स्वातंत्र्यदिन वर मराठी निबंध Essay On Independence Day In Marathi

Essay On Independence Day In Marathi भारताच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन हा एक महत्त्वाचा दिवस आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारतात स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा केला जातो. ब्रिटीश वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्यासाठी दीर्घ आणि कठीण संघर्षाचा कळस आहे. हा दिवस केवळ राष्ट्रीय सुट्टी नाही तर देशाचे सार्वभौमत्व सुरक्षित करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाची पवित्र आठवण आहे. स्वातंत्र्य दिन हा भारताला एक राष्ट्र म्हणून परिभाषित करणार्‍या मूलभूत मूल्यांचे प्रतिबिंब, उत्सव आणि पुनरुत्थान करण्याचा दिवस आहे.

Essay On Independence Day In Marathi

स्वातंत्र्यदिन वर मराठी निबंध || Essay On Independence Day In Marathi

स्वातंत्र्यदिन वर 100 शब्दांत मराठी निबंध || Essay on Independence Day In 100 Words :

दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारतातील स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यदिन दिवशी देशात सर्वत्र ध्वजारोहण होते. शाळा आणि सरकारी ठिकाणी तिरंगा फडकवला जातो. आणि राष्ट्रगीत गायले जाते. त्या दिवशी शाळा सरकारी ठिकाणी भाषणे होतात त्यातून राष्ट्राविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

यासोबतच हा दिवस साजरा करण्यासाठी शाळा, सरकारी कार्यालये, ग्रामपंचायत, अशा सरकारी ठिकाणी परेड होतात. या दिवशी पूर्ण भारतात सुट्टी असते. सर्व लोक भल्या पहाटे उठून, आवरून आनंद अंनाई उत्साहाने ध्वजारोहणासाठी सज्ज होतात. या दिवशी नदी लहान चार पाच वर्षांच्या मुलांपासून तर वयस्कर 70 – 80 वयाच्या लोकांमध्ये उत्साह असतो.

1947 मध्ये 15 ऑगस्ट या रोजी ब्रिटिश राजवटी पासून भारतात स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे स्वातंत्र्यातून बाहेर पडल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो या दिवशी देशभक्ती आणि आपल्या देशामध्ये प्रेम दाखवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती उत्साहाने स्वातंत्र्य साजरा करण्यास सहभागी होतो.

स्वातंत्र्यदिन वर 200 शब्दात मराठी निबंध || Essay on Independence Day In 200 Words :

स्वातंत्र्य दिन हा भारतातील एक महत्त्वाचा दिवस आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे त्या दिवशी पूर्ण भारतात राष्ट्रीय सुट्टी असते. 1947 मध्ये ब्रिटिश वसाहत आजचा अंत झाला आणि भारताला ब्रिटिशांच्या राजवटी पासून स्वातंत्र्य मिळाले.

त्यामुळे भारताच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरलेला आहे आणि यास खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून भारतात उत्साहाने साजरा केला जातो. बालकांपासून वृद्धापर्यंत प्रत्येक व्यक्ती उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करतो.

दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून दिवसाची सुरुवात होते देशभक्तीपर भाषणे होतात. पहाटे देशभक्तीची गाणे लावले जातात सर्व लोक लवकर उठतात. शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो. विद्यार्थी, गावातील नागरिक सर्वजण शाळेत उपस्थित राहतात. त्यांनतर तिरंगा फडकवला जात. यासोबतच गावातील शहरातील सहकारी स्थान समोर देखील ध्वजारोहण होते.

ध्वजारोहणाच्या वेळी ध्वजगीत म्हटले जाते. त्यानंतर राष्ट्रगीत म्हटले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम होतात. स्वातंत्र्याच्या वेळी ज्या महात्म्यांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले आणि स्वातंत्र्य चळवळीत योगदान देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याचे सर्वांचे स्मरण केले जाते, त्यांना श्रद्धांजली वाहिले जाते.

महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरू , सुभाषचंद्र बोस अशा लोकांच्या नेतृत्वाखाली 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. आज पर्यंत लोक या दिवसाचे महत्त्व सर्वजण जाणून आहेत आणि त्यामुळे आता प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य साजरा होतो.

 स्वातंत्र्य दिन हा दिवस ज्या स्वातंत्र्य वीरांनी आणि  सैनिकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यावर चिंतन करण्याचा आणि आपल्या आपल्याला ज्या कष्टाने स्वातंत्र्य मिळाले आहे त्या स्वातंत्र्याचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जबाबदाऱ्यांचे स्मरण करून देण्याचा दिवस आहे.

स्वातंत्र्यदिन वर 300 शब्दात मराठी निबंध || Essay on Independence Day In 300 Words :

दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिन हा भारताचा एक महत्त्वाचा उत्सव आहे. स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय उत्सव असून भारतात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा केला जातो.

