MCVC कोर्स ची संपूर्ण माहिती MCVC Course Information In Marathi

MCVC Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, बरेच विद्यार्थी दहावी झाल्यानंतर अकरावी व बारावी ही कला, वाणिज्य किंवा विज्ञान या तिनही शाखांमधून कोणतीही एका शाखा निवडत असतात. पण मी तुम्हाला आजच्या पोस्टमध्ये अशा कोर्सची माहिती सांगणार आहे. जो कोर्स तुम्ही अकरावी व  बारावी कला, विज्ञान व वाणिज्य या शाखेतून न करता दहावीनंतर करू शकता .तो कोर्स आहे MCVC !!!

MCVC Course Information In Marathi

MCVC कोर्स ची संपूर्ण माहिती MCVC Course Information In Marathi

कला, विज्ञान व वाणिज्य या शाखांसारखीच MCVC हा एक करिअर पूरक असा अभ्यासक्रम आहे. MCVC याचा इंग्रजी लॉंग फॉर्म “Minium Competency And Vocation Course” असा आहे तर मराठी फुल फॉर्म “किमान क्षमता आणि व्यावसायिक अभ्यासक्रम” असा होतो.

हा अभ्यासक्रम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र शासनमान्य आहे म्हणजेच MCVC हा कोर्स भारत सरकारच्या अंतर्गत घेण्यात येत असतो. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त व्यवसायिक क्षेत्राचे ज्ञान या कोर्समध्ये दिले जाते. सर्व अभ्यासक्रम हा मराठी व इंग्रजी या माध्यमातून उपलब्ध असतात. या कोर्समध्ये विद्यार्थ्याला एक खास ट्रेंड बद्दल शिकवले जाते.

आपल्याला जर MCVC या कोर्सला ऍडमिशन घ्यायचे असेल तर देशात अनेक खाजगी, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट व कॉलेजमध्ये आपण या कोर्सचे शिक्षण घेऊ शकतो. डॉक्टर कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार देशातील बेरोजगारी दूर व्हावी या उद्देशाने अकरावी व बारावीच्या धर्तीवर या व्यवसाय व्होकेशनल अभ्यासक्रमाची सुरुवात 1989-90  मध्ये करण्यात आली. त्यावर्षी 30 अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली होती .

उद्योग क्षेत्रातील व्यवसायिक गरजा लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम बनवण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात प्रॅक्टिकल नॉलेज व प्रात्यक्षिकांवर जास्त भर दिला जातो म्हणजेच प्रॅक्टिकल थेरी बरोबरच प्रात्यक्षिकांवर देखील भर या अभ्यासक्रमात दिला जातो. पूर्वी हा अभ्यासक्रम MCVC या नावाने ओळखला जात असे. परंतु आता त्याचे नामकरण एच.ए.सी व्होकेशनल झाले आहे. उद्योग व्यवसायांना पूरक व सुसंगत असा हा अभ्यासक्रम आहे.

एमसीवीसी हा कोर्स करण्याचे बरेच फायदे आपल्याला होत असतात या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या शाखा पर्याय उपलब्ध असतात त्यामुळे विद्यार्थी आपल्या पसंतीनुसार अभ्यासक्रम निवडू शकतो व त्यानुसार तो पुढे त्या क्षेत्रात आपले करिअर करू शकतो.

जसे की उदाहरणार्थ अभियांत्रिकी तंत्रज्ञान संगणक तंत्रज्ञान इत्यादी हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम असल्यामुळे विद्यार्थ्याला जास्तीत जास्त व्यवहारी ज्ञान देण्यावर जास्त भर दिला जातो त्यामुळे या दोन वर्षानंतर विद्यार्थी हा अनेक प्रकारच्या तांत्रिक नोकऱ्यांसाठी तयार होत असतो जर पुढे त्याला उच्च शिक्षणासाठी जायचे असेल.

