सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती Savitribai Phule Information In Marathi

Savitribai Phule Information In Marathi नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर जसे की आपणास माहीतच आहे की ज्यांच्यामुळे किंवा ज्यांच्या परिश्रमामुळे आज स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या एक उत्तम शिक्षिकाच नव्हे तर प्रथम महिला शिक्षिका होत्या .तसेच एक चांगल्या कवयित्री, अध्यापिका, समाजसेविका व पहिली शिक्षा घेणारी महिला. म्हणजेच समाज सुधारक सावित्रीबाई फुले होय. आजच्या लेखात आपण त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर या ज्ञानाच्या प्रवासात तुम्हीही आमच्या सोबत असा.

Savitribai Phule Information In Marathi
Savitribai Phule Information In Marathi

सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती Savitribai Phule Information In Marathi

त्यांनी महिलांना चूल आणि मूल या धारणेपासून मुक्त केले व त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याकरिता आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. महिलांसाठी शिक्षण खुले करत असतानाच त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला होता पण त्यांनी हार मानली नाही व महिलांसाठी शिक्षणाची दारं ही खुली केली.

पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले
टोपणनाव ज्ञानज्योती, क्रांतिज्योती
जन्म 3 जानेवारी 1831
जन्मस्थान नायगाव, सातारा, महाराष्ट्र
मृत्यू10 मार्च 1897
संघटनासत्यशोधक समाज
पुरस्कारक्रांतीज्योती
वडीलखंडोजी नेवसे (पाटील)
आईसत्यवती नेवसे
मुलगा यशवंत फुले

सावित्रीबाई फुले यांची प्राथमिक माहिती:-

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव जिल्हा सातारा येथे झाला होता. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ज्या काळी झाला त्यावेळी बालविवाहाची परंपरा ही समाजात खूप रूढ होती. म्हणजेच बालवयातच मुलींचे विवाह करून दिल्या जायचे. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचा देखील विवाह अवघ्या नव्या वर्षी झाला.

त्यांचा विवाह बारा वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्यासोबत करून देण्यात आला. ज्योतिबा फुले हे जन्मतःच अनाथ होते त्यामुळे त्यांचा सगळा सांभाळ त्यांच्या मावस आत्या सगुनाबाई यांनीच केलेला होता. ज्योतिराव फुले यांच्या आत्या सगुनाबाई या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करत होत्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलता देखील यायचे.

ज्योतिबा फुले यांचा सावित्रीबाईंची विवाह झाल्यावर सावित्रीबाई व सगुनाबाई या जेव्हा ज्योतिबा फुले यांना शेतात दुपारी जेवण देण्यासाठी जात असे तेव्हा ज्योतिबा फुले यांनी शेताच्या मागच्या बाजूला आंब्याची एक फांदी काढून त्याचा पेन बनवून त्याच्या साहाय्याने दोघींनाही अक्षर ओळख करून देण्याचे शिक्षण दिले. याच जमिनीवरच्या धुळीतून ही शिक्षणाची तेजस्वी अग्नी जन्माला आली.

सावित्रीबाई फुलेंचे प्रेरणास्थान:-

सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या प्रेरणा प्रवासात असे जाणवले की शिक्षण हेच परिवर्तनाचे एक उत्तम साधन आहे. कारण त्यांचे असे मानने होते की अशिक्षित व्यक्तींना समाजातील आपल्या हक्कांविषयी कसलीच जाणीव नसते. त्यामुळे हक्क प्राप्तीसाठी ते प्रयत्न करीत नाहीत व अनेक गोष्टींपासून ते अलिप्तच राहतात.

सावित्रीबाईंच्या प्रेरणास्थान बद्दल बोलायचे झाले तर ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी मिस्सेल हिने 1840 रोजी पुण्याच्या छबिलदासच्या वाड्यामध्ये मुलींसाठी एक शाळा सुरू केली .सावित्रीबाई देखील तेथेच शिकू लागल्या. शिक्षण घेत असताना त्यांनी थॉमसन क्लार्कसन यांचे जीवन चरित्र वाचले.

