स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण माहिती Swami Vivekanand Information In Marathi

Swami Vivekanand Information In Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती आणि अध्यात्माच्या या प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो या लेखांमध्ये आपण स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटलाबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो माहिती पाहिली की आपल्या ज्ञानात भर तर पडतेच पण आपल्या आयुष्याची पुढील वाटचाल सुलभ होण्यासाठी देखील अशा माहितीचा उपयोग होत असतो.

Swami Vivekanand Information In Marathi

स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण माहिती SSwami Vivekanand Information In Marathi

 स्वामी विवेकानंद यांनी ज्ञान व अध्यात्माच्या क्षेत्रात केलेले अतुलनीय कार्य पाहून संपूर्ण मनुष्य जातीला जी यशाची झेप घेण्याची उमेद मिळते ती खूपच मौल्यवान असते. या लेखांमध्ये आपण स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण, कार्य, अध्यात्मिक जीवन अशा अनेक पैलूंवर चर्चा करणार आहोत .

प्राथमिक माहिती- मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 साली  झाला असून ते मूळ पश्चिम बंगालचे रहिवासी होते.

 स्वामी विवेकानंद यांना विशेषतः तत्त्वज्ञान, संगीत, कला, साहित्य या क्षेत्रांमध्ये विशेष आकर्षण  होते. भारतीय धर्मांशी खूप चांगल्या पद्धतीने जोडले गेलेले होते. सर्व धर्मांचा त्यांचा अभ्यास देखील होता. सर्व धर्मांचे तत्व हे एकाच टोकापाशी येऊन थांबते असे त्यांचे  मानने होते.

 अशी अख्यायिका आहे की त्यांच्या जीवनाला खरा अर्थ मिळाला तो रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतरच .स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. हिंदू सनातन धर्माचा संदेश या मिशनमार्फत सर्वत्र पसरवण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले.या मिशन तर्फे धार्मिक प्रसार अध्यात्मिक शिकवण त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत देण्याचे कार्य केले.

स्वामी विवेकानंद यांचे प्रारंभिक जीवन- स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1843 रोजी कोलकत्ता येथील सिमलापल्ली येथे झाला. पौष कृष्ण सप्तमीला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील म्हणजेच विश्वनाथ दत्त हे कोलकत्ता येथील उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या वडिलांचा देखील साहित्य तत्त्वज्ञान धर्म अशा विषयांमध्ये विशेष रस होता. त्यामुळेच नरेंद्र अर्थात स्वामी विवेकानंद यांच्यावर देखील त्याच प्रकारचे धार्मिक संस्कार होत गेले. स्वामी विवेकानंद यांच्या आई भुवनेश्वरी देवी यादेखील काही धार्मिकच होत्या .

स्वामी विवेकानंद यांना शास्त्रीय संगीतामध्ये देखील विशेष आवड होती, त्यांनी अहमद खान व बेनीगुप्ता या त्यांच्या शिक्षकांकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. ते गायन व वादन या दोन्ही गोष्टी करत असे. त्यांचे आपल्या शारीरिक सुदृढते कडे देखील विशेष लक्ष असायचे.

पोहणे, कुस्ती ,व्यायाम करणे, लाठी चालवणे या अनेक क्षेत्रांमध्ये स्वामी विवेकानंद हे पारंगत होते. स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच जातीव्यवस्था ,धर्मांच्या अनिष्ठ रूढी प्रथा परंपरा, अंधश्रद्धा यांच्या विरोधात होते ,त्याचबरोबर स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते त्यांची वाचनाची गती देखील खूपच तेज होती.

स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण-

त्यांचे प्राथमिक शिक्षण हे ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटिअन इन्स्टिट्यूट मधून पूर्ण झाले. स्वामी विवेकानंद हे 1879 मध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता पात्र झाले.

कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जनरल असेंबलीज इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून इतिहास, पाश्चात्य तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला. त्याच पुढे दोन वर्षांनी म्हणजेच 1881 रोजी स्वामी विवेकानंद यांनी फाईन आर्ट्स ची परीक्षा देखील उत्तीर्ण केली. सन 1884 रोजी त्यांनी आपले बीए चे शिक्षण देखील पूर्ण केले.

नरेंद्रांचे तत्त्वज्ञान-

स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच खूपच हुशार व बुद्धिमान होतेच परंतु कोणतीही गोष्ट स्वतः अनुभवल्याशिवाय ते त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नसे.

 शिक्षण चालू असताना व पूर्ण झाल्यावर देखील त्यांनी अनेक तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यांनी यामध्ये अनेक महान तत्त्वज्ञानी लोकांचा देखील अभ्यास केला. जसे की  बारूच स्पिनोझा, इमॅन्युएल कान्ट, डेव्हिड ह्यूम, गोत्तिलेब फित्शे, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, जॉन स्टुअर्ट मिल, चार्ल्स डार्विन, स्पेन्सर इत्यादी.

