स्टाफ सिलेक्शन कमिशनची संपूर्ण माहिती Staff Selection Commission Information In Marathi

Staff Selection Commission Information In Marathi आपल्या देशामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. याचे कारण म्हणजे नोकरीच्या संख्येपेक्षा नोकरी मागणाऱ्या लोकांची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. अशा वेळेस परीक्षेशिवाय पर्याय उरत नाही. आणि या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षा घ्यायच्या असतील तर चांगली संस्था असणे देखील गरजेचे ठरते.

Staff Selection Commission Information In Marathi

स्टाफ सिलेक्शन कमिशनची संपूर्ण माहिती Staff Selection Commission Information In Marathi

बहुतेक स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्याला एमपीएससी किंवा यूपीएससी आठवते, मात्र त्यांच्या बरोबरीनेच एस एस सी अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन ही देखील एक संस्था सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा घेण्याचे कार्य करत असते.

एमपीएससी यूपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा शक्यतो पदवी कार्यक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी असतात, मात्र स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तुम्ही अगदी दहावी किंवा बारावीचे शिक्षण घेतले असेल तरीदेखील अर्ज करून सदर पात्रतेच्या नोकऱ्या मिळवू शकता. आजच्या भागामध्ये आपण एसएससी बद्दल माहिती घेणार आहोत…

नावएस एस सी
पूर्ण रूपस्टाफ सिलेक्शन कमिशन
कार्यसरकारी नोकरीसाठी विद्यार्थ्यांची निवड करणे
स्तरकेंद्रीय स्तर
अधिपत्यकेंद्र सरकारच्या अधिपत्याखाली

स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे काय:

स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्याला मराठीमध्ये कर्मचारी निवड आयोग असे म्हटले जाते, तो एक केंद्र सरकारच्या अधिनस्त असलेला सरकारी आयोग असून, ज्या अंतर्गत स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय विभागांमधील नोकऱ्यांसाठी निवडले जाते. या सर्व परीक्षा आणि भरती प्रक्रियेचे केंद्र सरकार द्वारे व्यवस्थापन केले जाते.

ज्यावेळी केंद्र सरकारमध्ये कुठल्याही नवीन पदाची निर्मिती केली जाते, तेव्हा या पदाच्या भरती करिता स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्याचे कार्य ही संस्था करत असते. ही एक खूप मोठी संस्था असून या अंतर्गत बऱ्याच पदांसाठीच्या परीक्षा घेतल्या जातात. ज्यामध्ये काही परीक्षा या नियुक्तीसाठी तर काही परीक्षा या पदोन्नतीसाठी असतात.

ज्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या अधिनस्त असलेल्या नोकऱ्या मिळवायच्या असतील, त्यांच्यासाठी एस एस सी हा यूपीएससी साठी एक चांगला पर्याय ठरतो. आणि विशेष बाब म्हणजे या अंतर्गत तुमच्या पात्रतेनुसार अनेक नोकऱ्यांची संधी असते.

स्टाफ सिलेक्शन कमिशन या संस्थेची निर्मिती कशी झाली:

भारत सरकारने केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या नोकऱ्यांमध्ये नागरिकांना सामावून घेण्यासाठी दिनांक ४ नोव्हेंबर १९७५ रोजी एक आयोग स्थापन केला, ज्याचे नाव सब ऑर्डिनेट सर्विसेस कमिशन असे होते. ही संस्था नोकऱ्या वाटपासाठी स्पर्धा परीक्षा घेत असे.

मात्र दोन वर्षानंतर अर्थात २६ सप्टेंबर १९७७ या दिवशी या संस्थेचे नाव बदलून ते स्टाफ सिलेक्शन कमिशन असे करण्यात आले. आज मितीला स्टाफ सिलेक्शन कमिशनचे मुख्यालय भारताच्या राजधानी च्या ठिकाणी अर्थात दिल्ली येथे आहे.

एस एस सी अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण आयकर इन्स्पेक्टर, सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी, निरीक्षक परीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, परराष्ट्र मंत्रालयातील सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक, केंद्रीय दक्षता आयोगातील सहाय्यक, किंवा रेल्वे मंत्रालयाचे सहाय्यक इत्यादी प्रकारच्या नोकऱ्या करू शकता.

एस एस सी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शहराचे वाटप:

स्टाफ सिलेक्शन कमिशन हे अखिल भारतीय स्तरावर कार्य करत असल्यामुळे या अंतर्गत दिल्या गेलेल्या नोकऱ्या संपूर्ण भारतात कुठेही मिळू शकतात. ज्या ठिकाणी नोकऱ्या आहेत अशा शहरांचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये एक्स शहर, वाय शहर आणि झेड शहर असा समावेश होतो.

एक्स विभागातील शहरांमध्ये नोकरी करणाऱ्यांना इतरांपेक्षा काही प्रमाणात जास्त वेतन दिले जाते. मग दुसऱ्या शहरातील कर्मचाऱ्यांचे पद समान असले तरी देखील हरकत नाही. या प्रकारामध्ये भारतातील महत्त्वाच्या शहरांचा अर्थात दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, बेंगळूर, अहमदाबाद, चेन्नई, व हैदराबाद यांचा समावेश होतो.

