Tulip Flower Information In Marathi फुले प्रत्येक सजीवाला आवडत असतात. मग अगदी छोट्याशा किटका पासून तर मानवापर्यंत, प्रत्येक जण फुलांना बघितले की आनंदीत होत असतो. असेच एक सौंदर्यवान फुल म्हणजे ट्युलिप होय.
ट्युलिप फुलाची संपूर्ण माहिती Tulip Information In Marathi
ट्यूलिप हे लिली कुटुंबाचे एक फुल असून, त्याचे आशिया खंडामध्ये सर्वात जास्त प्रमाण आढळून येते. भारताचा विचार केल्यास कश्मीर या राज्यामध्ये ट्युलिप मोठ्या प्रमाणावर फुलते. मूळचे तुर्की या देशातील असणारे हे फुल खऱ्या अर्थाने हिमालयातील होते, असे अनेक लोक मानतात. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर हे फुल फुलते, त्यावेळी हा नजारा बघण्यासारखा असतो.
काही ऐतिहासिक संदर्भानुसार ट्युलिपचे फुले सुरुवातीला सोळाव्या शतकामध्ये युरोप येथे दिसून आले होते. ट्युलिप हा शब्द पार्शिया या भाषेतील असून त्याचा मराठी मध्ये अर्थ पगडी असा होतो. जसे की एका नाजूक दांड्यावर कोणीतरी पगडी ठेवलेली आहे असे वाटते.
आजच्या भागामध्ये आपण ट्यूलिप या फुलाबद्दल इत्यंभुत माहिती बघणार आहोत…
नाव | ट्युलिप |
शास्त्रीय नाव | Tulipa spp |
हायर क्लासिफिकेशन | लिलीओईडी |
कुटुंब किंवा कुळ | लिलीएसी |
ग्रुप | लिलीइ |
किंगडम | प्लांटी |
ऑर्डर | लिलीयाल्स |
जिनस | ट्युलिपा |
वसंत ऋतूमध्ये उमलणारे एक अतिशय सुंदर फुल म्हणजे ट्युलिप होय. हे फुल अगदी तुर्की पासून अफगाणिस्थान, जपान, चीन, सायबेरिया, भारत, कुमायू हिमालय इथपर्यंत फुलते.
सर्वप्रथम तुर्कीमध्ये फुलणारे हे फुल १५५४ मध्ये ऑस्ट्रेलिया, आणि तिथून १५७१ यावर्षी हॉलंडमध्ये पोहोचले. पुढे १५७७ यावर्षी हे फुल इंग्लंड मध्ये देखील पसरले, आणि तिथून ते संपूर्ण जगभर झाले. १५५९ मध्ये केलेल्या काही लेखनांमध्ये या ट्युलिप फुलाचा उल्लेख आढळून येतो. हे फुल आजकाल त्याच्या सुंदर दिसण्यामुळे आणि सौंदर्यामुळे जगभर लोकप्रिय होत आहे.
मुख्यत्वे यात पाच ते सात पाकळ्या असतात. त्यांचा रंग कुठल्या प्रजातीचे फुल आहे यावर अवलंबून असतो. या झाडाला पाने सुद्धा असतात. यांची संख्या तीन ते सात इतकी असते, आणि रंग गडद हिरवा असतो. लांबीचं म्हणाल तर चार ते सात इंच लांब असणारी ही पाने ट्यूलिप वनस्पतीच्या सौंदर्यात भर घालतात.
ट्युलिप फुलाचा रंग आणि त्यांचे विविध अर्थ:
ज्याप्रमाणे गुलाबाचे विविध कलर वेगवेगळ्या गोष्टी दर्शवतात, किंवा वेगवेगळ्या गोष्टींची प्रतिक असतात, तसेच ट्यूलिप या फुलांमध्ये देखील आहे. ज्यामध्ये गुलाबी रंगाचे ट्युलिप फुल आत्मविश्वास व आनंद याचे प्रतीक म्हणून समजले जाते.