तरीही या अभ्यासक्रमाचा उपयोग करून तो पुढील उच्च अभ्यासक्रम निवडू शकतो जसे की या अभ्यासक्रमाची बारावीची परीक्षा उच्च माध्यमिक मंडळातर्फे म्हणजेच मुंबई बोर्ड द्वारे घेण्यात येते इतरशाखन प्रमाणेच या परीक्षेची गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाते त्यानुसार आपण बारावीनंतर वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाला तसेच कला शाखेच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ शकतो.

जर टेक्निकल ग्रुपचा विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या विषयाच्या डिप्लोमा च्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेऊ शकतो उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंगच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेऊ शकतो या कारणांमुळे हा अभ्यासक्रम खूप लोकप्रिय होत चालला आहे.

आत्ताची परिस्थिती पाहता सर्व क्षेत्रात स्पर्धा ही पाहण्यास मिळत आहे दहावीला चांगले गुण असतील तरच आपण आय टी आय किंवा डिप्लोमा यांसारख्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना दहावीला कमी गुण मिळत असतील त्या अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स उपयुक्त ठरत आहे.

एमसीवीसी हा कोर्स प्लस सारखा आहे हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी कुठलीही नोकरी करू शकतो व पुढील अभ्यासक्रम करू शकतो आज एमसीव्हीसी प्रदान करणाऱ्या अनेक संस्था या जास्त करून महाराष्ट्र राज्यात आहेत हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचा असा व्यवसाय सुरू करू शकतो.

एमसीवीसी या अभ्यासक्रमात प्रत्येकी सहा विषय यात इंग्रजी मराठी जनरल फाउंडेशन बरोबरच उर्वरित तीन विषय निवडलेल्या अभ्यासक्रमावर आधारित आहे आता ते सहा विभाग कोणते ते पुढील प्रमाणे :-

 • इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी ग्रुप कॉमर्स ग्रुप
 • फिशरीज ग्रुप
 • ॲग्रीकल्चरल ग्रुप
 • पॅरामेडिकल ग्रुप
 • केटरिंग अँड फूड टेक्नॉलॉजी ग्रुप

आता या प्रत्येक विभागांमध्ये जो अभ्यासक्रम घेतला जातो त्याची आपण माहिती पाहूयात.

 • टेक्निकल ग्रुप
 • इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी

इयत्ता 1112 मिळून इलेक्ट्रॉनिक सर्किट, मोबाईल व इतर सर्व इलेक्ट्रॉनिक साधने यांचे कामकाज ,त्यांच्यातील दोष शोधून तो रिपेअर करणे, पार्ट बदलणे ,डीटीएच सेवा, एलईडी टीव्ही, सोलर सिस्टिम या सर्व विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असतो. हा कोर्स केल्यानंतर ऑडिओ आणि टीव्ही टेक्निशियन, कॉम्प्युटर हार्डवेअर टेक्निशियन ,इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी

या अभ्यासक्रमात या दोन वर्षात इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रिकल मशीन्स या विषयांतर्गत सिंगल फेज आणि थ्री फेज वायरिंग, वीज निर्मिती वितरण यासंबंधी ज्ञान दिले जाते व सर्व घरगुती विजेच्या उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल हेही शिकवले जाते. सिंगल फेज आणि थ्री फेज मशीन चा अभ्यास या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही वायरमेन, इलेक्ट्रिकल टेक्निशियन म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

कॉम्प्युटर टेक्नोलॉजी

या अभ्यासक्रमात  इंटरनेट आणि कॉम्प्युटर टेक्निक विषयी संपूर्ण माहिती शिकवली जाते. बेसिक कॉम्प्युटर, हार्डवेअर, टेली कम्युनिकेशन, विंडोज लिनक्स सारख्या ऑपरेटिंग सिस्टीम तसेच एमएस ऑफिस, टॅली ईआरपी 9, कॉलर ड्रॉ ,फोटोशोप, एचटीएमएल, जावा स्क्रिप्ट डाटाबेस यांसारख्या कॉम्प्युटरशी संबंधित सर्व विषयांचा अभ्यासक्रम येथे शिकवला जातो.

