Sachin Tendulkar Information In Marathi मित्रांनो क्रिकेटच्या स्टेडियम मध्ये क्रिकेटचे सामने पाहायला गेल्यावर मुख्य असते ते म्हणजे अवघ्या स्टेडियम मध्ये दुमदुमणारा आवाज तो म्हणजे सचिन सचिन तर मित्रांनो तुम्हाला समजलच असेल की आजच्या लेखात आपण कोणाबद्दल माहिती पाहणार आहोत.
सचिन तेंडुलकर यांची संपूर्ण माहिती Sachin Tendulkar Information In Marathi
तर आज आपण क्रिकेट विश्वामध्ये ज्याला क्रिकेटचा देव असे म्हटले जाते त्या सचिन तेंडुलकर बद्दल माहिती पाहणार आहोत ज्या क्रिकेटपटूचे फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही इतर देशांमध्ये चाहते आहे अशा सुप्रसिद्ध क्रिकेटर म्हणजेच सचिन तेंडुलकर होय असं खूपच कमी वेळा होतं की एखाद्या खेळाडूला केवळ आपल्या देशातच नव्हे तर देशात बाहेरही प्रसिद्धी मिळते क्रिकेटच्या सम्राटाच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील नोंदवला गेलेला आहे.
पूर्ण नाव | सचिन रमेश तेंडुलकर |
जन्म | 24 एप्रिल 1973 |
जन्मस्थान | मुंबई, महाराष्ट्र |
टोपणनाव | मास्टर ब्लास्टर, तेंडल्या, सच्चू |
विशेषता | फलंदाज |
वडील | रमेश तेंडुलकर |
भाऊ | अजित तेंडुलकर |
पत्नी | अंजली तेंडुलकर |
मुलगा | अर्जुन तेंडुलकर |
मुलगी | सारा तेंडुलकर |
जागतिक स्तरावर बोलायचे झाल्यास डॉन ब्रॅडमॅन यांच्या नंतरचे जागतिक स्तरावरील सुप्रसिद्ध खेळाडू म्हणजेच सचिन तेंडुलकर होय त्यांच्यातील फलंदाजीचे कौशल्य म्हणजे काहीतरी मानवी शक्ती असल्याचे भासते चला तर मग मंडळी जाणून घेऊयात त्यांच्या जीवनचरित्र विषयी काही महत्त्वाचे मुद्दे.
सचिन तेंडुलकर यांचे बालपण:-
सचिन तेंडुलकर यांचे पूर्ण नाव हे सचिन रमेश तेंडुलकर हे आहे त्यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झालेला असून अगदी साध्या एका मराठी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. अगदीच साध्या राहणीमानामध्ये ते लहानाचे मोठे झाले सचिन तेंडुलकर यांचे कुटुंबीय हे सचिन देव बर्मन म्हणजेच सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक यांचे खूप मोठे चाहते होते त्यामुळे त्यांच्या नावावरूनच सचिन हे नाव त्यांनी ठेवले.
सचिन तेंडुलकर यांचे शिक्षण:-
त्यांचे वडील हे लेखनाचे काम देखील करायचे ते एक सुप्रसिद्ध कादंबरीकार व लेखक देखील होते त्यांच्या आई देखील वर्किंग वुमन होत्या त्यांच्या आई या विमा एजंट होत्या. त्यामुळे आई वडील दोघेही शिक्षित असल्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण नेहमी अभ्यासाचे व शिस्तीचे राहिलेले आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण हे शारदाश्रम विद्यामंदिर येथून पूर्ण झाले तेंडुलकर यांना लहानपणी टेनिस खेळायची फार आवड होती.
सचिन तेंडुलकरांचे वैवाहिक जीवन:-
सुप्रसिद्ध अमेरिकेचे टेनिस खेळाडू जॉन मॅकनरो हे त्यांचे आवडते खेळाडू होते पण त्यांचे मोठे बंधू अजित तेंडुलकर यांच्यामुळे ते क्रिकेट या खेळाकडे वळाली त्यांच्याकडूनच त्यांना क्रिकेटचा मार्गदर्शन मिळण्यास सुरुवात झाली. डॉक्टर अंजली यांच्याशी सचिन तेंडुलकर यांचा विवाह झाला. त्यांची दोन मुले म्हणजेच अर्जुन आणि सारा तेंडुलकर.
सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट विश्वात पदार्पण:-
सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट विश्वात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे त्यांची कारकीर्द ही फार मोठी आहे. सध्या जरी ते निवृत्त असले, तरी त्यांच्याकडूनच अनेक क्रिकेटचे धडे घेतात सुरुवातीला जेव्हा त्यांना क्रिकेट बद्दल माहिती मिळाली.
तेव्हा ते आपल्या भावासोबत क्रिकेट खेळत असे त्यांचे बंधू अजित तेंडुलकर यांनी सचिन मधले अचूक क्रिकेटर चे असणारे गुण हेरले. जसजशी तेंडुलकर यांची क्रिकेट खेळामध्ये रुची वाढू लागली, तेव्हा त्यांनी त्यात करिअर घडवण्यास सुरुवात केली. त्यांची ओळख रमाकांत आचरेकर जे क्रिकेटचे उत्तम प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात, त्यांच्याशी करून दिली.
आपल्या क्रिकेटची सुरुवात आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकर यांनी सुरू केली सन 1988 रोजी तेंडुलकर यांनी आपला प्रथम सामना खेळला व त्यात ते शंभर धावांवर देखील नॉट आउट राहिले. हा मुंबई विरुद्ध गुजरात संघ असा सामना होता त्या संघातील तो सर्वात तरुण खेळाडू होता पण त्याचीही कामगिरी पाहून सर्वजण अवाक झाले. जस जसा वेळ पुढे गेला तसतसं त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्यास सुरुवात केली.
