शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती Shivneri Fort Information In Marathi

Shivneri Fort Information In Marathi: नमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या या प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एका महत्त्वपूर्ण गडकिल्ल्याबद्दल आजच्या लेखात आपण माहिती पाहणार आहोत. हा किल्ला म्हणजे मराठा साम्राज्याच्या महान राजाचे जन्मस्थळ होय .तर मित्रांनो आजच्या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याबद्दल माहिती पाहणार आहोत .

Shivneri Fort Information In Marathi
Shivneri Fort Information In Marathi

शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती Shivneri Fort Information In Marathi

किल्ल्याचे नाव शिवनेरी किल्ला
किल्ल्याची उंची 3500 फुट
जिल्हा पुणे
तालुका जुन्नर
किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग
किल्ल्याची स्थापना 1170
डोंगररांगा नाणेघाट
शिवनेरी किल्ला कोणी बांधला शहाजी राजे

शिवनेरी किल्ल्याची थोडक्यात माहिती Information About Shivneri Fort In Marathi:-

हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून सतराव्या शतकामध्ये लष्करी कारणासाठी बांधलेला हा किल्ला आहे. यादवांनी हा किल्ला सतराव्या शतकामध्ये नाणेघाट डोंगरावर जवळपास 3500 फूट उंचीवर बांधला होता. पुण्यापासून या किल्ल्याचे अंतर जवळजवळ 105 किलोमीटर असून हा किल्ला सुमारे 300 मीटर उंच टेकडीवर आहे.

shivneri fort
Image Source @wikipedia

हा किल्ला पहावयास तुम्हाला सात वेशी ओलांडाव्या लागतात त्यामुळे या किल्ल्याची त्या वेळेची सुरक्षा किती चांगली होती हे त्या किल्ल्याच्या वेशीच ठरवतात. शिवनेरी किल्ल्यावर पर्यटनासाठी असणारे विशेष आकर्षण म्हणजे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या आई सोबत म्हणजेच जिजाऊ माता सोबत असलेली सुबक मूर्ती होय .

शिवनेरी हा किल्ला चहुबाजूने उताराच्या स्वरूपात असून लांबून पाहिले तर किल्ल्याचा आकार हा आकर्षक शिवपिंडीप्रमाणे दिसत असतो. जुन्नर तालुक्यात म्हणजेच जुन्नर शहरात प्रवेश केल्या केल्या शिवनेरी किल्ला दिसू लागतो.

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास (History Of Shivneri Fort In Marathi)

जुन्नर या शहराचे प्राचीन नाव म्हणजे जर्ना नगर. प्राचीन भारतातील अगदी जुन्या शहरांपैकी एक शहर म्हणजे जुन्नर शहर होय. येथे शाक राजवटीचे अधिराज्य होते .जुन्नर शहराच्या आजूबाजूला जवळजवळ शंभर लेण्या असून त्यामधील शिवनेरी किल्ला हा एक असून, ज्या डोंगरावर शिवनेरी किल्ला बांधला गेलेला आहे हा डोंगर एका खूप मोठ्या खाडीने संरक्षित असलेला आपल्याला पहावयास मिळतो. म्हणूनच किल्ला बांधण्यासाठी हीच योग्य जागा निवडली असावी.

shivneri fort ground
Image Source @wikipedia

या किल्ल्यामध्ये 64 लेण्या व आठ शिलालेख सापडले असल्याची इतिहासकारांची माहिती आहे. पुरातन इतिहास पहावयाचा झाल्यास शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन, बहामनी, यादव, शीलाहार ,मुघल अशा अनेक राज्यकर्त्यांनी अनेक वर्ष राज्य केले .
1995 रोजी शिवनेरी किल्ला व त्याच्या आजूबाजूचा परिसर हा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या ताब्यात आला होता.

शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म

त्यांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला असून सन 1632 रोजी जिजाबाई व छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ला सोडला असल्याची माहिती आहे. व 1637 रोजी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेल्याची देखील नोंद आहे. सन 1673 च्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर तब्बल 40 वर्षानंतर म्हणजेच 1716 रोजी हा किल्ला शाहू महाराजांच्या ताब्यात अर्थातच मराठा साम्राज्यात दाखल झाला. त्यानंतर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात गेल्याचे समजते.

शिवनेरी किल्ल्याची रचना (Structure of the Shivneri fort)

शिवनेरी हा किल्ला एक टेकडी किल्ला असून त्याचा आकार त्रिकोणी आहे. शिवनेरी किल्ल्याचे प्रवेशद्वार हे दक्षिण पश्चिम दिशेला असून या किल्ल्याभोवती चिखलाची भिंत बांधली गेलेली आहे. शिवनेरी किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आतल्या बाजूस असलेली मुख्य इमारत. त्यामधील प्रार्थना हॉल, थडगे व मशिदी होय.

shivneri fort water storage
Image Source @wikipedia

असे म्हटले जाते की किल्ल्याच्या आतील बाजूला एक दरवाजा असून किल्ल्याच्या मध्यभागी जो पाण्याचा तलाव आहे त्याला बदामी तलाव म्हणून देखील ओळखले जाते. या किल्ल्यामध्येच गंगा व यमुना असे दोन धबधबे असून ते पर्यटकांसाठी विशेष आकर्षण बनतात.

शिवनेरी किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्यावेळी जिजाबाई या गर्भवती होत्या त्यावेळी शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या आदिलशहाच्या सैन्यांमध्ये सेनापती म्हणून कार्यरत होते .सेनापती म्हणून कार्यरत असताना सतत युद्धाच्या कामांमध्ये ते व्यस्त असायचे त्यामुळे आपली गर्भवती पत्नी जिजाबाई यांच्या सुरक्षेची चिंता त्यांना सतत होती .

त्यामुळे त्यांनी जिजाबाईंना बाळंतपणासाठी शिवनेरी किल्ल्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला.हा किल्ला सुरक्षेच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा आहे कारण या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी तब्बल सात दरवाजे ओलांडणे गरजेचे आहे. याचे शत्रूपासून संरक्षण व्हावे यासाठी किल्ल्याची जी भिंत आहे म्हणजेच सीमा भिंत ती फारच उंच आहे.

अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 रोजी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे बालपण देखील शिवनेरी किल्ल्यावरच गेले. शिवनेरी किल्ल्यावर असताना जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर गरिबांसाठी स्वराज्य निर्माण करायचे असे प्रतिबिंब त्यांच्या मनावर बिंबवले. व महान राजाचे गुण काय असतात. प्राचीन इतिहासातील होऊन गेलेले महान राजे यांच्या बद्दल शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी शिकवणी दिली पण काही कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराज व जिजाबाई माता यांनी शिवनेरी किल्ला सोडला व सन 1637 रोजी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला .

पर्यटनासाठी शिवनेरी किल्ल्यावर पोहोचण्याचे मार्ग –

शिवनेरी किल्ल्यावर तुम्ही सहजरित्या रस्ते मार्गाने देखील जाऊ शकता. पुणे शहरापासून शिवनेरी किल्ल्याचे अंतर सुमारे 95 किलोमीटर असून भारतातील मुख्य ठिकाण म्हणजे मुंबई, हैदराबाद, कोल्हापूर, गोवा या विविध ठिकाणांवरून एसटी किंवा खाजगी बस सेवा नियमित पुणे किंवा जुन्नर या शहरांमध्ये चालूच असतात.

रेल्वे मार्ग किंवा विमान मार्गाने देखील तुम्ही पुण्यात पोहोचू शकता व पुण्यातून जुन्नरला जाण्यासाठीच्या बस किंवा एसटी सेवा नियमित चालू असते. शिवनेरी किल्ल्यावर प्रवेशा साठी कोणताही शुल्क पर्यटकांकडून आकारला जात नसून तेथे पोहोचणे अगदी विनाशुल्क आहे. शिवनेरी किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च होय. हा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्तम काळ मानला जातो.

