फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती Football Information In Marathi

Football Information In Marathi आजच्या पोस्टमध्ये आपण फुटबॉल खेळाची माहिती घेणार आहोत. फुटबॉल हा अतिशय रोमांचक तसेच कौशल्यपूर्ण खेळ आहे. एका सर्वेनुसार असेच निदर्शनास आले आहे की फुटबॉल हा जगात सर्वात जास्त पसंत केला जाणारा खेळ आहे.

Football Information In Marathi

फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती Football Information In Marathi

साऱ्या जगभरातील तरुण तसेच कोणत्याही वयोगटातील लोकांचा मनपसंत खेळ हा फुटबॉल आहे फुटबॉल हा खेळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये खेळला जातो. मात्र ब्राझील, स्पेन ,फ्रान्स ,अर्जेंटिना इत्यादी या सर्व देशांमध्ये या खेळात व या खेळाविषयी विशेष आकर्षण दिसून येते. व तसेच पाहायला गेले तर फुटबॉल हा खेळ अमेरिका तसेच कॅनडा या दोन देशांमध्ये विशेष लोकप्रिय असल्याचे आपल्याला कळते.

फुटबॉल या शब्दाचा उगम

फुटबॉल या नावाचा उगम कसा झाला याचा विचार करायला गेलं तर लोकांची बरीच वेगवेगळी मते असतात.FIFA म्हणजेच इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल यांच्या मानण्यापासून असे समजले आहे की फुटबॉल हा चिनी खेळ आहे व हा खेळ सुझु या खेळापासून विकसित एक प्रकार आहे.

म्हणजे चीनमध्ये फुटबॉल या खेळाला सुझु या नावाने ओळखले जाते. फुटबॉल या खेळाबद्दल अधिक माहिती पाहायला गेलो तर चीनमध्ये हा खेळ हनुच्या काळामध्ये विकसित करण्यात आला होता.

जपानमध्ये हा खेळ कॅमरी नावाने देखील ओळखला जात होता जेव्हा असूका राजवटीच्या कारकिर्दीत फुटबॉल हा खेळ खेळला जात असे. व त्यानंतर १५८६ मध्ये जॉन डेविस हा एक प्रसिद्ध जहाजाचा कॅप्टन होता त्याने व त्याच्या कामगारांनी ग्रीनलँड मध्ये फुटबॉल हा खेळ खेळला.

पंधराव्या शतकामध्ये फुटबॉल च्या नावाखाली पहिल्यांदा स्कॉटलंड मध्ये हा खेळ खेळला गेला होता व अशा प्रकारे स्कॉटलांड मध्ये फुटबॉल या नावाचे मूळ असल्याचे सांगितले आहे, म्हणजेच फुटबॉल हा खेळ पूर्वी खूप वेळा खेळला गेला परंतु वेगवेगळ्या देशांमध्ये या खेळाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे.

फुटबॉल या खेळाचा इतिहास

जसे की आपण आधी पाहिले फुटबॉल हा खेळ बऱ्याच देशांमध्ये खेळला गेला होता. मात्र या खेळाला विविध नावांनी ओळखले जात होते तसेच ब्रिटनचे राजकुमार हेन्री IV यांनी इ.स.१४०८ मध्ये इंग्रजीमध्ये फुटबॉल हा शब्द वापरला गेला.

१५२६ मध्ये इंग्लंडचा राजा हेन्री आठवा यांनी देखील फुटबॉल खेळण्यांमध्ये रस दाखविला होता व एका खास प्रकारचा बूट बनवून घेतला होता. तसेच सर फिलिप्स सिडनी यांनी १५८० मध्ये एका कवितेच्या माध्यमातून महिला फुटबॉल खेळतानाचे वर्णन केले होते.

१६ व्या शतकाच्या उत्तराधार्थ आणि तसेच सतराव्या शतकाच्या प्रारंभात प्रथमच गोल ही कल्पना विकसित करण्यात आली होती. व याचमुळे फुटबॉल ह्या खेळामध्ये स्पर्धेची भावना निर्माण झाली.खेळाडूने प्रथमच शेताच्या दोन विरुद्ध बाजूस झाले लावून गोलपोस्ट तयार केले.१७ वय शतकामध्ये गोल ची कल्पना विकसित झाल्या नंतर ८ किंवा १२ गोल्स चे सामने खेळले जाऊ लागले.