दीडशे वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले वर्ष भारत हा भारताचा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला भारतरत्न सुटका मिळाली, ब्रिटिशांची राजवट संपली आणि भारत स्वतंत्र झाला. त्यामुळे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.

स्वातंत्र्य हे सहज मिळाले नाही असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा असाच संघर्ष आणि बलिदानानंतर 1947 मध्ये भारताला पारतंत्र्यातून मुक्ती मिळाली. अनेक स्वातंत्र्यवीर आणि प्राण गमावले, वैयक्तिक स्वार्थाने फक्त देशासाठी आपल्या सर्वस्व अर्पण केले.

महात्मा गांधी सारख्या नेत्यांनी पूर्ण भारतात एकत्र आणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीने सामान्य माणसात धर पेटवली तरुण बलिदानांनी स्वातंत्र्य चळवळीचा अजून प्रेरणा मिळाली असंख्य नावे आहेत जे स्वातंत्र्य चळवळीत सुवर्णक्षरात लिहिली गेली आहेत. त्यांच्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने स्वतंत्र राष्ट्र म्हणून सूर्योदय बघितला. प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट दिवस त्या स्वातंत्र्याचे स्मरण करून देतो.

स्वातंत्र्य दिन लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला जातो पंतप्रधान देशाची प्रगती आणि आव्हाने यावर प्रतिमेपुढे भाषण करतात. भारताचा राष्ट्रध्वज हाताच्या अस्मितेचे प्रतीक आहे या तिरंगा आहे भगवा पांढरा आणि हिरवा भगवा शांततेचे आणि हिरवा समृद्धीचे. पांढऱ्या पट्ट्यांमध्ये भाग्य असलेले अशोक चक्र हे चोवीस आरे असलेले आहे हे अशोक चक्र प्रगतीचा आणि कर्तव्याचे प्रतीक आहे.

स्वातंत्र्यदिन हा फक्त दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत मर्यादित नाही स्वातंत्र्य दिन हा भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. प्रत्येक शाळेत या दिवशी ध्वजारोहण होते सकाळी पहाटे लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण तयार होतात आनंदाने शाळेत येतात आणि ध्वजारोहण करतात ध्वजारोहण होताना फडकणाऱ्या तिरंग्याला सलामी देतात सर्व एकत्र मिळवून देतात आणि त्यानंतर राष्ट्रगीत करतात त्यानंतर लहान बालकापासून वृद्धापर्यंत लोक भाषणे देतात.

या भाषणांमध्ये भारताच्या प्रगतीचे स्वातंत्र्याच्या वेळेस स्वातंत्र्यवीर यांनी केलेल्या बलिदानाचे आणि प्रत्येकाच्या कर्तव्याचे स्मरण केले जाते. प्रत्येक व्यक्ती हा मनापासून उत्साहाने स्वातंत्र्य दिना सहभागी होतो.

स्वातंत्र्यदिन खऱ्या अर्थाने भारतासाठी एक उत्सव आहे आणि प्रत्येक व्यक्ती एका उत्सवाप्रमाणेच हा दिवस साजरा करतो. सांस्कृतिक कार्यक्रम होतात. सांस्कृतिक कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे दर्शन होते. स्वातंत्र्यदीन विविध पार्श्वभूमीची पर्वा न करता नागरिकांमध्ये देशभक्ती आणि एकतेची भावना निर्माण करतो.

लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि स्वातंत्र्य – भारताने जपलेल्या मूल्यांची आठवण करून देतो. म्हणूनच स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व भारताच्या इतिहासात आणि ते प्रतिनिधित्व करत असलेल्या मूल्यांमध्ये खोलवर रुजलेले आहे.

स्वातंत्र्यदिन वर 400 शब्दात मराठी निबंध || Essay on Independence Day In 200 Words :

दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारतात स्वातंत्र्यदिन साजरा होतो. 1947 मध्ये या दिवशी भारतास स्वातंत्र्य मिळाले. त्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस राष्ट्रीय सं म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि भारतात प्रत्येक ठिकाण हा दिवस उत्साहात साजरा होतो.

150 वर्षे ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले या काळात भारताला कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते आणि भारतातील प्रत्येक नागरिक पारतंत्र्यात होता. अनेक वर्ष स्वातंत्र्यवीर यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कष्ट घेतले त्याचे फळ 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचे घोषित केले आणि स्वतंत्र राष्ट्राचा जन्म झाला.

15 ऑगस्ट हा भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. स्वातंत्र्यासाठी भारताच्या कठोर संघर्षाची एक प्रगल्भ आठवण आहे. या दिवशी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांकडून राष्ट्रध्वज फडकावून दिवसाच्या उत्सवाची सुरुवात होते. त्यांचे भाषण देशाच्या प्रगतीचे प्रतिबिंबित करते आणि पुढील आव्हानांची रूपरेषा देते.