तर पांढऱ्या रंगाचा ट्युलिप क्षमा किंवा माफी याचे प्रतीक आहे, तर पिवळ्या रंगाचा ट्युलिप असेल तर तो एक आशावादी ऊर्जा म्हणून ओळखला जातो, आणि स्टार म्हणून समजला जातो. काही ट्यूलिप कीरमीजी रंगांमध्ये सुद्धा असतात, ज्यांना एका उत्कट प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
ट्यूलिप या फुलाचे वैशिष्ट्य:
प्रत्येक सजीवाचे आपले असे काही न काहीतरी वैशिष्ट्य असतेच. मग ते फुल असो, फळ असो, प्राणी असो की वृक्ष. तसेच ट्यूलिप या फुलाचे देखील काही वैशिष्ट्ये आहेत, ते पुढील प्रमाणे…
- ट्युलिपची फुले विविध रंगात येतात, ज्यामध्ये पांढरा, लाल, पिवळा, जांभळा, गुलाबी, इत्यादी रंगांचा समावेश होतो.
- ट्यूलिपच्या फुलांमध्ये पाकळ्यांचा समूह असतो, जो अगदी कपासारखाच दिसतो.
- ट्युलिपच्या या वनस्पतीला चार ते पाचच हिरवी पाने येतात, मात्र ते या वनस्पतीच्या सौंदर्यामध्ये चार चांद लावतात.
- उंचीच्या दृष्टीने ही वनस्पती तीन ते सात इंचापर्यंत वाढते.
- ट्यूलिप या वनस्पतीला रात्रीची राणी म्हणून देखील ओळखले जाते.
- ट्युलिपच्या जगभरात सुमारे ३००० हूनही अधिक वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात.
ट्यूलिपच्या फुलाबद्दल काही मनोरंजक तथ्ये:
- जगभरात ट्युलिपच्या उत्पादनामध्ये नेदरलँड हा देश सर्वात आघाडीवर आहे. जो प्रत्येक वर्षाला सुमारे दोन ते पाच अब्ज किंमतीच्या ट्युलिपची निर्यात करत असतो, जे सर्वाधिक समजले जाते.
- काही वर्षांपूर्वी ट्युलिपची जास्त प्रमाणात लागवड केली जात नसल्यामुळे, त्याच्या किमती प्रचंड होत्या. ज्या सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या नव्हत्या. मात्र आज कोणीही ट्युलिप खरेदी करू शकतो.
- असे म्हटले जाते की १६ व्या शतका दरम्यान ट्युलिप खरेदी करण्यासाठी घर सुद्धा विकावे लागत असे.
- ट्यूलिप या फुलाच्या पाकळ्या खाण्यायोग्य असतात. ज्या कांद्याच्या ऐवजी देखील खाल्ल्या जाऊ शकतात.
- दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अनेक लोकांनी ट्युलिप या फुलाच्या पाकळ्या खाऊन आपले पोट भरले होते.
- ट्यूलिप ही वनस्पती केवळ थंड हवामानातच वाढली जाते.
- हिंदी भाषेमध्ये ट्युलिपच्या फुलाला कंड पुष्प म्हणून ओळखले जाते.
- थंडीमध्ये उगवत असल्यामुळे ट्युलिपची फुले नेहमी सूर्याकडे आपली तोंडे करत असतात.
- अफगाणिस्तान व तुर्कस्तान या दोन देशांनी ट्युलिपच्या फुलाला त्यांच्या राष्ट्रीय फुलाचा दर्जा दिलेला आहे.
- इतर फुलांपासून वेगळे म्हणजे ट्यूलिपच्या कळ्या खूप टिकाऊ असतात. ज्यामुळे त्या खराब होत नाहीत.
