फायर ब्रिगेड कोर्स ची संपूर्ण माहिती Fire Brigade Course Information In Marathi

Fire Brigade Course Information In Marathi मित्रांनो नमस्कार ,आपल्या या ब्लॉगमध्ये आत्तापर्यंत तुम्हा विद्यार्थ्यांना भरपूर अशा बारावीनंतर करण्यात येणाऱ्या कोर्स विषयी माहिती पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आलो आहोत व त्या माहितीचा तुम्हाला उपयोगीही झाला असेल अशी आमची आशा आहे.

Fire Brigade Course Information In Marathi

फायर ब्रिगेड कोर्स ची संपूर्ण माहिती Fire Brigade Course Information In Marathi

आपल्याला वैद्यकीय, अभियांत्रिकीय अशा क्षेत्रातील बऱ्याच कोर्सची माहिती असेल. कारण बरेच विद्यार्थी या क्षेत्रातील अभ्यासक्रम निवडण्यास पसंती देत असतात. परंतु आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला अशा एका वेगळ्या  कोर्सची माहिती देणार आहे. बघितले तर आत्ताच्या परिस्थितीत तो कोर्स सर्वात महत्त्वाचा ठरणारा आहे.

तो कोर्स आहे “फायरब्रिगेड कोर्स” म्हणजेच याला आपण “अग्निशामक अभियांत्रिकी कोर्स” किंवा “फायर अँड सेफ्टी कोर्स” असेही म्हणू शकतो. आजकाल आपण पाहत आहात की, आग लागण्याच्या घटना खूपच वाढत चालल्या आहेत. त्या अनुषंगाने व्यावसायिक अग्निशामक अभियंत्याची मागणी खूप वाढत चाललेली आपल्याला दिसत आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना बारावीनंतर करिअरचा एक चांगला पर्याय म्हणून या कोर्स कडे पाहिले पाहिजे. कारण हा एक उत्तम करिअर पर्याय म्हणून उदयाला आलेला आहे. अग्निशामक हे एक असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये आगीचे प्रकार, लागलेली आग कशी वीजवायची याच्या पद्धती, अग्निशामक उपकरणे कशी वापरायची व हाताळायची, आग लागल्यानंतर त्या आगीचा सामना करत लोकांना सुरक्षितपणे कसे बाहेर काढायचे इत्यादी बाबत प्रशिक्षण दिले जाते.

हे क्षेत्र असे आहे की येथे तुम्हाला आग विझवण्यासाठी तुमचे ध्येय ,कौशल्य व बुद्धिमत्ता याचा वापर कसा करायचा याचे योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजेच हा कोर्स करण्यासाठी तुमच्याकडे धैर्य व बुद्धिमत्ता हे गुण असणे आवश्यक आहे .तसेच तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे ही आवश्यक आहे.

हा कोर्स केल्यानंतर आपण फायरमन ते चीफ फायर ऑफिसर अशा पदांवर काम करू शकतो. हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने उत्तम असून हे एक आव्हानात्मक करियर आहे. त्यामुळे तुम्ही मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजे हे खरे!! त्यामुळे हा कोर्स म्हणजे एक प्रकारचे आव्हान आहे हे प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे.

आपण हा कोर्स करून एक सामाजिक सेवा करत आहोत हेही तेवढेच खरे आहे. कारण आपण जेव्हा लोकांना आगीतून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवतो व त्यांच्या मालमत्तेची जास्त हानी होणार नाही याची काळजी घेतो. म्हणजे एक प्रकारे आपण सामाजिक काम करत असतो .या कोर्समध्ये आपल्याला सर्वात महत्वाचे कार्य शिकवले जाते ते म्हणजे आग कशी लागली याचे कारण शोधून काढणे व ती आग रोखणे हे महत्त्वाचे कार्य असते.

या अभ्यासक्रमात अग्निशामक यंत्रणा, स्प्रिंकलर सिस्टीम ,अलार्म वॉटर कॅनन चा अचूक वापर कसा करायचा. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांचा जीव कसा वाचवायचा व कोणत्याही मालमत्तेची हानी जास्तीत जास्त होऊ देऊ नये याबाबत प्रशिक्षण दिले जाते.

प्रत्येक कोर्स करण्यासाठी पात्रता निकष ठरलेली असते. तसेच फायर ब्रिगेड हा कोर्स करण्यासाठी सुद्धा पात्रता निकष ठरलेली आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही रसायन, भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयांसह कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जसे की हा कोर्स करण्यासाठी शैक्षणिक पात्रता महत्त्वाची असते.

त्याचप्रमाणे या कोर्ससाठी फिजिकली म्हणजेच शारीरिक दृष्ट्या आपण किती सक्षम आहे याची सुद्धा खात्री केली जाते. पुरुषांसाठी किमान लांबी 165 सेंटीमीटर आहे. तर वजन 50 किलोमीटर लागते. तर महिलांसाठी किमान लांबी 157 सेंटीमीटर आहे व त्यांचे वजन हे 46 किलो असले पाहिजे. वयाची अट 19 ते 23 वर्ष अशी ग्राह्य धरली जाते. हा कोर्स महिला व पुरुष असे दोघेही करू शकतात.

हा कोर्स करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त प्रवेश परीक्षा घेतल्या जातात .या प्रवेश परीक्षा दिल्यानंतर आपल्याला भारतात व परदेशातील विद्यापीठात ऍडमिशन घेता येते. विदेशात बॅचलर साठी SAT व मास्टर साठी GRE या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. तसेच JEE MEANCE , AICET , IMU CET या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.