याच बरोबर त्यांनी बंगाली प्राचीन संस्कृती व साहित्य देखील अभ्यासण्यास सुरुवात केली .स्वामी विवेकानंद यांच्या ज्ञानाची भूक काही संपतच नव्हती .अत्यंत ज्ञानी बुद्धिमान असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची स्मरणशक्ती देखील खूप अलौकिक होती. त्यामुळे त्यांना श्रुतीधर असे देखील संबोधले जात होते. शिक्षण घेत असताना त्यांच्या असे लक्षात आले की बौद्धिक ज्ञानाने आपल्या जीवनाच्या अनुभवांमध्ये काडीचाही फरक पडत नसल्याने त्यांनी आत्मिक व अध्यात्मिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

 या त्यांच्या अध्यात्मिक प्रवासामध्ये त्यांना गुरु म्हणून लाभलेले रामकृष्ण परमहंस यांच्या मदतीने त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांचे नाते-

 त्याकाळी स्वामी विवेकानंद हे सर्व प्रकारच्या ज्ञानाने अतोनात भरलेले होते परंतु आता त्यांना आत्मिक ज्ञान आत्मसात करण्याची ओढ लागली होती. त्यांना देव आहे का ?

या प्रश्नाने इतके ग्रासले होते की त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणारा व्यक्ती त्यांना कुठेच सापडेनासा झाला. त्यावेळी महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर अर्थातच ब्राह्म समाजाचे नेते यांच्या संपर्कामध्ये स्वामी विवेकानंद काही काळ राहिले होते. स्वामी विवेकानंदांना वाटले की यांच्याकडून आपल्याला नक्कीच आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. परंतु महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर हे देखील विवेकानंदांची उत्तरे देण्यास व त्यांची आत्मिक भूक भागवण्यास असमर्थ ठरले.

आपल्या उत्तराच्या शोधात असतानाच विवेकानंद यांना रामकृष्ण परमहंस हे भेटले. विवेकानंदांनी लगोलग त्यांना आपला प्रश्न विचारला परंतु त्यावेळी रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना उत्तर देण्याचे टाळले. परमहंस यांना भेटल्यावर स्वामी विवेकानंद यांना वेगळाच साक्षात्कार झाल्याचे जाणवले. रामकृष्ण परमहंस यांना देखील आपल्या धर्माचा प्रसार व ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी नरेंद्र सारखाच एक कुशाग्र बुद्धी असलेला अद्भुत अलौकिकता व धाडसी व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती हवा होता .

स्वामी विवेकानंद यांना भेटल्यावर परमहंस यांना वाटले की हाच तो व्यक्ती जो आपल्या धर्माचा योग्यरित्या प्रसार करू शकेल .दोघांच्या भेटीनंतर विवेकानंद यांच्या अध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली. रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांचा शिष्य म्हणून स्वीकार केला .रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या समवेत अनेक तरुण शिष्य घेऊन काशीपूरच्या उद्यानामध्ये त्यांनी ध्यान साधना करण्यास सुरुवात केली. व आत्मिक अनुभवाची प्राप्ती देखील केली.

 अध्यात्माचा प्रसार व अध्यात्मिक शिक्षण घेत असताना रामकृष्ण परमहंस यांना कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यांची शारीरिक परिस्थिती ही बिकट होत चालली होती .अशा काळात देखील विवेकानंदांनी त्यांचा धर्मप्रसाराचा वारसा असाच पुढे चालू ठेवला.

रामकृष्ण परमहंस यांचे निधन-

रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाल्यावर त्यांच्या महासमाधी नंतर विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची देखील स्थापना केली .वराहनगर येथे वास्तव्य करणाऱ्या गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने रामकृष्ण मठाची स्थापना करण्यात आली .या मठाची स्थापना सुरुवातीला एका पडक्या इमारतीमध्ये झाली.

हा मठ तयार झाल्यानंतर रामकृष्ण परमहंस यांची आठवण म्हणून विवेकानंदांनी गुरूंनी वापरलेल्या वस्तू ,त्यांच्या अस्थी, त्यांचे भस्म हे सर्व मठात नेऊन ठेवले.या मठांमध्ये रामकृष्ण गुरूंचे सर्व शिष्य ,अनुयायी भक्त येऊन राहू लागले .

विवेकानंदांचे भारत भ्रमण-

धर्मप्रसार या उद्देशाने स्वामी विवेकानंद यांनी भारत भ्रमण करण्याचा निर्णय घेतला .भ्रमण करत असताना भारताची धार्मिक उदासीनता त्यांनी पाहिली हे पाहून त्यांना खूप दुःख झाले .त्यांना असे वाटले की भारतीय तरुण किंवा भारतीय मनुष्य जर काही अंशी धार्मिक बनला तर परिस्थिती बदलण्यास सुरुवात होईल.