हा कोर्स केल्यानंतर कॉम्प्युटर सर्विसिंग, कॉम्प्युटर मेंटेनन्स, डीटीपी ऑपरेटर ,वेब डिझायनर ॲनिमेटर, हार्डवेअर नेटवर्किंग टेक्निशियन म्हणून तुम्हाला नोकरीच्या संधी प्राप्त होतात.

मेकॅनिकल टेक्नॉलॉजी

या अभ्यासक्रम फिटिंग वेल्डिंग प्लंबिंग तसेच सर्व मशिनरी टूर्स मशीन पार्ट इंजिनिअरिंग ग्राफिक्स सीएनसी प्रोग्रामिंग व ऑपरेशनची सखोल थेरी व प्रात्यक्षिक वर भर असा हा अभ्यासक्रम असतो हा कोर्स केल्यानंतर टर्नर फिटर वेल्डर सीएनसी ऑपरेटर जॉब इन्स्पेक्टर प्लंबर म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात

कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी

कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमामध्ये दोन वर्षात आपल्याला कन्स्ट्रक्शन मटेरियल आणि सेफ्टी मॅनेजमेंट, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, कॉम्प्युटरस सिविल इंजीनियरिंग ड्रॉईंग, काँक्रीट टेक्नॉलॉजी सर्व्ह, एस्टीमेटिंग, वॉटरप्रूफिंग, सेटिंग, प्लंबिंग, ड्राय ड्राफ्ट्समन, इंटेरियर डिझाईनिंग, क्वालिटी कंट्रोल कन्स्ट्रक्शन, मटेरियल टेस्टिंग, सुपरविजन अशा बांधकामाच्या दृष्टीने सर्व उपयुक्त विषयांचा अभ्यासक्रम शिकवला जातो.

प्लंबर ,साईट सुपरवायझर, सर्व्हयर, साईट इंजिनिअर, आर्किटेक्ट असिस्टंट, ड्राफ्ट्समन, मटेरियल टेस्टिंग लॅब, टेक्निशियन म्हणून शासकीय व निमशासकीय आणि खाजगी क्षेत्रात आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी

या अभ्यासक्रमात दोन वर्ष या कालावधीत ऑटोमोबाईल साठी लागणारी सर्वसाधारण सामग्री, मशीन, इंजिन्स याचे कार्य, वापर रिपेरिंग करणे सर्व सिस्टिमचे ट्रान्समिशन ,एस्टिमेशन कॉस्टिंग, बिल्डिंग विक्री आणि मार्केटिंग अशा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी उपयुक्त असा हा अभ्यासक्रम आहे.

हा कोर्स केल्यानंतर ऑटो इलेक्ट्रिशियन, ऑटो टेक्निशियन, टू व्हीलर व फोर व्हीलर मेकॅनिक, हेवी व्हेईकल मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, असिस्टंट मेकॅनिक वर्कशॉप असिस्टंट, गॅरेज असिस्टंट, एलपीजी तसेच सीएनजी सिस्टीम सर्विस मेकॅनिक म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

 • कॉमर्स ग्रुप
 • लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट

11 वी12 मध्ये आपल्याला वाहतूक, मार्केटिंग, सप्लाय चेन, टॅली ईआरपी 9,बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, इन्शुरन्स रिटेल मॅनेजमेंट इत्यादी मार्केटिंग टेली, मार्केटिंग हाउसकीपिंग ,पेर्चेस मॅनेजमेंट ,स्टोअर अकाउंटिंग, खरेदी ,विक्री, साठवण असे व्यापार व वाणिज्याच्या दृष्टीने सर्व महत्त्वाचे विषय शिकवले जातात.

