडावर पोहोचू शकतो.

रस्ता मार्गे रायगड वर पोहोचणे तर अगदीच सोपे, त्यासाठी आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच खाजगी वाहनांनी देखील रायगडाला भेट देऊ शकतो.

तर मित्रांनो रायगड किल्ल्याविषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आणखी कुठल्या विषयावर आपणास लेख हवे आहेत याची देखील सूचना आपण आम्हास करू शकता. धन्यवाद.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:-

रायगड किल्ला कोणी बांधला?

छत्रपती शिवाजी महाराज

रायगड किल्ला कुठे आहे?

रायगड

रायगड किल्ल्याचे जाणे नाव काय होते?

रायरी

Leave a Comment