देशभरातील शहरे आणि गावांमध्ये साजरा केला जातो. प्रत्येक शाळेत ध्वजारोहन करून, द्वाजगित आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक, नागरिक उपस्थित राहतात. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात. भाषणे होतात.

भाषणांमधून स्वातंत्र्यवीरांची आठवण केली जाते देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिले जाते. यासोबतच शासकीय कल्याण कार्यालय समोर देखील स्वातंत्र्यदिन साजरा होतो. सोहळ्याला मान्यवर, शासकीय अधिकारी, नागरिक उपस्थित असतात.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून उदयास आले. स्वातंत्र्य दिन हा प्रादेशिक भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेच्या पलीकडे जाऊन आणि देशभक्तीची भावना वाढवतो. केवळ एक उत्सव नाहीये हा भारताची मूळ मूल्य आणि अदर्षांना मूर्त रूप देण्याचा दिवस आहे.

या दिवशी लाल किल्ल्यावर सरकारी लष्कर परेड होते आणि भारताच्या लष्कर आणि वायू दलाचे शक्तिप्रदर्शन होते. हे सर्व कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित केले जातात. भारतीय नागरिक हे कार्यक्रम उरसहने बघतात. फक्त दिल्लीतच नाही गावातील आणि शहरातील शाळेत देखील विद्यार्थी परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात भारतीय संस्कृतीचे सादरीकरण केले जाते. भारत देश ज्या विविधतेने नटलेला आहे ती विविधता साजरी होते.

स्वातंत्र्यदिन दिवस स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे आणि सार्वभौम राष्ट्राच्या जन्माचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवला जातो रंग हा त्याच्या पांढऱ्या रंगातून शांतता,  हिरव्या रंगातून समृद्धी आणि भगव्या रंगातून धैर्य दर्शवतो पांढऱ्या रंगात असलेले अशोक चक्र हे एकात्मता आणि भारताच्या अस्मितेला आकार देणाऱ्या मूल्यांची आठवण करून देतो.

भारतातील स्वातंत्र्य दिन हा एक असा दिवस आहे जो देशाच्या इतिहासाचे सार, त्याची मूल्ये आणि भारतीय नागरिकांच्या आत्म्याचा अंतर्भाव दर्शवतो. हा अभिमान, कृतज्ञता आणि वचनबद्धतेचा दिवस आहे. तिरंगा ध्वज वाऱ्यावर फडकत असताना, तो कठोर संघर्षाने प्राप्त केलेल्या स्वातंत्र्याची आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो.

भारताच्या स्वातंत्र्याचा वारसा जिवंत आहे, जो तेथील नागरिकांमध्ये एकता आणि देशभक्तीची भावना निर्माण करतो. स्वातंत्र्यदिन ही केवळ ऐतिहासिक घटना नाही; प्रगती, लोकशाही आणि राष्ट्राची अनोखी ओळख जपण्याचा हा अखंड प्रवास आहे.

निष्कर्ष || Conclusion : 

स्वातंत्र्यदिन फक्त सामान्य दिवसापेक्षा खूप विशिष्ट आहे. हा चिंतन कृतज्ञता आणि वचनबद्धतेचा दिवस आहे. प्रत्येक भारतीयाच्या भावना या दिवसास जोडलेल्या आहेत.   

स्वातंत्र्यदिन उत्सव भारतात प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेच्या पलीकडे जाऊन, एकता आणि देशभक्तीची भावना वाढवतात. स्वातंत्र्यदिन  भारताच्या स्वातंत्र्याचा वारसा पुढच्या पिढ्यांसाठी जिवंत राहील याची खात्री करून, कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याची आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. भारतीयांसाठी स्वातंत्र्य दिन प्रत्येक ऐतिहासिक घटना नसून प्रगती, लोकशाही आणि राष्ट्राची अनोळखी ओळख जपणाऱ्या अखंड प्रवासाचे प्रतीक आहे.

ज्या एकतेचा भावनेवर भारत घडला आहे त्याचे आणि देशाच्या मूलभूत मूल्यांचे समर्थन करून ते जोपासण्याचे प्रतिज्ञाचे नूतनीकरणाचा हा दिवस आहे. अगदी शिक्षित ते सुशिक्षित, गरीब ते श्रीमंत, गाव ते शहर अशा प्रत्येक ठिकाणी हा दिवस उत्साहाने साजरा होतो. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदलेला हा दिवस हा भारतीयांच्या मनात रुजलेला आहे आणि हा असाच चिरायू राहील हे नक्की!

Leave a Comment