त्रिकोणासनची संपूर्ण माहिती Trikonasana Information In Marathi

Trikonasana Information In Marathi आजकाल योग प्रकार खूप प्रचलित होत आहेत, त्यातीलच एक महत्त्वाचे योगासन म्हणजे त्रिकोणासन होय. त्रिकोणासन हा एक संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ तीन अंग असा होतो, कारण या आसनादरम्यान मानवी शरीराचे स्नायू तीन वेगवेगळे कोण तयार करतात, व ताणले जातात. एकाच वेळी तीन वेगवेगळ्या शरीराच्या भागांना स्ट्रेचिंग देण्याची क्षमता असलेले हे आसन स्त्री व पुरुष या दोघांना देखील फायदेशीर ठरत असते. आजच्या भागामध्ये आपण या त्रिकोणासणाबद्दल माहिती घेणार आहोत, चला तर मग सुरु करूया या ज्ञानमय माहितीच्या प्रवासाला…

Trikonasana Information In Marathi

त्रिकोणासनची संपूर्ण माहिती Trikonasana Information In Marathi

नावत्रिकोणासन
प्रकारयोगासन
उपप्रकार तन्यता व्यायामप्रकार
मूळ उगमआयुर्वेद
उद्देशशरीर तानावने
सहउद्देशशरीराला आणि मनाला बळकटी देणे

हठयोग या योगाच्या श्रेणीशी संबंधित असणारे आसन म्हणून त्रिकोणासणाला ओळखले जाते. त्रिकोणासन या शब्दाची फोड त्रिकोण आणि आसन या पद्धतीने केली जाते, याचा अर्थ होतो की तीन कोनांमध्ये आसन करणे किंवा शरीराची स्थिती करणे होय. या आसनामुळे शरीराच्या अगदी पायापासून हातापर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा होतो.

त्रिकोणासन म्हणजे नेमके काय?:

३० सेकंद पुरेसे असणारे आसन त्रिकोणासन ओळखले जाते. हे आसन दिवसातून तीन ते पाच वेळेस केले जाऊ शकते, या आसनाला नियमित केल्यामुळे मांड्या, गुडघे, आणि पायाचे घोटे यांच्यासोबतच हाताचे खांदे, कोपर ,मनगट,  नितंब इत्यादी अवयव बळकट होण्यास मदत मिळते.

वैदिक साहित्यामध्ये सुद्धा या आसनाचे खूप महत्त्व सांगितलेले आहे. ब्रम्हा विष्णू आणि महेश या तीन महान देवतांपासून तयार झालेल्या दत्तगुरूंमध्ये देखील या आसनाचे स्वरूप बघितले जाते. भारतासह इजिप्त मते देखील या आसनाला खूप महत्त्व दिले जाते. ते या आसनाला गिझा पिरामिड शी तुलना करतात. त्याचप्रमाणे काही लोक नक्षत्रातील तीन ग्रहांशी देखील या आसनाची तुलना करतात.

त्रिकोणआसन करण्याचे फायदे:

त्रिकोणासणापासून मिळणारे फायदे समजल्यानंतर तुम्हाला देखील हे आसन करण्याची सवय लागेल, चला तर मग जाणून घेऊया या त्रिकोण आसनाचे फायदे…

पाठदुखीवरील फायदे:

प्रस्तावनेमध्ये आपण पाहिलेच आहे की त्रिकोनासन न केल्यामुळे पाठीचे दुखणे कमी होते. मित्रांनो त्रिकोणासन पाठदुखीवर फायदेशीर आहे, याबाबत एन सी बी आय अर्थात नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन यांनी देखील आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या अभ्यासामध्ये सांगितलेले आहे.

या आसनामुळे शरीर लवचिक होते, त्यामुळे पाठीचे स्नायू आणि कणा मुक्त रीतीने हालचाल करण्यास शक्य होते. परिणामी पाठी मधून येणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते. मित्रांनो त्रिकोणासन हे पाठ दुखीवर गुणकारी आहे, मात्र ते किती स्वरूपात पाठदुखी कमी करते किंवा मुळातून घालवते यावर आणखी संशोधन होणे गरजेचे आहे.

ताणतणाव दूर करण्यासाठी त्रिकोणासणाचे फायदे:

आजकाल धावपळीच्या जीवनामुळे प्रत्येकाला चिंता आणि तणाव यांचा सामना करावा लागत आहे. मात्र सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये त्रिकोणासन केल्यामुळे दिवसभर माणूस अगदी ताणतणाव्यविरहित दिवस घालवू शकतो. ताणतणाव आल्यामुळे झोप देखील कमी लागते, आणि रक्तदाब देखील कमी अथवा जास्त होतो.

मात्र हे आसन या दोन्ही स्थितीमध्ये म्हणजेच चांगली झोप येण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे, याबाबत शास्त्रज्ञांनी पुष्टी केलेली आहे. अनेक संशोधनामध्ये सुद्धा असे दिसून आलेले आहे की त्रिकोणासन करणाऱ्या व्यक्तींमध्ये तानतनावाचे परिणाम कमी दिसून येतात.

पचना वरील विकारात फायदे:

आज-काल फास्ट फूड किंवा बाहेरील अन्न खाण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. मित्रांनो दिसताना बाहेरील अन्न चांगले वाटत असले, तरी देखील त्यामुळे आरोग्याचा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामध्ये अपचन ही एक महत्त्वाची समस्या आहे.

असे असले तरी देखील रोज त्रिकोणासन या आसनाचा सराव केल्यामुळे शरीरातील आवश्यक पोषक तत्वे शरीरामध्ये शोषणास मदत होते. तसेच शरीरातील विविध पचनाशी संबंधित असलेल्या पाचक ग्रंथी यांचे कार्य देखील चांगले होण्यास मदत होते. आणि पोटातील अग्नी उत्तम होतो. त्यामुळे खाल्लेले अन्न चांगले पचते, आणि त्याचे शरीराच्या रक्तामध्ये विविध घटकांच्या स्वरूपात शोषण देखील केले जाते.

