खाशाबा जाधव यांची संपूर्ण माहिती Khashaba Jadhav Information In Marathi

Khashaba Jadhav Information In Marathi खाशाबा जाधव हे एक ऑलिंपिक पदक विजेते भारतीय कुस्ती खेळाडू आहेत. इ. स. 1952 मधे हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात कांस्यपदक जिंकले. खाशाबा जाधव यांनी जिंकलेले हे पदक तेव्हा ऑलिंपिक स्पर्धेतील स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक पदक होते. या पडकामुके भारताला एक नवीन उमेद मिळाली. खाशाबा जाधव यांनी केलेली ही खूप मोठी कामगिरी होती, त्यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया.

Khashaba Jadhav Information In Marathi

खाशाबा जाधव यांची संपूर्ण माहिती Khashaba Jadhav Information In Marathi

पूर्ण नाव (Full Name) खाशाबा दादासाहेब जाधव
टोपणनाव (Nick Name) केडी (KD), पॉकेट डायनामो
राष्ट्रीयत्व (Nationality)भारतीय
निवासस्थान (Residence)रेठरे, कराड तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
जन्मदिनांक (Birth Date)जानेवारी 15, 1926
जन्मस्थळ (Birth Place) गोळेश्वर, सातारा
वडील (Father)दादासाहेब जाधव
आई (Mother) पुतळीबाई
मृत्युदिनांक (Death)  ऑगस्ट 14, 1984
मृत्युस्थान(Death Place) कराड, तालुका – सातारा
उंची (Height) 5’6″ (167cm)
खेळ (Sport) /Professionकुस्ती
प्रशिक्षक (Coach) रीस गार्डनर

खाशाबा जाधव जन्म आणि लहानपण || Khashaba Jadhav Birth and Childhood :  

खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील, करडा तालुक्यात असलेली गोलेश्वर गावात झाला. खाशाबा जाधव हे दादासाहेब जाधव यांचे सर्वात धाकटे अपत्य होते. खाशाबा जाधव यांना 4 भावंडे होती. खाशाबा यांचे वडील दादासाहेब हे ख्यातनाम पैलवान होते. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते.

खाशाबा यांचे आईवडील हे शेती करत. त्यांचे वडील हे कुस्ती देखील खेळायचे सोबतच ते तरुणांना कुस्तीचे शिक्षण देखील द्यायचे. संध्याकाळच्या वेळी त्यांच्या घरी कुस्तीचे डाव खेळले जात. त्यामुळे खाशाबा जाधव यांच्यात कुस्ती हि जन्मापासून होती असे म्हणता येईल. 

खाशाबा जाधव शिक्षण || Khashaba Jadhav Education:

खाशाबा जाधव यांनी 1940 -1947 दरम्यान कराड तालुक्यात असणाऱ्या टिळक हायस्कूल मधे आपले शिक्षण घेतले. बालपणापासून दादासाहेबांनी खाशाबा यांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती त्यामेले खाशाबा जाधव कुस्तीचे प्राथमिक शिक्षण हे घरीच त्यांच्या वडिलांकडून मिळाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खाशाबा जाधव हे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरला गेले. तेथे त्यांनी राजाराम महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले. या काळात त्यांना बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांनी कुस्तीचे प्रशिक्षण दिले आणि मार्गदर्शन केले. या काळात खाशाबा जाधव यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात देखील भाग घेतला.

खाशाबा जाधव कारकीर्द || Khashaba Jadhav Career :

सन 1948 मधे खाशाबा जाधव यांची लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत फ्लायवेट गटासाठी कुस्तीमध्ये निवड झाली. खाशाबा यांची निवड झाली तेव्हा ते खेळाडूंमध्ये 6 व्या क्रमांकावर होते. एवढ्या उच्च स्थानावर पोहचू शकणारे ते भारताचे प्रथम खेळाडू होते.

1948 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव जिंकू शकले नाही पण 1952 सलाच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांनी जोरदार सुरूवात केली. 1952 सालची ऑलिम्पिक स्पर्धा हि हेलसिंकी येथे होणार होती. या स्पर्धेसाठी खाशाबा जाधव यांची बाॅटमवेट गटात म्हणजे 57 किलो वजन गटात निवड झाली.  खाशाबा जाधव यांचे महाविद्यालयातील प्राचार्य

1952 क्या ऑलिम्पिक स्पर्धेत निवड होण्या अगोदर त्यांना ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाकडून सांगण्यात आले होते की त्यांची निवड होणार नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितल्याप्रमाणे मद्रास येथे झालेल्या राष्ट्रीय निवड प्रक्रियेत मुद्दाम खाबा जाधव यांना एक मार्क कमी देण्यात आला ज्यामुळे ऑलिम्पिक साठी त्यांची नाळ होत नव्हती.

पण हे सर्व बघून खाशाबा जाधव यांनी पटियालाचे महाराजांना यांच्याकडे त्यांच्यावर झालेला अन्याय सांगितला आणि न्यायासाठी विनंती केली. पटियालाच्या महाराजांना खेळाची आवड होती. त्यांनी खाशाबा जाधवांच्या तक्रारींकडे विशेष लक्ष दिले आणि त्यांच्या विरोधी कुस्तिगरासोबत पुन्हा खाशाबा यांची कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत खाशाबा जिंकले आणि त्यामुळे त्यांची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली.

