Women Empowerment Information In Marathi महिलांना अगदी पूर्वीच्या काळापासूनच समाजामध्ये दुय्यम स्थान देण्यात आलेले आहे. त्यामुळे महिलांची प्रगती होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. मात्र आजकाल सरकारच्या योग्य निर्णयामुळे आणि महिलांसाठी चांगल्या धोरणांची राबवणूक केल्यामुळे महिला सर्व क्षेत्रांमध्ये आघाडी करताना दिसत आहेत. महिला सबलीकरण म्हणजे काय हे समजण्यासाठी तुम्हाला महिला सक्षमीकरण म्हणजे काय हे माहिती असले पाहिजे.
महिला सबलीकरणची संपूर्ण माहिती Women Empowerment Information In Marathi
सशक्तीकरण म्हणजे एखादी व्यक्ती आयुष्यातील सर्व चांगले वाईट निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करतो, तेव्हा त्याला सशक्त झाले असे म्हटले जाते. आणि ज्यावेळी या निर्णयांची जबाबदारी घेऊन ती व्यक्ती यशस्वी होते त्यावेळेस तिला सबल झाल्याचे किंवा सबलीकरण झाल्याचे म्हटले जाते.
महिला या सबलीकरणामुळे कुटुंबावर अवलंबून राहत नाहीत, आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन त्या यशस्वी बनू शकतात. आजच्या भागामध्ये आपण महिला सबलीकरणाबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर मग क्षणाचाही वेळ न दवडता या माहितीच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूयात…
महिला सबलीकरण म्हणजे नेमके काय:
स्त्रियांना दैवी शक्ती म्हणून ओळखले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना देवाचे स्थान दिलेले आहे. अखिल मानव जातीच्या अस्तित्वाकरिता स्त्रीची आवश्यकता फार मोठी आहे. स्त्री नसेल तर संपूर्ण समाज क्षणार्धात नाहीसा होण्यास वेळ लागणार नाही.
स्त्रियांचा विकास घडवणे आणि त्यांना सामाजिक, राजकीय व आर्थिक स्वरूपाचा न्याय प्रदान करणे, तसेच त्यांना आपली मत प्रकट करण्याची संधी देऊन त्यांच्या स्वातंत्र्य, उपासना, धर्म, श्रद्धा, आणि इतर गोष्टींचा आदर करणे व त्यांना प्रत्येक ठिकाणी समान संधी बहाल करणे म्हणजे महिला सक्षमीकरण होय. आणि या सक्षमीकरणातून त्यांना एकट्याने सर्व कामे करणे किंवा कारभार सांभाळणे यांची संधी देणे म्हणजे सबलीकरण होय.
दुसऱ्या भाषण सांगायचे झाल्यास महिलांची सर्वांगीण स्थिती सुधारणे म्हणजे सुद्धा स्त्री सबलीकरण असे मानण्यात येते. ज्यामध्ये स्त्रियांना रोजगार, अर्थ, शिक्षण, सामाजिक स्वातंत्र्य इत्यादी क्षेत्रांमध्ये पुरुषांइतकीच संधी दिली जाते.
भारतामध्ये असणारी महिला सबलीकरणाची गरज:
प्राचीन काळामध्ये स्त्रियांना खूप महत्त्वाचे स्थान दिले जाई. त्यांना राजकारभारात देखील समावेश करण्याची मुभा असे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे देता येईल. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये स्त्रियांना दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्त्री व पुरुष यांच्या कर्तृत्वामधील दरी अधिकच रुंदावत गेली, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर योजनांची अंमलबजावणी करून त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
आजकाल शहरी स्तरावर स्त्रियांचे सबलीकरण झालेले असले, तरी देखील ग्रामीण भागामध्ये अजूनही स्त्रियांना केवळ चूल आणि मुलं इतकेच महत्त्व दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये महिला सबलीकरणाची नितांत गरज आहे.
ग्रामीण भागामध्ये अजूनही मुलींचे कमी वयात लग्न लावून दिले जाते, आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सुद्धा सबलीकरणाची आवश्यकता आहे. भारतासारख्या देशात पुरुष शिक्षणाचा दर सुमारे ८१.३% असताना महिलांचा केवळ ६०.६% इतकाच शिक्षण दर आहे.
ग्रामीण भागात अशी परिस्थिती असली तरी देखील शहरे देखील काही अंशी याबाबतीत मागे नाहीत. शहरी भागात मुलींना शिकविले जात असले तरी देखील त्यांना रोजगार मिळवणे किंवा नोकरी करणे यामध्ये मज्जाव केला जातो. आज आपल्याला अनेक स्त्रिया नोकरी करताना दिसत असल्या तरी देखील त्यांच प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेने फारच थोडे आहे.
आज मीतिला जवळपास ९० टक्के स्त्रिया यांना कुठलाही ऑफिशियल जॉब मिळण्याऐवजी शेती करावी लागत आहे. ज्यातील बऱ्याचशा स्त्रिया साक्षर देखील आहेत.