हा कोर्स केल्यानंतर इन्व्हेंटरी क्लर्क, पेर्चेस क्लर्क, मार्केट सर्वर अकाउंट, ऑफिसर स्टोर कीपर, कमिशन एजंट ,इम्पोर्ट एक्स्पोर्ट एजंट म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या कोर्समध्ये दोन वर्षात आपल्याला अकाउंटिंग आणि ऑडिटिंगच्या सर्व कार्यपद्धती, संज्ञा, अकाउंट मध्ये कॉम्प्युटरचा वापर कसा करायचा, बिल्स वाउचर ,कॉस्ट स्टेटमेंट तयार करणे, ऑफिस व्यवहार तसेच बुक कीपिंग मध्ये जनरल लेजर, ट्रायल बॅलेन्स ,फायनल अकाउंट तयार करणे ,इन्कम टॅक्स, फॉर्म 16 A तयार करणे व इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, डिमॅट अकाउंट, ऑफिस मोटिवेशन, टॅली ईआपी 9 या सर्व महत्त्वाच्या विषयांचे ज्ञान दिले जाते .

हा कोर्स केल्यानंतर आपण अकाउंट क्लर्क ,अकाउंट असिस्टंट, ऑफिस सेक्रेटरी, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टोर कीपर ,कॅशियर, ऑडिट क्लार्क अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात.

बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स

या अभ्यासक्रमात बँकेच्या सर्व सेवा, सुविधा ,खात्यांचे प्रकार, बँकिंग, हिशोब व त्यांचा लेखाकर्म, डिमॅट खाते, आर्थिक नियोजन करणे ,ट्रायल बॅलेन्स, फायनल अकाउंट तसेच इन्कम टॅक्स विषयीयीची सर्व कामे, विमा आणि जनरल इन्शुरन्स यांसारखे सखोल ज्ञान दिले जाते. हा कोर्स केल्यानंतर आपण बँकेमध्ये क्लार्क, कॅशियर ,मॅनेजर तसेच विमा प्रतिनिधी, फायनान्स ऍडवायझर, लोन रिकवरी एजंट, शेअर ब्रोकर, कॉम्प्युटर ऑपरेटर, टॅली ऑपरेटर अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

फिशरीज ग्रुप

या अभ्यासक्रमात दोन वर्षात आपल्याला मत्स्यपालन, मासेमारी, मासेमारीची साधने व  त्याच्या पद्धती, प्रजाजनाच्या पद्धती ,खाद्य निर्मिती, मत्स्यपेट्यांची निर्मिती, मत्स्य शेती ,मत्स्य शेतीच्या पद्धती, माशाची साठवणूक कशी करायची व त्यावर विविध प्रक्रिया तसेच मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती, मत्स्य विपणन अशा विविध विषयांचा समावेश होतो.

हा कोर्स केल्यानंतर आपण मत्स्य बीज निर्मिती सहाय्यक, मत्स्यालय देखभाल सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, मत्स्यालय मॅनेजर किंवा मदतनीस, मत्स्यपालन लॅब असिस्टंट, मार्केटिंग असिस्टंट अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

 • एग्रीकल्चर ग्रुप
 • हॉर्टिकल्चर

या अभ्यासक्रमात आपल्याला बागकाम ,फळफुल, भाजीपाला यांची लागवड कशी करायची, त्यांची काळजी कशी घ्यायची, फळे व भाजीपाला प्रक्रिया, ग्रीन हाऊस याविषयी संपूर्ण माहिती शिकवली जाते. हा कोर्स केल्यानंतर आपण भाजीपाला उत्पादक कंपनीत टेक्निकल असिस्टंट, खत कंपनीत विक्री अधिकारी किंवा शेतीविषयक मदतनीस, नर्सरीमध्ये सुपरवायझर ,ऍग्रो केमिकल कंपनीत विक्री प्रतिनिधी,ऑरचर्ड व्यवस्थापक, ग्रीन हाऊस मदतनीस, सुपरवायझर अशा रोगावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

क्रॉप सायन्स

या अभ्यासक्रमात कृषी व्यवसाय, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, मसाला पीक, नगदी पिके यांचे उत्पादन कसे घ्यायचे अशा कृषी निगडित व्यवसाय व उद्योगाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती शिकवली जाते. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही कृषी सहाय्यक, उत्पादक सहाय्यक, शेती सहाय्यक ,ग्रीन हाऊस, वेअर हाऊस सहाय्यक, सिंचन तंत्रज्ञान,ऊस उत्पादन निरीक्षक असे रोजगार प्राप्त करू शकतात.