पण खाशाबा यांच्याकडे ऑलिम्पिक स्पर्धेस जाण्यासाठी पैसे नव्हते. अशावेळी गावातील सर्व लोकांनी आणि आणि आजूबाजूच्या लोकांनी वर्गणी गोळा करून खाशाबा यांना जाण्यासाठी पैसे जमा केले. खाशाबा यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी खाशाबा यांना जाण्यासाठी स्वतःचे घर मराठा बँकेकडे गहाण ठेवून ₹7000 ची मदत केली.

सन 1952 मधील हेलसिंकी येथील ओलिपिक स्पर्धेत खाशाबा जाधव सोबत 24 स्पर्धक होते. या स्पर्धेत खाशाबा जाधव हे सेमी फायनल्स पर्यंत पोहचले. तोपर्यंत त्यांनी जर्मनी, कॅनडा, मेक्सिको यांच्यासोबत झालेल्या स्पर्धा जिंकल्या होत्या.  खाशाबा जाधव यांनी या स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. खेळताना दोन चुका झाल्या म्हणून त्यांचे सुवर्ण पदक हुकले. खाशाबा जाधव यांनी जिंकलेले हे कांस्य पदक वैयक्तिक पातळीवर स्वतंत्र भारताला मिळालेले पाहिले ऑलिम्पिक पदक ठरले. त्यामूळे खाशाबा जाधव यांचा विजय हा भारत देशासाठी खूप अभिमानाची  गोष्ट ठरली.

सन 1955 मधे खाशाबा जाधव हे महाराष्ट्र पोलीस दलात सब-इन्स्पेक्टर म्हणून भरती झाले. तेव्हा होणाऱ्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याच काळात खाशाबा जाधव हे राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. खाशाबा जाधव यांनी महाराष्ट्र पोलीस दलात 27 वर्षे काम केले आणि शेवटी ते असिस्टंट पोलिस कमिशनर या हुद्द्यावर असताना नोकरीतून निवृत्त झाले.

रेकॉर्ड|| Records:

  • 1952 मधे हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले.
  • 1948 मधे लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी 6 वा क्रमांक पटकावला होता.

1948 London Olympic Khashaba Jadhav || 1948 लंडन ऑलिम्पिक खाशाबा जाधव :

1948 मधे लंडन येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खाशाबा यांची निवड झाली. त्यांना गादीवर कुस्ती खेळण्याचा सराव नव्हता. त्यांनी आपला सराव हा लाल मतीतीच केला. पण पुढे स्पर्धेत गादीवर पाय सत्कार होते. त्या कारणाने त्यांच्याकडून चुका झाल्या आणि पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा प्रयत्नात त्यांना अपयश आले. पण त्यांनी सर्वोत्तम कुस्ती खेळाडूंच्या यादीत 6वे स्थान मिळवले. हि त्या काळातील खूप मोठी गोष्ट होती कारण एवढ्या उच्च स्तरव स्थान पटकावणारी खाशाबा जाधव हे प्रथम खेळाडू होते.

Helsinki Olympic 1952, Khashaba Jadhav || हेलसिंकी ऑलिम्पिक 1952, खाशाबा जाधव :

1952 मधील हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बऱ्याच अडचणी नंतर खाशा यांची स्पर्धेसाठी निवड झाली. आर्थिक टंचाईमुळे त्यांना स्पर्धेस जाण्यासाठी खूप कष्ट पडले. पण ऑलिम्पिक स्पर्धेत गेल्यानंतर त्यांनी चांगली कामगिरी बजावली. बॉटम weigjt गटात त्यांनी भारतासाठी कांस्य पदक जिंकले. भारताच्या स्वतंत्र काळातील ते प्रथम वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरले.

पुरस्कार आणि सन्मान , खाशाबा जाधव || Khashaba Jadhav Awards and Honours :

  • 1982 मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टॉर्च रनचा भाग बनवून त्यांचा गौरव करण्यात आला.
  • 1992-1993 मध्ये महाराष्ट्र सरकारने खाशाबा जाधव यांना मरणोत्तर छत्रपती पुरस्कार सन्मान केला.
  •  सन 2000 मध्ये भारत सरकारकडून त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
  • खाशाबा जाधव यांच्या कमिफिरीचा सन्मान करण्यासाठी 2010 दिल्ली येथे कॉमनवेल्थ गेम्ससाठी बांधलेल्या नवीन कुस्ती स्थळास नव्याने बांधलेल्या कुस्ती स्थळाला त्यांचे नाव देण्यात आले.

Book and Movies, Khashaba Jadhv || पुस्तके आणि चित्रपट, खाशाबा जाधव :

  • लेखक संजय दुधाणे यांनी लिहिलेले “ऑलिम्पिक वीर K. D. जाधव” हे खाशाबा जाधव यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तक आहे.

FAQ

खाशाबा जाधव यांना कोणता खेळ आवडायचा?

खाशाबा जाधव कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत. खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा, महाराष्ट्र येथे एक भारतीय कुस्तीपटू होता. ते स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते (वैयक्तिक) आहेत.

खाशाबाच्या गावातील लोकांनी त्यांचे कसे स्वागत केले?

खाशाबाच्या गावातील लोकांनी 151 बैलगाड्यांच्या मिरवणुकीने त्यांचे स्वागत केले. त्याला ढोल-ताशांच्या गजरातही नेले.

हेलसिंकी येथे खाशाबा जाधव यांनी किती लढती जिंकल्या?

1952 ऑलिम्पिक हेलसिंकी येथे आयोजित करण्यात आले होते. तिथे खाशाबा जाधव यांना रशिया आणि आखाती देशांतील विरोधकांचा सामना करावा लागला. पहिले पाच बाउट त्याने सहज जिंकले. प्रत्येक चढाओढ त्याने पाच मिनिटांत जिंकली.

Leave a Comment