विराट कोहली यांची संपूर्ण माहिती Virat Kohli Information In Marathi

Virat Kohli Information In Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या या प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो क्रिकेट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक क्रिकेटपटू येतात त्या सर्व क्रिकेटपटू पैकी एक नावाजलेले नाव म्हणजेच विराट कोहली होय. भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये विराट कोहली या खेळाडूचे देखील अनेक चाहते आहेत.

Virat Kohli Information In Marathi
Virat Kohli Information In Marathi

विराट कोहली यांची संपूर्ण माहिती Virat Kohli Information In Marathi

सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी या खेळाडू नंतर भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवण्याचं काम या खेळाडूने अगदी चोख पार पाडले आहे.

पूर्ण नावविराट प्रेम कोहली
जन्म 5 नोव्हेंबर 1988
जन्मस्थान दिल्ली, भारत
उपनाव चिकू, किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन, किंग कोहली
उंची 5 फुट 9 इंच
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धतउजव्या हाताने
एकदिवसीय शर्ट क्र.18
एकदिवसीय सामने 248
कसोटी सामने 89

 क्रिकेट विश्वातील सर्व लोक विराट कोहलीला भारतीय संघाचा बॅकबोन असे देखील संबोधतात. कारण उजव्या हाताने खेळी करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर व अधिक प्रतिभावान व हुशार खेळाडूंपैकी विराट कोहलीचे नाव सर्वप्रथम येते .

सध्या विराट कोहली हा भारतीय क्रिकेट महासंघाचा कर्णधार असून अनेक तरुण तरुणींवर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडलेली आहे. विराट कोहली हा अनेक तरुणांचा स्टाईल आयकॉन देखील बनला आहे.

विराट कोहलीची प्राथमिक माहिती

या भारतीय संघाच्या कर्णधाराचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्ली मधील एका पंजाबी कुटुंबात झाला असून त्यांचे वडील प्रेम कोहली हे क्रिमिनल लॉयर म्हणून दिल्लीमध्ये वकिली करत होते. तर त्यांची आई सरोज कोहली या सामान्य गृहिणी होत्या. विराट कोहलीला दोन भावंड आहेत. विराट कोहली चा मोठा भाऊ विकास तर त्यांच्या मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे.

कोहली जेव्हा तीन वर्षाचा होता तेव्हापासूनच क्रिकेट हा त्याच्या विशेष आवडीचा खेळ होता. तो जस जसा  मोठा होत गेला तसतशी क्रिकेटमधील त्याची आवड देखील खूप वाढत गेली. विराट चे वडील प्रेम कोहली यांनी त्याच्यातील क्रिकेटचे विशेष कौशल्य हेरले व ते त्याला घेऊन रोज क्रिकेट प्रशिक्षणासाठी जात असे.

विराट कोहलीचे शिक्षण

विराट कोहलीचे प्रारंभिक शिक्षण अर्थातच प्राथमिक शिक्षण विशाल भारती पब्लिक स्कूल येथून पूर्ण झाले. अभ्यासामध्ये तो एका सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच होता परंतु खेळाकडे त्याचे विशेष लक्ष होते. त्याची ही आवड हेरून त्याच्या वडिलांनी नऊ वर्षापासूनच त्याला क्रिकेट क्लब मध्ये पाठवण्यास सुरुवात केली.

एवढ्या लहान वयात क्रिकेट प्रशिक्षण सुरू करण्यामागे त्यांच्या वडिलांचा उद्देश हाच होता की क्रिकेटमधील बारकावे त्याने शिकावेत .क्रिकेट हेच आपले करिअर मानून विराटने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर आपले पूर्ण लक्ष क्रिकेट कडेच केंद्रित केले.

विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा हे होते. विराट कोहलीने आपल्या क्रिकेट करियर मधील पहिला सामना सुमित डोंगरा अकॅडमी मधून खेळला.