ऍनिमल हजबंडरी अँड डेरी टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात दोन वर्षात आपल्याला पशुसंवर्धन म्हणजेच काय मग शेळी मेंढी अशा सर्व पाळीव प्राण्यांची निगा व व्यवस्थापन कसे करायचे तसेच दुग्ध तंत्रज्ञानात दुग्ध व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन व त्यावरील प्रक्रिया दुधाचे पदार्थ टिकवणे त्यांचे पॅकेजिंग व वाहतूक व्यवस्था यांची संपूर्ण थे माहिती या अभ्यासक्रमात शिकवली जाते हा कोर्स केल्यानंतर आपण डेरी सुपरवायझर ,पोल्ट्री हॅचरी सुपरवायझर, दूध शीतकरणाचा सुपरवायझर ,शेळी फार्म सुपरवायझर, फीड तंत्रज्ञ, डेरी प्लांट सुपरवायझर अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

पॅरामेडिकल ग्रुप

चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विसेस

या कोर्समध्ये आपल्याला बाल संगोपन, बाल विकास, बाल आरोग्य, बाल शिक्षण, बाल मानसशास्त्र याचबरोबर मुलांची काळजी कशी घ्यावी याचा समावेश असतो. तसेच ओल्ड एज म्हणजेच वृद्धापकाळ, त्यांची माहिती व काळजी वृद्धांचे संगोपन ,आरोग्य व निगा कशी राखायची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओ यांचा अभ्यास आणि इन्स्टिट्यूशनल संस्थांचे हाउसकीपिंग म्हणजेच मानवनिगा संस्थांमधील हाउसकीपिंग यांचा समावेश असतो .हा कोर्स केल्यानंतर आपण बालवाडी किंवा नर्सरी मध्ये टीचर म्हणून काम करू शकतो तसेच एखाद्या वृद्धाश्रमात केअरटेकर म्हणून काम करू शकतो.

मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन या अभ्यासक्रमात  रक्त, लघवी,थुंकी यांच्या तपासण्या विषयी ,रक्त तपासणी, या सर्वांचे सखोल ज्ञान प्रात्यक्षिकांसह दिले जाते. हा कोर्स केल्यानंतर आपण पॅथॉलॉजी ,मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, लॅब टेक्निशियन, हॉस्पिटल लॅब असिस्टंट, प्रायमरी हेल्थ सेंटर ,फार्मासिटिकल लॅब व दूध उत्पादक संघात टेक्निशियन म्हणून रोजगाराच्या संधी प्राप्त करू शकतो.

रेडिओलॉजी टेक्निशियन

या अभ्यासक्रमात आपल्याला शरीर रचना शास्त्र, शरीर क्रिया शास्त्र ,एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन, सिटीस्कॅन मशीन, एमआरआय मशीन, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी लॅब यांविषयी सर्व माहिती दिली जाते.

त्याचबरोबर शरीराच्या निरनिराळ्या भागांचे एक्स-रे कसे काढायचे, पेट स्कॅनिंग प्रोसिजर, सिटी स्कॅनिंग प्रोसिजर ,मेमोग्राफी, रेडिओथेरपी याचे संपूर्ण ज्ञान व प्रशिक्षण दिले जाते. हा कोर्स केल्यानंतर आपण सिटीस्कॅन टेक्निशियन ,कॅथ लॅब टेक्निशियन, रेडिओथेरपी टेक्निशियन ,रेडिओग्राफर यांसारख्या नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतो.

केटरिंग अँड फूड टेक्नॉलॉजी ग्रुप फूड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी

या अभ्यासक्रमात आपल्याला खाद्यपदार्थ ,अन्नपदार्थ ,बेकरी व कन्फेक्शनरी पदार्थांचे शास्त्रीय तांत्रिक व वैज्ञानिक ज्ञान उत्पादन पद्धती, तसेच भारतातील ,विविध प्रांतातील तसेच विदेशी पाककला शिकवली जाते.

