लाल बहादूर शास्त्री यांची संपूर्ण माहिती Lal Bahadur Shastri Information In Marathi

Lal Bahadur Shastri Information In Marathi लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते आणि पुढे जाऊन ते स्वतंत्र भारताचे 2रे पंतप्रधान झाले. भारताच्या विकासासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्याचा सन्मान म्हणून भारत सरकारने 1966 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या जीवनाबद्दल तपशीलवार माहिती खाली बघुया.

Lal Bahadur Shastri Information In Marathi

लाल बहादूर शास्त्री यांची संपूर्ण माहिती Lal Bahadur Shastri Information In Marathi

Laal Bahadur Shastri Biography In Marathi || लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती :

नाव( Name)          लाल बहादूर शारदाप्रसाद श्रीवास्तव
जन्मस्थान(Birth Place)उत्तर प्रदेशातील मुघलसराई
जन्म(Birth Date)2 ऑक्टोबर 1904
वडील(Father)            मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव
आई(Mother)             राम दुलारी देवी  
पत्नी (Wife / Spouse) :ललिता देवी  
मृत्यू(Death)                :11 जानेवारी 1966  
पक्ष  (Party)               भारतीय राष्ट्रीय काँग्रेस  
धर्म (Religion)            हिंदू
राष्ट्रीयत्व (Nationality)   : भारतीयभारतीय
पुरस्कार (Awards)        भारत रत्न  
स्मारक (Monuments)   विजय घाट  
अपत्ये (Children)        6
टोपण नाव (Nick Name)Man of Peace (मॅन ऑफ पीस)    

Lal Bahadur Shastri Birth and Family| लाल बहादूर शास्त्री जन्म आणि कुटुंबाची माहिती :

लाला बहादूर शास्त्री यांचा वाराणसी पशी असलेल्या मुघलसराई या गावात 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला. लाल बहादूर शास्त्री यांचे खरे नाव लाल बहादुर शारदाप्रसाद श्रीवास्तव असे होते  लाल बहादूर शास्त्री यांना 3 भावंडे होती. लाल बहादूर शास्त्री यांच्या वडिलांचे नाव मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव होते तर त्यांच्या आईचे नाव राम दुलारी देवी असे होते.

त्यांचे वडील शिक्षक होते पण शास्त्री अवघे दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या आई आपल्या 3 मुलांना घेऊन मिर्झापूर येथे आपले वडील हजारी लाल यांच्या घरी राहू लागल्या. शास्त्री यांचे संगोपन त्यांनी तिथेच केले. 

Lal Bahadur Shastri Education | लाल बहादूर शास्त्री शिक्षण :

लाल बहादूर शास्त्री यांचे बालपण त्यांचे आजोळ मिर्झापूर येथे गेले. आर्थिक आणि इतर अनेक अडचणींमुळे लाल बहादूर शास्त्री यांचे बालपण खडतर गेले. त्यांच्या गावातील शाळा खूप चांगली नव्हती तरी ते परिश्रम करत शिकत राहिले.  त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण देखील तेथेच झाले.

गावातल्या शाळेत त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे माध्यमिक शिक्षण घेण्याकरिता लाल बहादूर शास्त्री यांना वाराणसीला आपल्या काकांकडे जावे लागले. वाराणसी मध्ये त्यांना नीलकामेश्वर प्रसाद नावाचे एक गुरुजी भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लाल बहादुर शास्त्री यांनी काशी विद्यापीठ म्हणजेच आत्ताचे महात्मा गांधी काशी विद्यापीठ येथून पदवी ग्रहण केली.

लाल बहादूर शास्त्री यांचे शास्त्री नाव :

सन 1925 मध्ये कशी विद्यापीठाने लाल बहादूर शास्त्री यांना “शास्त्री” हि पदवी प्रदान केली. तेव्हापासून लाल बहादूर शास्त्री हे आपल्या नावापुढे “शास्त्री” नावाचा वापर करू लागले आणि त्यांना लाल बहादूर श्रीवास्तव ऐवजी लाल बहादूर शास्त्री म्हणून ओळखले जाऊ लागले.