फुटबॉल खेळ प्रसिद्ध कसा झाला?

१९ व्या शतकामध्ये इंग्लंडच्या सार्वजनिक शाळांमध्ये विविध प्रकारांमध्ये फुटबॉल हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जात असे. जुना इतिहास किंवा इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार जर पाहायला गेलो तर फुटबॉल क्लब ची सुरुवात एड्बर्ग मध्ये 1824 या साली झाली होती.

सुरुवातीला या क्लब ची स्थापना ही विद्यार्थ्यांनी केली होती व यातीलच एक शेफिल्ड फुटबॉल क्लब म्हणून ओळखला जाणारा इंग्रजी फुटबॉल क्लब आहे. व या फुटबॉल क्लब ची स्थापना ही २४ ऑक्टोबर १८५७ ह्या साली झाली. व आपल्याला असे कळते की हा जगातील सर्वात जुना सक्रिय फुटबॉल क्लब आहे.

इंग्लिश क्लब नोट्स काउंटिंग या क्लब ची स्थापना १८६२ साली झाली. व याच कारणांमुळे फुटबॉल या खेळाचा प्रसार होऊ लागला व व्यापाऱ्यांनी देखील या फुटबॉल या खेळामध्ये रस दर्शवायला सुरुवात केली. प्रथम फुटबॉल स्पर्धा १८७२ मध्ये इंग्लंड आणि स्कॉटलंड या दोन देशांमध्ये खेळली गेली होती .व हा सामना पाहण्यासाठी जवळजवळ 4000लोक उपस्थित होते.

खेळ हा ०-० च्या बरोबरीत झाला होता.१८८३ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला गेला होताज्यात, आयर्लंड, इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स च्या संघांनी सहभाग घेतला होता. व अशाप्रकारे इंग्लंडमध्ये फुटबॉल ची प्रसिद्धी वाढली व ती हळूहळू युरोपियन खंडात देखील पोहोचली हा खेळ सर्वप्रथम अर्जेंटिना मध्ये युरोपच्या थोडासा बाहेर खेळला गेला होता.

फिफा वर्ल्ड कप

फिफा ची स्थापना 1904 मध्ये पॅरिस मध्ये झाली होती. फिफा म्हणजेच इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल व यानंतर हे नाव साऱ्या जगभर प्रसिद्ध झाले. व कुठल्याही फुटबॉल च्या सामन्यांमध्ये फुटबॉल संघटनेचे नियम पाळावे लागतील अशी घोषणा साऱ्या जगभर करण्यात आली.

फिफा ने तयार केलेल्या कायद्यावर फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क, नेदरलँड, स्पेन, स्वीडन आणि स्विझर्लंड यांच्या प्रतिनिधींनी देखील सही केली होती. व सुरुवातीला इंग्लंड व इतर ब्रिटिश देशांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते.1913 मध्ये फिफा इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन बोर्डाच्या प्रतिनिधित्वामुळे जगभरात फुटबॉल ची लोकप्रियता वाढत गेली. वयानंतर हा खेळ जगभर पसरला आणि फुटबॉल बद्दल लोकांचा प्रतिसाद व आवड ही वाढू लागली.

भारतामध्ये फुटबॉल या खेळाचा उगम

जसे की आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की भारतात क्रिकेट हा सर्वात प्रसिद्ध खेळ असल्याचे मानले जाते मात्र फुटबॉल देखील मागे राहिलेल्या नाही. भारतात देखील फुटबॉल प्रेमींची संख्या ही दिवसेंदिवस वाढत जात आहे.

पश्चिम बंगाल तसेच ईशान्यकडील राज्यात फुटबॉल हा खेळ सर्वात जास्त खेळला जातो. सुरुवातीला भारतात ब्रिटनची वसाहत होती म्हणूनच ब्रिटिश खेळांना देखील भारतात मान्यता मिळाली होती. भारतात फुटबॉल हा खेळ लोकप्रिय झाला व यात नागेंद्र प्रसाद सरबाधिकारी यांचे योगदान हे खूप मोलाचे ठरले होते.

नागेंद्र प्रसाद सरबाधिकारी यांना फुटबॉल चा जनक देखील मानले जाते. फुटबॉल हा खेळ सर्वप्रथम भारतातील शालेय मैदानात खेळला जायचा. नागेंद्र प्रसाद यांनी फुटबॉल या खेळाच्या प्रसारासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी बॉईज क्लब ची देखील स्थापना केली व १८८० पर्यंत कोलकत्ता या राज्यामध्ये अनेक फुटबॉल क्लब ची स्थापना करण्यात आली.