विराट कोहलीचे क्रिकेटमधील प्रदर्शन

विराट कोहली चे वैशिष्ट्य म्हणजे तो उजव्या हाताचा खेळाडू असून सन 2002 रोजी अंडर 15 स्पर्धा खेळण्याची कामगिरी त्यांनी केली. 2006 रोजी विराट कोहली ची निवड अंडर 17 मध्ये देखील करण्यात आली. ही निवड झाल्यावर त्याच्या खेळात मोठा बदल पहावयास मिळाला.

त्याचा खेळ अनेक पटीने सुधारलेला होता त्यामुळे 2008 रोजी विराट कोहली ची निवड अंडर 19 क्रिकेट स्पर्धांसाठी निवड करण्यात आली. अंडर 19 विश्वकप स्पर्धा मलेशिया येथे झाली असून या स्पर्धेत विजय मिळवून देण्यासाठी विराटचा विशेष वाटा असल्याचे पहावयास मिळते.

या सामन्यानंतर त्याची निवड वन डे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी देखील करण्यात आली. 2011 रोजी विराट कोहली याला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळण्याची सुवर्णसंधी लाभली त्यात देखील भारताला विजय मिळवून देण्यास त्यांनी हातभार लावला.

त्यानंतर त्याची क्रिकेटमधील खरी कारकीर्द सुरू होऊन लागोपाठ सामने खेळण्यास त्यांनी सुरुवात केली. खेळत असतानाच त्याचा समावेश उत्तम फलंदाजामध्ये होऊ लागल्याने आज तो क्रिकेट विश्वामध्ये उत्तम फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे.

विराट कोहलीची एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द

2011 साली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामना सहाव्या स्थानावर फलंदाजी करण्यास विराटने सुरुवात केली.

प्रत्येक व्यक्ती लगोलग सफल होतो असे नाही त्यामुळे विराटला प्रथम दोनदा पराजयाचा सामना देखील करावा लागला. परंतु आपल्या पराजयाने किंवा हारीने तो कधीच हरला नाही किंवा खचला देखील नाही उलट चुकांमधून धडे घेत त्यांनी आपला खेळ अधिक उत्कृष्ट बनवण्याचा सराव चालू केला.

त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याने 116 धावा केल्या या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळू शकला नाही पण या सामन्यांमध्ये एकमेव शतक मिळवणारा खेळाडू म्हणून विराट चे नाव पुढे आले. त्यानंतर विराट कोहली यांनी कॉमनवेल्थ बँक ट्राऐगुलर स्पर्धांमध्ये देखील ऑस्ट्रेलिया व श्रीलंका या देशांविरुद्ध सामने खेळले व सात सामन्यांपैकी दोन सामने जिंकण्यात त्यांना यश मिळाले.

 या सिरीजच्या फायनल मध्ये जाण्यासाठी श्रीलंके विरुद्धची मॅच सुरू असताना 321 धावांची आवश्यकता होती त्यात एकट्या विराटने 133 धावा काढत भारताला विजय मिळवून देऊन मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील त्याने पटकावला. क्रिकेटमधील आपल्या सर्वोत्तम प्रदर्शनामुळे सलग खेळण्याच्या संधी देखील त्याला मिळत गेल्या .

2012 रोजी आशियाई चषक स्पर्धेकरिता व्हाईस कॅप्टन म्हणून देखील त्याची निवड करण्यात आली. याच स्पर्धेदरम्यान त्याला कर्णधार बनविण्याच्या चर्चांना उदान आले. त्यावेळी प्रसार माध्यमांमध्ये अशा चर्चा होत्या की विराटने आपली अशीच दमदारखेळी चालू ठेवली तर भविष्यात तो भारतीय संघाचा कर्णधार बनेल व त्यानंतरच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराट चे नाव समोर आले.

विराट कोहलीचे आयपीएल मधील प्रदर्शन

2008 रोजी विराट कोहली यांनी आयपीएल मधील आपला पहिला सामना खेळला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघातर्फे वीस लाख रुपये मानधन घेऊन विराट यांनी आयपीएल मध्ये पदार्पण केले. या संघाकरिता 13 सामन्यांमध्ये 165 धावा विराटने काढल्या या संघाला 2009 रोजी विराटने फायनल पर्यंत पोहोचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.