लाल बहादूर शास्त्री विवाह  :

सन 1927 मध्ये लाल बहदुर शास्त्री यांचा ललिता देवी यांच्यासोबत विवाह झाला. त्यांना 6 अपत्ये झाली.

लाल बहादूर शास्त्री स्वातंत्र्यसैनिक, स्वानात्र्या चळवळ || Lal Bahadur Shastri As A Freedom Fighter :

लाल बहादूर शास्त्री यांना निलकामेश्वर प्रसाद यांच्या कडून महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनाबद्दल ऐकायला भेटत होते. त्यामुळे शैक्षणिक कळतच त्यांना स्वातंत्र्य चळवळीचे वेड लावत होते.

लाल बहादूर शास्त्री जसजसे मोठे होत होते तसतस त्यांच्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होणाऱ्या लढ्यात रस वाढत होता.

लाल बहादूर शास्त्री 11 वर्षांचे असताना बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कोनशिला बसवण्यासाठी महात्मा गांधी आले होते. तेथील त्यांचे भाषण ऐकून लाल बहादूर शास्त्री खूप प्रभावित झाले. तिथून पुढे त्यांनी महात्मा गांधीची पाठ सोडली नाही. अगदी 16-17 वर्षांचे असताना त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेण्यास सुरुवात केली.  महात्मा गांधीचे चंपारण्य आंदोलन, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी इत्यादी घटनांनी लाल बहादूर शास्त्री प्रभावित झाले होते.

शिक्षण संपल्यानंतर शास्त्री हे लाला लजपतराय यांच्या द्वारा सुरू केलेल्या ‘द सर्वेन्ट्स ऑफ़ द पीपल सोसाइटी’ यांच्यासोबत जोडले गेले.

महात्मा गांधीच्या विदेशी मालाचा बहिष्कार, स्वदेशीचा वापर या आंदोलनात लाल बहादूर शास्त्री यांनी सहभाग घेतला.

सन 1921 सली त्यांनी asahayog आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी त्यांना तुरागुवसात टाकण्यात आले पण वय कमी असल्यामुळे त्यांची सुटका झाली.

पुढे 1930 मध्ये महात्मा गांधींच्या “सविनय अवज्ञा आंदोलन” मध्ये ते सहभागी झाले. या आंदोलनाचा उद्देश हा देशाच्या नागरिकांना इंग्रज सरकारला कर न देण्या बाबत जागृत करण्यासाठी होते. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांनी अनेक भाषणे देऊन लोकांमध्ये कर देण्याबाबत जागरूकता निर्माण केली. त्यामुळे त्यांना तेव्हा अडीच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला.

दुसऱ्या महायुध्दाच्या काळात काँग्रेसने स्थापन केलेल्या जन आंदोलनात सहभागी झाल्यामुळे लाल बहादूर शास्त्री यांना पुन्हा 1 वर्ष तुरुंगात टाकण्यात आले.

सन 1942 मध्ये झालेल्या “भारत छोडो आंदोलनात” लाल बहादूर शास्त्री यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यामुळे त्यांना 11 दिवस भूमिगत राहावे लागले होते. पण तरीदेखील त्यांना इंग्रजांनी पकडले आणि सन 1945 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.

अश्या प्रकारे लाल बहादुर शास्त्रींनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक प्रकारे योगदान केले.

Lal Bahadur Sahstri Awards

लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. 9जून, इ.स. 1964 रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. 1965सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले.

ब्रिटीश कालीन भारतात इंग्रज सरकार विरुद्ध मोठ्या मुत्सद्दीने लढा देणारे गांधी वादी नेते व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री एक महान नेता,  व स्वातंत्र्य सेनानी,  होते. त्याचप्रमाणे, पूर्ण देशांत त्यांची प्रतिमा, एक दूरदर्शी, इमानदार आणि निष्ठावंत राजनेत्याच्या स्वरुपात प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अनेक संकटांना सामोरे जात देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले.