१९५० ह्या साली भारत हा फुटबॉल वर्ल्ड कप साठी पात्र ठरला गेला मात्र विश्वचषकात जाण्यासाठी भारतीय संघाकडे पैसे नसल्यामुळे त्या काळात विश्वचषकांपेक्षा भारताने ऑलिंपिक गेम्सला जास्त महत्त्व दिले होते.१९५६ तसेच १९५८ च्या ऑलम्पिक गेम मध्ये भारतीय संघ हा चौथ्या स्थानावर होता व या काळालाच भारतीय फुटबॉल संघाचा सुवर्णकाळ म्हणतात व यानंतर भारतामध्ये फुटबॉल या खेळासाठी लोकप्रियता वाढत गेली.

फुटबॉल ह्या खेळाचे स्वरूप

फुटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. फुटबॉल हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो प्रत्येक टीम मध्ये 11 खेळाडू असतात. व प्रत्येक सामना हा 90 मिनिटांच्या कालावधीचा असतो या दरम्यान 45 मिनिटांवर एक पंधरा मिनिटांचा ब्रेक हा दिला जातो प्रत्येक टीमचे एक एक गोल पोस्ट असते.

व खेळताना फुटबॉल पायाने मारून समोरच्या किंवा विरोधी संघाच्या गोल मध्ये घालविणे हा एवढाच उद्देश खेळाडूंचा असतो. व खेळा दरम्यान जर एखाद्या खेळाडूस दुखापत झाली तर त्याला ‘इंजुरी टाईम, म्हणून काही वेळाचा कालावधी दिला जातो व जरा वेळ खेळ थांबवण्यात येतो.

फुटबॉल खेळासाठी वापरला जाणारा फुटबॉल सुरुवातीच्या काळामध्ये प्राण्यांच्या मूत्राशयापासून बनवण्यात यायचा मात्र नंतरच्या काळामध्ये फुटबॉल बनविण्यासाठी प्राण्यांची चमडी वापरली जायची, ज्यामुळे फुटबॉल चा आकार हा निश्चित करण्यात आला.

व आताच्या या आधुनिक काळात पाहायला गेले तर फुटबॉल बनवणाऱ्या अगदी नावाजलेल्या फुटबॉल कंपन्या या स्थापित झालेल्या आहेत. व या सर्व कंपन्या खेळाडूंचे वय, मैदान कोणते आहे, इत्यादी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन फुटबॉलची निर्मिती करतात. व तसेच एक सॉकर बॉल हा ५८ सेमी किंवा ६१सेमी एवढा गोलाकार बॉल असतो.

फुटबॉल या खेळासाठी लागणारे मैदान

फुटबॉल खेळासाठी लागणाऱ्या मैदानाच्या लांबीला ‘साईडलाईन’ आणि तसेच रुंदीला ‘गोल लाईन’ असे म्हटले जाते. खेळाचे मैदान हे आयताकृती आकाराचे असते.मैदान हे ५० गज,१०० किंवा १३० यार्ड आयताकृती आकाराचे असते.

व खेळाच्या मैदानाच्या मध्यभागी एक रेष असते जी दोन्ही क्षेत्रांना मध्यभागी दोन भागांमध्ये विभाजित करत असते, व मध्यभागी दहा यार्डचे वर्तुळ काढलेले असते व याला ‘स्टार्टिंग पिरेड’ असे म्हटले जाते. दोन्ही बाजूला आठ यार्ड एवढे मोठे गोल फील्ड असते व गोल एरियाच्या दुसऱ्या बाजूला चौकोनी आकाराचा पेनल्टी एरिया असतो जो १८.१८ यार्ड एवढा असतो.

फुटबॉल या खेळाबद्दल माहिती

जसे की आपण पाहिले फुटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. म्हणूनच हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो, ज्यामध्ये दोन्ही संघांमध्ये 11 -11 खेळाडू असतात तसेच एकूण 90 मिनिटांचा हा खेळ असतो.