- भारतातील श्रीनगर या लोकप्रिय पर्यटनाच्या ठिकाणी एक ट्युलिप गार्डन आहे, जे भारतातील सर्वात मोठे गार्डन म्हणून ओळखले जाते.
- एक ट्युलिपचे फुल साधारणपणे किमान तीन दिवस तर कामाला सात दिवस जगते.
- ट्युलिपच्या वनस्पतीचे आयुष्य हे सुमारे दोन वर्षांपर्यंत असू शकते.
- ट्युलिप या वनस्पतीची लागवड बल्ब अर्थात कंदाच्या साह्याने केली जाते.
- ट्युलिपच्या वनस्पतीला फारसे पाणी लागत नाही, कमी पाण्यात देखील हे फुल चांगले फुलत असते.
निष्कर्ष:
वसंत ऋतूमध्ये उमलणारे आणि आपल्या सौंदर्याने संपूर्ण पर्वतांना रंगीबेरंगी करून टाकणारे फुल म्हणजे ट्यूलिप हे फुल होय. ट्यूलिप हे फुल भारतामध्ये काश्मीर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उगविले जाते. हे फुल अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागते.
बऱ्याच ठिकाणी समारंभामध्ये, बुके बनवणे, सत्कार करणे, भेटवस्तू सोबत देणे, इत्यादी अनेक गोष्टीत या फुलाचा वापर होतो. हे फुल सौंदर्याच्या दृष्टीने उत्तम आहे, त्याचप्रमाणे हे हाताळायला देखील खूप आनंददायी आहे, आणि खाण्यायोग्य सुद्धा आहे. आजच्या भागामध्ये आपण या फुलाबद्दल माहिती पाहिलेली आहे.
FAQ
ट्यूलिप या फुलाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत?
ट्युलिप हे फुल आरोग्यदायी देखील आहे, ज्यामुळे लघवीचे प्रमाण वाढविले जाते. तसेच जुनाट सर्दी आणि खोकला यावर सुद्धा उत्तम समजले जाते. हे फुल कर्करोग, सायनस, ताप आणि डोकेदुखी यासाठी सुद्धा उत्तम समजले जाते.
ट्युलिप फुलाचे वैशिष्ट्य काय आहे?
ट्यूलिप हे फुल अतिशय सरळ वाढते, आणि त्याच्या दांडीवर शेवटी एक छोटेसे मात्र शिरा असलेले आणि रंगीबेरंगी प्रकारचे फुल उमलते. जे दिसायला कपाच्या आकारासारखे दिसते. ज्याचे रंग लाल, पांढरा, पिवळा या प्रकारचे असतात.
काही ट्युलिपच्या फुलाचे रंग फारच वेगळे दिसतात, ते का?
काही वेळेस फुलांचे रंग इतरांपेक्षा फारच वेगळे दिसण्यामागे कारण म्हणजे त्या फुलावर विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झालेला असतो.
ट्यूलिप या फुलांचा खाद्यपदार्थांमध्ये वापर केला जाऊ शकतो का?
ट्यूलिप हे फुल आरोग्यदायी असल्यामुळे ते खाल्ले देखील जाते. सॅलड मधील कांद्याला पर्याय म्हणून हे फुल वापरले जाऊ शकते. तसेच यापासून वाईन देखील बनवली जाऊ शकते.
जगभरामध्ये ट्यूलिप या फुलाच्या किती प्रजाती आढळून येतात?
जगभरामध्ये ट्युलिप या फुलाच्या सुमारे ३००० पेक्षा ही जास्त प्रजाती आढळून येतात.
आजच्या भागांमध्ये आपण ट्युलिप फुलाविषयी माहिती पाहिली, ही माहिती तुम्हाला आवडली असेलच. त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट मध्ये जाणून घ्यायला नक्की आवडेल. तसेच तुमच्या फुलांची आवड असणाऱ्या इतर मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती वाचण्यासाठी नक्की शेअर करा.
धन्यवाद…