फायर ब्रिगेड या कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये डिप्लोमा, प्रमाणपत्र, मास्टर डिग्री व बॅचलर डिग्री असे भरपूर अभ्यासक्रम असतात. जसे की फायर अँड सेफ्टी डिप्लोमा ,पिजी डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी,बीएससी इन फायर इंजीनियरिंग, सर्टिफिकेट इन फायर फायटिंग, फायर टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल सेफ्टी पर्यवेक्षक, बचाव आणि अग्नी अग्निशमन.

आता आपण विविध अभ्यासक्रमाची यादी बघूया!!

सर्टिफिकेट कोर्सेस:-

  • फायरमन प्रशिक्षणातील प्रमाणपत्र.
  • आपत्ती व्यवस्थापनातील प्रमाणपत्र.
  • सुरक्षा आणि आग प्रतिबंधक प्रमाणपत्र.

आयटीआय अभ्यासक्रम:-

  • ITI फायरमन कोर्स
  • ITI फायर टेक्नॉलॉजी आणि सेफ्टी मॅनेजमेंट

डिप्लोमा कोर्सेस:-

  • डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी टेक्नॉलॉजी.
  • अग्निशमन आणि सुरक्षा अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा.
  • डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट.

बैचलर्स कोर्सेस:-

  • बी.एस्सी. आग आणि सुरक्षा.
  • बी.एस्सी. अग्निसुरक्षा आणि धोका व्यवस्थापन.
  • बी.एस्सी. आग आणि औद्योगिक सुरक्षा.
  • B.Techफायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग.

अग्निशमन आणि सुरक्षा व्यवस्थापनात बी.ई.

पीजी कोर्सेस:-

  • पीजी डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट.
  • पीजी डिप्लोमा इन फायर सेफ्टी अँड हॅझर्ड मॅनेजमेंट.

आता आपण हा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतात हे पाहुयात!!!

पूर्वी फक्त मेट्रो शहरांमध्येच अग्निशमन केंद्र होती परंतु आज प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक शहरात अग्निशमन केंद्रे बांधली जात आहेत. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होत आहेत. याशिवाय प्रत्येक सरकारी व खाजगी क्षेत्रात अग्निशमन अभियंता नियुक्त करणे बंधनकारक असल्यामुळे या क्षेत्रात व्यवसायिकाची गरज वाढत आहे.

तसेच आर्किटेक्चर आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, इन्शुरन्स असेसमेंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रिफायनरी गॅस फॅक्टरी, बांधकाम उद्योग, प्लास्टिक एलपीजी आणि केमिकल प्लांट इत्यादी अनेक क्षेत्रात सुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

या क्षेत्रात सुरुवातीला महिन्याला 10000 ते  15000 रुपये पगार मिळतो. परंतु या क्षेत्रात आपल्याला चांगल्या अनुभवावरून आपण दरमहा एक ते दीड लाखा रुपये कमवू शकतो. जर आपल्याला 15 ते 20 वर्षाचा अनुभव असेल तर आपण स्वतःची अग्नि सुरक्षा एजन्सी देखील सुरू करू शकतो.

हा कोर्से देणाऱ्या भरपूर संस्था व विद्यापीठे आहेत. त्यातील प्रमुख तीन संस्था महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे.

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर, पश्चिम बंगाल.
  • नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, पालम रोड नागपूर महाराष्ट्र. दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजीनियरिंग, नवी दिल्ली.
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ.
  • संदीप विद्यापीठ, नाशिक. ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड.
  • झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई.
  • इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, निम्स विद्यापीठ जयपूर. इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअर युनिव्हर्सिटी, औरंगाबाद
  • जीजीएसआयपियू गुरुगोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठ, दिल्ली.
  • दुरुस्त शिक्षण स्कूल, भारतीय विद्यापीठ, कोयंबटूर .
  • अभियांत्रिकी कॉलेज गिंडी, अण्णा विद्यापीठ, चेन्नई.
  • चितकारा कॉलेज ऑफ एप्लाईड, चंदिगड.
  • इजिनिअरिंग स्कूल ,यूपीएससी, देहारादून.
  • सिल्वर ओक युनिव्हर्सिटी, अहमदाबाद.
  • पीपी सवानी विद्यापीठ, सुरत.

FAQ

फायरब्रिगेड अँड सेफ्टी कोर्स हा किती वर्षाचा असतो?

फायर ब्रिगेड अँड सेफ्टी कोर्स यामध्ये वेगवेगळे कोर्सेस असतात. त्यानुसार त्यांचा कालावधी हा सुद्धा वेगवेगळा असतो. प्रमाणपत्र या कोर्सचा कालावधी तीन ते सहा महिन्याचा असतो. तर डिप्लोमा व मास्टर डिग्री साठी कोर्सचा कालावधी हा तीन वर्षाचा असतो.

फायर ब्रिगेड हा कोर्स कसा आहे?

फायर ब्रिगेड हा कोर्स केल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. परंतु हा कोर्स म्हणजे एक आव्हान आहे. कारण या कोर्स झाल्यानंतर आग विझवण्यासाठी आपल्याला एक प्रकारचे आव्हानच स्वीकारावे लागते. त्यामुळे आपण शारीरिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असणे महत्त्वाचे आहे.

फायर ब्रिगेड अँड सेफ्टी या कोर्सची शैक्षणिक पात्रता काय असते?

हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला रसायनशास्त्र ,भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयांसह मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जसे शैक्षणिक पात्रता महत्त्वाची असते तसेच या कोर्समध्ये फिजिकली म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती देखील पाहिली जाते

*

Leave a Comment