एका सर्वेक्षणानुसार भारतातील स्त्रियांना सर्व कौशल्य असून देखील पुरुषांपेक्षा तब्बल २० टक्क्यांपर्यंत कमी मासिक पगार दिला जातो. यामुळे महिला सबलीकरणांमध्ये मोठी बाधा येते.
महिला सबलीकरणामध्ये आडवे येणारे घटक:
- महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नसल्या तरी देखील कुटुंबातील सदस्यांच्या जुन्या आणि पुरानमतवादी विचारांमुळे महिलांच्या सबलीकरणांमध्ये बाधा पोहोचते.
- जुन्या आणि कालबाह्य झालेल्या प्रथा परंपरांमुळे स्त्रियांवर दरवेळी अन्याय अत्याचार होतात.
- भारतातील पुरुषप्रधान संस्कृती महिलांवर नेहमी अत्याचाराचा घटना घडवून आणते.
- जन्मावेळीच स्त्री व पुरुष यांच्यामध्ये भेदभाव सुरू केला जातो, ज्यामुळे पुढे महिलांचे मत पुरुष विरोधी बनत जाते.
महिला सबबलीकरणांमध्ये शासनाचा समावेश:
कुठलाही बदल घडवून आणण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या, तर त्या अधिक प्रभावी ठरतात असे म्हटले जाते. त्यामुळे सरकारने देखील महिला सबलीकरणाची गरज लक्षात घेता महिलांसाठीच्या विविध योजना सुरू केलेल्या आहेत. ज्या महिला आणि बाल विकास मंत्रालय व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने चालविल्या जातात. ज्यामध्ये अनेक योजनांचा समावेश होतो, जसे की बेटी बचाव बेटी पढाव जी स्त्रीभ्रूणहत्या व महिला शिक्षणासाठी कार्य करते.
महिला हेल्पलाइन महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. तसेच मानवी तस्करी व लैंगिक शोषण यांपासून महिलांचे संरक्षण व्हावे याकरिता उज्वला योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे. तसेच महिलांना राजकारभारामध्ये सहभागी होता येण्यासाठी आरक्षणाची देखील तरतूद करण्यात आलेली आहे.
निष्कर्ष:
निसर्ग हा नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे महिला व पुरुष यांना कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींमध्ये थोडेसे उन्नीसबीस बनविलेले आहे. मात्र एकंदरीत विचार करता स्त्री आणि पुरुष हे प्रत्येकचं आपापल्या ठिकाणी सक्षम असतात. निसर्ग नियमानुसार निसर्ग नेहमी मादीची संख्या पुरुषांपेक्षा जास्त ठेवत असतो. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये स्त्रीभ्रूण हत्या इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली, की यामुळे निसर्गातील स्त्री पुरुष समतोल ढासळला गेला.
आजकाल जनजागृतीच्या माध्यमातून हे प्रमाण कमी झाले असले, तरी देखील अजूनही बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना समानतेची वागणूक दिली जात नाही. त्यासाठी शासन युद्ध स्तरावर कार्य करत असून, त्याला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे. आणि लवकरच भारतामध्ये पूर्णपणे स्त्री पुरुष समानता प्रस्थापित होण्यास मदत होईल अशी आशा देखील आहे.
FAQ
महिला सबलीकरण का गरजेचे आहे?
महिला सबलीकरणामुळे महिलांना स्वतःची निर्णय स्वतः घेता येतात, त्यामुळे त्या आपल्या आवडीप्रमाणे आयुष्य जगू शकतात. आणि नोकरी व्यवसाय या सारख्या क्षेत्रांमध्ये सुद्धा आपली ओळख निर्माण करू शकतात.
महिला समानता व महिला सबलीकरण या गोष्टी सारख्याच आहेत का?
नाही, महिला सबलीकरण व महिला समानता या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी देखील त्यांचे एकमेकांशी काही प्रमाणात का होईना संबंध आहेत.
महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यामुळे कोणता बदल होतो?
महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यामुळे कुठल्याही गोष्टीच्या इतर पैलूंचा अभ्यास करता येतो, तसेच यामुळे महिलांना देखील कारभार समजण्यास मदत होते.
ऍसिड हल्ल्यामध्ये पीडित झालेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणी फार मोठे कार्य केलेले आहे?
ऍसिड हल्ल्यामध्ये पीडित झालेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी वर्षा जवळगेकर यांनी फार मोठे कार्य केलेले आहे.
महिलांसाठी शासनाने काय काय केलेले आहे?
महिलांसाठी शासनाने अनेक योजना सुरू केलेल्या आहे. यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, महिलांसाठी हेल्पलाइन, उज्वला योजना, महिलांना प्रशिक्षण व रोजगार पुरविणे, महिला शक्ती केंद्राची स्थापना, तसेच राजकारभारामध्ये महिलांना आरक्षण यासारख्या गोष्टी केलेल्या आहेत.
आज या भागामध्ये आपण महिला सबलीकरण म्हणजे काय? आणि त्याचे फायदे तोटे किंवा महिला सबलीकरण करण्याची का गरज आहे याबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरलेली असेल, त्यामुळे त्याचा फायदा इतरांनाही व्हावा म्हणून ही माहिती अवश्य शेअर करा.
धन्यवाद…