वाय प्रकारच्या शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला एक्स शहरातील कर्मचाऱ्यापेक्षा काहीसे वेतन कमी मिळत असले तरी देखील झेड प्रकारच्या शहरातील कर्मचाऱ्यापेक्षा जास्त वेतन मिळते. या प्रकारामध्ये भोपाळ, अमृतसर, सुरत, नागपूर, अलाहाबाद, कानपूर, वाराणसी, लखनऊ, फरीदाबाद, वारंगल, पाटणा, आग्रा, इंदूर, भावनगर, गुंटूर, गोरखपूर, रायपूर व भावनगर इत्यादी शहरांचा समावेश होतो.

झेड प्रकारच्या शहरांमध्ये कार्यरत असणाऱ्या कामगारांना बाकीच्यांपेक्षा सर्वात कमी वेतन किंवा पगार दिला जातो. ही शहरे म्हणजे भारतातील इतर अविकासित ठिकाणावरील शहरे आहेत.

एस एस सी परीक्षेचा आराखडा कसा असतो:

एसएससी ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारची चाचणी परीक्षा घेत असते. त्यामध्ये इंग्रजी भाषा, गणित व तर्कशास्त्र इत्यादी विषयांचे प्रश्न असतात. या प्रश्नांची काठिण्य पातळी ही वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी असते, त्यामुळे प्रत्येक प्रकारचा विद्यार्थी या पेपरमध्ये आपले नशीब आजमावू शकतो. जर परीक्षा देण्याआधी परीक्षेची पद्धती योग्य प्रकारे समजून घेतली तरी ही परीक्षा पास होणे काहीही कठीण नाही.

निष्कर्ष:

आजकाल नोकरी मिळणे फार दुरापास्त झालेले आहे. मात्र असे असले तरी देखील लग्नाच्या बोहल्यावर चढू इच्छिणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी मिळवणे एक स्वप्न असते. मित्रांनो सरकारी नोकरी म्हणजे एका जागेसाठी कितीतरी पटीने अर्ज येतात, मग नोकरी कोणाला द्यायची हा प्रश्न सरकार पुढे निर्माण होतो. त्यासाठी सरकारने विविध संस्थांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये एक म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन होय.

हेच स्टाफ सिलेक्शन कमिशन केंद्रीय स्तरावरील विविध नोकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करत असते, आणि त्या मार्फत उमेदवारांना वेगवेगळ्या नोकऱ्यांचे वाटप करत असते. स्टाफ सिलेक्शन कमिशनचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्ही विविध पात्रता आवश्यक असणाऱ्या नोकऱ्या करू शकता. यामध्ये अगदी दहावीपासून पीएचडी पर्यंत देखील पात्रता नुसार नोकऱ्या असतात.

या एसएससी ला अधिनस्त सेवा आयोग असे देखील नाव आहे. त्याची निर्मिती ४ नोव्हेंबर १९७५ मध्ये करण्यात आली होती, आज आपण या स्टाफ सिलेक्शन कमिशन बद्दल माहिती पाहिली.

FAQ

एस एस सी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पास होण्याकरिता कोचिंग घेणे आवश्यक असते का?

एस एस सी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पास होण्याकरिता कोचिंग घेण्याची काहीही आवश्यकता नसते, तुम्ही स्वतः अभ्यास करून देखील उत्तीर्ण होऊ शकता.

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कोणकोणत्या नोकरांसाठी परीक्षा घेतल्या जातात?

स्टाफ सिलेक्शन कमिशन ही सरकारी संस्था असल्यामुळे सरकारी नोकऱ्यांच्या पदांसाठी ती परीक्षा घेत असते. यामध्ये पोलीस अधिकारी, शिक्षक, लष्करी कर्मचारी, व यांसारखे इतरही नागरी अधिकारी यांच्यासाठी परीक्षा होत असतात.

एस एस सी ही संस्था कशाचे काम करते?

एस एस सी ही संस्था सरकारी नोकऱ्यांसाठी विविध स्तरावरील परीक्षा वेळोवेळी घेण्याचे कार्य करत असते. यामध्ये ब आणि क गटातील पदांचा जास्तीत जास्त समावेश असतो.

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांची नावे काय आहेत?

स्टाफ सिलेक्शन अंतर्गत सी जी एल, सी एच एस एल, स्टेनो, जे ई, सी ए पी एफ आणि जे एच टी इत्यादी प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीचे ठिकाण वाटताना या शहरांचे कसे वर्गीकरण करण्यात आलेले आहे?

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीचे ठिकाण वाटताना या शहरांचे एक्स, वाय व झेड अश्या तीन गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे.

आजच्या भागामध्ये आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन याबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कळवा, आणि सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या आपल्या मित्र परिवाराला देखील ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Leave a Comment