हा कोर्स केल्यानंतर आपण हॉटेल, रेस्टॉरंट, रिझोल्ट यामध्ये मुख्य कुक किंवा सहाय्यक खूप म्हणून काम करू शकतो.

टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट

या अभ्यासक्रमात पर्यटन आणि  आदरातिथ्य याविषयी संपूर्ण माहिती शिकवली जाते. टूर प्रोग्रॅम आखणे ,त्यातील हॉटेल, रेल्वे, विमान, जलवाहतुकीचे रिझर्वेशन करणे .भारतीय संस्कृती पासून देश विदेशातील पर्यटन संधी सर्व भौगोलिक क्षेत्र या विषयांचे सखोल ज्ञान दिले जाते.

ट्रॅव्हल एजन्सी .हॉटेल इंडस्ट्री यांचे कामकाज त्यांच्या समस्या व त्याचे निराकरण कसे करावे हेही या अभ्यासक्रमात शिकवले जाते. हा कोर्स केल्यानंतर आपण ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल इंडस्ट्री तसेच टुरिस्ट गाईड म्हणून रोजगाराच्या संधी प्राप्त करू शकतो.

वरील प्रमाणे आपण प्रत्येक अभ्यासक्रमात MCVC या कोर्समध्ये आपल्याला या प्रत्येक क्षेत्रातील सर्व बेसिक शिकवले जाते. त्यानंतर आपण ज्या क्षेत्रात या दोन वर्षात जो अभ्यासक्रम आपण शिकलो आहेत त्या क्षेत्रात आपण पुढील उच्च अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो.

FAQ

1. एमसीव्हीसी म्हणजे काय?

व्होकेशनल अथवा एमसीव्हीसी (MCVC) ही करिअरला पूरक अशी विद्याशाखा उपलब्ध आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान, कला आणि वाणिज्य या शाखांसारखीच एच.एस.सी. व्होकेशनल अथवा एमसीव्हीसी (MCVC) ही करिअरला पूरक अशी विद्याशाखा उपलब्ध आहे. या शाखेत शिकवल्या जाणाऱ्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती आपण या लेखात करून घेऊयात.

2. महाराष्ट्राचा MCVC अभ्यासक्रम काय आहे?

किमान सक्षमता आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (MCVC). 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर कला/वाणिज्य/विज्ञान या पारंपारिक अभ्यासक्रमांना जाण्याऐवजी विद्यार्थी या नोकरी-उन्मुख अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतात.

3. MCVC अभ्यासक्रमांचे फायदे काय आहेत?

हे विद्यार्थ्यांना दहावीनंतर पारंपारिक अकरावी आणि बारावी अभ्यासक्रम करण्याऐवजी त्याच वेळेत व्यावसायिक अभ्यासक्रम करण्याची संधी देते, ज्यामुळे त्यांची नोकरी आणि स्वयंरोजगाराच्या संधी लक्षणीयरीत्या वाढतात.

4. व्यावसायिक अभ्यासक्रम पदवीच्या बरोबरीचा आहे का?

काही व्यावसायिक अभ्यासक्रम हे पदवीपूर्व पदवी किंवा अगदी पदव्युत्तर कार्यक्रमाच्या समतुल्य असतात . जर तुम्ही व्यावहारिक वातावरणात शिकण्यास प्राधान्य देत असाल, तर अधिक पारंपारिक, शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत व्यावसायिक पदवी तुमच्यासाठी अधिक योग्य असू शकते.

5.व्होकेशनल म्हणजे काय?

वास्तविक, व्होकेशनल कोर्सला म्हणजे जो केल्यावर थेट नोकरी मिळते. त्याला जॉब ओरिएंटेड अर्थात जॉब ओरिएंटेड कोर्सही म्हणता येईल. हे असे अभ्यासक्रम आहेत जे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सुरू करता येतात. या अभ्यासक्रमांचा कालावधी 1 ते 2 वर्षांचा आहे.

1 thought on “MCVC कोर्स ची संपूर्ण माहिती MCVC Course Information In Marathi”

Leave a Comment