जसे की आपल्या सर्वांनाच माहित आहे की क्रिकेटच्या खेळात पंच असतात त्याचप्रमाणे फुटबॉल या खेळामध्ये सर्व अधिकार हे रेफ्रीकडे असतात. रेफ्रिचा  निर्णय हा वैध व शेवटचा मानला जातो. व रेफ्री बरोबर एक सहाय्यक रेफ्री देखील असतो जो रेफ्रीला सहाय्य करतो.

फुटबॉल या खेळामध्ये देखील नाणेफेक केली जाते नाणेफेक ही खेळ सुरू होण्यापूर्वी केली जाते व विजयी करणे स्वतः निर्णय घेतो की त्याच्या टीमला गोल पोस्ट अटॅक करायचा आहे, किंवा चेंडूला किक ऑफ मारायची आहे, हे दोन पर्याय असतात. व एखादी टीम जेव्हा गोल करते तेव्हा पुन्हा तो चेंडू मध्येशवर ठेवला जातो व सामना पुढे खेळला जातो.

फुटबॉल या खेळामध्येएकस्ट्रायकर असतो ज्याचे काम हे गोल करणे हेच असते. विरोधी पक्षातून जो खेळाडू समोरच्या खेळाडूला गोल करण्यापासून रोखतो त्याला डिफेंडर असे म्हटले जाते. व जो खेळाडू प्रतिस्पर्धी टीमकडून बॉल खेचून आपल्या खेळाडूंना देतो त्याला मिडफिल्डर्स असे म्हटले जाते. व गोलकीपर चे काम हे विरोधी टीमला आपल्या गोल मध्ये गोल करून देण्यापासून रोखणे हे असते.

जगातील काही प्रसिद्ध फुटबॉल क्लबची नावे

  • बार्सिलोना, स्पेन
  • रियल माद्रिद, स्पेन
  • बायर्न म्यूनीच, जर्मनी
  • मँचेस्टर युनायटेड, इंग्लंड
  • लिव्हर पूल, इंग्लंड
  • मँचेस्टर सिटी, इंग्लंड
  • चेल्सी, इंग्लंड
  • आर्सेनल, इंग्लंड
  • पीएसजी, फ्रान्स
  • टोटेनहॅम, इंग्लंड

FAQ

फुटबॉलची मूलभूत माहिती काय आहे?

फुटबॉल, ज्याला असोसिएशन फुटबॉल किंवा सॉकर देखील म्हणतात, हा एक खेळ आहे ज्यामध्ये 11 खेळाडूंच्या दोन संघांचा समावेश आहे जे त्यांचे हात किंवा बाहू न वापरता बॉल दुसर्‍या संघाच्या गोलमध्ये वळवण्याचा प्रयत्न करतात. जो संघ जास्त गोल करतो तो जिंकतो. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय बॉल गेम आहे जो सहभागी आणि प्रेक्षकांच्या संख्येत आहे.

फुटबॉलचा उद्देश काय आहे?

गोल करण्यासाठी विरोधी संघाच्या गोलपोस्टमध्ये फुटबॉलला लाथ मारणे किंवा हेड करणे हे प्रत्येक संघाचे उद्दिष्ट असते. आक्रमण करणाऱ्या संघासाठी गोल म्हणून गणले जाण्यासाठी संपूर्ण चेंडू गोल-रेषा ओलांडला पाहिजे. जी बाजू 90 मिनिटांत जास्त गोल करेल ती मॅच जिंकते.

फुटबॉल खेळाचा कालावधी किती असतो?

एक सामान्य फुटबॉल खेळ 90 मिनिटे चालतो ज्यामध्ये 45 मिनिटांचे दोन भाग असतात . तथापि, घड्याळ बर्‍याचदा प्रत्येक अर्ध्या भागाच्या शेवटी ठराविक वेळेपेक्षा पुढे जाते, त्यात काही मिनिटांची भर पडते.

फुटबॉल संघात किती खेळाडू असतात?

फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात ११ खेळाडूंचा समावेश असतो.

फुटबॉलमध्ये 11 खेळाडू का असतात?

हा विशिष्ट क्रमांक का निवडला गेला याचे कारण नेमके स्पष्ट नाही: असे मानले जाते की अनेक चाचण्या आणि चाचण्यांनंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की खेळपट्टी कव्हर करण्यासाठी 20 खेळाडू पुरेसे आहेत आणि त्यामध्ये आधी उल्लेख केलेले दोन गोलरक्षक जोडणे आवश्यक होते.

Leave a Comment