स्नायूंची बळकटी व वजन वाढविण्यासाठी फायदे:

आजकालच्या तरुणांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. तसेच वीस ते पंचवीस वयादरम्यानच्या युवकांच्या अंगावर थोडे देखील मांस आढळून येत नाही. त्यामुळे त्यांचे आत्मविश्वास कमी होण्यास सुरुवात होते. पण त्रिकोनासन केल्यामुळे शरीराचे स्नायू ताणले जातात, परिणामी त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन येते. 

हे स्नायू वाढण्याबरोबरच अगदी बळकट देखील होतात, त्यामुळे शरीर देखील अतिशय सुडौल होते आणि स्नायूंची संख्या व वस्तुमान वाढल्यामुळे शरीराचे वजन आपोआपच वाढण्यास मदत होते. शिवाय या आसनामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबीचे रूपांतर स्नायूंमध्ये होते, नितंबाचे मांस वाढते, या सर्वांचे परिणाम सुडौल शरीर आणि चांगले वजन यामध्ये होते.

त्रिकोणासन करण्याची पद्धती:

सर्वप्रथम मोकळ्या हवेमध्ये योगा मॅट अंथरावी. त्यानंतर दोन्ही पायांमध्ये योग्य अंतर घेऊन आपले हात खांद्यापासून आडवे पसरावे. त्यानंतर उजवा हात उचलून कानापर्यंत घ्यावा, आणि श्वास घेत डावा पाय बाहेरच्या दिशेने वळवावा. त्यानंतर श्वास सोडताना मात्र डावीकडे वळवावा, आता डाव्या हाताने पायाच्या घोट्याला स्पर्श करावा, आणि त्याचवेळी उजवा हात जमिनीला समांतर राहील अश्या रीतीने ठेवावा.

या स्थितीमध्ये किमान १० सेकंद ते तुमच्या क्षमतेनुसार कमाल ३० सेकंदापर्यंत थांबावे. आता पुन्हा मूळ स्थितीमध्ये येऊन उजव्या बाजूने पुन्हा याच पायऱ्या पार पाडाव्या. असे कमीत कमी तीन ते चार वेळा करावे…

त्रिकोणासन फायदेशीर असले तरी देखील मोठ्या प्रमाणावर पाठदुखीचा त्रास असताना, मायग्रेन असताना उच्च रक्तदाबाच्या परिस्थितीमध्ये, आणि उच्च ऍसिडिटी जाणवत असेल अशावेळी त्रिकोणासन करणे टाळावे.

निष्कर्ष:

आजच्या भागामध्ये आपण त्रिकोणासन या महत्त्वपूर्ण योगासनाबद्दल माहिती घेतली. ज्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळाली, जसे की त्रिकोणासन या शब्दाचा अर्थ काय आहे?, ते कसे करावे?, त्याचे काय फायदे होतात?, तसेच नवीन त्रिकोण आसन शिकणाऱ्यांनी याचा सराव कसा करावा? हे आसन करण्यासाठीच्या काही टिप्स तसेच काय काळजी किंवा खबरदारी घ्यावी, आणि यानंतर रिलॅक्स कसे करावे इत्यादी प्रकारची माहिती बघितली.

FAQ

कोणाकोणाच्या आजारांमध्ये त्रिकोणासणाने फायदा होतो?

त्रिकोणासन शरीराचे विविध भाग स्ट्रेच करत असल्यामुळे जठरावर जर सूज असेल, छातीत जळजळ होत असेल, किंवा पाठ दुखी किंवा मनका दुखी जाणवत असेल अशा आजारांवर त्रिकोणासन खूपच गुणकारी ठरत असते.

या आसनाला त्रिकोणासन असे नाव का पडले?

मित्रांनो, त्रिकोण म्हणजे तीन कोपरे असलेली आकृती. हे आसन करताना शरीर त्रिकोणाप्रमाणे तीन कोणांमध्ये ताणले जाते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा उघडली जाते. यामुळे याला त्रिकोण आसन असे नाव देण्यात आलेले आहे.

त्रिकोनासन  केल्यामुळे शरीरामध्ये काय बदल दिसून येतात?

त्रिकोणासणामुळे शरीर अतिशय लवचिक होण्यास मदत होते. कंबर आणि पाठ दुखी यांना दूर केले जाते तसेच खांदे भरदार होतात, आणि नितंब मजबूत होण्यास मदत होते.

काही लोकांना त्रिकोणासन टाळणे का सांगितले जाते?

ज्या लोकांना रक्तदाब किंवा जास्त पाठ दुखीचा त्रास असेल, त्या बरोबरीने ऍसिडिटी किंवा मायग्रेन असेल अशा लोकांना त्रिकोणासन न करण्याचा सल्ला दिला जातो…

त्रिकोनासन केल्यानंतर रिलॅक्स करण्यासाठी कोणकोणती असणे केली पाहिजेत?

मित्रांनो, त्रिकोनासनानंतर मुख्यत्वे परिवृत्त, उस्थीत पार्श्व, प्रसारित पादोत्तासन, आणि पार्श्वोत्तासन इत्यादी आसन करण्याचा सल्ला दिला जातो.

आजच्या भागामध्ये आपण त्रिकोणासन याविषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही आवर्जून कळवत असताच, मात्र तुमच्या ज्या मित्रांना हे आसन करायची गरज असेल त्यांना देखील ही माहिती शेअर करून अवश्य पाठवा.

धन्यवाद…

Leave a Comment