थॉमसन क्लार्कसन हे गुलामगिरी विरोधात काम करणारे होते. त्या जीवन चरित्रामध्ये आफ्रिकन गुलामांच्या संघर्षमय जीवनाचा संपूर्ण लेखाजोखा छापलेला होता .हे पुस्तक वाचताना त्यांना समजले की समाजाला शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही .त्यामुळे त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

सावित्रीबाई फुलेंचे शिक्षण:-

लग्नानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली पण तो काळ महिलांच्या शिक्षणासाठी अजिबातच अनुकूल नव्हता. त्यावेळी महिलांना घराच्या बाहेर देखील पडायची परवानगी नव्हती. पण ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना शिक्षित करण्याचे कार्य चालूच ठेवले.

सावित्रीबाई यांच्या शिक्षणाला विरोध हा त्यांच्या घरातूनच सर्वप्रथम झाला. पण ज्योतिबा फुलेंनी तो विरोध जुगारून लावला त्यामुळे त्यांच्या घरावर समाजाने बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या घरातल्यांनी त्यांना घरातून बाहेर काढले परंतु त्यांनी एक शिक्षक म्हणून सावित्रीबाई यांना शिक्षण देणे सुरूच ठेवले.

त्यांनी सावित्रीबाईंचा प्रवेश एका प्रशिक्षण शाळेत करून दिला. समाजातील विरोध पत्करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी असा मानस बाळगला की आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजातील स्त्रियांना देखील आपण शिक्षित केले पाहिजे .पण हे कोणत्याही अग्नी परीक्षेपेक्षा कमी नव्हते.

अशा संघर्षमय प्रवासातून पती ज्योतीराव फुले यांच्या सहाय्याने सन 1848 रोजी सावित्रीबाई यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. शिक्षणाचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यामध्ये भिडे वाडा येथे त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली .ज्यावेळी त्यांनी शाळा सुरू केली ती शाळा ही भारतातील मुलींसाठी असणारी पहिली शाळा ठरली .

त्याकाळी या शाळेत एकूण नऊ मुलींनी प्रवेश घेतला होता .पुढे जाऊन सावित्रीबाई फुले या शाळेच्या मुख्याध्यापिका देखील बनल्या होत्या. त्याच रीतीने भारत देशाच्या पहिल्या शिक्षिका देखील सावित्रीबाई फुले या बनल्या होत्या .सावित्रीबाई फुले यांनी समाजातील मुलींना दिलेले एक बोधवाक्य म्हणजे विनाकारण वेळ व्यर्थ घालवू नका जा आणि शिक्षण प्राप्त करा.

सावित्रीबाई फुले विषयी सामाजिक अवहेलना:-

जसं जसं मुलींना स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व पटत गेलं तसं तसं शाळेतील मुलींची संख्या ही वाढवू लागली. त्यात अभिमानास्पद बाब ही की अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात जास्त होती पण समाजाने ही गोष्ट काही स्वीकारली नव्हती सावित्रीबाई फुले या जेव्हा शाळेत निघत असे त्यावेळी त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागत असे.

त्यांच्यावर शेण ,दगड ,कचरा फेकण्यात यायचा व काही प्रसंगी मारहाण व शिवीगाळ देखील केली जात असे. पण तरीही त्या न डगमगता न हार मानता पुढे चालतच राहिल्या.

सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा:-

अभिमानास्पद बाब म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी कोणाचीच आर्थिक मदत न घेता आपले पती ज्योतिबा फुले यांच्या समवेत सन 1848 म्हणजेच 1 जानेवारी 1848 पासून ते 15 मार्च 1852 पर्यंत अठरा मुलींच्या शाळा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केलेल्या होत्या .

सन 1849 साली पुणे येथील मुस्लिम महिलांना व मुलींना शिक्षित करण्यासाठी एका मुस्लिम मनुष्याच्या घरी म्हणजेच उस्मान शेख यांच्या घरी सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केली. त्यांचे हे शिक्षणातील योगदान पाहून 16 नोव्हेंबर 1852 रोजी त्यांना ब्रिटिश शासनामार्फत गौरविण्यात आले.