किल्ल्यावर असणारे आकर्षक ठिकाण-

या किल्ल्यावर अनेक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक ठिकाणे आहेत. शिवनेरी किल्ल्याला सर्व मिळून सात दरवाजे असून त्यात महादरवाजा, पीर दरवाजा, फाटक दरवाजा, हटी दरवाजा, परगंजना दरवाजा, शिपाई दरवाजा इत्यादी दरवाजे आहेत.इतर आकर्षणाची ठिकाणी म्हणजेच ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या जन्म घरामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा.सद्यस्थितीत अलीकडेच ते घर पुनरस्थापित केले गेलेले आहे.

शिवाई देवीचे मंदिर- शिवनेरी किल्ल्यावर गेल्यावर शिपाई दरवाजा ओलांडून जेव्हा पर्यटक दरवाज्यापासून जात असतात तेव्हा मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला जाताना शिवाई देवीचे मंदिर पहावयास मिळते. या मंदिराच्या मागील बाजूमध्ये जे खडक आहेत तेथे सहा ते सात आकर्षक लेण्या देखील आहेत.

मंदिरात देवीची सुंदर मूर्ती स्थापित केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जिजाबाई यांनी याच शिवाई देवीच्या नावावरून ठेवले असल्याची आख्यायिका आहे .याच प्रकारे किल्ल्यावर अनेक मोगल काळातील मशिदी ,धबधबे ,पाण्याची तलावे यातच प्रसिद्ध असलेला बदामी तलाव इत्यादी आकर्षक पर्यटनाची ठिकाणी आहेत.

शिवनेरी किल्ल्याच्या मागच्या दाराने प्रवेश केल्यानंतर आपल्याला अंबरखाना पहावयास मिळतो .हा अंबरखाना अन्नधान्य साठवण्यासाठी त्याकाळी वापरला जात असे. त्याचबरोबर शिवनेरी किल्ल्याच्या मध्यभागी एक नैसर्गिक तलाव तयार झालेला आहे ज्या तलावामध्ये गंगा व यमुना नावाच्या झऱ्यांमधून सतत पाणी वाहत असते. शिवनेरी किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सुंदर स्मारक देखील बांधलेले आहे.

या स्मारकाला शिवकुंज असे नाव दिलेले आहे .या स्मारकाचे उदघाटन आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.शिवनेरी किल्ल्यावर सुप्रसिद्ध तानाजी मालुसरे उद्यान देखील पहावयास मिळते .हे उद्यान गडाच्या डाव्या बाजूला आहे .

बदामी तलावाच्या काही अंतर पुढे गेल्यावर आपल्याला कडेलोट टोक पहावयास मिळते.या कडे लोट टोकाची उंची जवळजवळ 1500 फूट असून या कडेलोट टोकाचा वापर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी केला जात असे. अपराध्याला या कडेलोट टोकावरून खोल दरीमध्ये ढकलून दिले जात होते. शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी दोन तासापेक्षा अधिक जास्त कालावधी लागतो.

जर तुम्ही शिवनेरी किल्ल्याला जाण्याचे योजत असाल तर तुमच्यासोबत गाईड घ्यायला नक्कीच विसरू नका .यामुळे आजूबाजूला असलेल्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर हा किल्ला पर्यटनासाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघडा असतो. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा.
धन्यवाद.

FAQ:

शिवनेरी किल्ला प्रसिद्ध का आहे?

मराठा राजा छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेला शिवनेरी किल्ला हा मराठा राजवटीत महत्त्वाच्या किल्ल्यांमध्ये होता.

शिवनेरी किल्ला कोणी बांधला?

शहाजी राजे

शिवनेरी किल्ल्याचे मालक कोण आहेत?

भारत सरकार

शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

पुणे जिल्हा

Leave a Comment