सचिन तेंडुलकर यांचे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण:-
1989 रोजी पाकिस्तान मधील कराची येथे तेंडुलकर यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला त्यानंतर फैसलाबाद या ठिकाणी झालेल्या कसोटी मालिकांमध्ये त्यांनी पहिले अर्धशतक मिळवले व त्यांची वाटचाल चालूच राहिली सचिन तेंडुलकर जरी यशाची शिखरे चढत होते, तरीसुद्धा पराभवाचा सामना हा त्यांना देखील करावा लागला होता.
आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यांमध्ये त्यांना काही यश मिळत नव्हते परंतु सराव परिश्रम त्यांनी चालूच ठेवले व असे करत सन 1990 रोजी इंग्लंड मध्ये त्यांनी पहिले कसोटी शतक पूर्ण केले. त्यावेळीस ते अकरा वर्षांचे होते त्यांचा अविस्मरणीय खेळ म्हणजे सन 1991 ते 92 यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना एक विलक्षण खेळी केली. कसोटी सामन्यांमध्ये तेंडुलकर यांना तब्बल अकरा वेळा सामनावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
9 सप्टेंबर 1994 रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्यांनी पहिले शतक कमावले भारतीय क्रिकेटपटून पैकी ते असे एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी, दिलीप चषक इराणी चषक रणजी चषक अशी पहिल्याच सामन्यात शतक नोंदवली आहे. जेव्हा सचिन तेंडुलकर हे मैदानात खेळण्यासाठी उतरायचे तेव्हा अख्या स्टेडियम मध्ये त्यांच्या नावाचा जयघोष हा चहूकडे दुमदुमायचा.
सचिन तेंडुलकर यांचे विक्रम:-
आज ते ज्या यशाच्या शिखरावर उभे आहेत त्याचे सर्व श्रेय त्यांनी तब्बल अकराव्या वर्षापासून घेतलेल्या मेहनतीला जाते. त्यांनी मिळवलेले पुरस्कार डॉन ब्रॅडमन या सुप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू नंतर दुसरा सर्वोत्तम कसोटी सामन्यांमधील फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून विवेन रिचर्ड्स यांच्यानंतर सचिन तेंडुलकर यांचं नाव घेतलं जातं .
क्रिकेट विश्वचषक सामन्यांमध्ये ज्या 23 झाली झाल्या होत्या त्यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकर यांना गौरविण्यात आले होते आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा एकमेव क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांना नावाजले देखील जाते 2009 मध्ये त्यांनी 30000 धावांचा टप्पा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पूर्ण केलेला आहे.
सचिन तेंडुलकर यांना मिळालेले पुरस्कार:-
भारतासाठी त्यांचं क्रिकेट क्षेत्रातील योगदान पाहून भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थातच भारतरत्न देऊन भारत सरकारद्वारे त्यांचा गौरव करण्यात आला होता. सन 1994 रोजी अर्जुन पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने त्यांचा गौरव केला. सन 1997 रोजी राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार देखील त्यांनी प्राप्त केला.
1999 रोजी त्यांना पद्मश्री देखील देण्यात आला तर सन 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले सन 2010 मध्ये एलजी पीपल अवॉर्ड्स या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला तर सन 2011 मध्ये क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराचे ते मानकरी ठरले.
सचिन तेंडुलकर यांची निवृत्ती:-
तेंडुलकर यांची क्रिकेटमधून निवृत्ती हा दिवस सचिनच्या चाहत्यांसाठी खूप दुःख देऊन जाणारा दिवस होता, कारण भारताचा अनुभवी क्रिकेट खेळाडू ज्याने क्रिकेट विश्वात भारताला एका वेगळ्याच स्थानी नेऊन ठेवलं होतं, त्या सचिन तेंडुलकरने निवृत्तीची घोषणा केली होती. 23 डिसेंबर 2012 रोजी तेंडुलकर यांनी एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
मुंबई येथे झालेल्या 2013 रोजीच्या शेवटच्या कसोटी मालिकेमध्ये 74 धावा घेऊन त्यांनी क्रिकेट ला कायमचा निरोप दिला खरंतर संपूर्ण भारतासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे की सचिन तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 100 शतके व 34 हजार धावा करून विश्वविक्रम करून भारताला जागतिक स्तरावर एक वेगळीच ओळख मिळवून दिली होती आतापर्यंत कोणत्याही खेळाडूंनी त्यांचा हा विक्रम मोडलेला नाही.
प्लेइंग इट माय वे हे त्यांचं आत्मचरित्र खूप प्रसिद्ध आहे त्यांच्या जीवनावर अनेक चित्रपट देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. प्लेइंग इट माय वे या त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पाच नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई येथे करण्यात आले.
त्या पुस्तकांमध्ये 24 वर्षातील त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्द सांगितलेली आहे या पुस्तकाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् देखील घेतलेली आहे शिक्षण आणि नॉन फिक्शन या श्रेणीमध्ये सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक म्हणून त्याची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स ने देखील घेतलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न:-
सचिन तेंडुलकर चा जन्म किती साली झाला?
24 एप्रिल सन 1973
सचिन तेंडुलकरच्या भावाचं नाव काय?
अजित तेंडुलकर
सचिन तेंडुलकर यांना अर्जुन पुरस्कार कोणत्या साली मिळाला?
1994
सचिन तेंडुलकर यांना पद्मविभूषण पुरस्कार कधी मिळाला?
2008