 त्यावेळी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू अनिल कुंबळेने देखील विराट कोहलीचे खूप कौतुक केले होते त्यानंतर 2014 रोजी काही कारणास्तव आयपीएल मधील विराटचे प्रदर्शन काही विशेष ठरले नाही. याच कालावधी दरम्यान महेंद्रसिंग धोनी यांनी कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला त्यानंतर कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहली ची निवड करण्यात आली.

कर्णधार म्हणून विराट कोहलीने खूप चांगल्या पद्धतीने आपली जबाबदारी पार पडली व संघाला मजबुती देण्याचे काम देखील विराट कडून करण्यात आले. त्यानंतर पाचशे धावांचा रेकॉर्ड मोडण्याकरिता विराट यशस्वी ठरला.

विराटच्या क्रिकेट विश्वातील यशाबाबत बोलायचे झाले तर अवघ्या क्रिकेट विश्वामध्ये केवळ आठ खेळाडू असे आहेत की ज्यांनी वीस ओडीआय मध्ये शतक झळकावण्याचा विक्रम केलेला आहे .त्यामध्ये विराट कोहलीचे नाव देखील येते . 20 ओडीआय मध्ये शतक झळकावणारा सर्वात वेगवान फलंदाज असा विक्रम विराट च्या नावाने झालेला आहे.

यापूर्वी सचिन तेंडुलकर यांनी हा विक्रम केला होता .त्यानंतर सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये एकूण तीन वर्षांमध्ये सलग 1000 हून जास्त धावा काढणारा व या सर्व खेळाडूंमध्ये चौथे स्थान पटकावणारा विराट कोहली हा अद्भुत खेळाडू ठरला आहे. 1000, 3000, 4000 व 5000 धावांचा रेकॉर्ड बनविण्याचा विक्रम देखील विराट कोहली च्या नावावर आहे. सर्वात वेगवान भारतीय खेळाडू म्हणून देखील त्याची ओळख प्रसिद्ध आहे.

विराट कोहलीच्या नावावर असणारे विक्रम

2011 रोजी झालेल्या विश्व कप स्पर्धेमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. विराटने अवघ्या 22 व्या वर्षी ओडीआय मध्ये 100 धावा काढून भारतीय खेळाडूंमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे.एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 5000,3000 धावा काढणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे .

2013 रोजी विराट कोहलीने जयपूर येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांमध्ये केवळ 52 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते .त्याचबरोबर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेगवान भारतीय खेळाडू म्हणून 7500 धावा बनविणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.

विराट कोहली यांना मिळालेले पुरस्कार

आज ज्या यशाच्या शिखरापर्यंत विराट कोहली पोहोचलेला आहे तिथपर्यंत पोहोचणं हे काही सोपं काम नव्हतं. यासाठी अपार कष्ट दिवस-रात्र मेहनत कधीकधी अपयश पचवून देखील मैदानात उभे राहणे अशी अनेक दिव्य पार पाडून ते आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत. भारतासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना विविध सन्मान व पुरस्कार देऊन देखील गौरविण्यात आले आहे.

  •  2012 रोजी पीपल चॉईस अवॉर्ड फॉर फेवरेट क्रिकेटर म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते .
  • त्याचबरोबर 2012 रोजी आयसीसी ओडीआय प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड देखील विराटच्या नावावर आहे.
  • 2013 रोजी अर्जुन अवॉर्ड फॉर क्रिकेट देखील विराटला प्राप्त झाला आहे.
  • सन 2017 रोजी सीएनएन आयबीएन इंडियन ऑफ द इयर
  • तसेच 2017 रोजी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
  • सन 2018 रोजी सर गर्फिएल्ड सोबर्स ट्रॉफीने देखील त्याचा सन्मान करण्यात आला .

अशा या भारतीय संघाच्या कर्णधाराबद्दल त्याच्या जीवनपटलाबद्दल आपण जी माहिती पाहिली ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

विराट कोहलीचे पूर्ण नाव काय आहे?

विराट प्रेम कोहली

विराट कोहलीचा जन्म कुठे झाला?

दिल्ली

Leave a Comment