त्यांनी तरुणांना मार्गदर्शन, देशसेवा, धर्म जागृती याबाबत धडे देण्यास सुरुवात केली .त्यांचे हे कार्य भारताबाहेर देखील सुरू झाले. अद्भुत ब्रह्मज्ञान हेच केवळ मानवी जीवनाचे मूल्य व सर्वोच्च शिखर असल्याचे त्यांनी मानले  व हाच संदेश त्यांनी सर्वत्र पोहोचवण्याचे कार्य देखील पार पाडले .

जगभरातील धर्मप्रसारणाचे कार्य-

 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथे शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये सर्व धर्मीय परिषद भरली होती या सभेला विवेकानंदांनी उपस्थिती लावून हिंदू वेदिक धर्माचे प्रतिनिधित्व पार पाडले .अमेरिकेमध्ये झालेल्या भाषणांमध्ये विवेकानंदांनी माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणाची सुरुवात करून दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट देखील अनुभवला .

त्यांनी या परिषदेमध्ये भारतीय वेदांचे महत्त्व ,प्राचीन पुरातत्व ,भारतीय संस्कृती यावर व्याख्यानमाला दिली. त्यांचे असे मानणे होते की सर्व धर्म जरी भिन्न असले तरीही त्या सर्व धर्मांचा सार एकाच टोकाला येऊन थांबतो.

अमेरिकेत काही काळ वास्तव्य करत असताना आपल्या विचारांच्या शिदोरीनी, व्याख्यानांनी त्यांनी अमेरिकेतील जनसमुदायाचे, पत्रकार व्यक्तींचे व मोठमोठ्या जाणकार व्यक्तींचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली. तेथील वृत्तपत्रांमध्ये त्यांचे वर्णन हे सायक्लोनिक मोंक फ्रॉम इंडिया अर्थातच भारतातून अमेरिकेत आलेला एक वादळी संन्यासी असे केले होते. फक्त अमेरिकाच नव्हे तर त्यांनी अनेक विदेशी देशांचे भ्रमण धर्मप्रसाराकरिता केले होते.

विवेकानंदांचा मृत्यू-

स्वामी विवेकानंद यांनी खूपच कमी वयात बौद्धिक, अध्यात्मिक, आत्मिक अलौकिकता प्राप्त केली होती. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य त्यांनी गमावले. 4 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंद यांनी समाधी घेतल्याचे मानले जाते.

 स्वामी विवेकानंदांचे आयुर्मान हे केवळ 39 वर्ष इतकेच होते .एवढ्या कमी वयात त्यांनी धर्मप्रसाराचे कार्य इतके चांगल्या रित्या पार पाडले की आजही त्याचे धडे संपूर्ण विश्वामध्ये घेतले जातात. त्यांचे कार्य हे कायम स्मरणात राहील असेच आहे .

तमिळनाडू येथे कन्याकुमारी जवळ समुद्रात स्वामी विवेकानंद यांचे स्मारक देखील उभारण्यात आलेले आहे .

तर मित्रांनो या प्रखर व तेजस्वी व्यक्तिमत्वाबद्दल आपण जी माहिती पाहिली ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा…

धन्यवाद!!!!!

FAQ

स्वामी विवेकानंद यांचे गुरू कोण होते?

स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! 

स्वामी विवेकानंद यांचे शिष्य कोण होते?

श्रीरामकृष्णांंचे सर्वश्रुत शिष्य म्हणजे स्वामी विवेकानंंद. त्यांंच्यासह खाल,भवनाथ,भूपती,नित्यगोपाल,दुर्गाचरण हेही त्यांंचे साधक होते. त्यांंचा साधक परिवार मोठा आहे. रामकृष्ण मिशन ही स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली संस्था रामकृष्णांच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य करते.

स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचे ध्येय काय होते ?

श्रद्धेचा किंवा खऱ्या विश्वासाचा प्रचार हेच माझ्या वनाचे ध्येय. मनुष्याचा विकास हेच शिक्षणाचे ध्येय असते अर्थात यामध्ये श्रद्धा आणि विश्वासाचे स्थान महत्त्वपूर्ण असतेच असते. मनुष्याचे शील आणि चरित्र्य निर्माण हे शिक्षणाचे महत्त्वाचे तत्त्व होय.

स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय आहे?

स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ – ४ जुलै, १९०२, नरेंद्रनाथ दत्त) हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते.

स्वामी विवेकानंदांनी नववेदांत कसे स्पष्ट केले?

स्वामी विवेकानंदांनी वेदांत आपल्या दैनंदिन जीवनात, शहरी जीवनात, देशाच्या जीवनात, राष्ट्रीय जीवनात आणि प्रत्येक राष्ट्राच्या आशा जीवनात वाहून नेले जाऊ शकते असे सांगितले. कारण, एखादा धर्म माणसाला तो कुठेही असला तरी, तो कुठेही उभा असला तरी त्याला मदत करू शकत नसेल, तर त्याचा फारसा उपयोग नाही; निवडलेल्या काही लोकांसाठी तो केवळ एक सिद्धांत राहील.

Leave a Comment