सावित्रीबाई फुले यांचे इतर कार्य:-

त्यांचे कार्य हे शिक्षणापुरतेच मर्यादित नसून त्यांनी बालकांसाठी आश्रमे ,तसेच विधवा महिलांसाठी त्यांची परिस्थिती सुधारावी म्हणून त्यांना शिक्षण देणे व त्यांच्यासाठी आश्रम उभारले त्यांनी दलित व अस्पृश्य समाजातील महिलांसाठी देखील अमुलाग्र कार्य केले.

सावित्रीबाई फुले या एक उत्तम कवयित्री देखील होत्या. त्यांनी काव्य फुले व बावनकशी सुबोधरत्नाकर हे उत्तम काव्यरचना केलेल्या आहेत.

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य:-

त्याकाळी बालविवाहाची प्रथा ही समाजात अरुढ होती या प्रथेमुळे लहान बालिका या खूप लहान वयातच मोठ्या संख्येने विधवा होत होत्या. तसेच समाजामध्ये विधवा महिलेने विवाह करू नये अशी प्रथा होती याच कारणामुळे विधवा स्त्रिया या समाजात एकटेपणा, हिंसाचार, छळ, बलात्कार यांच्या शिकार होत असत.

सर्व प्रकारांमुळे समाजात त्यांना इज्जत मिळत नव्हती व त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण देखील सामाजिक भीतीपोटी वाढत होते. स्त्रियांवर होणारा अन्याय त्यांना कदापिही सहन होत नव्हता. त्यामुळे 1853 रोजी सावित्रीबाई फुले यांनी या अशा बालिकांसाठी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली व पाळणाघर देखील सुरू केली. ज्योतिबा फुले यांचा मित्र उस्मान शेख यांच्या घरीच हे बालहत्या प्रतिबंधात्मक गृह चालू करण्यात आले.

सावित्रीबाई फुले यांचे निधन:-

सन 1897 रोजी पुण्यामध्ये भयंकर प्लेगची साथ थैमान घालत होती. पुण्यातील रहिवासी हे पुणे सोडून जात होते. सावित्रीबाईना मानणाऱ्या लोकांनी त्यांना पुणे सोडून जाण्याची विनंती केली प्लेग हा रोग अत्यंत भयंकर होता यातून पिढीतांचे होणारे हाल पाहून लोकांनी पुणे सोडणे पसंत केले .पण सावित्रीबाईंना हे काही पटले नाही पिढीतांना असेच हाल अपेष्टेत सोडून आपण पुणे सोडून जावे हे त्यांना कदापिही मान्य नव्हते .

सावित्रीबाई फुले यांनी  पिडीतांसाठी पुण्याजवळील एका मळ्यामध्ये म्हणजेच ससाणे मळ्यामध्ये दवाखाना सुरू केला. एके दिवशी एक प्लेगग्रस्त लहान चिमुरड्याला दवाखान्यात आणण्यासाठी कोणतीच सोय उपलब्ध नव्हती. त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवाची कोणतीही परवा न करता त्या मुलाला स्वतःच्या खांद्यावर घेतले व आश्रमात आणले.

दुर्दैव असे की सावित्रीबाई फुले या स्वतः या भयंकर प्लेग रोगाच्या बळी ठरल्या व सन 1897 म्हणजेच 10 मार्च 1897 रोजी पुण्यात सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले परंतु त्या अशा व्यक्तिमत्त्वात गणल्या जातात, की ज्यांचे निधन झाले तरी त्यांनी केलेले कार्य हे चिरंतन जिवंत राहते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न :-

सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव काय?

सावित्रीबाई जोतीराव फुले

सावित्रीबाई फुले यांचा विवाह किती साली झाला?

सावित्रीबाई या 9 वर्षांच्या असताना इस 1840 मध्ये त्यांचा विवाह झाला.

सावित्रीबाई फुले जन्म कधी झाला?

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव जिल्हा सातारा येथे झाला होता.

पहिली भारतीय शिक्षिका कोण?

सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका स्त्री, अनाथांची माता आणि स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या प्रणेत्या होत्या.

Leave a Comment