लाल बहादूर शास्त्री राजकीय प्रवास || Lal Bahadur Shastri Political Career :

देशांत दुध उत्पादनाला चालना देण्यासाठी त्यांनी ‘श्वेत क्रांतीला’  पाठिबा दर्शविला.

सन 1946 मध्ये झालेल्या प्रांतीय निवडणुकीदरम्यान लाल बहादूर शास्त्री यांचे काम पाहून पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी त्यांना आपले संसदीय सचिव बनले. लाल बहादूर शास्त्री यांनी हि भूमिका उत्तम पडली त्यामुळे गोविंद पंत यांनी त्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेतले आणि त्यांना पोलीस आणि परिवहन मंत्री हे मंत्रिपद दिले. त्यावेळी शत्री यांनी देशातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना प्रोटाशन देण्यासाठी महिलांना परिवहन विभागात आरक्षण दिले आणि महिलांची वाहक पदी भरती केली.

 आपल्या पदाचा योग्यरीत्या वापर करत त्यांनी पोलीस नियमात काही सुधारणा केल्या. जसे की, लोकांची गर्दी पांगवण्यासाठी पूर्वी काठीचा वापर केला जात असे. परंतु, लाल बहादूर शास्त्री यांनी हा नियम मोडीत काढत त्या ऐवजी पाण्याची फवारणी करण्याचा नियम लागू केला.

देशात संविधान लागू झाल्यानंतर सर्वसाधारण निवडणुका घोषित करण्यात आल्या. त्यावेळी शास्त्री हे काँग्रेस पक्षाचे महासचिव होते. सन 1952 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर लाल बहादुर शास्त्री यांना रेल्वे आणि परिवहन मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. यावेळी त्यांना आपल्या पदाचा सदुपयोग करून रेल्वेतील प्रथम श्रेणी आणि तृतीय श्रेणी यांच्यातील अंतर बऱ्याच प्रमाणत कमी केले. पण सन 1956 मधे एक रेल्वे दुर्घटना झाली त्याची जबाबदारी म्हून त्यांनी आल्या पदाचा राजीनामा दिला.

सन 1961 मध्ये गोविंद पंत यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर लाला बहादूर शास्त्री यांना गृह मंत्री बनवण्यात आले. गृहमंत्री असताना त्यांना देशाच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. 1962 मधील भारत चीन युद्ध चालू असताना त्यांनी देशातील शांतता राखण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.

सन 1964 तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अपघाती निधन झाल्यानंतर लाल बहादुर शास्त्री यांची पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आली. ते पंतप्रधान पदी असताना झालेल्या भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान त्यांनी आपल्या कुशल रांनितीने परिस्थिती उत्तमरित्या हाताळली.c

लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना देशात देशात खण्या पिण्याच्या गोष्टी बाहेरून आयात करव्यालगत होत्या. अशावेळी त्यांनी लोकांना एक दिवस उपवास पकडण्याची विनंती केली आणि लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी “जय जवान जय किसान” हा नारा दिला जो पुढे अजून खूप प्रसिध्द झाला.

लाल बहादूर शास्त्री निधन || Lal Bahadur Shastri Death :

सन 1966 मध्ये भारत आणि  पाकिस्तान यांच्यात शांतता स्थापित करण्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयुब खान यांनी आणि शास्त्रींनी मुख्य मुद्द्यांवर हस्ताक्षर केले. त्याच रात्री 11 जानेवारी 1966 रोजी लाल बहादुर शास्त्री यांचे अचानक निदान झाले. 

लाल बहादूर शास्त्रींची घोषणा काय होती?

जय जवान जय किसान हि लाल बहादुर शास्त्रींनी घोषणा होती.

अन्न संकटाची गरज भागवण्यासाठी शास्त्रींनी कोणता उपाय सांगितला?

हरित क्रांती.

लाल बहादूर शास्त्री यांना भारतरत्न कधी देण्यात आला?

1966 मध्ये लाल बहादुर sahstrinna मारोनात्तर भारतरत्न देण्यात आला.

लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान केव्हा झाले?

9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966 मध्ये शास्त्री पंतप्रधान होते.
 

Leave a Comment